मागील भागात.
“बर कॉफी घेणार?” मनाली उत्साहात येत बोलली.
“अं?” आरुष परत गोंधळून गेला.
“कॉफी?” मनाली शब्दावर जोर देत बोलली.
“ते बाकीच्यांसोबत आलो आहे.” आरुष “भेटू ना कधीतरी.”
“मग परवा.” मनाली “मी कॉलेज सुटल की येईल.”
“ठीक आहे.” आरुष लाजला गेला.
मनाली पण खळखळून हसून जायला निघाली. तिला जाताना बघून आरुष पण त्याच्या बंधू मंडळींकडे गेला. काही वेळाने त्यांची खरेदी झाली आणि ते त्या दुकानाच्या बाहेर आले. जसे बाहेर आले तसे ते परत गोंधळून गेले. कारण तिथे मनाली तिच्या डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडून हलकीशी हसत उभी होती.
बाकीच्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि पुढे जायला निघाले. तर आरुष परत तिच्या जवळ गेला.
“आता काय?” आरुषने पण एक उसासा टाकला.
आरुषची ही प्रतिक्रिया बघून मनालीचे गाल फुगले आणि मानेला झटका देऊन तिथून ती चालली गेली.
“आता काय झाल हिला?” आरुष विचार करायला लागला. “मी तर काही बोललो पण नाही तिला.”
आता पूढे.
“जाऊदे.” सुजय त्याच्या खांद्यावर हात टाकत बोलला. “अश्याच असतात मुली. त्यांना वाटत की आपण एक नजरेत त्यांच्या मनातलं ओळखावं. कधी कधी दी पण अशीच गाल फुगवून बसते माझ्यावर. पूर्ण दिवस मी टेन्शनमध्ये राहून काय झाल? ते तिला विचारत राहतो आणि त्याच कारण संध्याकाळी समजत जे अगदीच फालतू असत.”
“पण ही परत संध्याकाळी भेटणार नाही ना.” आरुष ती गेलेल्या दिशेने बघत बोलला.
“भेटेल रे,” सुजय “रावीची मैत्रीण आहे ती.”
“अरे हो की.” आरुषच्या चेहऱ्यावर चमक आली.
मग ते सगळेच त्यांनी घेतलेलं सामान आरुषकडे त्याच्या घरी ठेवायला देत घरी निघून गेले.
तिकडे रावी अजूनही तिच्या मोबाईलला बघत राहिली आणि मनालीचं बोलण आठवू लागली.
“काय गं कसल्या विचारात आहेस?” रावी काहीच बोलत नाहीये बघून परीने तिला विचारलं.
ह्या वेळेस मात्र रावीने तिला काहीही सांगितले नाही आणि नकारार्थी मान हलवत तिच्या घरी जायला निघाली.
आता मालाचा वाढदिवस आला म्हणजे प्रसादची पण तयारी सुरु झाली. त्याने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मालाला प्रपोज करायचे ठरवले. तिच्यासाठी कोणत गिफ्ट घ्यावं? ह्या विचारात तो होता.
अश्या वेळेस भाऊ तर लगेच मदतीला धावून येतोच की जेव्हा की तो राजसारखा असेल. त्याच्याकडे गिफ्टसाठीच्या वेगवेगळ्या अश्या कल्पना होत्या. पण त्यात माला बसतच नव्हती. तिला फिल्मी कल्पना तर लांब लांब पर्यंत आवडत नव्हत्या. नाहीतर एका कॅफेमध्ये सगळीच सोय करून झाली असती.
हा एक गोष्ट मालाला खूप आवडायची ती म्हणजे पुस्तक वाचायची. तिच्या घरी भरपूर पुस्तकांचा संग्रह होता. त्यात तिला एक पुस्तक मिळत नव्हत आणि ही गोष्ट राजला आठवली. त्याच्या कल्पनेची गाडी लगेच धावू लागली. त्याने लागलीच प्रसादला तिच्या त्या आवडत्या पुस्तकाचा शोध घ्यायला लावला आणि जिथे असेल तिथून ते घेऊन यायला लावलं. त्याला सांगून राज त्याच्या खोलीकडे निघून गेला.
इकडे प्रसादनेही लगेच त्याच्या मोबाईलवर त्या पुस्तकाचे नाव टाकून शोध घ्यायला सुरवात केली. पण त्यावर ते काही मिळाल नाही. मग त्याने इंटरनेटवर त्याच्या आसपासची दुकान शोधली आणि त्यावर फोन लावून विचारू लागला.
आता प्रसाद आणि पुस्तक याचा जास्त काही संबंध आला नव्हता. शाळा सोडल्यानंतर त्याने फक्त नोट्स वाचल्या होत्या. हा परदेशात कॉलेजला असताना त्याने पुस्तक वाचली होती ती पण विविध खाद्यपदार्थांच्या बनविण्याच्या पद्धतीचे, त्या नंतर साहित्यिक पुस्तके तर त्याने कधी पहिली देखील नव्हती. त्याचा पश्चाताप त्याला आता होत होता. कारण त्याने कोणत्याही दुकानात त्या पुस्तकाच नाव सांगितल्यावर पहिले त्या पुस्तकच्या लेखकाचे नाव विचारले जात होते आणि तेच त्याला माहित नव्हते.
राज परत प्रसादच्या खोलीत आला तर त्याला तो डोक्याला हात लावून बसलेला दिसला.
“काय रे काय झाल?” राजने त्याला विचारलं.
“अरे ते पुस्तक,” प्रसाद टेन्शनमध्ये येत बोलला. “इथे कुठेच नाहीये. त्यात त्या लेखकाच नाव पण माहिती नाहीये.”
प्रसादच्या बोलण्याने राजने डोक्यालाच हात लावला. “अरे बाबा, ते पुस्तक इथे मिळाल असत तर तिने ते आधीच नसत का घेतलं? आणि त्याच्या लेखकाचं नाव तर मलाही माहिती नाही.”
“मग ते कस मिळणार?” प्रसाद बारीक तोंड करून बोलला.
“आता सगळ मीच सांगू का?” राज त्याची फिरकी घेत बोलला. “मग तू काय करणार? फक्त घेऊन येणार? त्याला काही अर्थ राहील का?”
तसा प्रसाद अजूनच टेन्शनमध्ये आला. काही वेळ गेला आणि त्यालाही काहीतरी आठवलं. तसा त्याचा टेन्शनमधला चेहरा लागलीच चमकू लागला. “राज, तू तिच्यासाठीच्या सरप्राईजची तयारी कर. ते पुस्तक मी बघतो.” एवढं बोलून प्रसाद त्याचा मोबाईल घेऊन शिट्टी मारत खोलीतून बाहेर पडला.
“याला काय अल्लादिनचा चिराग मिळाला का काय?” राज जाणाऱ्या प्रसादकडे बघून बोलला.
तिकडे तेजश्री तिच्या भावाच्या म्हणजेच तुषारच्या खोलीत पोहोचली. तर तो कसल्याश्या विचारात हरवला होता.
“दादू.” तेजश्रीने तुषारला आवाज दिला.
तेजश्रीच्या आवाजाने तुषार त्याच्या विचारातून बाहेर आला. तेजश्रीला तिथे आलेलं बघून त्याला आज जरा भरून आल. आज ना उद्या ती तिच्या सासरी जाणार मग तेव्हाचा त्याचा एकटेपणा त्याला आत्ताच छळू लागला. त्याचे डोळे लगेच भरून आले.
“अरे दादू,” तेजश्री चिडवण्याच्या सुरात बोलली. “मी काय लगेच लग्न करून जाणार नाहीये, इतक्यात तरी तुझी सुटका नाहीये माझ्यापासून.”
तस तुषारला हलकसं हसू आल.
“ऐक ना पण,” तेजश्री आता जरा गंभीर झाली. “माझ ठरण्याआधी तुझ पण बघायचं आहे. कारण घरात तर लगेच तयार नाही होणार रे.”
“बघू बाबांना तर सांगितलं आहे.” तुषार दीर्घ श्वास घेत बोलला.
“कधी?” तेजश्रीच्या चेहऱ्यावर आश्चर्य जमा झाल.
“झाले काही दिवस.” तुषार “आधी तुझ काय ते फिक्स करू मग बघू म्हणे.”
“ठीक आहे.” तेजश्री “तू ममची स्कुटी पाठवणार आहेस ना?”
“मी कशाला पाठवेल?” तुषार
“मग तूच ती दुरुस्तीला टाकली बोलला होतास ना?” तेजश्री
“मी नाही,” तुषार “सुजयने टाकली होती.”
“अच्छा.” तेजश्री तिच्या विचारात हरवली.
“काय गं कसल्या विचारात हरवली?” तुषार
“सुजाताला तो सुजय आवडतो.” तेजश्री पटकन बोलून गेली.
ते ऐकून तुषारच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसू लागला.
ते ऐकून तुषारच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसू लागला.
“हो,” तेजश्री तुषारचा चेहरा वाचत बोलली. “कधीची माझ्या मागे लागली आहे त्याच्याशी ओळख करून देण्यासाठी.”
“आणि तुला वाटत का सुजय तिच्याकडे बघेल तरी?” तुषार प्रश्नार्थक बोलला.
तसा तेजश्रीने एक सुस्कारा सोडला. “सांगितलं मी तिला की त्याच्या अपेक्षांच्या यादीत ती लांब लांब पर्यंत नाहीये. तरी ती ऐकत नाहीये.”
“मला भेटायला सांग तिला.” तुषार
“तिला समजवायचं आहे,” तेजश्री तिचं तोंड वाकड करत बोलली. “घाबरवायचं नाहीये.”
तस तुषारने पण त्याच तोंड वाकड केल. “तुमची डान्सची प्रॅक्टिस कधी सुरु होणार?”
“ती तर चालू आहे आमच्या वर्गातच.” तेजश्रीला तुषारचा पुढचा अंदाज आला.
“वर्गात चालू आहे?” तुषारने तोंड पाडून विचारलं.
“हो.” तेजश्री तिचं हसू दाबत बोलली. “झाली आता वर्गात जागा.”
तस तुषारच मन लागलीच नाराज झाल.
तस तुषारच मन लागलीच नाराज झाल.
“अरे हा,” तेजश्री काहीतरी आठवत बोलली. “मी बोलली सरांसोबत. पण ते आधी मॅमसोबत बोलणार आहेत.”
“नको सांगू,” तुषार लागलीच बोलला. “कॅन्सल करायला लाव.”
“का रे काय झाल?” तेजश्री आता गोंधळून गेली.
"बघितलं नाहीस का तिच्या हाताला किती लागल होत.” तुषार “तुमच्या फंक्शनपर्यंत तो हात व्यवस्थित नाही होणार.”
“अरे वा !” तेजश्री सूर खट्याळ झाला. “एवढी काळजी मॅमची?”
“हो,” तुषार ठसक्यात बोलला. “जा बरं आता. तुझ काम झाल असेल तर.”
तिने ठरवलेलं काम तर झाल नव्हत. कारण स्कुटी तर सुजय घेऊन जाणार होता. मग आता काय कराव? ह्याच विचारात तेजश्री तुषारच्या खोलीतून बाहेर जायला निघाली. आता फंक्शन होईपर्यंत तर त्यांची प्रॅक्टिस पण वर्गातच होणार होती. मग परी आणि तुषारची भेट होणे तर शक्य होताना दिसत नव्हत. पण तेजश्री देखील मागे हटणार नव्हती. तिने मनाशी काहीतरी ठरवलं आणि स्वतःवर खुश होत हॉलकडे निघून गेली.
परी घरातलं बऱ्यापैकी काम आवरून तिच्या खोलीत जाऊन बसली. आज तर त्यांच्या कामवाल्या मावशी पण आल्या होत्या. त्यांनी लगेच किचनचा ताबा घेतला आणि परीला तिच्या खोलीकडे पाठवून दिल होत.
परी तिच्या खोलीत बसून पुस्तक वाचत बसली होती. तिची वाचनाची तंद्री लागलेली असताना तिचा मोबाईल वाजला. पहिले तर तिने दुर्लक्ष केल पण तो सारखा सारखा वाजत असल्याने परीने तो वैतागून उचलला.
मोबाईलवर प्रसादचं.नाव बघून परी विचारात पडली आणि तिने तो उचलला. फोनवर प्रसादचं बोलण ऐकून परीला हसूच आल. कारण ज्याला साहित्यिक पूस्तक वाचायचा कंटाळा होता आज तोच मुलगा एका साहित्यीक पुस्तकाबद्दल विचारात होता.
परीच हसण प्रसादपर्यंत सहज पोहोचलं होत. त्याने एक मोठा दीर्घ श्वास घेतला कारण त्याला तर ते सहन करणंच होत. प्रेमात माणूस इतका बदलतो हे तो आज स्वतः अनुभवत होता.
थोडा वेळ झाला तरी प्रसाद काहीच बोलत नव्हता ते बघून परीने तिचं हसू आवरत घेतलं आणि मालाला आवडणाऱ्या त्या पुस्तकाची त्याला माहिती दिली. तस तर तिचं हे पुस्तक मालाला ह्या वाढदिवसाला गिफ्ट देणार होती. त्यासाठी तिने त्या पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन देखील केला होता.
त्यावेळेस तर त्याच्याकडे त्या पुस्तकाची प्रत नव्हती. म्हणून परीने खास आठवण करून ते पुस्तक जिथे कुठे असेल तिथून आणायला सांगितलं होत. आता परी त्यांच्या दुकानाची नियमित गिऱ्हाईक असल्याने त्या प्रकाशकाने त्यांनी ते पुस्तक पाठवलेल्या बऱ्याचश्या दुकानात चौकशी केली आणि तिथून ते मागवून घेतलं होत.
पण आता तेच पुस्तक प्रसाद विचारत असल्याने परीने ते पुस्तक त्याला घ्यायची परवानगी दिली. ही कल्पना पण राजची असल्याच परीला समजून गेल होत. कारण तिनेच तर राजला त्याबद्दल सांगितलं होत.
प्रसाद खूपच खुश झाला होता. आता त्याला फक्त पुण्याला जाऊन ते पुस्तक आणायचं होत. परीने देखील त्या प्रकाशकाला फोन लावून ते पुस्तक घेण्यासाठी तिचा भाऊ येत असल्याचे त्यांना सांगितले.
प्रसादने परीचे फोन ठेवेपर्यंत कैक वेळा आभार मानले.
रावी तिच्या घरी पोहोचली पण नव्हती की तिला आरुषचा फोन आला होता. आता कानातले हेडफोन अजूनही काढले नसल्याने तिने लागलीच आलेला फोन उचलला. रावी पुढे काही बोलणार त्याआधीच आरुषने बोलायला सुरवात केली.
“तुझी मैत्रीण भेटली होती आज मार्केटला.” आरुष हलकसं हसून बोलला.
तस फ्रेश होण्यासाठी जाणारी रावी जागीच थांबली. ती तिचे हेडफोन काढणारच होती की तिला आरुषच ते वाक्य ऐकायला गेल होत.
“व्हॉट?” रावीला जरा धक्काच बसला आणि नंतर तिला मनालीचं वागण आठवलं. जेव्हा की रावी तिला सगळ काही सांगून द्यायची धमकी देत होती आणि मनाली तिला बिनधास्त जाऊन सांगायला बोलत होती.
“किती छुपारुस्तम रुस्तम निघाली रे ती.” रावी लगेच गाल फुगवून बोलली.
“का गं काय झाल?” आरुष
मग भावनेच्या भरात रावीने आरुषला मनाली त्याचा नंबर मागत असल्याचे सांगून दिल.
“ती माझा नंबर मागत होती?” आरुष लगेचच उत्साहात आला.
त्याचा उत्साह बघून रावीने कपाळवर हात मारून घेतला. ‘का मी त्याला सांगितल? आता तो पण तिचा नंबर मागेल.’
आणि रावीच्या मनात हा विचार आलाच होता की आरुषने पुढच्याच मिनिटाला रावीकडे तिचा नंबर मागितला.
“यार,” रावी वैतागून बोलली. “मी तुमचा कबुतर आहे का?”
“का?” आरुषचा सूर पण आता वेगळा लागला. “तुला त्या कबड्डी खेळणाऱ्याचा नंबर मगत होतीस तेव्हा?”
“यार मने.” रावी चिडून बोलली.
“तिला काही बोलायचं नाही.” आरुष तोऱ्यात बोलला.
तसा इकडे रावीच तोंडच वासल गेल. “हाऊ मीन यार. पहिले मी तुझी बहिण आहे आणि तू तिच्या बाजूने माझ्याशी भांडतोस? तिच जी दोन दिवसातून एकदा अंघोळ करते. सकाळचा चहा पण बेडवरच घेते.”
रावी भावनेच्या भरात बोलून गेली. आता बहिणीपेक्षा तिच्या मैत्रिणीला जास्त भाव दिला की बहिणीला जेलसी तर वाटणारच की. तेच आता रावी बरोबर झाल होत.
“हे तू सांगतेस?” आरुषला आता रावीची फिरकी घ्यायची लहर आली. आता बहिण अशी जळायला लागली की तिला चिडवायला अजूनच मज्जा येते नाही का? “पहिलं म्हणजे त्या नंबरची गोष्ट तर मी माझ्या कानांनी ऐकली जेव्हा तू मनालीला सांगत होतीस. ती बिचारी तुला इशारा करून करून कंटाळली पण तुझ काही माझ्याकडे लक्ष गेल नाही आणि तू त्या बिचारीला बोलत आहेस?”
“ती बिचारी?” रावी अजूनच चिडली. “ती बिचारी नाही ती बोचरी आहे.”
“बोचरी?” आरुषला आता खूपच हसायला येत होत. “तू तुझ्या फ्रेंडला, त्यात बेस्ट फ्रेंडला बोचरी बोलत आहेस?”
“तू नाही बोलायचं तिला बोचरी.” रावी आरुषला धमकी देत बोलली.
“नाहीतर तिला सांगेल की तुझ्या आतापर्यंत किती गर्लफ्रेंड झाल्या.”
“नाहीतर तिला सांगेल की तुझ्या आतापर्यंत किती गर्लफ्रेंड झाल्या.”
आता मात्र आरुषची बोलती बंद झाली. जरी त्याला आजवर कोणतीही गर्लफ्रेंड नव्हती झाली तरी मनाली तर रावीच्याच बोलण्यावर विश्वास ठेवेल ना. हा विचार करून तो गप्प झाला.
“मला तिचा नंबर दे.” आरुष आता थेट मुख्य मुद्यावर आला.
आता रावीला आरुषचा फोन करण्याच मुख्य कारण मिळाल. आता बाजू रावीच्या हातात आली होती अस तिला वाटल आणि तिने भाव खायच्या उद्देशाने आरुषकडे त्या नंबरच्या मोबदल्यात काहीतरी मागायचं ठरवलं.
“तू सरळ सरळ नंबर दे,” आरुष कडक आवाजत बोलला. कारण त्याला रावीच्या मनात आता काय चालू झाल असेल याची जाणीव झाली होती. “नाहीतर तू पण सुजयला त्याच्या स्पर्धेत मदत करतेस ते मावशीला सांगून देईल.”
“किती खडूस आहात रे तुम्ही.” रावी कपाळावर आठ्या पाडून बोलली.
“आता तूच तशी वागतेस.” आरुष हसतच बोलला.
“पाठवला आहे नंबर.” रावी चिडून बोलली. “आता काही विचारयला ये, मग सांगते का तुला बघ.”
“ठीक आहे,” आरुष “मावशीला कॉन्फरन्सवर घेतो वेट.”
“आरश्याऽऽऽ“ रावीने आरुषच लागलीच बारस केल. ती अशी चिडली की तोंडाला येईल ते बोलायची.
“अस?” आरुष अजूनच तिला चिडवू लागला. “आता तर ठेवच फोन आणि तुझ्या मामीच्या फोनची वाट बघ.” एवढं बोलून त्याने फोन ठेवून देखील दिला.
“अरे कुठल्या जन्माचा बदला घेत आहे हा?” रावीने पटकन आरुषला फोन लावायला घेतला.
पण आरुष कुठे तिचा फोन उचलत होता. उलट त्याने त्याच्या दुसऱ्या नंबरवर फोन चलू ठेऊन रावीचा फोन वेटिंगवर टाकला.
आपला फोन वेटिंगवर बघून रावी अजूनच टेन्शनमध्ये आली. काय करू? हा विचार करत असतानाच तिला तिची आठवण आली आणि तिने लगेच तिला फोन लावला.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा