Login

अवनी एक प्रवास भाग ६०

मोबाईल स्पीकरवर असल्याने घरातल्या सगळ्यांनी ते ऐकल आणि त्यांना धक्काच बसला. आता तुषारचा चेहरा रागाला आला नसता तर नवलच होत. कारण त्याच्या घरच्यांनी जी चौकशी केली त्यात तर तो मुलगा आणि त्याच कुटुंब हे चांगलच सांगितलं गेल होत आणि जस कॉलेजच फंक्शन संपणार होत त्याच्या तीन चार दिवसात गावी जाऊन त्या मुलाच्या कुटुंबाची भेट घेणार होते.
मागील भागात.

“तुमच्या लेकीला माझी वाहिनी व्हायचा उपद्व्याप सुचला आहे.” रावी एका दमात बोलून मोकळी झाली.

जे मनालीच्या आईला पहिले तर समजलच नव्हत. “काय सुचल आहे?”

आता रावीने एक दीर्घ श्वास घेतला. “तुमची मुलगी आमच्या घरी आणण्याची तयारी करत आहे.”

“नीट सांगतेस का तिकडे येऊन तंगड तोडू?” मनालीची आई चांगलीच चिडून बोलली.

“तुम्हाला काय माहित आम्ही कुठे आहे ते?” रावी तर मनालीच्या आईला चिडवत बोलली.

“काय कार्ट्या आहेत,” मनालीची आई डोक्याला हात लावत बोलली. “तुला तुझी आई जे भेटेल त्याने मारते ना ते अगदी बरोबर आहे.”

“अम्म अस काय ओ मावशी.” रावी लहान मुलीसारखी बोलली आणि मनालीकडे नजर टाकली तिचं बोलण कदाचित संपत आल होत.

“मनाली माझ्या आरुष दादाच्या प्रेमात पडली आहे. तोच आराध्या मावशीचा मुलगा. त्यालाही ती आवडत आहे. आता ही गोष्ट तर ती स्वतःहून तुम्हाला सांगणार नाही. बाकी तुम्हाला समजलाच असेल.”

“अरे !” मनालीची आई जराशी चिडून बोलली. “आमची परवानगी आहे की नाही तर विचारशील की नाही?”

आता पूढे.

“मावशी,” रावी आता तोऱ्यात बोलली.“तुम्ही माझ्या सगळ्या दादांना चांगलच ओळखता आणि मला तर खूपच जवळून त्यामुळे...” रावी शेवटी शेवटी असुरी स्मित करत बोलली.

“अच्छा मला धमकी?” मनालीची आई पण त्याच तोऱ्यात बोलली. “मागच्या सेमिस्टरला प्रोजेक्ट सबमिटचा नाव सांगून कोणीतरी गाड्यांची रेस खेळायला गेल होत.”

“माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी मला सगळ काही चालेल, अगदी ते सांगितल तरी.” रावी

“तू घरी ये,” मनालीची आई “मग तुला बघते. एवढी मोठी झाली की तू मला धमकी देतेस. तुझ्या आईला पण बोलावून घेते. तिचा नंबर पण आहे माझ्याकडे.”

“मॉम?” रावी आता जरा घाबरली. “पण आम्ही घरी कुठे येणार आहे?”

“हो का?” मनालीची आई विजयी सुरात बोलली. “तू मनुला घेऊन जरी तुझ्या घरी पळाली ना तरी फोन लवकर लागेल, तू घरी पोहोचण्याच्या आधी.”

“मी आणते तुमच्या लेकीला.” रावी लगेच नम्र झाली. “लग्नाच काय? ते दादा बघून घेईल. म्हणजे तुम्ही मोठी माणस काय ते बघून घ्या.”

रावीला अस घाबरलेलं बघून मनालीच्या आईला खूप हसू येत होत. मुळात मनाली आरुषच्या घरी जाईल हा विचार करूनच त्यांना खूप आनंद झाला होता. कारण एकदा का त्याच्या घरी गेली की तिच्या जीवाचा धोका अगदीच संपण्यात जमा होता. शेवटी तो मोहिते साहेबांचा नातू होता आणि काही दिवसांनी तोही राजकारणात उतरणार होता.

“जावा मग, तुझ्या घरी तिला घेऊन.” मनालीची आई “तू पण आज एकटीच आहेस घरी. मग मनुचा पण जीव नाही लागणार इकडे.”

“तस नाही,” रावी “मनु नसती तर मी पण आत्याकडे गेली असती.”

“एक काम करा मग,” मनालीची आई विचार करत बोलली. “तिला घेऊन तिकडेच जा. पण तुझ्या आत्याला काही प्रोब्लेम नाही होणार ना?”

“तिला कसला आला आहे प्रोब्लेम?” रावी उसासा टाकत बोलली. “उलट तिला मनु सारखी मुलगी खूप आवडते. ती तर अगदी दी सारखी आहे.”

एवढं बोलून दोघी खळखळून हसल्या. “ठीक आहे मग.” मनालीची आई समाधानाने बोलली.

तेवढं बोलून दोघींनी फोन ठेवून दिला. तर मनालीच देखील बोलण झाल होत. आरुषसोबत बोलून तिला खूपच भारी वाटल होत. रावी आणि मनाली दोघी एकमेकींच्या जवळ आल्या.

“चला निघायचं?” रावी मनालीकडे बघून बोलली. तिचा चेहरा तेव्हापेक्षा जरा फ्रेश दिसला. “अरे वा, चेहरेपे क्या नूर आया हे?” रावी नाटकी लाजत बोलली.

“चला जाऊयात.” मनाली तिची नजर टाळत पुढे निघाली. कारण ती आता चिडवल्याशिवाय रहाणार नव्हती. “एकतर तुझ्या घरी जाऊन जेवण पण मलाच बनवावं लागणार आहे. तू तर कशाला हात लावणार नाहीस.”

“त्याची काळजी तू नको करूस,” रावी मागून येत तिच्या खांद्यावर हात टाकून बोलली. “आपण आत्याकडे जात आहोत.”

“तिकडे का?” मनाली लगेच टेन्शनमध्ये येत बोलली. “तिकडे मॅम पण असतील.”

“अजूनही मॅम?” रावी परत खट्याळ झाली. “आता तुझ्या ममला अंस बोलायला शिक.”

रावीच्या तोंडून ते अंस ऐकून मनाली पोट धरून हसू लागली. “तुझ काही होऊ शकत नाही.”

एवढं बोलून मनाली त्या खोलीतून बाहेर पडली.

“मी काय केल आता?” रावी तिच्या मागे मागे जात बोलली.

मग दोघी कॅफेच्या बाहेर पडल्या आणि बाईकवर बसून परीच्या घरी जायला निघाल्या. जाता जाता तिने परीला फोन लावून त्या दोघी आज तिथे येत असल्याच सांगून दिल.

तुषारच्या घरी तुषार त्याच्या वडिलांसोबत गप्पा मारत असताना त्याला परत त्याच्या गावच्या मित्राचा फोन आला. त्याने तिथेच तर तो उचलला पण फोनवरच बोलण ऐकून तो परत घराच्या बाहेर चालला गेला.

‘नक्की काय चालू आहे याच?’ हा प्रश्न त्याच्या घरच्यांच्या मनात डोकावून गेला.

काही वेळ गेला तोच तुषार परत घरात आला. जाताना हसत गेलेला तुषार आता परत आल्यावर मात्र रागात दिसायला लागला होता. फोनवर काहीतरी झाल असल्याचं बाकीच्यांना जाणवलं. त्याने सर्व घरावर नजर टाकली आणि किचनमध्ये काम करणाऱ्या आईला हॉलमध्ये बोलावलं. खोलीत गेलेली तेजश्री देखील बोलवून आणली.
घरच्यांना तर समजतच नव्हत की त्याच नक्की काय बिनसलं होत ते. त्याचे वडील तर हॉलमधेच बसलेले होते. आता ते सर्वच तिथे जमा झाले आणि तुषारने त्याच्या गावी त्याच्या लहान काकांना पण व्हिडीओ कॉल लावला.

“अरे काय झाल आहे?” तुषारचे वडील “ते तर सांगशील?”

“सगळ काही सांगतो बाबा.” तुषार त्याच्या काकांची फोन उचलायची वाट बघत बोलला.

पुढच्या तीन चार रिंगमध्ये फोन उचलला गेला आणि तुषार बोलू लागला. “हा, बोला आता. आत काय म्हणणं आहे तुमच?”

“बरोबर बोलला होता रे तू.” काका टेन्शनमध्ये येत बोलले.

“पण काय झाल?” तुषारची आई आता जरा वैतागून बोलली. “उगाच जीवाला घोर लावून ठेवला आहे.”

“तुषारची शंका बरोबर निघाली होती.” तुषारचे लहान काका “मुलाकडच्या माणसांनी त्यांच्या मोठ्या सुनेला जाणून घरी ठेवलं आहे. तिलाही आधी जॉब करू देईल जाईल असच सांगितलं आणि नंतर त्यांच्या घरातल्या मोठ्या महिलांनी कामाच निमित्त करून, बायको मुठीबाहेर जाईल याची भीती घालून तिला घरीच ठेवलं. तुषारचा मित्र आहे ना सोमनाथ त्याची बहिणीची मैत्रीण त्यांच्या मोठे सुनेची चांगली मैत्रीण निघाली. जस तिला समजलं की तेजश्रीसाठी त्यांच्या घरातून मागणी आली आहे तशी ती सोमनाथजवळ पोहोचली आणि तिनेच आम्हाला हे सगळ सांगितलं.”

मोबाईल स्पीकरवर असल्याने घरातल्या सगळ्यांनी ते ऐकलं आणि त्यांना धक्काच बसला. आता तुषारचा चेहरा रागाला आला नसता तर नवलच होत. कारण त्याच्या घरच्यांनी जी चौकशी केली त्यात तर तो मुलगा आणि त्याच कुटुंब हे चांगलच सांगितलं गेल होत आणि जस कॉलेजच फंक्शन संपणार होत त्याच्या तीन चार दिवसात गावी जाऊन त्या मुलाच्या कुटुंबाची भेट घेणार होते. पण आता हे सगळ ऐकून सर्वांची बोट तोंडात गेली होती.

“त्यांचा परत निरोप आला होता की जमल तर लवकर या.” तुषारचे लहान काका

“काही गरज नाही म्हणा.” तुषारचे वडील चिडून बोलले.

“तेव्हाच त्यांना सांगून दिल आहे,” तुषारचे काका “पुन्हा दारात आला तर याद राखा म्हणून.”

“आणि घाई करायचं कारण काय?” तुषार

“शेजारच्या गावातल्या एका मुलीला त्याने फूस लावली होती,” तुषारचे लहान काका “पण ती मुलगी खमकी निघाली आणि तिने त्याला धमकी देत सरळ त्याची गचांडी पकडली होती. तेव्हा तर त्याने त्या मुलीला कसतरी आवरलं. पण आता त्याला बाकी कोणीही मुलगी देत नाहीये. म्हणून तिकडे येऊन कामाला लागला आणि तिकडची मुलगी पाहू लागला. गावातल्या बाकी मुलाचं अस पण म्हणणं आहे की त्याने बऱ्याच मुलींना नादाला लावून फसवल आहे.”

“आणि एवढं सगळ तुला कोणी सांगितलं?” तुषारचे वडील

“कोणी म्हणजे?” तुषारचे लहान काका “ आपल्या तुषारच्या मित्रांनी. पार त्या फूस लावलेल्या मुलीच्या घरी जाऊन पोहोचले. आज सकाळी त्या मुलाच्या घरापुढे खूप मोठा तमाशा झाला.”

“आता मला सांगा,” तुषारने त्याच्या आई वडिलांवर नजर टाकली. “तुम्हाला कोणी माहिती दिली?”

“कोणी म्हणजे?” तुषारची आई “त्यांच्या शेजारी पाजारी यांनी.”
“आता ते उघड उघड थोडीच खरं बोलणार होते आई.” तुषार चिडून बोलला.

“झाल ना आता,” तुषारचे वडील पण चिडून बोलले. तुषारचा अस आवाज चढवून बोलण त्यांना अवडल नाही. “चांगलं झाल ना आधीच तुला समजलं ते. तू काय आणि आम्ही काय? वेगळे आहोत का?”

“बाबा,” तुषार “तुम्ही त्यांच्या घरी जायला निघाले होता.”

“जाऊ अस बोललो होतो,” तुषारचे वडील “चाललो अस नाही.”

“अरे यार,” आता तेजश्री पण चिडून बोलली. “तुम्हाला जर भांडायचं आईल तर मी गपचूप जाऊन लव्ह मेरेज करेल.”

तसे आता ते तिघेही त्यांच्या घरातल्या ह्या मस्तीखोर शेंडेफळाला चिडून बघू लागले.

“मग काय तर?” तेजश्री तुषारकडे बघू लागली. “आता त्यांच्या ओळखीतली माणस थोडीच त्यांच्याबद्दल वाईट बोलतील. फक्त वर वर चांगल आहे अस सांगितलं होत. बाकी तर त्यांच्या घरच्यांनीच जास्त कौतुक केल होत. त्यामुळे तुम्ही नका भांडू. आल ना काय ते समोर. मग ते दादाने आणलेलं असूदे किंवा आई बाबा तुम्ही आणलेलं असुदे. जे पण झाल ते चांगलच झाल ना.”

“हम्म ते तर आहेच,” तुषारचे वडील “जाऊदे तो आता विषय. आपण दुसरा बघू.”

“म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे का ह्या वर्षी माझ लग्न करायचं ते.” तेजश्री “आधी दादाकडे बघा, त्याच वय उलटून चालल आहे. म्हातारा झाला तर त्याला कोणीच मुलगी देणार नाही.” आता तेजश्री तिचे दात काढून हसू लागली.

तिचं बोलण ऐकून त्याने त्याच्या आई बाबांवर नजर टाकली आणि पुढच्याच क्षणाला तिथल्या तिथे पकडापकडीचा खेळ चालू झाला. तेजश्री पुढे पळत होती तर तुषार तिच्या मागे. तस तर तिला पकडणं तुषारच्या डाव्या हाताचा खेळ होता. पण लहान्या बहिणीला जिंकल्यावर मिळणारा आनंद बघायला तुषारला खूप आवडायचं. मग तो काही तिला लवकर पकडत नव्हता.

“आता तर आधी तुझच लग्न होणार.” तुषार तिच्या मागे पळता पळता ओरडला.

“मी तर दादासाठी मुलगी पण बघून ठेवली आहे.” तुषार तिच्या खूपच जवळ येताना बघून तेजश्रीने तिचा हुकुमाचा पत्ता बाहेर काढला.
तेजश्रीच बोलण ऐकून तिच्याजवळ पोहोचलेला तुषार जागीच थांबला.

‘ती खरचं सांगून तर नाही देणार ना आईला? बाबांना तर माहिती आहे. पण आई तर कशा कशाने मारेल मला ते सांगता पण येणार नाही मला.’ तुषार मनातच बडबड करत राहीला.

तेजश्री पण तुषारला थांबलेलं बघून थांबली आणि बाजूच्या खुर्चीवर तिने बसून घेतलं.

“तू का एवढं टेन्शन घेत आहेस?” तुषारची आई तुषारला टेन्शनमध्ये आलेलं बघून बोलली. “ती मक्सरी करत आहे रे. तुझ्यासाठी तर मीच एखादी राजकुमारी शोधणार.”

आता तुषार अजून टेन्शनमध्ये आला. “म.. मला भूक लागली आहे.” तुषार पटकन बोलून त्याच्या खोलीकडे चालला गेला.

“ह्याला काय झाल अचानक?” तुषारची आई पण आता टेन्शनमध्ये आली. “कोण्या मुलीच्या मागे तर नाही ना हा?” तिने बाकी दोघांवर नजर टाकली.

त्या दोघांचे चेहरे पण बघण्यासारखे झाले होते. तुषारला मुलगी आवडते हा प्रोब्लेम नव्हता. पण ती मुलगी दत्त्तक घेतलेली आहे याचा तुषारच्या आईला प्रोब्लेम होणार होता आणि ती नक्की कोणाची मुलगी आहे हे फक्त परीच्या घरच्यांना माहिती होत.

आता ते गौतम त्यांच्या घरी येऊन गेल्यामुळे परी आणि तिच्या बाकी बंधूंना ते समजल होत. बाकी कुठलीही माहिती त्यांनी बाहेर येऊ दिली नव्हती.

त्या आश्रमातून गौतमला माहिती पोहोचवणाऱ्या त्या माणसाला तर परीच्या बंधू मंडळींनी चांगलच चोपून काढलं होत. त्यातही तो जरा कुठे हॉस्पिटलमधून बरा होऊन बाहेर पडला तसा आरुषने त्याच वजन वापरून त्याला परत जेलमध्ये टाकल होत. ज्यात आश्रमाच्या बऱ्याचश्या गैरव्यवहारात त्याचे हात सापडले होते.

आता तुषारची आई त्या दोघांना अजूनच बारीक डोळे करून बघू लागली.

“तेजू तू आत जा.” तुषारच्या वडिलांनी तेजश्रीकडे पाहिलं. तस परिस्थितीच गांभीर्य बघून ती तिच्या खोलीकडे जायला निघाली.

“किचनकडे,” तिच्या आईने तिला दटावले. “जेवणाची तयारी कर. बनवून ठेवलं आहे ते वाढायला घे.”

तशी तेजश्री किचनच्या दिशेने निघून गेली. ती गेल्यावर तिच्या आईने परत तिच्या नवऱ्याकडे पाहिलं. त्यांनी तिला बाजूला बसवलं आणि परीबद्द्ल तिला सांगून दिल. आज ना उद्या तिला बाहेरून समजण्यापेक्षा स्वतःहून सांगितलेलं त्यांना बरोबर वाटल.

परीबद्द्ल ऐकून तुषारची आई टेन्शनमध्ये आली. अपेक्षेप्रमाणे तिने नकार घंटा वाजवायला सुरवात केली. तिच्या मते तुषार एवढा चांगला मुलगा आहे तर त्याला मिळणारी मुलगी पण तिला खानदानी हवी होती. त्यात तिला किडनॅप करण्याचा झालेला प्रयत्न ऐकून तर ती अजूनच घाबरून गेली होती. तिच्यामुळे तुषारच्या जीवाला पण धोका होऊ शकतो ही काळजी तिच्या डोक्यात थैमान घालू लागली. आता स्वतःच्या पोटच्या मुलाच्या जीवाला असणारा धोका ऐकून कोणीतीही आई घाबरणारच की. आता तुषारच्या आईच तेच झाल. ती पुरती बिथरली गेली.

तुषारच्या वडिलांनी तुषारची बाजू पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला पण तुषारची आई काही ऐकायला तयार झाली नाही. उलट त्याने जे तिच्या मनाप्रमाणे लग्न नाही केल तर आयुष्यभर त्याच तोंड बघणार नाही अशी त्याला धमकी द्यायला लावली.

पण तुषारच्या वडिलांच्या चेहऱ्याकडे बघून ते काही तुषारला अस काही बोलणार नाहीत अस तुषारच्या आईला वाटून गेल. तशी ती उठली आणि सरळ तुषारच्या खोलीकडे जाऊ लागली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all