Login

अवनी एक प्रवास भाग ५९

रावीने मनालीला सोबत घेतलं आणि तिथून सरळ त्या कॅफेमध्ये आली. कॅफेच्या आत जाण्याआधी रावीने दोघींचा अवतार ठीक केला. कारण त्या कॅफेच्या मालकाला काही शंका जरी आली तरी ती गोष्ट सरळ सुरजच्या कानावर जाणार होती. त्याच्या कानावर गेली म्हणजे तो थेट विजयला फोन लावून सांगणार होता.आता अश्या संध्याकाळच्या वेळेला रावी आणि मनालीला येताना बघून सुरजचा मित्र गोंधळून दोघींना पाहू लागला.
मागील भागात.

“हा सर फोन केला होता?” माला

“मी?” तुषार गोंधळून गेला आणि नंतर लागलीच त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. “अगं हो.” तो आता जरासा चिडून बोलला. “आता वेळ भेटला का तुला फोन करायला.”

“अम्म ते सॉरी,” माला “तुम्हाला तर माहिती आहे ना की संध्याकाळचा हा वेळ पुस्तक वाचण्यासाठी असतो.”

“आणि त्या आधी जो तुझा फोन व्यस्त लागत होता ते.” तुषार

“काही महत्वाच बोलायचं होत का?” मालाने तुषारच्या त्या प्रश्नाला सरळ बगल दिली. तिला तिची सध्याचं व्यक्तिगत आयुष्य कोणाला सांगायची इच्छा नव्हती.

आता तिने तो विषय टाळला ते बघून तुषारने पण त्या विषयाला हात लावला नाही.

“हो,” तुषार “सुजयचा विषय आहे.” एवढं बोलून त्याने सुजाताविषयी तिला सगळच काही सांगून दिल.

ते ऐकून मालाच्या कपाळावर आठ्या चढल्या.

आता पूढे.

पण नंतर लागलीच त्या निवळल्या देखील. कारण ती पण आता प्रेमात होती आणि प्रेमात माणूस वेडा होतो हे तिला चांगलच समजून आल होत. सुजातातो हट्ट बघून तिने सुजाताला तिच्या वाढदिवसाला यायची परवानगी दिली. पण तिला जे काही बोलायचं होत ते तिचा वाढदिवस झाल्यावर बोलायला तिला सांगितल होत. कारण तिला तिचा वाढदिवस खराब करायचा नव्हता.

“पण तुम्ही का तिची बाजू लावून धरली आहे?” मालाने तिला पडलेला प्रश्न विचारला.

“तेजश्रीची बेस्ट फ्रेंड आहे,” तुषार दीर्घ श्वास घेत बोलला. “ती तिच्या मैत्रिणीला दुखी बघू शकत नाही आणि मी माझ्या बहिणीला.”

“पण मग तिला सुजयकडून काही अपेक्षा ठेवायला सांगू नका,” माला गंभीर आवाजात बोलली. “तुम्ही पण त्याला चांगलच ओळखता.”

“सांगितलं ना,” तुषारने उसासा सोडला. "तिला सगळ काही सांगितलं आहे. पण तिलाच सुजयसोबत बोलायचं आहे.”

“ठीक आहे. मग आपण तरी काय करणार?” माला

बाकी थोड्याफार गप्पा मारून त्यांनी फोन ठेवून दिला.

आता रावी देखील मनालीजवळ जाऊन पोहोचली होती. ती येईपर्यंत मनाली रस्त्यावरच उभी होती. येणारे जाणारे तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. रावीने तिच्याजवळ पोहोचताच मनालीने तिला घट्ट मिठी मारली. रावीने देखील तिला घट्ट आवळून घेतलं. जरा ती शांत झाली अस वाटल तस तिला आधी बाजूच्या एका कट्ट्यावर बसवलं.

“बेबी,” रावी घाबरून बोलली. “काय झाल? अशी का रडत आहेस?”

पण मनाली काहीच बोलत नव्हती. ती फक्त रडत होती.

“अशी फक्त रडत बसशील तर मला कस समजेलं की नक्की काय झाल?” रावी मनालीचे गाल तिच्या दोन्ही हातात घेऊन बोलली.

“मी खूप वाईट आहे गं.” एवढं बोलून मनाली परत रडायला लागली.

“अस का बोलत आहेस यार?” रावीला समजतच नव्हत की काय करावं? “तू तर बेस्ट आहेस ना. माझी बेस्ट मैत्रीण.”

“पण मी बेस्ट मुलगी नाही ना.” मनालीने तिचं तोंड स्वतःच्या हातात झाकून घेतलं.

आता रावी पुरती गोंधळून गेली. पण तिथेच अस रस्त्यात तिला विचारण रावीला बरोबर वाटल नाही. पण आता तिला घेऊन कुठे जाव? हा प्रश्न तिला पडला. मग तिला त्यांच्या कॉलेजच्या बाजूला असणार कॅफे आठवलं. तिथे तर रेस्ट रूम सुद्धा होता.

रावीने मनालीला सोबत घेतलं आणि तिथून सरळ त्या कॅफेमध्ये आली. कॅफेच्या आत जाण्याआधी रावीने दोघींचा अवतार ठीक केला. कारण त्या कॅफेच्या मालकाला काही शंका जरी आली तरी ती गोष्ट सरळ सुरजच्या कानावर जाणार होती. त्याच्या कानावर गेली म्हणजे तो थेट विजयला फोन लावून सांगणार होता.

आता अश्या संध्याकाळच्या वेळेला रावी आणि मनालीला येताना बघून सुरजचा मित्र गोंधळून दोघींना पाहू लागला. कारण ह्या वेळेला ते कधीच तिथे येत नव्हते. त्यात मनालीचा चेहरा जरा लाल झाल्यासारखं त्याला दिसला.

“काय गं?” सुरजचा मित्र “ह्या वेळेला इथे?”

“ते जरा रेस्ट रूम युझ करायची होती.” रावी जरा चाचरत होती.

“अच्छा जा ना मग,” सुरजचा मित्र “काही पाहिजे असेल तर सांग.”

“अम्म सध्या तरी नको.” रावी भावनेच्या भरात बोलून गेली.

“व्हॉट?” सुरजच्या मित्राला जरा आश्चर्यचं वाटल. कारण काय हवं ते सांग म्हटलं की रावी तिला जे हवं असेल त्याची मोठी यादीच सांगायला सुरवात करायची आणि आता मात्र काहीच नको बोलली होती. “तुला आणि काही नको?”

“आता खाल्लं तर घरी जेवण जाणार नाही आणि घरी जेवल नाही तर..” रावी उगाच हसवून दाखवत बोलली.

“ह्म्म्म ते पण बरोबर आहे.” सुरजचा मित्र हलकेच हसत बोलला. “जा आता. कॉफी पाठवतो.”

“हा त्याची खूप गरज आहे.” रावी लगेच बोलून मोकळी झाली.

“वाटलच मला.” सुरजचा मित्र पण हसू लागला.

मग त्या दोघी आतल्या रेस्ट रूममध्ये गेल्या. त्यांना जाताना बघून सुरजच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण नेहमी रावीची मस्करी करायची संधी शोधणारी मनाली आज मात्र काहीच बोलली नव्हती.

रावी आणि मनाली रेस्टरूमच्या आत आल्या. तस रावीने त्या रूमच लॉक लावून घेतलं. आधी तिला फ्रेश व्हायला पाठवलं. तोपर्यंत त्यांच्यासाठी कॉफी देखील येऊन पोहोचली. काही वेळातच मनाली पण फ्रेश होऊन बाहेर आली. आता ती बरीच निवांत झालेली रावीला दिसली. रावीने तिला कॉफीचा कप दिला आणि त्या दोघी तिथल्याच सोफ्यावर बसून ती कॉफी पिऊ लागल्या.

जरा वेळ शांततेत गेला. कॉफी पिऊन दोघींना बरीच तरीतरी आली.

“हम्म बोल आता.” रावीने मनालीचे हात तिच्या हातात घेतले.

मनालीने एकवार रावीकडे पाहिलं आणि तिने जे काही ऐकलं होत ते रावीला सांगून दाखवलं. मनालीच बोलण ऐकून रावीला पण जरा धक्काच बसला. तिचेही दोन्ही हात तिच्या तोंडावर गेले.

“खूप वाईट वागली गं मी आई बाबांसोबत.” मनाली परत तिचं तोंड तिच्या हातात खुपसून रडू लागली. “मला वाटत होत की मुलगी म्हणून ते मला कुठेच पाठवत नव्हते. पण ते तर माझी सेफ्टी बघत होते. त्यांना मला खेळूच द्यायचं नसत तर त्यांनी मला शाळा आणि आता कॉलेजमध्ये देखील खेळू दिल नसत. पण मीच वेडी ते समजू शकले नाही.”

“अगं..” रावीने तिला स्वतःच्या मिठीत ओढून घेतलं. तिला कस समजवावं ते रावीला समजत नव्हत. “शूऽऽऽ शांत हो.”

“नाही गं.” मनाली हुंदके देत बोलली. “सगळ काही आठवत आहे सारखं. मला आता माझीच लाज वाटते.”

आता अशी परिस्थिती कशी सांभाळावी? ते तर रावीला माहिती नव्हते. मग तिने जरा विचार केला आणि तिला परी आठवली. आता ह्या वेळेला फक्त तिचं मनालीला सावरू शकत होती.

रावीने थोडा वेळ मनालीला मनसोक्त रडू दिल. तोपर्यंत एका बाजूला परीला मेसेज करून भेटायचं असल्याचं सांगितलं. आता परी घरी असल्याने ती कधी मेसेज बघणार होती तेही माहित नव्हत.

काही वेळ असाच गेला. मनालीच मन देखील रडल्याने थोड हलक झाल होत. तेवढ्यातच मनालीचा फोन वाजला. कॉलेजवरून निघून बराच वेळ झाला तरी ती घरी आली नव्हती म्हणून तिला तिच्या घरून फोन यायला सुरवात झाली. एकतर आताच घरी आलेल्या माणसाने जे काही सांगितलं तर ऐकून मनालीचे आई वडील आधीच टेन्शनमध्ये आले होते.

मोबाईलवर आईच नाव बघून मनालीला अजूनच भरून आल. ती फक्त मोबाईलकडे बघत राहिली होती. त्यामुळे फोन वाजून बंद झाला. पुढच्या काही सेकंदात तो परत वाजू लागला. मनाली काही फोन उचलत नव्हती. ते बघून रावीनेच तिचा मोबाईल उचलला.

“हेलो मावशी.” रावी नेहमीप्रमाणे हसून बोलली. “तुमच्या लेकीला मी पळवून घेऊन चालली आहे.”

“तुम्हाला उशीर होत असेल तर फोन करायला काय होत गं?? मनालीची आई टेन्शनमध्ये येत बोलली. “कधी कधी ना मला तुम्हा दोघींवर शंका येते.”

“कुठली?आम्ही एकमेकांना आवडतो याची?” रावी अजूनच खट्याळ झाली. “मला आवडेल तिच्यासोबत संसार करायला.”

“तुझ्या जिभेला काही हाड?” मनालीची आई लटक्या रागात बोलली. रावी सोबत असल्याने तिचं टेन्शन लागलीच दूर पळून गेल होत.

“जिभेला हाड असत तर आम्ही की...?” रावी जाणून बोलता बोलता थांबली.

“रावी तू फक्त घरी ये.” मनालीची आई चिडून बोलली. “जाम चावट झाली आहेस.”

“आता तर मी तिला सोडतच नाही.” रावी “तुम्हाला तिला भेटायचं असेल तर माझ्या घरी याव लागेल. तेही माझी अपोइन्टमेन्ट घेऊन.”

“हो येते ना,” मनालीची आई “येताना दोन बांबू पण घेऊन येते. एकाने तुला मारते आणि दुसरा तुझ्या आईच्या हाती देते.”

“नाही नको.” रावी लगेच घाबरून बोलली.

मनालीच्या आईला रावीची आई रावीला कशी मारते? ते चांगलच माहिती होत. मग काय? तिला अस घाबरताना बघून तिकडे मनालीची आई खळखळून हसली.

"किती वेळ लागेल यायला?” मनालीची आई आता जर गंभीर होऊन विचारू लागली.

“अम्म आज मी तिला माझ्या घरी घेऊन जात आहे.” रावी

“का?” मनालीची आई गोंधळून गेली.

“ते मॉम आणि आज्जी बाहेर गेले आहेत,” रावी “आज घरी कोणीच नाही म्हणून.”

“पण मग एकट्याच कश्या रहाणार?” मनालीची आई काळजीने विचारू लागली.

“नका टेन्शन घेऊ मावशी,” रावी काही तिचा खट्याळपणा सोडायला तयार नव्हती. “तुमच्या लेकीच्या इज्जतीला मी नाही हात लावणार.”

“हे भगवान,” मनालीची आई डोक्याला हात लावत बोलली. “मी काय विचारात आहे? आणि तुझ वेगळच काहीतरी.”

इकडे मनाली मात्र खळखळून हसायला लागली. मनालीचा असा हसताना आलेला आवाज ऐकून मनालीच्या आईला एक अनामिक समाधान मिळाल होत. तर तिला हसताना बघून रावीच्या जीवात जीव आला होता.

मनाली हसतच होती की रावीचा मोबाईल वाजला. रावीने तिचा मोबाईल पहिला तर आरुष फोन करत होता. मग रावीने मनालीचा फोन कानारून काढून पहिला तर त्यावर आरुषचे चार मिस कॉल आलेले तिला दिसले.

मग काय? रावीला मिळाली की संधी मनालीची अजून चिडवायची. तिने तिचा मोबाईल मनालीच्या समोर केला. तसा मनालीच्या चेहऱ्यावर लज्जास्पद हसू आल. रावीने इशारत तिला तो फोन उचलायला लावला.

साहजिक होत, मनालीची फोन व्यस्त लागत असल्याने आरुषने तिच्या मोबाईलवर फोन केला होता.

मनालीने रावीकडून तिचा मोबाईल घेतला आणि रावीपासून जरा लांब जाऊन उभी राहिली. रावीने ते पाहिलं आणि मनालीच्या आईसोबत जरा गंभीर होऊन बोलू लागली.

“मावशी ऐका ना.” रावी

रावीचा असा गंभीर आवाज ऐकून मनालीच्या आईला परत टेन्शन आल. “काय गं? काय झाल?”

“आज कोणी तुमच्या घरी आल होत का?” रावी “कोण होता तो?”

रावीच्या तोंडून हे वाक्य ऐकून मनालीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. “त.. तू.. तुला कस समजल?”

“ते महत्वाच नाही,” रावी “कोण होता तो?”

“मला आधी सांग तुला कस समजल?” मनालीची आई आता हट्टाला पेटली. कारण ती खूपच गुप्त गोष्ट होती. तो आलेला कोणालाच समजलं नव्हत. मग ते रावीला कस समजल? तेच मनालीच्या आईला समजत नव्हत.

“मनालीने तुमच सर्व बोलण ऐकल आहे.” रावी दीर्घ श्वास घेत बोलली.

“काय?” मनालीची आई जोरातच ओरडली. तिचा असा आवाज ऐकून मनालीचे वडील देखील लागलीच मनालीच्या आईजवळ आले.

“हो,” रावी “खूप रडली ती. तुमच्याशी वाईट वागली याच तिला खूपच वाईट वाटत आहे.”

रावीच बोलण ऐकून मनालीच्या आईला परत रडू आल. "नाही गं. अस आम्हाला कधीच वाटल नाही. आता तिला काही माहितीच नव्हतं तर त्याला तरी तरी काय करणार होती? दे तर तिला फोन. मला तिची माफी मागायची आहे.”

“सध्या काही बोलू नका तिला, “रावी मनालीकडे बघत बोलली. “तिला सगळ समजलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. ते तिला समजू देऊ नका. नाहीतर ती तुमचा विचार करून तिच्या राहिलेल्या इच्छा पण मारून टाकेल आणि फक्त तुम्ही म्हणाल तसच वागत राहील.”

“बरोबर बोलतेस तू,” मनालीची आई तिचे अश्रू पुसत बोलली. “आधी तरी भीती होती. पण जेव्हापासून तुझ्यासोबत तुमच्या कॉलेजला टाकल तेव्हापासून ती भीती पण कमी झाली. आता तिला तिच्या मनाप्रमाणे जगू देऊ. तिला आता नाही अडवणार कश्यासाठी.”

“अजून एक गोष्ट आहे.” रावी आता जरा चाचरत बोलली.

“अजून काय?” मनालीची आई “तुला माहिती आहे का तिची कुठली इच्छा बाकी आहे ते?”

“इच्छा म्हणजे आता कस सांगू?” रावी ओठांचा चंबू करत बोलली. “तुम्ही मला आणि तिला धरून मारणार तर नाही ना?”

“आता काय उपद्व्याप केलात?” मनालीची आई आता लटक्या रागात विचारू लागली.

“असा उपद्व्याप नाही काही,” रावी आता गोल गोल फिरवत बोलू लागली.

“नीट आणि स्पष्ट बोल रावी.” मनालीची आई

“तुमच्या लेकीला माझी वाहिनी व्हायचा उपद्व्याप सुचला आहे.” रावी एका दमात बोलून मोकळी झाली.

जे मनालीच्या आईला पहिले तर समजलच नव्हत. “काय सुचल आहे?”

आता रावीने एक दीर्घ श्वास घेतला. “तुमची मुलगी आमच्या घरी आणण्याची तयारी करत आहे.”

“नीट सांगतेस का तिकडे येऊन तंगड तोडू?” मनालीची आई चांगलीच चिडून बोलली.

“तुम्हाला काय माहित आम्ही कुठे आहे ते?” रावी तर मनालीच्या आईला चिडवत बोलली.

“काय कार्ट्या आहेत,” मनालीची आई डोक्याला हात लावत बोलली. “तुला तुझी आई जे भेटेल त्याने मारते ना ते अगदी बरोबर आहे.”

“अम्म अस काय ओ मावशी.” रावी लहान मुलीसारखी बोलली आणि मनालीकडे नजर टाकली तिचं बोलण कदाचित संपत आल होत.

“मनाली माझ्या आरुष दादाच्या प्रेमात पडली आहे. तोच आराध्या मावशीचा मुलगा. त्यालाही ती आवडत आहे. आता ही गोष्ट तर ती स्वतःहून तुम्हाला सांगणार नाही. बाकी तुम्हाला समजलाच असेल.”

“अरे !” मनालीची आई जराशी चिडून बोलली. “आमची परवानगी आहे की नाही तर विचारशील की नाही?”

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all