मागील भागात.
“विषय?” तुषारचे लहान काका मधेच बोलले. “पूर्णच्या पूर्ण माहिती काढून झाली आहे साहेबांची.”
तसे ते सगळेच तुषारकडे बघू लागले. कारण त्याने त्याबद्दल कोणाला काहीही सांगितल नव्हत. घरच्या मोठ्या मंडळींकडून चौकशी जरी झाली असती तरी त्या मुलाबद्दल त्यांना चांगलंच सांगण्याची शक्यता जास्त होती. म्हणून त्याने त्याच्या लेव्हलवर माहिती काढायला सुरवात केली होती.
ज्यात त्या मुलाचे मित्र कुठले आहेत? जिथे कामावर जातो तिथलं त्याच वागण कस आहे? खासकरून खालच्या पोस्टवर काम करणाऱ्या माणसांसोबत तो कसा वागतो? हे सगळचं त्याने गोळा केल होत. गावाची माहिती तर त्याने त्याच्या गावतल्या मित्रांकडून काढली होती आणि इथे ज्या ठिकाणी काम करायला जात होता तिथे त्याने त्याचे ते चार विद्यार्थी पाठवले होते. आता ते कोण? हे वेगळ सांगायची गरज नाही. कारण तुषारला त्यांच्यावरच जास्त विश्वास होता.
“आता सांगतोस का?” तुषारचे वडील तुषारला गप्प बसलेले बघून बोलले.
आता पूढे.
मग तुषारने त्याला मिळालेली माहिती सांगायला सुरवात केली. त्याच्या माहितीनुसार तो मुलगा तर खूप चांगला होता. पण घरचे माणस मात्र जरा जुन्या विचारपद्धतीचे होते. तेजश्रीने बाहेर जाऊन काम करणे त्यांना बहुतेक आवडणार नव्हत. त्यांच्या गावी असणारी चुलत भावाची बायको देखील अशी घरीच ठेवलेली होती. तिचेही चांगल शिक्षण झाल होत. पण तिला कामासाठी बाहेर पाठवलं जात नव्हत.
“पहिले त्या मुलासोबत बोलून घ्या,” तुषार “तेजुला गरजेपेक्षा जास्त बंधन जर पडणार असतील तर आत्ताच नकार द्या. नाहीतर लग्नाच्या आधी बोलतील की नोकरी केली तरी चालेल आणि नंतर घरची कामे होत नाही म्हणून तिला गावीच ठेवलेली मला चालणार नाही.” शेवटी शेवटी तुषारच्या मनातला पझेसिव्ह भाऊ बाहेर पडलाच.
“अरे हो,” तुषारचे वडील त्याला शांत करत बोलले. “जरा विचार करावा लागेल आणि थोड ॲडजस्ट तर कराव लागत ना.”
“थोड ठीक आहे,” तुषार “पण गरजेपेक्षा जास्त होणार असेल तर..” तो बोलता बोलता शांत झाला.
“आता तर माणसाच्या आत काय चाललं आहे? ते आपल्याला कस समजेल ना?” तुषारचे लहान काका.
“म्हणून तर त्याच्या घरची काय परीस्थिती आहे ते आत्ताच सांगितलं.” तुषार “पहिले त्या मुलासोबत बोलून घ्या. तुम्हाला नसेल जमणार तर मला सांगा.”
“काही गरज नाहीये त्याच्याशी तुला बोलायची.” तुषारची आई जरा कडक आवाजात बोलली. “हे आणि भाऊजी जाऊन बोलून येतील.”
”बघा काय ते मला सांगा.” तुषार इतक बोलून तिथून त्याच्या खोलीकडे चालला गेला.
आता तेजश्री तिच्या खोलीतून बाहेर हॉलमध्ये येऊन बसली. बाकी तिघांची अजूनही त्या मुलाविषयी चर्चा चालू होती. इथे काय झाल? ते तेजश्रीला माहिती नव्हत. म्हणून ती शांतपणे ते सगळ ऐकत होती. तिला एवढचं समजल होत की तिच्यासाठी आलेल्या स्थळाबद्दल ती चर्चा होती.
तिने तिच्या लग्नाचा विषय सर्व घरच्यांवर सोडला होता. त्यामुळे ती त्या चर्चेत जास्त काही बोलतच नव्हती. तिला जे काही विचारलं जाईल फक्त त्याचच उत्तर देत होती. तिच्या मनात सध्या इतकचं होती की ती लग्न करून जाण्याआधी तिच्या दादासाठी तिला काहीतरी करायचं होत.
नंतर तिला आठवलं की तिच्या मॅमची स्कुटी दुरुस्त झालेली होती. तिला काहीतरी सुचल आणि ती तिथून उठून तुषारच्या खोलीकडे गेली.
दुसरीकडे रावी परीला घेऊन तिच्या घरी तर पोहोचली होती. पण घरात गेल्यावर पण नुसतीच परीच्या मागे मागे फिरत होती. ना धड काही सांगत होती आणि नाही स्वतःच्या घरी जायचं नाव घेत होती.
रावीच्या मनात आता एकच गोष्ट घुमायला लागली होती. ती म्हणजे तुषारच्या मनात तिच्या दी विषयी काही भावना तर नाही? प्रसंगी चालत जाईल पण तिच्या घरच्यांशिवाय कोणाच्याही बाईकवर न बसणारी तिची दी तुषारच्या बाईकवर मात्र न संकोचता बसली होती. मग तिलाही काही वाटत का? हेच तिला शोधायचं होत आणि परी तर सहज तिच्या मनाचा सुगावा तिला लागू देणार नव्हती. ही गोष्ट रावीला माहिती असल्याने परीला कस विचारायचं? ह्याच विचारात ती परीच्या मागे मागे उगीच फिरत होती.
“रावी,” परी वैतागून बोलू लागली. “काय चालू आहे तुझ? का सारखी सारखी मागे येत आहेस? काही केल आहेस का?”
“काही केल नाहीये गं दी,” रावी विचार करत बोलली. “आमच्या सरांबद्दल विचार करत होती.”
“कोणत्या सरांबद्दल?” परीने तिचं घरातलं काम आवरता आवरता विचारलं.
“तेच ज्यांनी तुला वाचवल.” रावी आता जणू खट्याळ झाली. सोबतच तिने परीच्या खांद्याला हलकासा धक्का पण मारला.
“मग तूच विचार कर ना,” परी कपाळावर आठ्या पाडून बोलली. “मला का धक्का मारत आहेस?”
“तू पाहिलं नाहीस का?” रावी
“काय?” परी
“ते आता आपण घरी पोहोचेपर्यंत आपल्या मागे मागे आले होते.” रावी परीचा चेहरा वाचत बोलली.
रावीच बोलण ऐकून परीचे काम करणारे हात थांबले. कारण तिने पण एक दोन वेळेस त्याला त्याच्या मागे येताना पाहिलं होत. पण तिने लागलीच तिची नजर फिरवून घेतली होती.
“हा मग,” परीने परत तिच्या कामाला सुरवात केली. “असेल काही काम त्यांच ह्या बाजूला.”
“सिरीअसली दी?’ रावी
“हा मग,” परी तिची काम आता खूपच पटापट करायला लागली. आता ती चिडूनच बोलू लागली. “ते मला कस काही माहिती असेल? तुमचे सर आहेत ते मग तूच जाऊन विचार ना. माझ का डोक खराब करतेस?”
परीला अस चिडून बोलताना बघून रावीला आश्चर्यच वाटल.
‘सगळे माझ्याच मागे का लागले आहेत?’ परी मनातच बडबड करू लागली. ‘पहिले त गौतम काय? नंतर त्यांचा तो भाचा काय? आणि ह्यांच्या सरांचं वेगळच. एकदा काय वाचवलं तर थेट डेटला बोलावू राहिले.’ भावनेच्या भरात परी पुढचं वाक्य मोठ्याने बोलून गेली. “त्यात ती बिनडोक, मलाच डोक लावत आहे.”
“कोण बिनडोक?” रावीच्या कपाळवर आठ्या चढल्या. “आणि काय बडबड करत आहेस तू? बरी आहेस ना दी तू?”
“तू गेली नाहीस अजून?” परी अजूनच चिडून बोलली.
“आता कुठे जाऊ?” रावी “अच्छा मी आता तुझ्या नजरेसमोर पण नको ना?” रावी तिचे गाल फुगवून बोलली.
रावीच्या ह्या वाक्याने परी तिच्या विचारांच्या बाहेर आली. “तुला तुझ्या सरांना काही विचारायचं होत ना?” परीने लगेच स्वतःला सावरून घेतलं. “मग त्यांच्याकडेच जा आणि हो जरा मोठ्याने बोल. त्या उंच दगडाला त्यांच्या उंचीच्या खालच दिसत ही नाही आणि ऐकू पण येत नाही.”
परीच्या ह्या अश्या बोलण्याने रावी अजूनच गोंधळून गेली. ‘उंच दगड?’ रावीला आता हसावं की रडावं? तेच समजत नव्हत. ती तिच्याच विचारात असताना तिचा मोबाईल वाजला.
“मला तुझ्या आरुष दादाचा नंबर पाहिजे.” रावीने फोन उचलल्या उचलल्या तिच्या कानावर पहिलच वाक्य पडलं. तशी रावी अजुनच गोंधळून गेली. कारण परीच्या विचारात असताना तिने मोबाईल न बघताच आलेला फोन उचलला होता. ती त्याच विचारात असल्याने समोरची व्यक्ती काय बोलली तेच तिला समजल नाही. म्हणून तिने तिच्या कानावरचा मोबाईल काढला आणि आलेला फोन पहिला. तर तो मनालीचा होता. मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला.
“हेल्लो,” काहीच प्रतिक्रिया आली नाही म्हणून मनालीने पुन्हा आवाज दिला. “कुठल्या मुलाच्या स्वप्नात गेलीस, त्या कबड्डी खेळणाऱ्याच्या का?”
आता मात्र रावीचे डोळेच विस्फारले गेले. कारण मनालीने पुन्हा आवाज दिल्यावर रावीने तिचा फोन स्पीकरवर टाकला होता आणि मनालीच पुढंच वाक्य परीने स्पष्ट ऐकल होत. कुठे रावी मनालीची मस्करी करणार होती आणि आता कुठे रावीच नवीनच प्रकरण थेट परीच्या कानावर आल होत.
“अय बावळट,” रावीने स्पीकरवरचा फोन काढून कानाला लावला. “बघ ना जरा फोन स्पीकरवर होता ते.”
“आता मी काय देव आहे का फोनमधून तिकडच मला दिसायला.” मनाली पण भावनेच्या भरात बोलून गेली आणि मग तिला काहीतरी जाणवलं. “एक मिनिट, तू फोन का स्पीकरवर टाकला?” मनाली चिडून विचारू लागली.
“कारण,” परीने रावीच्या हातून तिचा मोबाईल काढून घेतला आणि स्वतः बोलू लागली. “तुला माझ्या समोर तोंडावर पडायचं होत.”
“मॅम?” मनाली घाबरून गेली आणि सरळ तिने फोन कट केला.
ते बघून रावीने परीला उगाच हसून दाखवले.
ते बघून रावीने परीला उगाच हसून दाखवले.
“कोण आवडला तुला?” परी रावीला रोखून बघत विचारू लागली. “आणि काय बोलली होती मला की पहिले करियरवर लक्ष देईल म्हणून.”
“अगं दी,” रावी “कबड्डी खेळताना एका मुलाचा खेळ खूप चांगला होता. तेच तिला सांगितल तर ती वेगळच काहीतरी धरून बसली. तिला आरुष दादाचा नंबर पाहिजे ना तर मला अशी ब्लॅकमेल करत आहे दुपारपासून.”
“अच्छा,” परीला परत मनाली आठवली आणि तिने रावीच्या फोनवरूनच मनालीला फोन लावला. “तिला सांग की मी गेली आणि फोन स्पीकरवर ठेव.”
रावीने परत उगीच हसून होकारात मान हलवली आणि परीच्या हातून स्वतःचा मोबाईल हातात घेतला.
तीन रिंग नंतर मनालीने फोन उचलला. “हेलो.” आता ती अगदीच प्रेमाने बोलली. तिची मॅम अजूनही तिथेच तर नाही ना अशी तिला शंका होती.
“बोल गं, मी बाजुला आली.” रावी बोलू लागली. “जरा बघत जा ना की कोण आहे म्हणून.” रावी निवांत होऊन बोलली.
तसा मनालीने तिकडून एक दीर्घ श्वास घेतलेला इकडे या दोघींना पण स्पष्ट ऐकू आला. “थांक गोड. तू त्या मुलाबद्ल मॅमला सांगितलं नाहीस वाटत.”
“त्याच सोड,” रावी विषय बदलू बघत होती. “तुला का दादाचा नंबर पाहिजे?”
“जसा तुला त्या मुलाचा नंबर पाहिजे.” मनाली आता खट्याळ झाली.
“म.. मला कोणत्या मुलाचा नंबर पाहिजे?” रावी आता पूर्ण घाबरून गेली. “काहीही काय बोलत आहेस? तू फक्त मला ब्लॅकमेल करत आहेस. ज्जा, आता दादाला पण सांगेल की तू उशिरा उठतेस. थंडीत दोन दिवसांनी एकदा अंघोळ करतेस. तुला सकाळचा चहा पण बेडवर लागतो.”
“म.. मला कोणत्या मुलाचा नंबर पाहिजे?” रावी आता पूर्ण घाबरून गेली. “काहीही काय बोलत आहेस? तू फक्त मला ब्लॅकमेल करत आहेस. ज्जा, आता दादाला पण सांगेल की तू उशिरा उठतेस. थंडीत दोन दिवसांनी एकदा अंघोळ करतेस. तुला सकाळचा चहा पण बेडवर लागतो.”
“हा हा हा...” मनालीचा तिरकस आवाज आला. “जा जाऊन बिनधास्त सांग.”
त्या आवाजाने तिच्यात एवढा आत्मविश्वास आलेला बघून रावीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
“बघ हं,” रावी पुन्हा तिला धमकी देत बोलली. “घरी गेली की लगेच त्याला फोन लावेल मी.”
“हं,” मनाली तोऱ्यात बोलली. “त्यासाठी खूप उशीर झालेला असेल. बाय बेबी.” मनाली खट्याळ होत बोलली आणि फोन कट केला.
मनाली तिचं काही सामान घ्यायला मार्केटला आली होती. तर रावीसोबत फोनवर बोलता बोलता तिला समोरच आरुष दिसला. जो त्याच्या बाकी बंधू मंडळीसोबत मार्केटलाच आला होता. काही दिवसांनी मालाचा वाढदिवस होता त्याच्या पार्टीची तयारी करण्यासाठी काही सामान घ्यायला ते पण आले होते.
“हाय.” आरुष आणि बाकी भावंडांना मागून आवाज आला.
तसे ते सगळेच मागे वाळूल्न बघू लागले. जसे ते मागे वळले तस ते दोन मिनिट गोंधळून गेले. ते काही वेळ मनालीला बघतच राहिले. मग बाकीच्यांना जाणवलं की तिने नक्की कोणाला आवाज दिला असेल. तसे बाकीचे लगेच समोरच्या दुकानाकडे वळले.
“हाय.” आरुषने देखील मंद स्मित करत उत्तर दिले. “इकडे कशी?”
“ते सामान घ्यायचं होत घरातलं.” मनाली
“अच्छा.” आरुष एवढ बोलून गप्प झाला. कारण पुढे काय बोलाव तेच त्याला सुचत नव्हत.
त्याचा तो उडालेला गोंधळ बघून मनालीला हलकेच हसू आल.
“ते त्या दिवशीसाठी खूप खूप थ्यांकू.” मनालीने सुंदर अस स्मित केल.
तिच्या त्या आलेल्या सुंदर स्मितने आरुष त्यात हरवला गेला नसता तर नवलचं. मनालीचं ते बोलन देखील त्याच्या डोक्यावरून गेल. ते बघून मनालीने त्याच्या हाताला हलकेच चिमटा काढला.
“आउच.” आरुष हलकेच ओरडला. आता तो मनालीला गोंधळून बघू लागला.
“म्हटलं त्या दिवशीसाठी खूप खूप थ्यांकू.” मनालीच्या चेहरा अजूनही तसाच होता.
“मग चिमटा का काढला?” आरुष भाबडेपणाने बोलून गेला.
“आता असा रस्त्यात टक लावून बघशील तर मला काहीतरी कराव लागेल ना.” मनाली हसून बोलली.
तसा आरुष ओशाळला. “अम्म सॉरी.”
“बर कॉफी घेणार?” मनाली उत्साहात येत बोलली.
“अं?” आरुष परत गोंधळून गेला.
“कॉफी?” मनाली शब्दावर जोर देत बोलली.
“ते बाकीच्यांसोबत आलो आहे.” आरुष “भेटू ना कधीतरी.”
“मग परवा.” मनाली “मी कॉलेज सुटल की येईल.”
“ठीक आहे.” आरुष लाजला गेला.
मनाली पण खळखळून हसून जायला निघाली. तिला जाताना बघून आरुष पण त्याच्या बंधू मंडळींकडे गेला. काही वेळाने त्यांची खरेदी झाली आणि ते त्या दुकानाच्या बाहेर आले. जसे बाहेर आले तसे ते परत गोंधळून गेले. कारण तिथे मनाली तिच्या डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडून हलकीशी हसत उभी होती.
बाकीच्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि पुढे जायला निघाले. तर आरुष परत तिच्या जवळ गेला.
“आता काय?” आरुषने पण एक उसासा टाकला.
आरुषची ही प्रतिक्रिया बघून मनालीचे गाल फुगले आणि मानेला झटका देऊन तिथून ती चालली गेली.
“आता काय झाल हिला?” आरुष विचार करायला लागला. “मी तर काही बोललो पण नाही तिला.”
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा