Login

अवनी एक प्रवास भाग ५०

तुषार त्यांच्या पाठी पाठी येत आहे हे समजायला रावीला जास्त वेळ लागला नाही. कारण त्याने त्याच्या घराचा रस्ता कधीच मागे सोडला होता. पण रावीने देखील परीला त्याबद्दल काहीच सांगितल नाही आणि हळू हळू तिची बाईक चालवत राहिली. न जाणो तिची बाईक जोरात चालवण तुषारला आवडलं नाही मग आणि तेही परी माझ्या मागे बसलेली असताना. ह्या विचारातच रावीच्या चेहऱ्यावर एक सुंदर अस स्मित आल होत.
मागील भागात.

आताचा परीचा तो निरागस चेहरा तुषारच्या मनाला जो थंडावा देऊन गेला. त्याला तर एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी गेल्यासारखं वाटल.

“एकतर माझ्या हाताला लागलं आहे ते दिसतय ना तुम्हाला?” परी

“ठीक आहे,” तुषार तिच्याकडे रोखून बघत बोलला. “मग माझ्यासोबत डेटवर यायचं.”

“व्हॉट?” परीच्या कपाळवर आठ्या चढल्या. “त्यापेक्षा मी चालत जाईल. मला इथून पण रिक्षा मिळेल. नाहीतर कोणालाही फोन केला तरी मला घ्यायला कोणीही येईल.”

“ठीक आहे,” तुषार एक उसासा टाकत बोलला. “बोलव मग कोणालातरी. मग मी पण थेट सांगतो की तू कशी पडली? का कोणी तुला पाडल.”

तस परीने तिचे डोळे घट्ट मिटून परत उघडले आणि तुषारच्या चेहऱ्याकडे तिचे दोन्ही हात आणले. जणू काही तिच्या त्या हाताने त्याचा चेहरा ओरबाडून काढेल. पण मग तिचं ते सिक्रेट त्याच्याकडे असल्याने तिने तिचे ते दोन्ही वर आलेले हात झटकून खाली घेतले.

“यु ऽऽ,” परी त्याला तिचं बोट दाखवत बोलली. “तुला तर, मी नंतर बघते.”

“ठीक आहे नाही येत तर.” तुषारने त्याचा मोबाईल काढला आणि त्यावर एक फोन लावू लागला.

आता पूढे.

ते बघून परीने लगेच त्याचा तो हात पकडला. “थांबा ना, लगेच का फोन लावत आहात? मी नाही बोलली का?” परी चिडून बोलली.

“पण तू हो पण बोलली नाहीस.” तुषार त्याचे खांदे उडवत बोलला.

“ठीक आहे,” परी इकडे तिकडे बघत बोलली. “येईल मी बस.” परी वैतागून बोलली.

“जरा प्रेमाने..” तुषार बोलता बोलता थांबला. कारण परी त्याला खूपच रागाने बघू लागली. “ठीक आहे. बस मग.”

परी त्याला रागातच बघत त्याच्या बाईकवर बसली. ‘त्या दिवशी हाच का सापडला मला?’ परी मनातच बडबड करू लागली. ‘तरी नशीब डान्सच खूळ डोक्यातून काढून टाकल. नाहीतर ह्याच्यामुळे मला कॉलेजच्या फंक्शनमध्ये नाचावं लागल असत.’

तिची ही बडबड चालू असताना तिचा सारखा मोबाईल वाजत होता. तुषारसोबत भांडत असताना तिचं काही तिच्या मोबाईलकडे लक्ष गेल नव्हत. कारण तिच्या मोबाईलचा आवाज खूपच कमी ठेवलेला असायचा. पण आता शांत झाल्यावर तिला तो ऐकायला गेला. सारखा सारखा वाजत असल्याने तिने तो वैतागूनच उचलला.

“हेलो दी, कुठे आहेस ?” रावीचा काळजीयुक्त चिडलेला आवाज आला.

रावीच्या त्या सुराने परी अजूनच चिडीला आली. “तुला आता आठवण आली का माझी? तुझ्या दादाला तुझी मैत्रीण गर्लफ्रेंड म्हणून काय मिळाली तर तो आणि तू मला विसरलीस?”

परीच ते बोलण ऐकून रावी अजूनच घाबरली गेली. ती जास्तच वैतागली असली की तिचा असा सूर लागायचा आणि कुठलही लॉजिक कुठेही जोडून मोकळी व्हायची.

“बोल ना आता,” परी लगेच चिडून बोलली. “आता का गप्प बसलीस?”

“तू तिला बोलू देशील तर ती बोलेल ना.” तुषार हसून बोलला.

“तुम्ही तुमच काम करा.” परी तुषारला पण चिडून बोलली.

आणि हे बोलण रावीने ऐकल. ‘दी सरांसोबत आहे? ते कसे काय तिकडे पोहोचले?’ मग तिला आठवलं की त्यांची बहिण पण तर त्याच कॉलेजला होती. ‘मग तिला सोडायचं सोडून ते दी ला सोडायला आले? चक्कर काय आहे?’ रावी मनातच तिचे बंगले रचू लागली.

“बोलतस का आता?” परी खूपच चिडून बोलली. “का तुला पण कोणी भेटला?”

“दी,” रावी पण आता चिडून बोलली. “सरांचा राग माझ्यावर नको काढूस.”

“तुला कस समजल की म.. मी त्यांच्यासोबत आहे ते?” परी जरा घाबरून बोलली.

‘दी च्या डोक्यावर परीणाम झाला काय?’ रावी परत मनात बोलू लागली. “दी, आता तूच मोठ्याने त्यांच्याशी बोलत होतीस ना. तेच मी ऐकल.”

“बरं बरं,” परी आता तोऱ्यात बोलली. “मला नेहमीच्या चौकात भेट. मी तिथेच उतरते.”

“का?” रावी गोंधळून गेली. “सर घरी पण सोडतील तुला.”

“तुला बाकीच्यांचा ओरडा खायचा आहे का?” परी “बाबांची वर्निग विसरलीस का?”

“ओके ओके,” रावी लागलीच बोलली. “मी आलीच.”
एवढं बोलून फोन ठेऊन दिला.

“अभिनंदन.” तुषार

“आणि ते का?” परी

“तुझ्या भावाला गर्लफ्रेंड मिळाली ना?” तुषार

“तुम्ही आमच बोलण चोरून ऐकत होतात?” परी कपाळावर आठ्या आणत बोलली.

“चोरून कशाला?” तुषार “तू बोलतच इतक्या रागात आणि मोठ्याने होती की बाजूचा गाडीवाला पण आपल्याकडे विचित्र नजरेने बघत होता.”

“तरी अस लक्ष द्यायचं नसत कोणाच्या बोलण्याकडे.” परी ठसक्यात बोलली.

“कोणाकडे नाही,” तुषार पण तितक्याच ठसक्यात बोलला. “तो स्टुडन्ट आहे माझा.”

यावर परीने तिचं तोंड वाकड केल. “मला पुढच्या चौकात सोडा.”

“का?” तुषारचं मन लगेच नाराज झाल.

“का म्हणजे?” परी “आताच ऐकल नाही का रावी येत आहे ते.”

“हम्म,” तुषार “पण डेटचा लक्षात ठेव.”

“ते तुम्ही मला विसरू देणार आहात?” परी हसून पण चिडत बोलली.

तसा तुषारने त्याचा मोबाईल नंबर सांगायला सुरवात केली.

“हे काय आहे?” परी गोंधळून जात विचारू लागली.

“माझा मोबाईल नंबर आहे.” तुषार

“मला नकोय तुमचा नंबर.” परीच्या कपाळवर अजूनही आठ्या नाचत होत्या. नंतर ती हळूच बोलली. “आणि तुम्ही पण.”

“मग वेळ आणि ठिकाण कस कळेल तुला?” तुषार “ठीक आहे मग घरीच येऊन सांगतो.”

“तुम्हाला ब्लॅकमेल करण्याशिवाय दुसर काहीच येत नाही का?” परी

“तस तू ऐकत नाहीस ना.” तुषार त्याची बाईक थांबवत बोलला.

“आता का थांबवली बाईक?” परी

“अच्छा म्हणजे घरीच सोडू का?” तुषार लगेच उत्साहात आला.

तेव्हा कुठे परीच आजूबाजूला लक्ष गेल. तेव्हा तिला समजल की ते त्या चौकात पोहोचले होते. “नाही नको. मी उतरते.” एवढं बोलून परी बाईकवरून उतरली.

जरा वेळ गेला तरी तुषारला अजुनही तिथेच पाहून परी त्याच्याकडे आठ्या पाडून बघू लागली.

“आता काय?” परी

“रावी अजून आली नाही?” तुषार जरा गंभीरपणे बोलला.

“येईलच ती.” तो गंभीरपणे बोलला म्हणून परीने पण शांतपणे उत्तर दिल.

अजून थोडा वेळ गेला आणि रावी तिथे येऊन पोहोचली. “सॉरी ना दी.” तिने आल्या आल्या तिचे कान पकडले. नंतर तिचं लक्ष तुषारकडे गेल जो तिच्याकडे रागात बघत होता.

ते बघून रावीला पहिले तर टेन्शन आल. पण नंतर तिला जरा खट्याळपणा सुचला. तुषारला कधी राग आला की तो काढल्याशिवाय किंवा शिक्षा दिल्याशिवाय शांत होत नव्हता. आता तर दोन्हीपैकी काहीतरी नक्कीच होणार याची खात्री रावीला होतीच. एकतर तिचं बाकी भावांना ती गोष्ट समजणार नाहीतर तुषार तिला चांगलाच भांडणार. आता तिने एक डाव खेळायचं ठरवलं.

आपण तिच्याकडे रागत बघून सुद्धा तिला त्याचा काहीच फरक पडला नाही? हा विचार तुषारच्या मनात घोळू लागला. ‘काही कांड करायच्या तयारीत तर नाही ना?’ आता तो सगळ्या बाजूने विचार करू लागला.
पण रावीच्या डोक्यात असलेला विचार त्याच्या डोक्यात आलाच नाही.

रावी हळूच परीजवळ सरकली. “दी,” रावी तिचे ओठ बाहेर काढून बोलली. “ते सरांना सांग ना. नाहीतर ते नक्कीच बाकीच्यांना जाऊन सांगतील. मग माझ हॉस्पिटलमध्ये जाण फिक्स.”

मग परीने तुषारवर नजर टाकली. जो रागातच रावीकडे बघत होता. आता त्याच रागात बघण पण बरोबर होत. पण रावीवरचा तिचा जीव आता तुषारला भांडणार होता.

“ऐका,” परी तुषारला बघत बोलली. “रावीला काही बोलायचं पण नाही, भांडायचं तर नाहीच नाही आणि ही गोष्ट आपल्यातच राहील. तिच्या बाकीच्या भावांना सांगितली तर बघा.”

परी सरळ सरळ त्याला धमकी देत होती. तर तुषारला रावीच पुढच कांड समजून गेल होत. तिला काहीतरी कुणकुण लागली असल्याचे त्याला जाणवले.

तर रावी मनातच इतक्या उड्या मारत होती की तिला तिची शंका आता खात्रीत बदलताना दिसत होती.

“ती तुला चक्क विसरून घरी निघून गेली तरी तू तिची बाजू घेत आहेस.” तुषार गंभीर होत बोलला.

“काय करू?” परी दीर्घ श्वास घेत बोलली. “शेंडेफळ आहे घरातलं.”

परीच्या या वाक्यावर रावी परीला बघून विचार करू लागली. ‘दीने माझी बाजू घेतली की टोमणा मारला.’

पण परीच्या या वाक्यावर तुषारला मात्र हलकेच हसू आलं. “घरी पोहोचले की मेसेज करा.”

“तुमचा नंबर माझ्याकडे आहे.” रावी तिचे डोळे बारीक करून बोलली.
कारण तुषार परीकडे बघून बोलला होता.

“म्हणून म्हटलं की घरी पोहोचले की मेसज करा.” तुषार त्याची एक नजर परीवर टाकून रावीकडे बघत बोलला.

परीने फक्त तिचं तोंड वाकड केल आणि रावीच्या बाईकवर जवळ जाऊन उभी राहिली.

तिच्या बाईकवर जाऊन बसली. जशी रावी बाईकवर बसली तशी परी पण लागलीच रावीच्या मागे जाऊन बसली.

‘ही अशी माझ्या बाईकवर कशी बसणार?’ तुषारच्या मनात विचार चमकून गेला. कारण जेव्हा ती तुषारच्या मागे बसली होती तेव्हा अगदीच बाईकच्या मागच्या टोकाला जाऊन बसली होती. पण आता रावीच्या बाईकवर तिच्या खांद्यावर आरामात निवांत होऊन बसली होती.

इकडे रावीने तिची बाईक चालू करून तुषारचा निरोप घेतला. ह्या दोघींना त्याने पुढे जाऊ दिल आणि नंतर हळू हळू त्यांच्या मागे मागे जाऊ लागला. परीला किडनॅप करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे तो जरा जास्तच सावध झाला होता. जेव्हा परी तिच्या घरी सुरक्षित पोहोचेल तेव्हाच त्याच्या जीवाला शांती मिळणार होती.

तुषार त्यांच्या पाठी पाठी येत आहे हे समजायला रावीला जास्त वेळ लागला नाही. कारण त्याने त्याच्या घराचा रस्ता कधीच मागे सोडला होता. पण रावीने देखील परीला त्याबद्दल काहीच सांगितल नाही आणि हळू हळू तिची बाईक चालवत राहिली. न जाणो तिची बाईक जोरात चालवण तुषारला आवडलं नाही मग आणि तेही परी माझ्या मागे बसलेली असताना. ह्या विचारातच रावीच्या चेहऱ्यावर एक सुंदर अस स्मित आल होत.

काही वेळातच रावी तिच्या मामांच्या घरी जाऊन पोहोचली. त्यांना बिल्डींगमध्ये जाताना पाहिल्यावरच तुषार त्याच्या घराकडे निघून गेला.
तुषार त्याच्या बहिणीला घ्यायला ग्लेला असूनही तेजश्री एकटीच पुढे आलेली बघून तिच्या घरच्यांना ते वेगळच वाटल.

“तू एकटी कशी आली गं?” घरात आल्या आल्या तिच्या आईने तिला विचारलं.

आईच्या प्रश्नावर तेजश्रीला आठवल की तिने घरी काय सांगायचं तो विचारच केला नव्हता. पण काहीतरी उत्तर द्याव लागणार होत.

“अगं बोल.” तिची आई परत तिला विचारू लागली. “दादा नाही भेटला का तुला?”

“न.. नाही ना,” तेजश्री “त्याची बाईक खराब झाली होती वाटत. मग म्हटलं किती वाट बघू ना. म्हणून सुजाताला सांगितल मला घरी सोडायला.”

“तिच्याकडे गाडी आहे?” तिची आई प्रश्नार्थक बघत विचारू लागली.
कारण त्यांच्या माहिती प्रमाणे तर तिच्याकडे गाडीच नव्हती.

“अगं आज तिने तिच्या आईची स्कुटी आणली होती.” तेजश्री उगाच हसून दाखवत बोलली. ‘दादा मुळे किती खोट बोलावं लागत आहे मला. देवा मला माफ कर रे बाबा.’ तिने मनातच देवाची माफी मागितली.

“बरं बरं,” तिची आई “जा जाऊन फ्रेश हो.”

तशी तेजश्री फ्रेश व्हायला तिच्या खोलीत गेली. काही वेळाने तुषार घरी आला. तो ही त्याच्या तंद्रीत घरी आला आणि सरळ त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. खोलीकडे जाता जाता त्याचं साध दुसरीकडे लक्ष देखील गेल नव्हत की कोणी तिथे बसलं आहे की नाही.

“काय झाल होत रे गाडीला?” तुषारला मधेच त्याच्या आईचा आवाज आला.

तसा तो लागलीच दचकून त्याच्या आईकडे गोंधळून बघू लागला. त्याला त्याच्या आईचा प्रश्नच समजला नव्हता. कसा समजणार? कारण तेजश्रीने तर त्याला काही सांगितलं नव्हत.

“अरे तेजश्री बोलली मला,” त्याची आई “की बाईक बंद पडली म्हणून तिला घ्यायला जायला जमल नाही तुला. त्यामुळे काही लपवायची गरज नाही.” त्याची आई तोऱ्यात बोलली.

ते ऐकून त्याला आताच्या परिस्थीतीची जाणीव झाली. ‘ती एकटी घरी कशी आली ते विचारलं गेल असेल. म्हणून तिने अस काहीतरी सांगितलं वाटत.’ तुषार मनातच विचार करू लागला.

“लाडकी लेक आहे ना तुझी,” तुषारने तेच पुढे केल आणि बोलू लागला. “म्हटलं माझ्यावर रागावली मग? मी कोणाकडे जाऊ?”

तस त्याची आई त्याच्याकडे आठ्या पडून बघू लागली. “म्हणून तर सांगते की बायको करून आणूया तुझ्यासाठी. पण तू ते पण ऐकत नाहीस.”

“बोललो ना आधी तेजूच.” तुषार “गावाला काही चौकशी करायला लावली का?”

“आता बहिणीची काळजी दाटून आली का?” त्याचे वडील “इतके दिवस तर साधा विषय पण काढला नाही तिचा.”

“विषय?” तुषारचे लहान काका मधेच बोलले. “पूर्णच्या पूर्ण माहिती काढून झाली आहे साहेबांची.”

तसे ते सगळेच तुषारकडे बघू लागले. कारण त्याने त्याबद्दल कोणाला काहीही सांगितल नव्हत. घरच्या मोठ्या मंडळींकडून चौकशी जरी झाली असती तरी त्या मुलाबद्दल त्यांना चांगलंच सांगण्याची शक्यता जास्त होती. म्हणून त्याने त्याच्या लेव्हलवर माहिती काढायला सुरवात केली होती.

ज्यात त्या मुलाचे मित्र कुठले आहेत? जिथे कामावर जातो तिथलं त्याच वागण कस आहे? खासकरून खालच्या पोस्टवर काम करणाऱ्या माणसांसोबत तो कसा वागतो? हे सगळचं त्याने गोळा केल होत. गावाची माहिती तर त्याने त्याच्या गावतल्या मित्रांकडून काढली होती आणि इथे ज्या ठिकाणी काम करायला जात होता तिथे त्याने त्याचे ते चार विद्यार्थी पाठवले होते. आता ते कोण? हे वेगळ सांगायची गरज नाही. कारण तुषारला त्यांच्यावरच जास्त विश्वास होता.

“आता सांगतोस का?” तुषारचे वडील तुषारला गप्प बसलेले बघून बोलले.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all