Login

अवनी एक प्रवास भाग ४९

परीच हसण बघून लांबून येणारा तुषार लागलीच त्यात हरवला गेला. तो एवढा हरवला की त्याला त्याचा गबाळ्या अवतारच देखील भान राहील नाही. बाईक चालवता चालवता एका माणसाला खेटून बाईक गेली आणि त्या माणसाने तुषारचा त्याच्या भाषेत उद्धार केला. तेव्हा कुठे तुषार तिच्या हसण्यातून बाहेर आला.मग त्याला त्याचा अवतार आठवला आणि त्याने लागलीच त्याची बाईक थांबवली.
मागील भागात.

परी कॉलेजच्या गेट बाहेर आली. संध्याकाळ झाली होती. बरीचशी मुल घरी निघून गेली होती. तिथला बराचसा स्टाफ देखील निघून गेला होता. तिथे आता फक्त शिपाई होते. आता तो रस्ता चांगलाच वर्दळीचा असल्याने तिथून जायला काही वाटणार नव्हत. पण मुख्य रस्ता सोडल्यावर नंतरचा रस्ता जरा सुनसान राहायचा. तिथे माणसांची ये जा खूपच कमी प्रमाणात होती.

हा सगळ विचार करत परी रिक्षाची बघू लागली. टेन्शनमध्ये तिला कोणाला फोन करून बोलवावं हे देखील कळलं नव्हत.

“मॅम गेल्या नाही अजून.” परीला मागून आवाज आला.

तस परीने मागे वळून पाहिलं तर तेजश्री आणि तिचा ग्रुप होता जो घरी जायला निघाला होता.

“अम्म हो,” परी परत रस्त्यावर रिक्षाला हात करत बोलली. “आज गाडी घरी राहिली.”

तेजश्री काही बोलणार तोच एक दोन रिक्षावाले थांबले देखील होते. पण परीने पत्ता सांगितल्यावर त्यांनी तिकडे जायला सरळ नकार दिला होता.

“मॅम,” तेजश्री जरा चाचरत बोलली. “तुमची हरकत नसेल तर दादा येत आहे. त्याला मी सांग...” बोलता बोलता तेजश्री शांत झाली.

कारण परी तिला आठ्या पाडून बघायला लागली होती.

आता पुढे.

“मॅम प्लीज.” तेजश्री आता विनंती करत बोलली. “दादाने मला सांगितलं आहे सगळ. प्लीज एकट्या जाऊ नका.”

ते ऐकून परीला जरा टेन्शनच आल. पण दुसरा काही उपाय नसल्याने ती थांबायला तयार झाली.

तिकडे तेजश्रीला घ्यायला जायचं म्हणून तुषार त्याच्या साध्या कपड्यातच कॉलेजला यायला निघाला. त्याने फक्त त्याचे केस विंचरले होते. बाकी त्याचा अवतार जरा गबाळा होता. दोन दिवस परी दिसणार नाही म्हणून त्याचा मूड खराब होता. म्हणून त्याने त्याच बाकी काही आवरलं नव्हत.

तो त्याच्या त्याच्या धुंदीत कॉलेजकडे यायाला निघाला.

“तेजश्री त्याला यायला वेळ लागेल का?” परी तिचं घड्याळ बघत बोलली. कारण आता कोणत्याही क्षणी तिच्या वडिलांचा आणि बंधू मंडळींचा तिला फोन येणार होता.

“नाही,” तेजश्री “पोहोचेलच आता. मला घ्यायला यायचं म्हणजे त्याची बाईक हवेशी गप्पा मारते.” तेजश्री हलकीशी हसत बोलली.

“म्हणजे त्यालाही बाईक जोरात चालवायला आवडते का?” परीच्या कपाळावर आठ्या चढल्या. “माझ्या भावांना त्याने तर अस जोरात चालवायला शिकवलं नाही ना?”

“दादा त्यांना भेटण्याआधी त्या सगळ्यांना बाईक चालवता येत होती. “आता तेजश्री पण जरा चिडूनच बोलली.

तस परीला जरा हसायला आल. “भावावर खूप जीव असतो ना बहिणींचा. जरा काही ऐकून घेत नाही.”

“ते तुमच्याकडूनच शिकली आहे.” तेजश्री लगेच बोलून गेली.

तशी परी अजूनच हसू लागली. कारण त्यांच बंधू प्रेम पूर्ण कॉलेजला माहिती होत.

परीच हसण बघून लांबून येणारा तुषार लागलीच त्यात हरवला गेला. तो एवढा हरवला की त्याला त्याचा गबाळ्या अवतारच देखील भान राहील नाही. बाईक चालवता चालवता एका माणसाला खेटून बाईक गेली आणि त्या माणसाने तुषारचा त्याच्या भाषेत उद्धार केला. तेव्हा कुठे तुषार तिच्या हसण्यातून बाहेर आला.

मग त्याला त्याचा अवतार आठवला आणि त्याने लागलीच त्याची बाईक थांबवली. त्याने परत पाहिलं तर तेजश्री सोबतच परी उभी होती. आता त्याला परीसमोर ह्या अवतारात जायला खूपच लाज वाटू लागली. पण त्याला तरी काय माहिती होत की त्याला फक्त तिच्या समोर जायचं नाही तर तिला थेट तिचं घरी पण सोडायचं आहे.
तुषार एका दुकानाच्या आडोश्याला लपला आणि त्याने तेजश्रीला फोन लावला.

इकडे तेजश्री आणि परीच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. त्यात तेजश्रीचा फोन वाजला. तिने पाहिलं तर तो तुषारचा होता. तिने तो लागलीच उचलला.

“दादा,” तेजश्री आता जरा वैतागून बोलली. कारण खरचं उशीर होत चालला होता. “कुठे आहेस रे?” नंतर ती जरा बाजूला जात हळूच बोलू लागली. “लवकर ये, तुझ्यासाठी सरप्राईज आहे.”

“माझा गबाळा अवतार तुमच्या मॅमला दाखवायचा ना?” तुषार जरा चिडून बोलला.

तशी तिकडे तेजश्री गोंधळून गेली.

“तू इकडे चालत ये,” तुषार “मी तिच्यासमोर अश्या अवतारात जाणार नाही.”

“त्यांच्यासमोर?” तेजश्री आता जरा टेन्शनमध्ये आली. “त्यांना घरी सोडायचं आहे. त्यांची स्कुटी आज घरी राहिली.”

आता तुषारला त्यातलं गांभीर्य समजून आलं. स्वतःच्या अवतारापेक्षा त्याला परीची सुरक्षा जास्त महत्वाची वाटली आणि तो सरळ त्याची बाईक काढून त्यांच्याजवळ आला.

पहिले तर परीने त्याला ओळखलच नाही. तो दुसरच कोणतरी आहे म्हणून तिने तिची नजर आलेल्या बाईकवाल्यावरून फिरवून घेतली.

“मॅम चला तुम्ही.” तुषारला आलेलं बाग्घून तेजश्री बोलली.

तेजश्रीच बोलण ऐकून परी तिला गोंधळून बघू लागली.

“हा काय दादा आला.” तेजश्रीने समोरच्या बाईकवाल्याकडे इशारा करत सांगितलं.

तशी परी त्याला डोळे विस्फारून बघू लागली. कारण तिने आजवर त्याला फक्त टाईट टी शर्ट, जीन्सची पँन्ट त्यावर एक ट्रेकच जकेट यावरच पाहिलं होत आणि आताचा तुषारचा अवतार बघून परीला हसायलाच आल. तिने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला आणि दुसरीकडे तोंड करून हलकसं हसून घेतलं.

ते तुषारने पाहिलं होत पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केल. कारण हे अस होणार हे त्याला माहिती होत. पण तो फक्त तिच्यासुरक्षेसाठी आला होता.

परीने तिचं हसू थांबवलं आणि तुषारच्या मागे जाऊन बसली. आता तेजश्री आणि सुजाता परीला आ वासून बघू लागल्या होत्या. कारण त्यांना वाटल होत की परीला बाईकवर बसवण्यासाठी अजून मनवाव लागेल का काय? पण परी काहीच न बोलता बसली ते बघून त्यांना आश्चर्यच वाटल होत.

“पण मग तू कशी जाशील?” परीने तेजश्रीला विचारलं.

“त.. ते हा,” तेजश्री काहीतरी आठवत बोलली. “सुजाताने आज गाडी आणली आहे. तिला सांगते सोडायला.”

“पण तू ते तुझ्या दादाला बोलावलं होत ना तुला घ्यायला.” परी विचार करत बोलली.

आपली चोरी पकडली गेली का काय? असा तेजश्रीच्या चेहऱ्यावर भाव होता आणि आपली मैत्री अश्याच वेळेस तर आपल्यासाठी धावून येते ना? तसच आताही झाल. तेजश्री पुढे काही बोलेल तोच सुजाता बोलली.

“तिला माझ्या ड्राईव्हींगवर विश्वासच नाही.” सुजाता तिचं तोंड वाकड करत बोलली.

ह्यांच बोलण तेजश्रीचा बाकीचा ग्रुप पण ऐकत होता. पण ते तेजश्री आणि सुजाताला विचित्र नजरेने बघत होता. त्यांना समजतच नव्हत की त्या दोघींचं नक्की काय चालू आहे?

“चालायचं?” आपल्या बहिणीच्या गप्पांना वैतागून तुषारने परीला विचारलं.

तस परीने बाकीच्यांना निरोप दिला आणि तुषारला निघण्यासाठी सांगितलं.

तिकडे रावी तिच्याच तंद्रीत तिच्या घरी जाऊन पोहोचली. घरात तर फक्त आज्जी होती. ती सध्या झोपलेली होती. मग ती तिच्या खोलीत गेली आणि फ्रेश झाली. त्यानंतर तिने किचनमध्ये पाहिलं तर जे काही बनवून ठेवलं होत ते तिने वाढून घेतलं आणि ते खात बसली. खातानाही तिचं मोबाईलमध्ये बघण चालूच होत.

काही वेळ झाला नाही तोच तिचा मोबाईल तिथून गायब झाला. तशी रावी गोंधळून इकडे तिकडे बघू लागली. मोबाईल पडला का काय? हा विचार करून ती खाली बघू लागली. खाली बघताना तिला तिच्या बाजूला अजून दोन पाय दिसले. तस तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले.

“काय गं आजी?” रावी गाल फुगवून बोलली. “किती घाबरली मी?”

“म्हणजे मी भूत दिसते का?” रुद्रची आई कपाळवर आठ्या पाडून बोलली.

“तस नाही गं,” रावी “म्हटलं मोबाईल मला न सांगता कुठे गेला. तू तर जान आहेस माझी. तुला का मी घाबरू?”

“जेवताना कशाला लागतो तुम्हाला मोबाईल?” रुद्रची आई चिडून बोलली. “काय खाल्ल ते तरी समजत का?”

‘हो,” रावी तोऱ्यात बोलली. “हे काय भाजी आणि चपाती.”

“आणि किती खाल्लीस?” रुद्रची आई कमरेवर हात ठेवून विचारु लागली.

“दोन चपात्या खाल्ल्या.” रावी तिचे दोन बोट दाखवत बोलली.

“बरं मग काल काय खाल्ल होत?” रुद्रची आई

“काल ना,” रावी चपातीचा एक घास तोडत बोलली. “अम्म्म काल ना..” ती आता घास हातातच ठेवून विचार करू लागली.

“नाही आठवत ना?” रुद्रची आई हलकसं हसून बोलली. “म्हणून खाताना तरी मोबाईल हातात घ्यायचा नसतो. जे खाल्ल ते समजतच नसेल तर ते अंगाला तरी कस लागेल?”

“बरं,” रावीने लगेच नमत घेतलं. “आता नाही घेणार.”

एवढं बोलून रावी जेवण करू लागली. तिची आज्जी पण तिच्याच बाजूला बसली आणि तिच्या नातीला बघू लागली.

रावीचा चेहरा बघता बघता रुद्रच्या आईला रावीच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक जाणवली. अशीच चमक तिला तिचा आधीचा बॉयफ्रेंड राकेश असताना जाणवली होती. मग रुद्रची आई परत टेन्शनमध्ये आली. तिची ही नात परत कोणाच्या प्रेमात तर पडली नाही ना? हा विचार तिच्या मनात घोळू लागला. शेवटी न राहवून रुद्रच्या आईने रावीला विचारलेच.

“आज काय विशेष?” रुद्रची आई “चेहरा आज खूपच खुललेला दिसत आहे.”

आज्जीच्या ह्या बोलण्याने रावीला आरुष आणि मनाली आठवली. तसा तिचा चेहरा अजूनच उजळला आणि ती आज जे काही झाल ते तिच्या आज्जीला सांगू लागली.

ते सगळ ऐकून मनातली शंका दूर झाल्याने रुद्रच्या आईच्या जीवाला जरा शांती मिळाली.

“म्हणजे तुमच्यातली पहिली विकेट पडली तर.” रुद्रची आई खळखळून हसत बोलली.

“पहिली नाही आज्जी,” रावी तिचं हसू दाबत बोलली. “ही तर दुसरी आहे.”

“मग पहिली कोणाची?” रुद्रची आई परत टेन्शनमध्ये आली.

“पहिली माला दीची.” रावी तिचं जेवण संपवत बोलली.

“काय?” रुद्रच्या आईला जरा आश्चर्यचं वाटल. “तिची कशी काय?”

“तो प्रसाद दादा नाही का? राज दादाचा मोठा भाऊ,” रावी तिला माहिती पुरवत बोलली. “त्याला ती आवडली आहे. बघू प्रयत्न चालू आहेत.”

“हम्म,” रुद्रची आई हलकसं हसत बोलली. “एकदा तुम्हां मुलांचे संसार मार्गी लागले की आम्ही मोकळे.”

“पण मग दीच टेन्शन आहे ना.” रावी तिचे ओठ बाहेर काढत बोलली.

“तिचं पण होईल गं,” रुद्रची आई “तो वर बसला आहे ना, त्याने पण तुमच्या दीसाठी कोणीतरी बनवला असेल. काही गोष्टी उशिरा मिळतात. पण जेव्हा त्या मिळतात ना त्या सगळ्यात बेस्ट असतात.”

“आय होप,” रावी वर बघत बोलली. “दी साठी पण असाच बेस्ट राजकुमार यावा.”

तिचं बोलण ऐकून रुद्रची आई हलकीशी हसली. “पण आहे कुठे तुझी दी, बरेच दिवस झाले ती आली नाही घरी.”

आता रावीच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तिच्या चेहऱ्यावर बारा वाजले. तिचा असा बदलेला चेहरा बघून रुद्रच्या आईला जरा वेगळच वाटलं.

“काय गं?” रुद्रची आई लगेच काळजीने विचारू लागली. “असा का चेहरा केलास? काही गोंधळ तर घालून ठेवला नाहीस ना?”

ते ऐकून रावी पटकन जागेवरून उठली आणि तिच्या खोलीत गेली. तिला आता दोन टेन्शन आले होते. एक तर परीच आणि दुसर म्हणजे तिच्या मामांच म्हणजेच विजयच. तिच्याच भरोश्यावर तर त्याने परीला तिच्यासोबत पाठवलं होत आणि आता तिचं परीला एकटी टाकून आली अस समजल्यावर विजय तिला चांगलंच भांडणार होता. त्यात तिच्या आईच्या कानावर ही गोष्ट केली तर तिची मॉम थेट झाडूनेच तिची आरती करणार होती.

रावी आता पटापट तिचं आवरु लागली. सोबतच परीला फोन लावणं पण चालू होत. पण परी काही तिचा फोन उचलत नव्हती. परी तरी कशी उचलणार होती फोन? ती तर तुषारच्या मागे बाईकवर बसलेली होती. तुषार तिला त्याच्या अटींची आठवण करून देत होता. तस तर त्याने तिच्या हाताला लागलेलं बघून डान्सची अट रद्द केली होती. फक्त त्याने तिला ती सांगितली नव्हती. ऐन वेळेस तो तिला दुसर काहीतरी सांगणार होता. पण आता तो तिला नुसतच छळत होता. त्यांची दोघांची बाईकवरच नौकझोक चालू झाली होती. शेवटी परी वैतागली.

“तुम्ही बाईक थांबवता की मी यावरून उडी मारू?” परीने त्याला कडक आवाजात धमकी दिली.

तशी त्याने त्याची बाईक पटकन थांबवली. “तुला तुझी काळजी नसेल पण तुझ्या भावांची, बाबांची पण काळजी नाही का? जे तुला एकटीला जायचं आहे?” आता तो जरा चिडून बोलला.

“ते मला नका सांगू,” परी चिडून बोलली. “मला आता काही झाल तर मी तुमचचं नाव घेईल.”

“त्यासाठी तू तुझ्या घरी पोहोचायला हवी ना?” तुषार परत तिची छेड काढत बोलला. “परत तुला कोणी पकडून घेऊन गेल तर?” त्याने परीला भीती दाखवायचा प्रयत्न केला.

तशी ती पहिले तर घाबरली. पण नतंर लगेच स्वतःला सावरत बोलली. “मग तुम्ही का सारखे त्या डान्सच नाव काढत आहात?”

आताचा परीचा तो निरागस चेहरा तुषारच्या मनाला जो थंडावा देऊन गेला. त्याला तर एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी गेल्यासारखं वाटल.

“एकतर माझ्या हाताला लागलं आहे ते दिसतय ना तुम्हाला?” परी

“ठीक आहे,” तुषार तिच्याकडे रोखून बघत बोलला. “मग माझ्यासोबत डेटवर यायचं.”

“व्हॉट?” परीच्या कपाळवर आठ्या चढल्या. “त्यापेक्षा मी चालत जाईल. मला इथून पण रिक्षा मिळेल. नाहीतर कोणालाही फोन केला तरी मला घ्यायला कोणीही येईल.”

“ठीक आहे,” तुषार एक उसासा टाकत बोलला. “बोलव मग कोणालातरी. मग मी पण थेट सांगतो की तू कशी पडली? का कोणी तुला पाडल.”

तस परीने तिचे डोळे घट्ट मिटून परत उघडले आणि तुषारच्या चेहऱ्याकडे तिचे दोन्ही हात आणले. जणू काही तिच्या त्या हाताने त्याचा चेहरा ओरबाडून काढेल. पण मग तिचं ते सिक्रेट त्याच्याकडे असल्याने तिने तिचे ते दोन्ही वर आलेले हात झटकून खाली घेतले.

“यु ऽऽ,” परी त्याला तिचं बोट दाखवत बोलली. “तुला तर, मी नंतर बघते.”

“ठीक आहे नाही येत तर.” तुषारने त्याचा मोबाईल काढला आणि त्यावर एक फोन लावू लागला.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all