Login

अवनी एक प्रवास भाग ५३

आरुषने त्याच्या आईकडे पाहिलं. “तशी तर ती मला आधीपासून आवडत होती. जेव्हा जेव्हा ती रावीचं रागाला सहज शांत करायची. पण तेव्हा फक्त ती आवड होती. पण जेव्हा ती स्पर्धेत ज्या त्वेषाने खेळली ना ते माझ्या मनात घर करून गेली. म्हणजे जिथे गरज आहे तिथे संयम आणि जिथे गरज आहे तिथे डायरेक्ट भिडते. तिला तिच्या घरून आधीच पाठींबा मिळाला असता तर ती कदचित आज खूप पुढे गेली असती.” त्याने आराध्याकडे पाहिलं. “आज पहिल्यांदाच तर फोनवर बोललो आहे. पण तरी अस वाटल की खूप जुनी मैत्री आहे.”
मागील भागात.

आता रावीला आरुषचा फोन करण्याच मुख्य कारण मिळाल. आता बाजू रावीच्या हातात आली होती अस तिला वाटल आणि तिने भाव खायच्या उद्देशाने आरुषकडे त्या नंबरच्या मोबदल्यात काहीतरी मागायचं ठरवलं.

“तू सरळ सरळ नंबर दे,” आरुष कडक आवाजत बोलला. कारण त्याला रावीच्या मनात आता काय चालू झाल असेल याची जाणीव झाली होती. “नाहीतर तू पण सुजयला त्याच्या स्पर्धेत मदत करतेस ते मावशीला सांगून देईल.”

“किती खडूस आहात रे तुम्ही.” रावी कपाळावर आठ्या पाडून बोलली.

“आता तूच तशी वागतेस.” आरुष हसतच बोलला.

“पाठवला आहे नंबर.” रावी चिडून बोलली. “आता काही विचारयला ये, मग सांगते का तुला बघ.”

“ठीक आहे,” आरुष “मावशीला कॉन्फरन्सवर घेतो वेट.”

“आरश्याऽऽऽ“ रावीने आरुषच लागलीच बारस केल. ती अशी चिडली की तोंडाला येईल ते बोलायची.

“अस?” आरुष अजूनच तिला चिडवू लागला. “आता तर ठेवच फोन आणि तुझ्या मामीच्या फोनची वाट बघ.” एवढं बोलून त्याने फोन ठेवून देखील दिला.

“अरे कुठल्या जन्माचा बदला घेत आहे हा?” रावीने पटकन आरुषला फोन लावायला घेतला.

पण आरुष कुठे तिचा फोन उचलत होता. उलट त्याने त्याच्या दुसऱ्या नंबरवर फोन चलू ठेऊन रावीचा फोन वेटिंगवर टाकला.

आपला फोन वेटिंगवर बघून रावी अजूनच टेन्शनमध्ये आली. काय करू? हा विचार करत असतानाच तिला तिची आठवण आली आणि तिने लगेच तिला फोन लावला.

आता पूढे.

मनाली तिच्या घरी फ्रेश होऊन हॉलमध्ये बसून टीव्ही बघत बसली होती. पण मनात मात्र आरुषने तिला बघून सोडलेला सुस्काराच दिसत होता. ती एवढ्या प्रेमाने त्याच्याकडे बघत होती. त्याला त्याचा नंबर विचायाला आली होती आणि त्याने तिला बघून सुस्कारा सोडला? हा विचार करून तिला आरुषचा राग येत होता.

आता ह्या वेळेला रावीचा आलेला फोन बघून ती देखील बिचारात पडली. तिचं काहीतरी काम असेल हा विचार करून तिने तो फोन उचलला.

“ऐक ना,” रावी एकदमच बोलत सुटली. “तुला आरुष दादाचा नंबर पाठवला आहे. प्लीज लगेच त्याला फोन लाव.”

“मला नाही बोलायचं त्याच्याशी.” मनाली लगेच गाल फुगवून बोलली.

“अरे यार,” रावी वैतागून बोलली. “तुमच्या भांडणात माझा बळी जाईल. प्लीज ना यार.”

“तुला काय माहित? मी त्याच्यावर रागावली आहे?” मनालीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उभ राहील.

“तू रागावली आहे त्याच्यावर?” उलट रावीने तिला प्रश्न केला. “तरीच तो पण तुझा नंबर मागत होता.”

“माझा नंबर मागत होता?” मनालीचा राग लगेच पळून गेला.

“हो,” रावी ठसक्यात बोलली आणि त्यांनतर आरुषसोबत जे काही बोलण झाल ते तिला सांगून दिल.

रावीच बोलण ऐकून मनाली तिच्यावर हसायला लागली.

“एक मिनिट,” रावीला काहीतरी आठवलं. “तू का त्याच्यावर रागावली होती? ते तर त्याला माहिती पण नाहीये.”

“त्याच्याजवळ त्याचा नंबर मागायला गेली तर त्याने मला बघून सुस्कारा सोडला.” मनाली बारीक आवाजात बोलली.

“बाजूला आमची बाकी बंधू मंडळी पण असतील?” रावी हलकीच हसत बोलली.

“हो,” मनाली “होती ना.”

“मग तुला अस नाही वाटत का तू आमच्या बंधू मंडळीना आरुषदादाला चिडवण्यासाठी संधी दिलीस?” रावी चिडवण्याच्या सुरात बोलली.

आता कुठे मनालीला आरुषच्या सुस्कारा सोडण्याचा अर्थ समजला. कारण त्याने बाकीजणांना बघूनच तो सोडला होता तर तिला आता आठवलं होत.

“आता?” मनाली तिचे ओठ बाहेर काढून बोलली.

“आता काय?” रावी “लगेच त्याला फोन लाव ना. नाहीतर त्याचा फोन माझ्या मामीला गेला आणि तिला बाकी सगळ समजलं ना तर माझ काहीच खरं नाही. प्लीज यार बेस्ट फ्रेंडची मदत नाही करणार तू?” रावी एकदमच कळवळून बोलली.

“ठीक आहे,” मनाली तिला आश्वस्त करत बोलली. “बोलली ना मी, आधी तू मग बाकी.”

“लव्ह यु बेबी.” रावीची कळी लगेच खुलली.

“बस बस,” मनाली हलकेच हसत बोलली. “नको मस्का मारूस.”
दोघींनी हसतच फोन ठेवला.

रावीसोबत बोलून झाल्यावर मनालीने लगेच आरुषचा फोन लावला. तिकडे आरुषने अजूनही त्याचे ते दोन्ही फोन एकमेकांना कॉलवर लावून ठेवले असल्याने मनालीला देखील त्याचा फोन व्यस्त ऐकू आला. अस तीन ते चार वेळा झाल्यावर मनाली आता आरुषवर खरोखर चिडू लागली. ती वैतागली आणि तिने सरळ परीला फोन लावला.

आरुष त्याचे दोन्ही फोन व्यस्त ठेवून गेम खेळत बसला होता. तो त्याच्या मोबाईलबद्दल विसरून गेला होता. तो त्याच्या धुंदीत खेळत असताना एका बाजूला एका सोशल मिडियावर देखील तो ऑनलाईन होता. खेळता खेळता त्याच्या त्या सोशल मिडियाच्या अकाऊन्टवर व्हिडीओ कॉल आला.

आरुषने आलेल्या व्हिडीओ कॉलवरच नाव वाचण्याचा प्रयत्न केला. तर त्याला ते काही समजलच नव्हत. काहीतरी वेगळेच चिन्ह वापरून ते तयार केल होत. त्याने त्या गोंधळातच आलेला फोन उचलला. जसा तो फोन उचलला तसा तो फक्त बोलण्याचा प्रयत्न करत राहीला.
त्याला बोलायची एकही संधी न देता मनाली त्याला भांडायला लागली होती.

“इथे माणूस फोन लावून लावून वैतागून गेला आहे आणि तुला खेळायची पडली आहे.” मनाली चिडून बोलली. “इतक काय खेळण्यात व्यस्त असता रे? जे एक फोन बघायला वेळ भेटत नाही. जर बोलायचं नव्हत तर माझा नंबर कशाला मागितला?”

“झाल?” आरुषने शांतपणे विचारलं. आता चूक त्याचीच होती त्यामुळे तो सध्यातरी शांतपणे बोलत होता.

“नाही.” मनाली रागाला येत बोलली आणि नंतर विचार केला. “हो झाल.”

“सॉरी.” आरुष त्याचे कान पकडून प्रेमाने बोलला. “ते रावीला जरा चिडवत होतो. तुझा नंबर देत नव्हती म्हणून.”

“हा,” मनाली कपाळावर आठ्या पाडून बोलू लागली. “मोठ्या भावांना एवढच बरोबर जमत. लहान्या बहिणीला छळयचं.”

“आता लहानी बहिण आहेच तितकी नौटंकीबाज त्याला मोठे भाऊ तरी काय करणार ना?” आरुष पण त्याच तोंड वाकड करत बोलला. “त्या रेसची गोष्ट माहिती आहे ना?”

“हम्म.” मनाली “मी पण तिला अडवलं होत. पण ती मला पण चकवून निघून गेली.”

“तरी तिला आम्ही काहीच बोलू नको का?” आरुष

“ठीक आहे,” मनाली “झाली तेव्हा चूक. पण मग आता तिच्या मामीला कशाला काय सांगणार आहेस?”

“अच्छा,” आरुष दीर्घ श्वास घेत बोलला. “आता ती तुला पुढे करत आहे.”

“म्हणजे?” मनाली

“ती अशीच करते.” आरुष “वेळेनुसार तिला कोण पाठीशी घालेल? याचा विचार करून बरोबर त्याच्या पाठीशी जाऊन स्वतःला सेफ करते.”

“आता तुम्ही सारखे तिला ओरडणार तर ती बिचारी तरी काय करेल नाही का?” मनाली

“काही बिचारी नाहीये ती.” आरुष “ती तिच्या मॉमपेक्षा पुढची आहे. आता तरी शांत झाली आहे. नाहीतर आधी तर जशी काही गुंडीच होती.”

‘आधी?’ मनाली मनातच बोलू लागली. ‘आतचे कॉलेजमधले किस्से अजून माहिती नाही वाटत. आधी नाही ती आताही आमच्या कॉलेजमध्ये गुंडीच आहे.’ हा विचार करून मनालीला खुदकन हसू आल.

“आता आपल बोलूया?” आरुष तिचं सुंदर स्मित बघून बोलला.

“आपल?” मनाली गोंधळून गेली.

“ते रावीजडे नंबर मागत होतीस ना.” आरुष “मग बोल आता.”

एवढा वेळ बडबड करणारी मनाली आता मात्र लाजून गप्प बसली.

“अगं बोल.” आरुष तू इतकी घाबरतेस?” आरुष तिला उकसवू लागला. तिला उकसवल की ती बेभान होते ते त्याने तिला खेळताना पाहिलं होत. तिचं मनाली त्याला आता बघायची होती.

“मी नाही घाबरत कोणाला.” मनाली निरागस चेहऱ्याने बोलली. “ते तर मला आभार मानायचे होते. मी पडल्यावर कोणाचच लक्ष गेल नाही. ती रावी पण त्या अम्पायरकडे पळाली होती.”

“नेहमी आमच्या रावीला सांभाळून घेणारी मनाली, त्यादिवशी बेभान होऊन भिडणारी मनाली आणि आताची ही निरागस मनाली,” आरुष तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागला. “या सगळ्या मनाली मला खूप आवडल्या. अजून किती रूप आहेत तुझे?”

तशी मनाली खूप लाजली आणि तिने तिचा चेहरा तिच्या एका हाताने झाकून घेतला. “मी ठेवते फोन.”

“बघ मग,” आरुष तिला प्रेमळ धमकी देत बोलला. “मी पुन्हा फोन नाही करणार मग.”

“ह्या अश्या धमक्या मला नाही द्यायच्या.” मनालीने लागलीच तिच्या चेहऱ्यावरचा हात काढला आणि जरा चिडून बोलली.

“मग काय देऊ?” ती पुढे काही बोलणार तोच आरुष प्रेमळ आवाजात बोलला.

“काही नको.” चिडलेली मनाली लगेच तिची नजर चोरत बोलली.

“मग अस मी बघत बसलेल चालेल तुला?” आरुष
तश्या तिच्या कपाळावर परत आठ्या चढल्या. "फक्त मला बघायला फोन केला आहे?”

“हो.” आरुष त्याचे डोळे मिचकावत बोलला.

“चालेल मग मी रावीला सांगते तुला फोन करायला.” मनालीचा सूर तर बदललाच पण त्या सोबत तिच्या चेहऱ्यावर पण बारा वाजले. “ठेवू?”

“कश्याबद्दल?” आरुष गोंधळून जात बोलला. “आत्ताच तर फोन केला आहे. लगेच ठेवते?”

“हो.” मनाली घाबरून बोलली. तिची नजर सारखी मागे जात होती.

“का भूत पाहिलस का मागे?” आरुष हसून विचारू लागला.

तशी मनाली अजूनच बावरून गेली आणि तिने पटकन फोन कट केला.

“अरे हिला काय झाल आता?” आरुष पुरता गोंधळाला गेला. “आता काय केल मी?”

“तू काही नाही केल, तिने भूत पाहिलं.” ...

आरुषला मागून त्याच्या आईचा म्हणजेच आराध्यचा आवाज आला. तस त्याने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले.

“फक्त मला बघायला फोन केला आहे?” मनाली जस तिचं हे वाक्य बोलली. तेव्हाच आराध्या आरुषच्या मागे येऊन उभी राहिली होती. आरुषच्या डोळ्यात हरवलेल्या मनालीला पहिले समजलच नव्हत पण जस आराध्याने थोड वाकून पाहिलं तस मनालीच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते.

ती तिकडे खूपच घाबरून गेली. आता आरुषच्या घरात त्याच्यासोबत काय होईल? या विचारानेच तिला घाम फुटला होता.

इकडे आरुष आराध्याला अजूनही पाठ करून उभा होता. आराध्या आज लवकरच घरी आली होती. आईचा आवाज ऐकून नेहमी हॉलमध्ये येणारा लाडका लेक अजून का आला नाही? ते बघायला आराध्या त्याच्या खोलीत आली होती. तेव्हा तिला तिचा लाडका लेक एका मुलीसोबत प्रेमाच्या गप्पा मारताना दिसला होता.

असही परीने आराध्याला शब्द दिल्याप्रमाणे तिने आराध्याला फोन करून मनालीबद्दल संगीताल होत आणि आता तो थेट रंगेहात पकडला गेला होता.

“साहेबांना इतक्या प्रेमाने पण बोलता येत?” आराध्या हाताची घडी घालून विचारू लागली. “नाहीतर मैत्रिणीचा विषय काढला की लगेच चिडतो.”

“तस काही नाही मॉम.” आरुषची हिम्मतच होत नव्हती आराध्याकडे वळायची.

“इकडे बघ आधी.” आराध्याने त्याला स्वतःकडे वळवलं आणि त्याला त्याच्या बेडवर बसवून ती त्याच्या बाजूला बसली. “आता मला सांग काय चालू आहे तुझ्या मनात?”

आरुषने त्याच्या आईकडे पाहिलं. “तशी तर ती मला आधीपासून आवडत होती. जेव्हा जेव्हा ती रावीचं रागाला सहज शांत करायची. पण तेव्हा फक्त ती आवड होती. पण जेव्हा ती स्पर्धेत ज्या त्वेषाने खेळली ना ते माझ्या मनात घर करून गेली. म्हणजे जिथे गरज आहे तिथे संयम आणि जिथे गरज आहे तिथे डायरेक्ट भिडते. तिला तिच्या घरून आधीच पाठींबा मिळाला असता तर ती कदचित आज खूप पुढे गेली असती.” त्याने आराध्याकडे पाहिलं. “आज पहिल्यांदाच तर फोनवर बोललो आहे. पण तरी अस वाटल की खूप जुनी मैत्री आहे.”

“अरे तुला तर तिच्याबद्दल बरचं काही समजलं आहे.” आराध्या “आणि मला सांगतो की पहिल्यांदाच बोललो म्हणून.”

“मॉम,” आरुष “रावीने सांगतील मला.”

“म्हणजे तिच्याबद्दल संशोधन पण करून ठेवलं आहेस.” आराध्या

“मी बोलू की नको?” आरुष लटक्या रागात बोलला.

आराध्या कधीची त्याची मस्करी करायच्या मागे लागली होती. त्याच्या मनात तिच्याबद्दल फक्त आकर्षण आहे की खरचं तो प्रेमात पडला आहे. हे ती बघत होती. आकर्षण तर क्षणभरासाठी असत पण कधी कधी एका क्षणात सुद्धा प्रेमात पडता येत. हे आराध्या पेक्षा जास्त कोणाला माहिती असेल. तिच्यासारखा तिचा मुलगा देखील त्याला आवडणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडला होता.

आवड ते प्रेम हा कालावधी त्याने स्वतःला वाट बघायला लावलं होत. आधी त्याने स्वतःच्या मनाची खात्री केली आणि नंतरच तिने मारलेल्या त्या सुरात तो अडकला गेला होता.

“बघत होते रे,” आराध्या “तुला अजून वाट बघायची गरज आहे का?” तिने आरुषच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला.

“म्हणजे मी होकार समजू?” आरुष लगेच उत्साहात येत विचारू लागला.

“आधी तिला विचारलं?” आराध्या तिच्या भुवया उंचावत विचारू लागली.

तस आरुषने बारीक तोंड करून नकारार्थी मान हलवली.

“मग तिच्या घरातून परवानगी नाकारली तर?” आराध्या

“अस कस नाकारतील?” आरुष लगेच चिडून बोलला.

“हाच तुमचा आतातायीपणा तुम्हाला नडतो.” आराध्याच्या कपाळवर देखील आठ्या आल्या. “आधी तिच्या घरी तिला परवानगी देतील का ते बघ आणि नंतर एकमेकांत तुमचा जीव गुंतवा. नाहीतर नंतर जमल नाही तर खूप कठीण होऊन बसत.”

“अस कस?” आरुष गोंधळाला. “अस विचारून थोडीच प्रेमात पडता येत.”

“बरोबर आहे,” आराध्या “अस विचारून प्रेमात पडता येत नाही. पण पुढच पाउल टाकण्याआधी जरा विचार करायचा असतो, जे कदाचीतच कोणी करत.”

आता आरुष विचारात पडला. तसा त्याला प्रसाद आठवला जो थेट मालाच्या घरी जाऊन पोहोचला होता.

“पण मग मालाने विचार केला नाही.” आरुष विचार करत बोलला. “जस प्रसादने तर फक्त शब्द टाकला होता. त्यांनी पण अजून एकमेकांना प्रपोज केल नाही. त्यांना तर परवानगी सहज मिळाली ना.”

“तुला कोण बोलल की त्यांना परवानगी दिली आहे ते?” आराध्या “असही तुम्ही लहानपणापासून एकत्र वाढले आहात. त्यामुळे त्यांना एकमेकांना समजून घ्यायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून त्यांना कोणी काही बोलत नाहीये. त्याचा अर्थ असा नाही ती त्यांना परवानगी दिली आहे. त्यांचा निर्णय झाला की आम्ही परत एकदा त्यांच्यासोबत बोलणार आहोत.”

“मग आता काय करू?” आरुष

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all