मागील भागात.
“का?” रावी तिरकस हसत बोलली. “मिरची लागली ना? खरं बोलली तर.”
“जास्तीच बोलायची काही गरज नाही,” दुसरी मुलगी “जिंकला नाहीत ना मग निघा आता.”
“आम्ही चाललोच होतो,” रावी “ते काही लोकांना काहीतरी सांगायचं होत.”
तश्या त्या मुली रावीला अजून रागात बघू लागल्या. यावर रावी हलकीच हसत जाऊ लागली.
“युझलेस,” पहिली मुलगी चिडून बोलली. “सावत्र बहिणीच्या जीवावर उडते फक्त.”
तशी पुढे जाणारी परत जागीच थांबली. ते बघून मनालीने परत डोळे मिटून घेत एक दीर्घ श्वास घेतला.
“गप ना,” पाचवी मुलगी “कशाला तिच्या मागे लागते. एकतर तिला आणि तिच्या भावांना डोक कमी आहे.”
बास, हे वाक्य जस तिच्या कानावर गेल तस तिने बाजूला असलेली बादली उचलली आणि सरळ त्या उभ्या असणाऱ्या मुलींच्या अंगावर टाकली.
त्या बादलीमध्ये सिमेंट आणि माती एकत्र करून कालवलेल मिक्स्चर होत. ते सगळ त्यां मुलींच्या अंगावर आणि केसांवर उडाल.
हे सगळ रावी पण डोळे विस्फारून बघत राहिली.
आता पूढे.
कारण हा सगळा पराक्रम मनालीने केला होता. तिच्या भावांमध्ये आरुष पण येत होता आणि तो तिच्या मनात वसला गेला होता. त्याच्याबद्दल अस काही ऐकून मनालीचा राग का अनावर झाला? हे तिलाही समजल नाही आणि तिने कसलाही विचार न करता हे अस करून ठेवलं होत.
बाकी त्या मुली लगेचच स्वतः अंग झटकू लागल्या. केस मोकळी सोडून ते ही झटकू लागल्या.
“बावळट आहेस का?” पाचवी मुलगी तिच्या मैत्रिणीकडे बघत चिडून बोलली.
“त्यांना घेऊन गपचूप निघायचं,” मनाली अगदीच चिडून बोलली. “नाहीतर तुम्ही आता जे काही बोललं आहे ते तर रेकॉर्ड केल आहेच. पण गेम खेळताना मला पडायचा जो तीन चार वेळा प्रयत्न केला ना त्याची पण व्हिडीओ आहे."
तश्या त्या पाचही मुली स्वतःला झटकायच विसरून मनालीकडे डोळे विस्फारून ब्बघू लागल्या. त्यांना वाटल होत की त्यांची चीटिंग कोणाला समजणार नाही. पण ते तर व्हिडीओ देखील रेकॉर्ड झालेलं त्यांना समजलं.
“त्यांच्या मागे लागून तू पण वेडी झाली आहेस.” पहिली मुलगी तावातावात बोलली.
“निघते का?” आता रावी पण चिडून बोलली. “का घालू बादली डोक्यात.” रावी मनालीच्या हातातली बादलीला हात लावत बोलली.
तश्या त्या मुली पटकन तिथून पळून गेल्या. त्यांना जाताना बघून मनालीने एक सुस्कारा सोडला. तिने रावीवर नजर टाकली तर ती तिलाच बघत असल्याचे मनालीला दिसले.
“आता काय?” मनाली
“तू कधीपासून माझ्यासारखी वागायला लागलीस?” रावी तिच्या भुवया उंचावत विचारू लागली. “की दादाला बोलल्या म्हणून तू...” रावी बोलता बोलता थांबली. कारण मनाली तिला आठ्या पाडून बघत होती.
पण त्या आठ्या काहीच क्षणच राहू शकल्या आणि तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज चढली. तशी रावी उत्साहात येत परत तिला चिडवू लागली.
“तुमच झाल की जरा त्या बाजूला या.” अचानक परीचा आवाज आला.
तश्या त्या दोघी दचकून गपचूप उभ्या राहिल्या.
रावी चिडायला लागली की पहिला निरोप परीजवळ पोहोचवला जात होता. पण ह्या वेळेस तो निरोप पोहोचायला जरा उशीर झाला. आताही रावी आणि मनाली गपचूप परीच्या मग्गे मागे चालू लागल्या आणि त्या तिघी कॉलेजमध्ये असणाऱ्या एका मोकळ्या कोपऱ्यात जाऊन पोहोचल्या.
परीने मागे वळून हातची घडी घातली. तर त्या दोघी त्यांच्या माना खाली घालून उभ्या राहिल्या.
“काय तिच्या सोबत राहून तू पण तुझी बुद्धी फिरायला पाठवली काय?” परी मनालीजवळ जात बोलली. कारण तिचा स्वभाव अगदीच शांत होता. चिडलेल्या रावीला ती नेहमीच सावरून घ्यायची. पण आजच तिचं वागण अगदीच अनपेक्षित होत. “काय गरज होती ती बादली उचलून फेकायची?”
“मला दुसर काही भेटलं नाही.” मनाली तिचं तोंड वाकड करत बोलली.
“पण त्या तर तिच्या भावांना बोलल्या ना,” परी मनालीला चिडून विचारू लागली. “तुझा काय सं... बं..... ध?” बोलता बोलता शेवटी परी शांत झाली. कारण आता तिच्या डोक्यात पण प्रकाश पडला आणि ती कमरेवर हात ठेवून मनालीकडे बघू लागली.
ते बघून मनालीने तिची नख खायला सुरवात केली.
“रावी तू जा बरं इथून.” परी रावीकडे बघत बोलली.
“का?” रावी नाटकी आवजात विचारू लागली. “माझी बेस्ट फ्रेंड आहे ती.”
“असू दे,” परी कडक आवजात बोलली. “आता जा. हवं तर कॉलेजच्या गेटवर तिची वाट बघ.”
तस रावीने मनालीवर नजर टाकली. तर मनाली तिला हळूच मान हलवत नको जाऊ चा इशारा करू लागली. पण परीचा शब्द मोडणे रावीला जमतच नव्हत. तिनेही इशारतच मनालीचा बेस्ट ऑफ लक केल आणि तिथून चालली गेली. तिथे आता फक्त मनाली आणि परी होती.
“बोला मॅडम,” परीने परत हाताची घडी घातली. "अश्या काही सेकंदात प्रेमात पडता येत का?”
“तस नाही मॅम.” मनाली आता पूर्ण घाबरून गेली. कारण तिला सांभाळून घेणारी तिची मैत्रीण तिथून निघून गेली होती.
“आता का घाबरली?” परीचा आवाज अजूनही कडकच होता. “त्या मुलींवर बादली उलटी करताना बरी घाबरली नाहीस.”
“त.. हा. ते” मनाली खूपच गडबडायला लागली. “माहित नव्हत मला की त्या उभ्या आहेत आणि मी त्यांना बादलीवर टाकल.”
आता परी मनालीला विचित्र नजरेने बघू लागली. “काय झाल?”
तस मनालीने स्वतःच्या डोक्याला हलकेच चापट मारली. “त्या बादलीत काय होत ते माहित नव्हत मला.” ती स्वतःला सावरत बोलली.
“त्याच उत्तर नकोय मला.” परी त्याच्या आधीचा प्रश्न, त्याच उत्तर हवं आहे.”
“क... को.. कोणता प्रश्न?” मनाली
“अगं बाई इतकी घाबरशील तर कस व्हायचं?” परीने डोक्याला हात लावला. “त्याला एकदम डॅशींग मुली आवडतात. तू जर त्याच्यासमोर पण घाबरलीस तर तो तुला उभ पण करणार नाही.”
“क.. कोण?” मनालीला आता घाम फुटायला लागला. शेवटी परी त्यांची शिक्षक होती. तिच्यासमोर तरी ती कस काही बोलणार होती?
मग परी तिच्या जवळ गेली. तिला बाजूच्या एका बेंचवर बसवून तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. आधी तिला शांत केल.
मग परी तिच्या जवळ गेली. तिला बाजूच्या एका बेंचवर बसवून तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. आधी तिला शांत केल.
“घाबरू नकोस.” परी “तुझ्या टीचर सोबत तुझ्या बेस्ट फ्रेंडची बहिण पण आहे ना?” परी तिच्याकडे प्रेमाने बघत बोलली. “मग जशी ती माझ्यासाठी माझी लहान बहिण आहे तशीच तू सुद्धा माझ्यासाठी लहान बहिणच झाली ना.”
“नन. ना.. नाही.” मनाली अचानक बोलली. “तुम्ही माझ्या बहिण कश्या होऊ शकता? नका ना होऊ.”
आता मात्र परी खळखळून हसायला लागली. “अच्छा, म्हणजे तो पण तुझा भाऊ होईल म्हणून का?”
तशी मनाली अजूनच गडबडली. “त.. तस.. नाही मॅम.” मग ती मनात बोलू लागली. ‘बहुतेक तू आज मार खाऊनच रहाणार आहेस.’
“धर पाणी पी.” परीने तिच्यासमोर तिच्याच बॅगेतून पाण्याची बाटली काढली आणि तिला पाणी प्यायला दिल.
मनालीने एका दमात ती पाण्याची बाटली रिकामी केली. तिने स्वतःला शांत केल. दोन तीन वेळा दीर्घ श्वास घेतला आणि परीवर एक नजर टाकली.
“अस एका दिवसाच काही नव्हत मॅम,” मनालीने बोलायला सुरवात केली. “रावी सोबत आल्यापासून, म्हणजे तिने जेव्हा त्यांची ओळख करून दिली होती ना तेव्हापासून. पहिले मला वाटलं की फक्त आकर्षण आहे. पण जस रावीकडून त्याची माहिती मिळाली तस त्याच्याकडे ओढ वाटू लागली. पण मग आठवलं की तो तर माझ्या बेस्ट फ्रेंडचा भाऊ आहे. मग तिला कस वाटेल की फ्रेंडच्या भावावरच..” ती बोलता बोलता मधेच थांबली.
नंतर परत बोलू लागली. “म्हणून रावीला पण मी कधीच काही बोलली नाही. आताही ती इथे असती तर मला बोलता आल नसत. कारण मला तिची मैत्री गमवायची नाहीये. सगळ्यांना ती खडूस वाटते. पण ती तशी नाहीये आणि राहिली गोष्ट त्याची तर आज जसा त्याचा हात काही सेकंदात हात पुढे आला ना ते बघून माझा हात पण लगेच पुढे गेला. एक विश्वास वाटला मला की मी देऊ शकते. त्या वेळेस माझ्या डोक्यात दुसर काहीच येत नव्हत....”
ती परत बोलता बोलता थांबली. कारण तिच्या खांद्यावर मागच्या बाजूने एक हाताचा विळखा पडला होता. जो रावीचा होता.
“लव्ह यु बेबी.” रावी खूपच प्रेमाने बोलली.
परीने तिला जरी जायला लावलं होत. तरी ती त्यांच्यापासून थोड लांब जाऊन एका भिंतीच्या आडोश्याला लपली होती. जस मनालीच वाक्य तिच्या कानी पडले. तस तिला रहावलं गेल नाही आणि ती सरळ धावत येऊन मनालीच्या गळ्याला स्वतःच्या हाताचा हार करत तिला मिठी मारली.
“तुला मी जायला लावलं होत ना?” परीने रावीचे हलकेसे कान ओढले.
“माझी बेस्ट फ्रेंड आहे ती.” रावी तोऱ्यात बोलली. “तिला मी सोडू नाही शकत.” रावीने मनालीला मारलेली तिची मिठी अजून घट्ट केली.
“माझी बेस्ट फ्रेंड आहे ती.” रावी तोऱ्यात बोलली. “तिला मी सोडू नाही शकत.” रावीने मनालीला मारलेली तिची मिठी अजून घट्ट केली.
त्यांची ती मैत्री बघून परीने हलकसं हसत नकारार्थी मान हलवली.
“एक मिनिट,” रावी मनालीची मिठी सोडून तिच्या बाजूला बसली. “तुला आरुष दादा आधीपासून आवडतो? मग मला सांगितल का नाहीस?” आता ती थोडी चिडून बोलली.
“बोलली ना तेव्हा,” मनाली पण कपाळवर आठ्या आणत बोलली. “जे तू गपचूप ऐकलस.”
“चला मी आता आराध्या मावशीसोबत बोलायला मोकळी.” परी एक सुस्कारा सोडत बोलली.
परीच्या वाक्यावर मनालीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आल.
“तुझ्या होणाऱ्या सासूबाई गं.” रावी खट्याळ होत बोलली.
ते ऐकून मनाली अजूनच घाबरली. “आता लगेच काही नका ना बोलू मम.” मनाली विनंती करत बोलली. “अजून आमच बोलण पण झाल नाही.”
“ते काय?” रावी “ते लगेच मी करून देते की.”
“म.. मी चालली.” मनाली अजूनच अस्वस्थ झाली.
“का गं?” परी “काय झाल? तुला त्याच्याशी बोलायचं नाहीये का?”
“तस नाही,” मनाली रावीकडे वैतागून बघत बोलली. “ही नुसतीच चिडवत राहील.” मनालीने तिची बॅग उचलली.
“हम्म ते पण आहे.” परी विचार करत बोलली. “मी सांगते त्याला तुझी भेट घ्यायला.”
तशी मनालीच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज पसरली आणि ती ठीक आहे बोलून तिथून जाऊ लागली.
“बरोबर आहे,” आता रावीची नौटंकी चालू झाली. ‘पाहिलं का दी. आता कोणीतरी कोणालातरी भेटलं आहे तर माझी गरजच नाही कोणाला.”
तशी पुढे जाणारी मनाली जागेवरच थांबली आणि मागे वळून रावीला आठ्या पाडून बघू लागली. “चिडवणार नसशील तरच सोबत चल.”
“खात्री नाही देणार.” रावी पटकन तिच्याजवळ पळत जात बोलली. “जर तू माझ्याकडे दुर्लक्ष केलास तर.”
“नाही करणार,” मनाली “तुझ्यासाठी मी कोणालाही सोडू शकते.”
“दादाला पण?” रावी परत सुरु झाली.
तस मनालीने कमरेवर हात ठेवून तिच्याकडे रोखून पाहिले. “हो.” मनाली ठसक्यात बोलली आणि पुढे चालू लागली.
“अरे सॉरी ना.” रावी परीला बाय करत मनालीच्या मागे पळत बोलली. “पहिल्यांदाच दादाला कोणीतरी आवडली आहे. तिला बरं मी काही बोलेल.”
इतक्यात पुढे जाणारी मनाली पटकन रावीजवळ आली आणि तिचं तोंड दाबून धरल. “बावळट, पूर्ण कॉलेजला सांगायचं आहे का?” मनालीच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होत. “बोल ना आता.” ती अजून चिडून बोलली.
तस रावीने स्वतःच्या हाताने तिचा हात स्वतःच्या तोंडावरून काढला. “तोंडावर हात ठेवून बोल की बोल म्हणून.” रावी वैतागून बोलली.
“उप्स..” मनाली हलकीशी हसत बोलली. “सॉरी. पण आता हळू बोल.”
तेव्हा कुठे दोघी जणी हळू हळू गप्पा मारत कॉलेजच्या बाहेर पडल्या. दुसरीकडे परी पण तिच्या कामाकडे गेली.
तेव्हा कुठे दोघी जणी हळू हळू गप्पा मारत कॉलेजच्या बाहेर पडल्या. दुसरीकडे परी पण तिच्या कामाकडे गेली.
जशी तिची आजची काम आटोपली तस तेजश्री आणि सुजाता परीजवळ आल्या आणि त्यांची झालेली प्रॅक्टिस बघायला तिला बोलावू लागल्या. असही काम आटोपली होतीच मग परी तेजश्रीसोबत जायला निघाली. तेजश्रीने ह्या स्पोर्ट्सच्या दिवसात त्यांच्या वर्गातच बेंच बाजूला करून तिथेच डान्सची प्रॅक्टिस केली होती. आत्ताशी तर अर्धाच डान्स बसवून झाला होता.
मग परीचा पुढचा अर्धा तास तेजश्री आणि त्यांच्या ग्रुपचा डान्स बघण्यात आणि त्यातल्या चुका दुरुस्त करण्यात गेला. ते झाल्यावर परी घरी जायला निघाली. मग तिला आठवलं की तिला तर रावी घेऊन आली होती. मनाली आणि आरुषच्या नादात दोघी जणी ती गोष्ट विसरून गेल्या. आता परीला सर्वात जास्त टेन्शन विजयच आल होत. त्याला जेव्हा समजेल की ती एकटीच घरी आली तर तो तिच्यावर नक्कीच ओरडणार होता.
परी कॉलेजच्या गेट बाहेर आली. संध्याकाळ झाली होती. बरीचशी मुल घरी निघून गेली होती. तिथला बराचसा स्टाफ देखील निघून गेला होता. तिथे आता फक्त शिपाई होते. आता तो रस्ता चांगलाच वर्दळीचा असल्याने तिथून जायला काही वाटणार नव्हत. पण मुख्य रस्ता सोडल्यावर नंतरचा रस्ता जरा सुनसान राहायचा. तिथे माणसांची ये जा खूपच कमी प्रमाणात होती.
हा सगळ विचार करत परी रिक्षाची बघू लागली. टेन्शनमध्ये तिला कोणाला फोन करून बोलवावं हे देखील कळलं नव्हत.
“मॅम गेल्या नाही अजून.” परीला मागून आवाज आला.
तस परीने मागे वळून पाहिलं तर तेजश्री आणि तिचा ग्रुप होता जो घरी जायला निघाला होता.
“अम्म हो,” परी परत रस्त्यावर रिक्षाला हात करत बोलली. “आज गाडी घरी राहिली.”
तेजश्री काही बोलणार तोच एक दोन रिक्षावाले थांबले देखील होते. पण परीने पत्ता सांगितल्यावर त्यांनी तिकडे जायला सरळ नकार दिला होता.
“मॅम,” तेजश्री जरा चाचरत बोलली. “तुमची हरकत नसेल तर दादा येत आहे. त्याला मी सांग...” बोलता बोलता तेजश्री शांत झाली.
कारण परी तिला आठ्या पाडून बघायला लागली होती.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा