Login

अवनी एक प्रवास भाग ५४

आता काय करावं? याचा विचार ते करत बसले होते. त्यांना काहीही करून ती सगळी संपत्ती स्वतःच्या नावे करायची होती. त्याच्या भरोश्यावर तर त्यांच्या घरातल्या कोणीही कुठेही काम पाहिलं नव्हत आणि नाही कुठे साधा व्यवसाय टाकला होता. पण ज्याने परी जिवंत असल्याची माहिती पुरवली होती त्याला मात्र शोधून त्यांच पूर्ण कुटुंब बरबाद करून टाकल होत. त्या माणसावर भ्रष्टाचाराचा आरोप करून त्याला कोठडीत टाकल होत. त्याच्या बायकोच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. त्याच्या मुलाला देखील खोट्या केस मध्ये फसवून जेलमध्ये ठेवलं होत.
मागील भागात.

“हाच तुमचा आतातायीपणा तुम्हाला नडतो.” आराध्याच्या कपाळवर देखील आठ्या आल्या. “आधी तिच्या घरी तिला परवानगी देतील का ते बघ आणि नंतर एकमेकांत तुमचा जीव गुंतवा. नाहीतर नंतर जमल नाही तर खूप कठीण होऊन बसत.”

“अस कस?” आरुष गोंधळाला. “अस विचारून थोडीच प्रेमात पडता येत.”

“बरोबर आहे,” आराध्या “अस विचारून प्रेमात पडता येत नाही. पण पुढच पाउल टाकण्याआधी जरा विचार करायचा असतो, जे कदाचीतच कोणी करत.”

आता आरुष विचारात पडला. तसा त्याला प्रसाद आठवला जो थेट मालाच्या घरी जाऊन पोहोचला होता.

“पण मग मालाने विचार केला नाही.” आरुष विचार करत बोलला. “जस प्रसादने तर फक्त शब्द टाकला होता. त्यांनी पण अजून एकमेकांना प्रपोज केल नाही. त्यांना तर परवानगी सहज मिळाली ना.”

“तुला कोण बोलल की त्यांना परवानगी दिली आहे ते?” आराध्या “असही तुम्ही लहानपणापासून एकत्र वाढले आहात. त्यामुळे त्यांना एकमेकांना समजून घ्यायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून त्यांना कोणी काही बोलत नाहीये. त्याचा अर्थ असा नाही ती त्यांना परवानगी दिली आहे. त्यांचा निर्णय झाला की आम्ही परत एकदा त्यांच्यासोबत बोलणार आहोत.”

“मग आता काय करू?” आरुष

आता पूढे.

“आधी एकमेकांसोबत स्पष्ट बोला,” आराध्या त्याला समजवत बोलली. “तुझे गोल्स काय आहेत? तिचे तिच्या आयुष्याबाबत काय विचार आहेत? तिच्या घरचे कसे आहेत? पुढे जाऊन एकमेकांसोबत ॲडजस्ट कराल का? भावनेच्या भरात निर्णय नका घेऊ. काही प्रश्न पडलेचं तर आम्ही तुझ्या सोबत असू.”

“एवढा विचार करायचा आहे?” आरुषच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभ राहील.

“मग,” आराध्या “आयुष्य आहे हे. कोणता खेळ नाही की पुन्हा संधी मिळेलच.”

“मग कधी जाऊ भेटायला तिला?” आरुष

“आता ते ही तू मलाच विचारशील?” आराध्या हलकेच हसत बोलली आणि त्याचे केस विस्कटत त्याच्या खोलीतून बाहेर पडली.

आराध्या बाहेर पडल्यावर आरुषने मनालीला तिच्या मोबाईलवर फोन लावला.

तिकडे टेन्शनमध्ये असणारी मनाली तिची नख खात बसली होती. आरुषच्या घरी काय चालू असेल? याचा ती विचार करत होती. ती तिच्याच विचारात असताना तिचा मोबाईल वाजला. मोबाईलचा आवाज ऐकून पहिले तर ती दचकलीच. नंतर वाजणारा मोबाईल बघून स्वतःला भांडत तिने तो फोन लागलीच उचलला.

“सॉरी ते..” ती चाचरत बोलायला लागली. “जास्त ओरडल्या का तुमच्या मॉम?”

“तुमच्या?” आरुषच्या चेहऱ्यावर लागलीच चमक आली. “आत्तापासून पासून एवढा रिस्पेक्ट?”

“इथे माझा जीव टांगणीला लागला आहे आणि तुम्हाला मस्करी सुचत आहे?” मनाली लटक्या रागात बोलली.

“काही ओरडली नाही,” आरुष “फक्त समजावत होती की आधी भेटून एकेमेकांचे व्विचार समजून घ्यायचा प्रयत्न करा. मग सांग कधी भेटतेस?”

“अं?” मनाली गोंधळून गेली.

“तुला भेटायचं आहे.” आरुष “कधी आणि कुठे भेटू?”

“अं ते,” मनाली चाचरली. “म्हणजे घरी काय सांगू? ते नाही पाठवणार अस.”

“मग मी घरीच येतो.” आरुष “असही आज ना उद्या यावचं लागेल ना.”

“जरा मस्करी सोडून गंभीर व्हा.” मनाली गंभीर होऊन बोलली.

“अरे यार,” आरुष “ते अस अहो जो नको करूस. सध्या तरी नावाने हाक मार ना.”

“बघू प्रयत्न करते.” मनाली हलकीशी लाजत बोलली.

“मग भेटशील ना?” आरुष प्रेमाने बोलला. “हवं तर कॉलेज सुटल की भेटू. घरी तुझ्या लाडक्या मैत्रिणीच नाव सांग.”

“तिला नको.” मनाली गाल फुगवून बोलली. “तिला काही सांगायला गेली की ती नुसती चिडवत राहते.”

“मग मी थेट तिला न सांगता तिकडे आलो तर ती अजून चिडवेल.” आरुष “चालेल का तुला?”

“नाही नको.” मनाली लगेच घाबरून बोलली. “मी सांगते तिला. कॉलेज समोरच्या कॅफेमध्ये भेटूयात.”

“तिथे नको.” आरुष विचार करत बोलला. “तुमच्या वर्गातल्या कोणी पाहिलं तर उगाच तुझ्याबद्दल काहीतरी पसरायचं.”

कोणीतरी आपल्याबद्दल इतका विचार करतय हे बघून मनाली भारावून गेली.

“एक काम कर,” आरुष “रावीला घेऊन तू थोडं शहराबाहेर असणाऱ्या आमच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये ये. जिथे आम्ही नेहमी जेवायला थांबतो.”

“शहराबाहेर?” मनाली परत घाबरली.

“नको टेन्शन घेऊ,” आरुष “रावीला मी सांगतो. ती बरोबर आणेल तुला.”

“ठीक आहे.” मनालीच्या चेहऱ्यावर सुंदर अस स्मित आल आणि तिने फोन ठेवून दिला.

तिकडे आरुषच्या चेहऱ्यावर देखील उद्या तिला भेटता येईल या विचाराने चमक आली होती. हे दोघे एकमेकांच्या विचारात स्मित करत असताना तिकडे परी मात्र डोक्याला हात लावून बसली होती. तिला देखील तुषारने मेसेज करून त्याच्यासोबत डेटला बोलावलं होत. बरं तिला थेट नकार देखील देता येत नव्हता. नाहीतर तो खरचं तिच्या भावांना खरं काय झाल ते सांगून देईल ही भीती तिच्या मनात होती. शेवटी कॉलेज सुटल्यावर भेटू असा त्याला रिप्लाय केला आणि तिच्या कामाला लागली.

शेवटी एकदाचा आजचा दिवस संपला म्हणून सर्वांनी त्यांची पाठ त्यांच्या त्यांच्या बेडला टेकवली.

रावीने टेकवलेली पाठ काही वेळातच पुन्हा उठून सरळ झाली होती. कारण तिला आरुषने मेसेज करून मनालीला उद्या त्यांच्या नेहमीच्या कॅफेमध्ये घेऊन यायला लावल होत. तोच मेसेज तिने दोन वेळा स्वतःचे डोळे चोळत चोळत वाचून पहिला होता.

“म्हणजे उद्या तिला प्रपोज करणार का तू?” रावी लगेच उत्साहात येत विचारू लागली. “मी तिला तिकडे घेऊन येणार आणि तू तिला अचानक येऊन प्रपोजच सरप्राईज देणार. हाऊ रोमांटिक यार.”

“तुझ्या रंगलेल्या त्या कल्पनांना लगाम दे.” आरुष कडक आवाजात बोलला. “तिला फोन करूनच मी हे ठरवलं आहे. आता उद्या तिच्या घरी सांगून तिला कस घेऊन यायचं? ते तू बघ.” आरुषने जणू काही ऑर्डर सोडली.

“याच्या बदल्यात मला काय मिळणार?” रावी तितक्याच तोऱ्यात बोलली.

“तुला जे हवं ते तर तू न मागता सहज मिळत आणि तुला हवी असेलली गोष्ट सहज मिळत नाही तेव्हा ते तू बरोबर लाडीगोडी लावून मिळवते.” आरुष “मग तुला अजून काय हवं?”

“ते मी तुला भेटल्यावर सांगते.” रावी आता जरा गंभीर झाली.

तिचा तो गंभीर आवाज ऐकून आरुष पण जरा विचारात पडला. कारण रावीच्या मनासारखं काही बोललं नाही की ती तिच्या पद्धतीने बरोबर ब्लॅकमेल करायला सुरवात करत होती. पण आज मात्र ती अस काहीच न करता फक्त बोलली होती.

नंतर ते दोघेही झोपी गेले.

दुसरा दिवस उजाडला. आज आरुषचा चेहरा चांगलाच खुलला होता. तिकडे मनाली देखील उत्साहात होती. पण तितकीच ती टेन्शनमध्ये सुद्धा होती. इकडे परी पण झोपेतून उठताना आनंदात उठली होती. पण जस तुषार आठवला तस तिच्या कपाळावर देखील आठ्या आल्या होत्या. रावी सध्या तरी निवांत झोपलेली होती.

मालाचा वाढदिवस असल्याचे सुजाताला तेजश्रीकडून समजल होत. आता तिचा वाढदिवस म्हणजे तुषार तर त्यासाठी जाणारच आणि सुजय देखील तिथे येणारच. हे माहिती असल्याने तिने देखील तेजश्रीला दोन दिवसापासून हैराण केल होत. कारण तिला देखील त्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होत. त्यानिमित्ताने का होईना सुजयला तिला बघता येईल आणि झालंच तर त्याची भेट देखील होईल.

तेजश्रीने गेले दोन दिवस दादासोबत बोलते म्हणून सुजाताला जरा वाट बघायला लावली होती. मालाला तिच्या कुटुंबाबाहेरची आणि अनोळखी माणस अश्या तिच्या पार्टीला आलेली आवडत नव्हती आणि तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचं म्हणजे आधी तुषार सोबत बोलाव लागणार होत. तो तिच्या जितक्या जवळचा होता. तितक्या तेजश्री आणि सुजाता नव्हत्या. भले तेजश्री तुषारची बहिण का असेना? तिच्याशी फक्त तिची तोंडओळख होती. त्यामुळे तेजश्रीने अस अचानक तिच्या पार्टीला गेलेलं माला आवडेल की नाही ह्याची खात्री तेजश्रीला नव्हती. पण फक्त आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणीसाठी ती तिच्या दादासोबत बोलण करणार होती.
तेजश्रीने तिला एवढ सांगून सुद्धा सुजाताने तिला सकाळीच तुषारसोबत बोलण झाल का विचारायला फोन केला.

“अगं बाई,” तेजश्री वैतागून बोलली. “मी आत्ताशी उठली आहे आणि दादा त्याच्या जिममध्ये घाम गाळत असेल. जरा दम धर ना.”

“तुला नाही समजणार.” सुजाताने चिडून फोन ठेवून दिला.

‘हे भगवान.’ तेजश्रीने वर तिच्या खोलीच्या छताकडे पाहिलं. ‘काय करू मी हिचं?’” ती मनातच बोलू लागली. ‘एवढं समजावून पण तेच करायचं आहे तिला.’

तिने नकारार्थी मान हलवली आणि आवरायला पळाली. आज काहीही करून तुषारसोबत बोलण्याचे तिने ठरवले होते.

जो तो ज्याच्या त्याच्या घरी पटापट आवरत होता. कोणाला कामाला जायची घाई तर कोणाला कॉलेजला जायची.

तिकडे गौतम आणि त्याच बाकी कुटुंब मात्र खूपच धुसमुसत होत. त्यांनी चालवलेले सगळे प्रयत्न सपशेल आटपत होते. नाही त्यांना परीला मनवता आल होत आणि नाही तिला पकडण्यात यश आल होत. त्यात रागाच्या भरात परी आणि तिच्या त्या कुटुंबाबद्दल नाही नाही ते तिला बोलून गेले होते. आता तिने त्या संपत्तीत काही रस नसल्याच्या कागदावर सही देखील करून पाठवली होती. त्याचा फायदा फक्त आश्रमाला होणार होता.

आता काय करावं? याचा विचार ते करत बसले होते. त्यांना काहीही करून ती सगळी संपत्ती स्वतःच्या नावे करायची होती. त्याच्या भरोश्यावर तर त्यांच्या घरातल्या कोणीही कुठेही काम पाहिलं नव्हत आणि नाही कुठे साधा व्यवसाय टाकला होता. पण ज्याने परी जिवंत असल्याची माहिती पुरवली होती त्याला मात्र शोधून त्यांच पूर्ण कुटुंब बरबाद करून टाकल होत.

त्या माणसावर भ्रष्टाचाराचा आरोप करून त्याला कोठडीत टाकल गेल. त्याच्या बायकोच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. त्याच्या मुलाला देखील खोट्या केस मध्ये फसवून जेलमध्ये ठेवलं गेल. आता बाहेर फक्त त्या माणसाची मुलगी होती जी बाहेर होस्टेलला असल्याने वाचली होती. तिची माहिती खूपच गुप्त ठेवली असल्याने तिच्यापर्यंत मात्र गौतमला पोहोचता आल नव्हत.

एकवेळ तर त्यांना वाटायचं की तिलाच संपवलं तर सगळ सुटेल. पण मग त्यांच्या हाती काहीच लागणार नव्हत. कारण परीच्या वडिलांनी त्यांच ते मृत्यूपत्र तेवढ्याच हुशारीने बनवलं होत. त्यामुळे परीला त्यांच्याकडे आणून ठेवणे हा एकच उपाय त्यांच्यासमोर होता. गौतमने परीची ती आत्या देखील जरा लांबची शोधून आणली होती. ती चुलत का असेना ती गौतमला मिळालेली होती. एकदा का हरीशच लग्न परीसोबत झाल की तिला देखील खूप सारे पैसे द्यायचं आश्वासन गौतमने दिल होत.

“आपण परीला काही करू शकत नाही ना?” हरीश विचार करत बोलला. “पण तिच्या त्या बाकी कुटुंबाला तर बरचं काही करू शकतो, होऊ शकत.” हरीशच्या चेहऱ्यावर एक क्रूर स्मित झळकल.

“पण त्यांची पोहोच पण चांगलीच असावी,” गौतम विचार करत बोलला. “तिचे आताचे वडील त्या नामांकित कंपनीत आहेत आणि ज्यांची कंपनी आहे ते मोहिते साहेबांचे खास मित्र आहेत. त्यांच्यात बराच कौटुंबिक सलोखा आहे. तिच्या कुटुंबाला हात लावण्याआधी खूप विचार करावा लागेल. नाहीतर आपण चुकून जरी सापडलो ना तर आपल अस्तित्व पण रहाणार नाही.”

“आपण तिला त्यांच्यापर्यंत पोहोचूच द्यायचं नाही.” हरीश “फक्त तिलाच इमोशनल ब्लॅकमेल करूयात. तिच्या वडिलांकडे जायला वेळच द्यायचा नाही.”

“बरं ठीक आहे.” गौतम “पण बराच व्यवस्थित प्लान करावा लागेल.”

“ते सगळ ठरवलं आहे मी.” हरीशने त्यांना अजून जवळ बोलावलं आणि त्याच्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगून दाखवू लागला.

इकडे मनालीच आज त्यांच्या कॉलेजमध्ये लक्षच लागत नव्हत. तरी त्यांचे लेक्चर अजून तरी सुरु झाले नव्हते. जे काही एक दोन लेक्चर व्हायचे त्यापैकी एकही लेक्चरमध्ये तिचं मन तिला साथ देत नव्हत. तिच्या त्या मनात आज फक्त आरुषसोबत काय आणि कस बोलायचं? ह्याचाच विचार धावत होते.

तिची ही अवस्था बघून रावीला खूपच हसू येत होत. पहिले तर तिला पाहिलं प्रेम आठवलं. तेव्हा तिला ही कधी इतकी उत्सुकता लागली नव्हती. मग तेव्हाच तिंच ते प्रेम नव्हता का? हा विचार तिच्या मनात डोकावला. पण नंतर लागलीच मानेला झटका देत ते विचार बाजूला सारले आणि लेक्चरमध्ये लक्ष देऊ लागली.

परीचा हात देखील बरा झाला असल्याने तिने देखील तिचे लेक्चर काही दिवसांसाठी बाजूला ठेवले आणि डान्सच्या प्रॅक्टिसकडे लक्ष देऊ लागली. तिला आता तो डान्स लवकरात लवकर बसवून त्या मुलींना तयार करायचं होत.

त्या कॉलेजमध्ये आधी फक्त चांगली शिक्षक म्हणून चर्चेत असणारी परी आता तिच्या त्या डान्स बसवण्याच्या पद्धतीमुळे अजून चर्चेत आली. खास तिचा डान्स बघायला आता डान्समध्ये भाग घेतलेले बाकी स्पर्धक पण येऊ लागले होते. फक्त स्टेप्स दाखवण्यापुरती का असेना पण तिचा तो डान्स बघून सर्वांचे डोळे विस्फारत होते. काहींना तर आता कोरीओग्राफर म्हणून तिला नाकारलं ही चूक वाटू लागली होती. पण आता वेळ गेली होती. परीच्या हाताखाली तेजश्री आणि तिचा तो ग्रुप चांगलाच निरखून येत होता.

रावी आणि मनालीचे जसे लेक्चर संपले तश्या त्या दोघी लागलीच डान्सची प्रॅक्टिस चालू असलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचल्या. रावीला तिच्या दीचा डान्स बघण्याची संधी सोडायची नव्हती. त्या दोघी धावतच डान्सची प्रॅक्टिस चालू असलेल्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्या बघतच राहिल्या. कारण त्या वर्गाच दार तर लावून घेतलं होत. त्या वर्गाच्या उघड्या असलेल्या खिडकीत मुला आणि मुलींची तुफान गर्दी होती. ते बघून दोघींनी एकमेकींकडे पाहिलं.

आता काय करायचं? म्हणून दोघी विचारात पडल्या. परी तर काही आता फोन उचलणार नव्हती आणि त्यांच्याकडे तेजश्रीचा नंबर देखील नव्हता. मग काय? बसल्या की त्या दोघी तोंड पाडून.

त्यांना बसून थोडा वेळ झाला ही नसेल तोच त्या वर्गाचा दरवाजा उघडला गेला. तश्या त्या दोघी पटकन उठल्या आणि दरवाजाजवळ जाऊ लागल्या. पण त्याचं नशीब इतक खराब होत की त्यांची आजची डान्सची प्रॅक्टिस संपली होती आणि परी वर्गातून बाहेर पडत होती.

“काय गं दी.” रावी लगेच परीजवळ जात बोलली.

तिच्या अस तोंड पाडून बोलण्यावर परीने तिच्यावर डोळे वटारले. तस तिने अजूनच तोड वाकड केल आणि तिथून जाऊ लागली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all