मागील भागात.
“आरुष, रावी” तुषार कडक आवाजात बोलला. “बाहेर या.”
तसे ते तिघे कॅफेमध्ये असणान्र्या फ्रीजच्या मागून बाहेर आले आणि तुषारसमोर येऊन थांबले. त्या तिघांच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न होते.
“ही मनाली इथे काय करत आहे?” तुषार मनालीकडे बघत बोलला.
“दादाने तिला बोलवलं होत.” रावी पटकन बोलून गेली. “पण तुम्ही इथे काय करत आहात?”
बाकीचे बंधू जरी विचार करूब तुषारसोबत बोलत होते. पण रावीच तस काही नव्हत. ती बेधडक होऊन बोलत होती.
“बरं आधी तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो.” तुषार रावीकडे बघत बोलला. कारण तिला कितीही बोललं, समजावलं, ओरडलं तरी ती तिच्या मनासारखं करणारी होती. तिला तिच्या वडिलांनी, मामांनी, काकांनी तितक लाडावून जे ठेवलं होत. शेवटी त्या सर्वांमधली शेंडेफळ जे होती. “तुमची दी मला आवडते. त्यामुळे आता माझे साले आणि साली व्हायला तयार रहा.”
तुषारच्या ह्या वाक्याने तिघांना मोठा झटकाच बसला.
आता पूढे.
ते तिघेही डोळे मोठे मोठे करून तुषारला बघत राहिले. तिघांचे चेहरे मक्खा सारखे झाले होते. एकप्रकारे हा त्यांच्यावर बॉम्बच पडला होता. त्यांना काय बोलावं? कुठली प्रतिक्रिया द्यावी तेच समजत नव्हत. पुढचे पाच मिनिट ते फक्त शांत उभ राहून तुषारला बघत राहिले होते.
“माहिती आहे मला की तुम्हाला हे समजून घ्यायला जड जात असेल." तुषार त्यांची अवस्था बघत बोलला. “मलाही पहिले जड गेल. नंतर जेव्हा तिला पकडायचा प्रयत्न झाला तेव्हा माझ्या मनाने तिच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे आता तिला मनवायची जबाबदारी तुमची.”
“अरे,” रावी गोंधळून बोलू लागली. “आधी टाकलेल्या एकाच बॉम्बमधून आम्हाला बाहेर तर पडू दे.” तिने बाजूची पाण्याची बॉटल उचलली आणि त्यातलं पाणी पिऊ लागली.
“अरे ही माझी पाण्याची बाटली होती.” ज्याची बाटली उचलली तो लगेच चिडून बोलला.
“इथे आमच्यावर इतका मोठा बॉम्ब पडला आणि तुला पाण्याच्या बाटलीची पडली आहे?” रावी चिडून त्याच्या अंगावर चालली होती. तोच मनालीने तिला अडवून धरल.
आता तिला तर काही रावी आवरली जाणार नव्हती. म्हणून आरुष देखील लगेच पुढे आला. त्या तिघांना अस करताना बघून तुषारला खूपच हसू आलं. एकवेळ सारख्या आठ्या पडणाऱ्या परीला संभाळण त्याला सोप वाटत होत. पण तिचे हे नमुने भाऊ आणि बहिण सांभाळणे म्हणजे खूप कठीण काम. तुषार जरा पुढे आला आणि रावीच्या खांद्यावर हात ठेवला.
“चल, तुला चहा पाजतो म्हणजे तुझ डोक जरा शांत होईल.” तुषार
तस तिने आरुष आणि मनालीकडे पाहिलं.
“त्यांना त्यांची डेट एन्जॉय करू देत.” तुषार आरुषकडे बघून त्याचे डोळे मिचकावत बोलला.
तसे ते तिघे आता फक्त चक्कर येऊन पडायचे बाकी राहिले होते. रावी तर पटकन पुढे जाऊ लागली. आरुष आणि मनाली एकमेकांपासून जरा लांब होऊन एकमेकांविरुद्ध बघायला लागले. तुषारने तर बघून तिथून काढता पाय घेतला.
ते दोघेही गेल्याचे आरुषने खात्री केली आणि तो हळूच मनालीजवळ आला.
“गेले ते.” आरुष “चल आता आपण दोघेच आहोत, बस.” आरुषने एका बाजूच्या खुर्चीकडे हात केला.
पण मनाली अजूनही टेन्शनमध्ये होती. कारण तिला तर रावीसोबत पाठवलं होत. जर तिच्या किंवा रावीच्या मोबाईलवर तिच्या घरून फोन आलाच तर काय करायचं? हा प्रश्न तिला पडला होता.
तिकडे कॅफेच्या बाहेर गेलेली रावी तिच्या बाईकवर बसून राहिलेली तुषारला दिसली. तुषारने तिच्या वाट बघण्याच कारण विचारलं तर तिने मनालीच्या घराबद्दल त्याला सांगून दाखवले. मग त्याने काही तिला वाट बघण्यासाठी अडवलं नाही आणि तो त्याच्या घराकडे निघून गेला. आज नाही तो जिमला गेला आणि नाही मालाची प्रॅक्टिस घ्यायला ॲकेडेमीवर.
इकडे कॅफेमध्ये आरुष आणि मनाली दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले गेले. त्यांच्यात बऱ्याच गप्पा झाल्या, अगदी एकमेकांच्या भविष्याबाबत देखील. दोघांचे आज विचार ही जुळताना दिसले. मग काय? धरला की एकमेकांनी एकमेकांचा हात आणि आयुष्यभरासाठीची सोबत हे त्यांच्या नात्यातलं पहिलं वचन तिथूच रचलं गेल.
थोडफार खाऊन दोघेही कॅफेमधून बाहेर पडले. आताही दोघांचे हात एकमेकांमध्ये गुंतलेले होते. दोघांना मंद स्मित करत अस एकत्र येताना बघून रावीने लागलीच दोघांचा फोटो काढला.
“ओये लैला मजनू,” रावीने दोघांना आवाज दिला. “आता तरी हात सोडा आणि ह्या गरीबाच्या मनाचा विचार करा.”
तसे ते दोघे ही हलकेसे हसले आणि एकमेकांना हलकीशी मिठी मारत एकमेकापासून दूर झाले.
“हा, जाळून टाका एकदाच ह्या बाल मनाला.” रावी नाटकी आवाजात बोलली.
ते बघून दोघेही खळखळून हसले.
“बाय.” आता तर आरुषने सरळ मनालीला फ्लाइंग कीस दिली आणि बाईक चालू करून तिथून निघून गेला.
“अय्यो.” रावी लाजायचं नाटक करत बोलली. सोबतच मनालीला धक्का मारायला विसरली नाही.
“चल आता गपचूप.” मनाली रावीला दटावत बोलली. “आता वहिनी होणार मी तुझी. माझा काहीतरी मान ठेव.”
“मान आणि तुझा?” रावी तिचे केस उडवत बोलली. “माझ्यावर अशी वहिनीच्या नावाची दमदाटी करायला गेलीस ना तर तू कोणाकोणाला घाबरते आणि आजवर काय काय कारनामे केले ते सगळे दादाला सांगून देईल.”
“अहो वन्स.” मनाली नाटकी आवाजात बोलली. “माफी असावी.”
“काय?” रावी गोंधळून गेली. “मी कंस?” ती चिडून बोलली.
“हे भगवान.” मनालीने वर आकाशाकडे पाहिलं. “कुठली नणंद माझ्या पदरात टाकलीस?”
“मग दी सारखे एवढे जड शब्द नको वापरूस.” रावी तिच्या बाईकवर बसून बोलली. “आता स्वपनातून खाली उतर आणि बस बाईकवर तुला माहेरी सोडायचं आहे.”
तशी मनाली तोंड वाकड करत बाईकवर बसली आणि त्या दोघी देखील घराकडे निघून गेल्या.
काही वेळातच तुषार त्याच्या घरी जाऊन पोहोचला. तेजश्री तर त्याचीच वाट बघत होती. तिला आता सुजाताच्या विषयी त्याच्याशी बोलायचं होत. कारण ती आता खूपच हट्टाला पोहोचली होती. तिने तुषारच्या खोलीतच त्याची फ्रेश व्हायची वाट पाहिली. कारण एकदा का तो खाली आला की त्याच्यासोबत तिला बोलता येणार नव्हत.
तेजश्रीला अस वाट बघताना पाहून तुषार तिला गोंधळून बघू लागला.
“काय झाल? काही हवं आहे का?’
“काय झाल? काही हवं आहे का?’
“मला काही नकोय,” तेजश्री “सुजाता. तिचं डोक फिरलंय.”
“आता काय केल तिने?" तुषार तेजश्रीच्या बाजूला बसला.
“तेच,” तेजश्री टेन्शनमध्ये येत बोलली. “तिला मॅमच्या भावासोबत एकदा बोलायचं आहे. तेही मालाच्या वाढदिवसाच्या दिवशी.”
“व्हॉट?” तुषार “पण तिला तिच्या वाढदिवसाला त्यांच्या व्यतिरिक्त दुसर कोणीही नको असत. मी पण तिला ट्रेनिंग देत आहे म्हणून मला बोलावते. एकदा का ते संपल की मला पण नो एन्ट्री राहील.”
“एवढी खडूस आहे ती?” तेजश्रीने डोळे मोठे केले.
“खडूस अशी नाही गं,” तुषार “ती लहान असल्यापासून तिच्या बंधू मंडळीसोबत राहिली, वाढली. त्यात तिची कडक बॉडी तर तू पहिली आहेसच. त्यामुळे तिला तिच्या शाळेत मुलगा म्हणून चिडवायचे. एक प्रकारे तिला टोमणे मारायचे. मग तिने मैत्री नावाचा विषय सोडून दिला होता. तेव्हा देखील तिचा एकच मित्र होता जो तिला समजून घ्यायचा. एक तो सोडला तर तिचा खास असा कोणीही मित्र नव्हता. जे काही आहे ते तिची दी आणि तिची ही अतरंगी बंधू मंडळी.”
“आता सुजाताला काय सांगू?” तेजश्री “कारण ती खूपच..” ती बोलता बोलता थांबली.
“तिच्यासोबत बघतो मी बोलून एकदा.” तुषार दीर्घ श्वास घेत बोलला.
“ठीक आहे.” तेजश्री “बघ लवकर काय ते.” आणि ती हॉलकडे निघून गेली.
ती बाहेर गेल्यावर तुषारने मालाला फोन लावायला घेतला. नेहमी एका रिंगमध्ये तुषारचा फोन उचलणारी ती, आज तिचा फोन चक्क व्यस्त लागत होता. तुषारने ते ऐकल आणि मोबाईल खाली ठेवला. असही ती जास्त काही फोनवर बोलत नव्हती. त्यामुळे काही वेळातच तिचा परत फोन येईल हा विचार त्याने केला आणि तो देखील हॉलकडे निघून आला.
रावी देखील मनालीच्या घरासमोर पोहोचली.
“चला वहिनी बाय.” मनालीला उतरलेलं बघून रावीने तिचं हेल्मेट काढून डोळे मिचकावत बोलली.
“गप ना.” मनालीने चिडून रावीच तोंड दाबायला घेतलं.
“चल बाय.” रावी परत हेल्मेट घालत बोलली. चेहऱ्यावर हसू तर अजूनही तसच होत.
“बाय काय?” मनाली तोंड वाकड करत बोलली. “माझ्या माउलीला तोड दाखवून जा. नाहीतर ती परत मला ओरडेल की तुला बाहेरूनच हाकललं.”
“शेवटी मावशींनाच माझी काळजी.” रावी हेल्मेट काढत बोलली.
आणि त्या दोघी मनालीच्या घरात आल्या. रावीने तर हॉलमधल्या सोफ्यावर बसून घेतलं तर मनाली तिच्यासाठी पाणी आणायला किचनकडे गेली. आत नाही कोणी हॉलमध्ये होत आणि नाही किचनमध्ये. सध्या तिथे शांतता नांदत होती.
“घरात कोणी नाही का?” रावी पाणी घेत बोलली.
“दिसतंय का कोणी?” मनालीने नेहमीप्रमाणे वाकड्यात उत्तर दिल.
“आई गेली असेल बाहेर आणि बाबा तर अजून घरी नसतील आले.”
“आई गेली असेल बाहेर आणि बाबा तर अजून घरी नसतील आले.”
“मग घराचं दार उघड कस?” रावी
“अगं बाहेर म्हणजे इथल्या शेजारच्या काकूंकडे गेली असेल.” मनाली “त्यांच्या घरातून आमच्या घर दिसत. एव्हाना आईला आपण आल्याच समजून गेल असेल.”
“बरं मग निघते मी.” रावी पटकन उठत बोलली.
तिला अस पटकन जाताना बघून मनालीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तिला आता परीला भेटायची घाई झाली होती. आज जे काही त्या कॅफेमध्ये पाहिलं त्याचा तिला सोक्ष मोक्ष लावायचा होता. मनालीचा निरोप घेऊन ती तिच्या घराबाहेर पडली आणि परीच्या घराकडे तिची बाईक वळवली.
कॉलेजमधून निघताना परी रावीला तर बोलली होती की तासाभरात परत येते. पण ती त्या कॅफेमधून निघून सरळ घरी आली होती. तुषारचे ते वाक्य तिच्या मनात अजूनही घुमत होते. त्यात तिने तिथे रावीची बाईक पहिली होती. मग ती घरी पोहोचेपर्यंत तुषारला खूपच भांडत होती.
घरी पोहोचल्यावर ती फ्रेश झाली आणि घराच्या कामाला लागली. पण राहून राहून आपण घरी पोहोचलो हे त्याला कवळून द्यायला हवं अस तिला सारखं सारखं वाटत होत. पण तो परत तेव्हासारख काहीतरी बोलेल म्हणून ती उचललेला मोबाईल परत घाबरून खाली ठेवत होती.
अस्वस्थ झालेल्या मनाला वळवण्यासाठी ती तिचं मन कामात घालत होती. पण ते मन पण तितकच हट्टी, तिला सारखं त्या कॅफेमधल्या त्या क्षणामध्ये घेऊन जात होते. तर दुसरीकडे तिची बुद्धी एक औपचारिकता म्हणून त्याला फोन करण्यासाठी सांगत होती आणि तिचं मन त्याकडे पण ओढल जात होत. तिचं एकंच काहीतरी ठरत नव्हत. म्हणून तिची आता चिडचिड व्हायला लागली.
बराच वेळ गेला, पण तिची बुद्धी काही तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिचं मन आणि बुद्धी यात तडफड चालू होती. शेवटी तिने तिचा मोबाईल उचलला आणि तुषारचा नंबर काढून त्यावर फोन लावला. त्याच्याशी पुन्हा न भेटण्याचं ठरवलेलं असताना तरी आपण त्याला का फोन लावला? हे फोन लावूनही तिला समजलं नव्हत.
तिकडे तुषार मालाच्या फोनची वाट बघत होता आणि काही वेळातच त्याचा मोबाईल वाजला. त्याला वाटल की मालाचा फोन असेल म्हणून त्याने तो न बघता उचलला.
“कुठे बिझी होतीस एवढी?” तुषार जरा चिडून बोलला. “कधीचा तुझ्या फोनची वाट बघत होतो.”
“कशाला?” परी पण चिडून बोलली. एकतर तिने एक औपचारिकता म्हणून फोन केला आणि वरून तोच तिला भांडत होता. म्हणून परी पण लगेच चिडली.
तिकडे फोनवर वेगळाच आवाज ऐकून तुषार गोंधळून गेला आणि त्याने कानाला लावलेला मोबाईल काढून आलेला फोन नंबर पाहिला. मोबाईलवरचं ते नाव वाचून त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उभं राहील. ती असा फोन करेल हे त्याच्या स्वप्नात पण आल नव्हत. तसा तो उठला आणि घराबाहेर जाऊ लागला.
घरात बसलेले त्याचे आई वडील, तेजश्री हे तिघेही त्याला बघतच राहिले.
“हेलो.” तुषार हलक्या आवाजात बोलला.
“माझ्या फोनची का वाट बघत होते?” परी अजूनच चिडून बोलू लागली.
“तुझ्या नाही गं...” तुषार पुढे काही बोलणार तोच परी तिकडून बोलू लागली.
“मग कोणाच्या फोनची वाट बघत होते?” परी “अजून कोणाला डेटवर घेऊन गेले होते का? गेलेच असणार. ब्लॅकमेल करून घेऊन जाता ना.”
“अगं ऐक..” तुषार मधेच बोलायचा प्रयत्न करत होता. पण परी त्याला बोलूच देत नव्हती.
“काय ऐकू?” परी “इथे मी विचार करतेय की एक फॉरमलिटी म्हणून तुमच्या कानावर घालू की मी घरी पोहोचले. पण तुम्ही तर दुसऱ्याच मुलीच्या फोनची वाट बघत आहात.”
“अरे,” तुषार आता खूपच कडक आवाजात बोलला. “एकदम गप.”
तशी परी तिकडून चिडीचूप झाली.
तशी परी तिकडून चिडीचूप झाली.
“मी बोललो का की मुलीचा फोन येणार आहे?” तुषार “ऐकून घ्यायचं तुला जमतच नाही वाटत. मी डेटवर घेऊन गेलेलो तू पहिली आणि शेवटची मुलगी आहेस.”
आता मात्र परीकडे बोलायला काहीच नव्हत.
“जेलस झालीस का?” तुषार आता हलकेच हसत बोलला. “मला कोण्या मुलीचा फोन येणार आहे म्हणून.”
तशी शांत झालेली परी परत चिडीला आली. “व्हॉट? जेलस आणि मी? माय फुट. मी का जेलस होऊ? मी तर एक माणुसकी म्हणून पोहोचले अस सांगायला फोन करत होती. तर तुम्हीच चिडून बोलायला सुरवात केली. मग मला पण राग आला.”
“तेच ना,” तुषार “तुला का राग आला मला फोन येणार तर.”
“काय डोक्यावर पडला आहात का?” परी “माझ ऐकून न घेता तुम्ही सुरवात केली म्हणून म्हणून मला राग आला. तुम्हाला कोणाचा पण फोन येऊदे. त्याच्याशी माझा काय संबंध? मी पोहोचले. बाय.”
परी फोन कट करणार तोच तुषारने तिला थांबवलं.
“ऐक ना.” तुषार आता जरा गंभीर झाला. “जरा बोलायचं आहे.”
“का?” परी तोंड वाकड करत बोलली. “आज जे बोलण झाल त्याने पोट नाही भरलं का? एकतर तिथे रावीच पण बाईक होती. तिने पाहिलं असेल तर किती प्रोब्लेम होईल माहिती आहे का?”
“तिची काळजी तू नको करूस.” तुषार आजूनही गंभीर होता. “मला जरा दुसऱ्या विषयवार बोलायचं आहे.”
आता तुषारचा गंभीर झालेला आवाज परीला समजला आणि ती पण बाकी सगळ सोडून टेन्शनमध्ये आली.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा