मागील भागात.
“इतकी बोर आहे का माझी कंपनी जे तुला लवकर संपवून लवकर जायचं आहे?” तुषार मेनूकार्डवर असलेली नजर वर करत बोलला.
“तस नाही,” परी “माझ्यामुळे उगाच तुमच्या डोक्याला त्रास नको.”
आता तुषार तिला बघतच राहीला. “मला जेव्हा पण भेटतेस तेव्हा भांडतच असतेस आणि आता त्रास नको पण बोलत आहेस?” त्याने त्याच्या मनातली शंका विचारली.
“मला नाही आवडत माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला,” परी “भले तो शत्रू का असेना?”
तिच्या ह्या विचारांना ऐकून तुषार परत तिच्यात हरवला आणि त्याला तो दिवस आठवला जेव्हा त्याने तिचा डान्स दिल्लीला पहिला होता. मग त्याला लागलीच त्याने चोरून ऐकलेलं बोलण आठवलं. ते आठवताच तुषारच्या चेहऱ्यावर चमक आलील आणि त्याने वेटरला बोलवलं. परीला ऐकूही जाणार नाही अश्या आवाजात त्याने वेटरला ऑर्डर दिली.
‘हे इतक्या बारीक आवाजात का बोलत आहेत?’ परी मनातच विचार करत बोलली.
आता पूढे.
तुषारने ऑर्डर दिली तसा तो वेटर त्याच्याकडे बघतच राहीला. पण तो नेहमीचा गिऱ्हाईक असल्याने वेटर त्याची ऑर्डर घेऊन निघून गेला.
“तुझ्या भावांकडून तुझे बरेच किस्से ऐकायला मिळाले आहेत.” तुषारने पुन्हा बोलायला सुरवात केली. “तुझी भेट होऊन सुद्धा कधी भेट नाही झाली.”
“म्हणजे?” तुषारच्या ह्या वाक्यावर ती गोंधळून गेली.
“ते दिल्ली, तुझा तो डान्स आणि मी काढलेला फोटो.” तुषार हलकेच हसत बोलला.
आता परी पण हलकीच हसली.
“तुझ्या भावांकडून ऐकायचो ना तेव्हा तुला भेटायची खूप इच्छा व्हायची,” तुषार “पण तू कधी आलीच नाहीस तुझ्याच भावांच्या अकेडेमीत.”
“खरं सांगू?” परी आता ओशाळून बोलली.
“काय?” तुषारला त्याची उत्सुकता लागली.
“ते माझ्या भावांना कोणत्या कॅरियरमध्ये टाकल म्हणून मी भांडत होते तुम्हाला.” परी बारीक आवाजात बोलली. “मला वाटत होत की त्यात काय करियर असेल?”
ते ऐकून तुषार तिला आठ्या पाडून बघू लागला. “त्यात त्यांची आवड आहे आणि कोण बोलल की त्यात करियर नाहीये? तुमच्या भावांची ती अकेडेमी शहरातलीच काय ह्या पूर्ण जिल्ह्यातली उत्तम अशी अकेडेमी आहे. लांबून लांबून फोन येत आहेत त्यांच्या अकेडेमिच्या मुलांना स्पर्धेत जिंकताना बघून.” आता मात्र तुषारचा आवाज किंचित वाढला होता. कारण ते ही त्याच्या आवडीच क्षेत्र होत आणि त्यात ती चमकत होता. आत ती गोष्ट वेगळी की त्याला मिळालेला तो नावलौकिक कधीच मिरवत नव्हता.
“हो,” परी त्याला शांत करत बोलली. “इतके का लगेच हायपर होत आहात? मला आधी वाटायचं तस अस पण मी बोलले. फक्त सुजयच्या त्या स्पर्धेची भीती वाटते. त्याबद्दल घरी जर समजलं ना त्याच्यासोबत माझ पण काही खर नाही.”
“का?” तुषार “लगेच घराबाहेर काढतील का?”
तशी परी त्याला आठ्या पाडून बघू लागली. “मला तर नाही पण सुजयला नक्कीच.”
“एवढा जीव आहे त्यांच्या तुझ्यात?” तुषार
“आता आईवडिलांचा आपल्या मुलांमध्ये जीव असतो की.” परी
“ते पण आहे,” तुषार “पण मग तुमची पहिली भेट कुठे झाली? त्या आश्रमातच का?”
“हो,” परी बोलू लागली. “तेव्हा बाबा आम्हाला शिकवायला, आमच्यासोबत खेळायला यायचे. जेव्हा कधी यायचे तेव्हा पूर्ण आश्रमात जणू सणच असायचा. नंतर त्यांचे मित्र येऊ लागले. आमच्या त्या आश्रमातल्या बऱ्याच मुलांचे आयुष्य त्यांच्यामुळे सुधारले आहेत.”
“अरे वा छानच की.” तुषार परीकडे बघत बोलला. विजयबद्दल बोलताना तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसून येत होती. “कोणाकोणाचे सुधरवले?”
“अरे वा छानच की.” तुषार परीकडे बघत बोलला. विजयबद्दल बोलताना तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसून येत होती. “कोणाकोणाचे सुधरवले?”
“जास्त लांब कशाला जायचं?” परी “मालाची आई पण आधी आमच्या आश्रमात होती. त्यांना पण आयुष्यात पुढे काय करायचं ते समजत नव्हत? तेव्हा बाबांनी तिला खूप मदत केली. एका ठराविक वयानंतर आश्रम सोडवं लागत तेव्हा बाबांनी काही दिवस त्यांच्या राहण्याची सोय केली. तात्पुरता जॉब पण लावून दिला होता. नंतर जस त्यांच फॅशन डिझाईनरच सुरु झाल तस ती पण तिथे अधेमध्ये येत जात राहायची.”
“मालाची आई पण आश्रमात होती?” तुषारला आश्चर्यच वाटल.
आता परी तिच्या विचारातून बाहेर आली आणि परत आठ्या पाडून तुषारला बघू लागली. “पण मी हे तुम्हाला का सांगत आहे?” तिने त्यालाच प्रश्न विचारला.
यावर तुषारला हलकंच हसू आल. “बाबांबद्दल बोलताना खूप गोड दिसतेस तू.” तुषार भावनेच्या भरात बोलून गेला.
तुषारच बोलण ऐकून परी दोन मिनिट स्तब्ध झाली. तो काय बोलला? हे समजून घ्यायला तिला तेवढा वेळ गेला. पहिल्यांदाच कोणीतरी तिची अशी तारीफ केली होती आणि त्याचा तिला आज्जीबात राग आला नव्हता. बाबांबद्दल बोलले म्हणून राग आला नाही की अजून दुसर काही कारण आहे? हाच विचार तिच्या मनात फिरू लागला.
“हेलो.” तुषारने तिच्या चेहऱ्यासमोरून त्याचा हात फिरवला. “कुठे हरवलीस?”
तशी विचारात असणारी परी तिच्या त्या विचारातून बाहेर आली. “अम्म नाही कुठे.”
“मुलीला अस बोलून तिच्यासोबत फ्लर्ट करता का?” परी उगाच राग दाखवायचा म्हणून बोलली. “अश्या किती जणीसोबत केल आहे?”
“फ्लर्ट?” तुषार “मी केल कुठे अजून? मी तर तुझ्या बाबांबद्दल बोलत होतो. त्यांच्याबद्दल बोलताना वेगळीच चमक असते तुझ्या चेहऱ्यावर.”
आता मात्र परीकडे याच उत्तर नव्हत. आता काय बोलाव? या विचारात ती पडली असताना तुषारने ऑर्डर केलेलं जेवण त्यांच्या टेबलावर आल.
आता मात्र परीकडे याच उत्तर नव्हत. आता काय बोलाव? या विचारात ती पडली असताना तुषारने ऑर्डर केलेलं जेवण त्यांच्या टेबलावर आल.
टेबलावर आलेली ती डिश बघून परीचे डोळेच विस्फारले गेले.
‘ह्याबद्दल ह्यांना कस माहित? इव्ह आता काय विचार करतील माझ्याबद्दल? मी कशासोबत काहीही खाते?’ परीला खूपच ओशाळल्यासारखं झाल. ‘नक्कीच दिल्लीला मला खाताना यांनी पाहिलं असणार.
“आठवल का काही?” तुषार हलकस हसत बोलला.
“ते पण तुम्ही पाहिलं होत?” परी हळूच विचारू लागली.
तस तुषारने होकारात मान हलवली. “त्या सांबारमध्ये सामोसा बुडवून खाताना तुझा खुललेला चेहरा मला अजूनही आठवतो आहे.”
“अजून काय काय आठवत आहे?” परीचा चेहराच उतरला.
“वेळ आली की सांगेल.’ तुषार मंद स्मित करत बोलला. “आता हे खा.”
परीने एकदा त्याला पाहिलं आणि एकदा त्या सांबारमध्ये बुडलेल्या सामोसाला. आज पहिल्यांदाच कोणीतरी तिला न सांगता तिला न विचारता तिची आवडीची ती डिश ऑर्डर केलेली बघून परी परत अस्वस्थ व्हायला लागली. तिला तिच्या वडिलांव्यतिरिक्त दुसरा कुठलाही विचार करायचा नव्हता. त्यात तिने प्रेम या विषयाला देखील टाकल होत. पण तुषारने आज अस काहीतरी केलेलं बघून तिचं मन पाघळत चालल होत.
परीने एकदा त्याला पाहिलं आणि एकदा त्या सांबारमध्ये बुडलेल्या सामोसाला. आज पहिल्यांदाच कोणीतरी तिला न सांगता तिला न विचारता तिची आवडीची ती डिश ऑर्डर केलेली बघून परी परत अस्वस्थ व्हायला लागली. तिला तिच्या वडिलांव्यतिरिक्त दुसरा कुठलाही विचार करायचा नव्हता. त्यात तिने प्रेम या विषयाला देखील टाकल होत. पण तुषारने आज अस काहीतरी केलेलं बघून तिचं मन पाघळत चालल होत.
“सध्यातरी दुसरा कोणताच विचार करू नकोस,” तुषार तिचा चेहरा वाचत बोलला. “फक्त आताची ही वेळ जगून घे. मला माहिती आहे तू पुन्हा अस कधीही खाणार नाहीस.”
परीने चमकून तुषारकडे पाहिलं. कारण तो खरोखर बोलत होता. तिला भूक तर लागून आली होती. मग तिने थोडा विचार केला आणि समोर आलेली तिची ती आवडीची डिश खायला सुरवात केली. तुषार फक्त तिचा तो खुललेला चेहरा बघून समाधानाने हलकसं हसत होता.
“तुम्ही का काही खात नाहीये?” परी त्याला फक्त तिला बघून मंद स्मित करताना बघून बोलली.
“तुझ्या डिशमधला शेअर करतेस का?” तुषार त्याची एक भुवई उंचावत विचारू लागला.
तस परीने तिचं तोंड वाकड केल. “आजकाल जास्तच फ्लर्ट करायाला लागले अस नाही वाटत का?”
“नाही,” तुषार “तूच मला ते करायला संधी देतेस.”
तुषारच्या ह्या वाक्यावर परी त्याला चिडून बघू लागली.
“माझ्यासमोर माझी डिश तरी आली आहे का?” तुषार परत हलकस हसत बोलला. “म्हणून मला वाटल की तुझ्या डिशमधलं शेअर करतेस का काय? मला तर आवडेल बाबा.”
“आज्जीबात नाही.” परी पटकन बोलून गेली. “ते मी पाहीलच नव्हत म्हणून बोलली.”
परीच ते वागण बघून तुषारला त्याच हसू थांबवता आल नाही आणि तो जरा मोठ्याने हसला.
“हळू ना जरा.” परी त्याच्या हातावर चापट मारत बोलली.
तस तुषारने पण जागा आणि परी असल्याच गांभीर्य बघून त्याच हसण लगेच थांबवलं. पण आता त्याला उशीर झाला होता. तुषारच ते हसण त्याच्या त्या विद्यार्थ्याला लगेच ओळखू आल होत जो त्याच्या नुकत्याच होणाऱ्या गर्लफ्रेंडला घेऊन आला होता. त्याने आवाज आल्याच्या दिशेने पाहिलं आणि तो दोन मिनिट स्तब्धच झाला. तो काय बघत आहे ते तो समजून घेऊ लागला.
आता तो कुठे बघत आहे? ते त्याची नुकतीच झालेली गर्लफ्रेंड बघू लागली. तर तिचे पण डोळे विस्फारले गेले. तिने लगेच त्यांच्या बाजूला बसलेल्या तिच्या त्या मैत्रिणीला दाखवले. तिनेही तिकडे नजर टाकली तर तिचंही तोंड उघड पडलं.
त्या कॅफेमध्ये पोहोचल्यावर त्याला त्याच्या तुषार सरांची बाईक तर दिसली होती जी बाहेरच्या बाजूला लावली होती. ती बघून पाहिले तर तो जरा घाबरला आणि स्वतःच पहिले त्या कॅफेच्या आतमध्ये येत बघू लागला. तेव्हा तर त्यांचे सर तुषार काही दिसले नाही.
मग त्याने त्याच्या त्या गर्लफ्रेंड आणि तिच्या मैत्रिणीला आत यायला लावले. तो आणि त्याची गर्लफ्रेंड एका बाजूला बसले आणि तिची मैत्रीण दुसऱ्या टेबलवर बसली. त्यांच्या देखील गप्पा चालू होत्या आणि तेवढ्यातच तुषारच्या मोठ्या हसण्याचा आवाज त्यांना आला होता.
आता तुषारच्या समोर जायचं तर ती देखील त्याच्या गर्लफ्रेंड सोबत आला होता. त्या गर्लफ्रेंडची मैत्रीण पण तुषारला जरा घाबरूनच असायची मग ती पण काही पुढे गेली नाही आणि तुषार सोबत असणारी तर त्यांची शिक्षिकाच होती जिच्यासमोर बोलायची त्यांची हिंम्मत व्हायची नाही.
मग काय कराव? ह्या विचारात ते तिघेही होते.
काही वेळाने तुषार आणि परीच जेवण आटोपलं आणि ते जाण्यासाठी उठून उभे राहिले. त्यांच्या जेवणाच बिल देण्यासाठी परीने तिच्या वाटणीचे पैसे काढले. पण तो कॅफेचा वेटर तिच्याकडून पैसे तरी कुठे घेत होता. तो वेटर पण तर तिला ओळखत होता. कारण तिच्या त्या बंधू मंडळींचे कारनामेच तसे होते. त्यात आज तुषार पण सोबतच होता.
“तू पैसे घेतोस की बाकीच्यांना सांगू तू माझ ऐकत नाहीस ते.” परी त्याला दम देत बोलली.
तस त्या वेटरने केविलवाण्या चेहऱ्याने तुषारकडे पाहिलं.
“अगं मी तुला इन्व्हाईट केल होत ना?” तुषार तर ते बिल मी दिल.”
“का?” परी “फक्त मुलांनी पैसे भरावे असा कुठे नियम आहे का?”
“का?” परी “फक्त मुलांनी पैसे भरावे असा कुठे नियम आहे का?”
“बरं.” तुषार “पुढच्या वेळेस तू दे.”
“म्हणजे मी परत तुमच्यासोबत येईल अस वाटत का तुम्हाला?” परी कपाळावर आठ्या चढवत बोलली.
“हो मग.” तुषार पण तितक्याच तोऱ्यात बोलला. “तू कशी पडली? हे जर घरच्यांना समजू द्यायचं नसेल तर.”
“हे अती होत आहे.” परी चिडून बोलली.
यावर तुषारने फक्त त्याचे खांदे उडवले.
“तुम्ही माझ्याच मागे का लागला आहात?” परी
“तुझ्यासोबत वेळ घालवायला मला आवडत.” तुषार त्याच्या खास शैलीत बोलून गेला. “चल लवकर तुझ्या बंधू मंडळींची यायची वेळ झाली आहे.”
तुषार पुढे गेला तरी परी जागीच स्तब्ध झाली होती. ‘तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडत.’ हेच तिच्या मनात घोळायला लागलं होत.
तर तिकडे ह्या तुषारला येताना बघून त्यांना बघत राहिलेले ते तिघे लागलीच एका कोपऱ्यात जाऊन लपले. त्यांना अस लपलेलं बघून त्यांना सर्व्ह करायला येणारा वेटर त्यांना विचित्र नजरेन बघू लागला.
“अगं चल.” तुषार जागीच थांवलेल्या परीला भानावर आणत बोलला.
तशी परी तिच्या विचारातून बाहेर आली आणि पटकन तुषारच्या मागे जाऊ लागली. त्याच्या बोलण्याचा नेमका उद्देश काय? ते त्याला विचारायचं होत. ते दोघेही कॅफेच्या बाहेर आले. तुषार त्याच्या बाईक जवळ गेला. परी देखील त्याच्या मागे मागे त्याच्याजवळ जाऊन पोहोचली.
“अरे वा,” तुषार मंद स्मित करत बोलला. “आज लिफ्ट पण पाहिजे का? मला तर आवडेल तुला लिफ्ट द्यायला.”
“हे काय चालू आहे तुमच?” परी कपाळावर आठ्या पाडत बोलू लागली. “आवडेल आवडेल म्हणून.”
“बोललो ना,” तुषार “मला तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडत.”
परी परत त्याला काही बोलणार तोच तिने वर केलेल्या हातातून तिचा मोबाईल खाली पडला. तो उचलायला ती खाली वाकली. खाली वाकताना ती जराशी मागे वळाली. तिने तिचा मोबाईल तर उचलला. पण त्याच्याच बाजूला असलेल्या एका बाईकच्या स्टॅन्डला लावलेला छोटासा बूट तिला दिसला. जो तिच्या खूप ओळखीचा होता. तिने पटकन वर उभ रहात ती बाईक पाहिली आणि तिचे डोळेच विस्फारले गेले.
“अरे रावी आली आहे इथे.” परी घाबरून इकडे तिकडे बघत बोलली. “म.. मला मी.. जायला हवं.” तिची खूपच तारांबळ उडाली. “उगाच आले तुमच्या पाठी? आता कोणाला समजल तर? काय विचार करतील माझ्याबद्दल?”
परीची असबंध बडबड सुरु झाली. ते बघून तुषारला खूपच हसायला येत होत. त्या बडबडीत परी अगदीच लहान निरागस अशी मुलगी दिसत होती.
“मी एवढी भांडतेय तुम्हाला आणि तुम्ही फक्त हसत आहात?” परी चिडून बोलली.
“तू अशी चिडल्यावर पण खूप गोड दिसतेस.” तुषार
“हे भगवान.” तुषारच वेगळच काही चाललेलं बघून परीने डोक्यालाच हात लावला. “इथे माझा जीव टांगणीला लागला आहे आणि तुम्हाला आताही फ्लर्ट करायचं आहे?”
“जेवढ्या वेळात बडबड केलीस ना,” तुषार “तेवढ्या वेळात तू इथून लांब पोहोचली असती.”
“अरे हो.” परीने परत डोक्याला हात लावला आणि तिच्या स्कुटीकडे पटापट चालत गेली.
तिला अस बडबड करत जाताना बघून तुषारला परत हसू आल. तिची ती प्रत्येक अदा त्याला खूप आवडायला लागली होती. खास करून त्याच्याकडे बघताना ती जशी डोळे वर करून त्याच्या भांडते, ते तर त्याच्या हृदयाच्या अगदीच जवळचं. त्यासाठी तो तिला जाऊन चिडवायचा.
जो पर्यंत ती जात नाही तोपर्यंत तुषार तिलाच बघत उभा राहीला. जशी ती नजरेआड झाली तसा तो परत त्याच्या बाईकवरून उतरून त्या कॅफेकडे जायला लागला.
तुषारला येताना बघून ते तिघे जे कधीचे तुषार आणि परीला बघत होते ते पटकन आतमध्ये निघून गेले. तुषार देखील त्या कॅफेच्या आत जाऊन पोहोचला. त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि आवाज दिला.
“आरुष, रावी” तुषार कडक आवाजात बोलला. “बाहेर या.”
तसे ते तिघे कॅफेमध्ये असणान्र्या फ्रीजच्या मागून बाहेर आले आणि तुषारसमोर येऊन थांबले. त्या तिघांच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न होते.
“ही मनाली इथे काय करत आहे?” तुषार मनालीकडे बघत बोलला.
“दादाने तिला बोलवलं होत.” रावी पटकन बोलून गेली. “पण तुम्ही इथे काय करत आहात?”
“ही मनाली इथे काय करत आहे?” तुषार मनालीकडे बघत बोलला.
“दादाने तिला बोलवलं होत.” रावी पटकन बोलून गेली. “पण तुम्ही इथे काय करत आहात?”
बाकीचे बंधू जरी विचार करूब तुषारसोबत बोलत होते. पण रावीच तस काही नव्हत. ती बेधडक होऊन बोलत होती.
“बरं आधी तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो.” तुषार रावीकडे बघत बोलला. कारण तिला कितीही बोललं, समजावलं, ओरडलं तरी ती तिच्या मनासारखं करणारी होती. तिला तिच्या वडिलांनी, मामांनी, काकांनी तितक लाडावून जे ठेवलं होत. शेवटी त्या सर्वांमधली शेंडेफळ जे होती. “तुमची दी मला आवडते. त्यामुळे आता माझे साले आणि साली व्हायला तयार रहा.”
तुषारच्या ह्या वाक्याने तिघांना मोठा झटकाच बसला.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा