Login

अवनी एक प्रवास भाग ६२

बाप लेकीच हे प्रेम बघून मनालीला तिचे वडील आठवले. ते पण तर तिला इतकाच तर जीव लावायचे. ती त्यांची मुलगी नाही याच तिला वाईट नव्हत वाटत. कारण त्यांनी तिला कधी तस ते भासू दिल नव्हत. याउलट तिला कुठेही बाहेर जाऊ देत नाही असा विचार करत बसायची. तिला वाईट या गोष्टीच वाटत होत की त्यांनी तिला खरं कधीच सांगितलं नव्हत.
मागील भागात.

“कशाला घाबरवता रे माझ्या व...” रावी पुढे काही बोलणार तोच मनालीने तिला चिमटा काढला.

ते बघून रावी ओरडायचं सोडून हसू लागली.

“तुम्ही ना कठीण आहात,” सायलीने रावीकडे बघून तिचे डोळे फिरवले. आत्ताच परीने मनालीबद्दल सांगून दिल्याने रावीचा तो न बोललेला शब्द सायलीला समजून गेला होता. मग तिने परीकडे पाहिलं. “सुजय कुठे पोहोचला ते बघ. ते चौघ त्या पार्टीतून निघाले का नाही ते विचार तर त्याला.” सायलीची एक नजर मनालीवरच होती.

तर सायलीच बोलण ऐकून परी आणि रावी दोघी गोंधळून गेल्या. तर मनालीच्या कपाळवर आठ्या आल्या.

“परी मनालीला पाणी तर दे,” सायलीने परत बोलायला सुरवात केली. “रावी तू चल तर किचनमध्ये.”

आता त्या दोघी एकमेकींकडे गोंधळून बघू लागल्या. तस सायलीने त्या दोघींना डोळ्यानीच दटावलं. मनाली तर ती एकटी होण्याची वाटच बघत होती. जश्या ता तिघी किचनकडे गेल्या तस मनालीने तिचा मोबाईल काढून आरुषला फोन लावायला घेतला.

आता पूढे.

तिकडे त्या बंधू मंडळींची खरेदी झाली आणि ते ज्यांच्या त्यांच्या बाईकवर जाऊन बसले. आरुष पण जसा त्याच्या बाईकवर बसला तसा त्याचा फोन वाजला. त्याने जस मोबाईल वर मनालीच नाव वाचल तस त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच उधाण आल.

त्याने पटापट त्याचा मोबाईल ब्ल्यू टूथला जोडला आणि डोक्यावर हेल्मेट चढवलं. आता त्याला त्याच्या मनालीचा आवाज नीट येणार होता.

तो खुश होत काही बोलायला जाणार तोच तिकडून मनाली त्याच्यावर बरसू लागली. ती आरुषला काही बोलूनच देत नव्हती.

इकडे त्या चिडलेल्या मनालीला किचनच्या दाराआड त्या तिघी लपून बघत होत्या. आरुषची ती चालू असलेली हजेरी बघून त्या तिघी त्यांची तोंड दाबून हसत होत्या.

आता सायली स्वतःहून बोलली असल्याने मनालीला तिचं बोलण खरं वाटून गेल होत. तेच बोलण जर रावीने केल असत तर तिने किंचितसुद्धा विश्वास ठेवला नसता.

एरवी स्वतःची चूक नसेल तर एक शब्दही ऐकून न घेणारा आरुष मनालीच सगळचं बोलण ऐकत राहीला होता. तिला तो समजावत राहीला होता. शेवटी एक वेळ आरुषच्या संयमाची सीमा संपली.

“एकदम चूप.” आरुष रागात गरजला.

तसा त्याचा तो रागीट आवाज ऐकून मनाली घाबरून अगदीच गप्प बसली. इतकी की तिने तिच्या तोंडावर हात ठेवला होता. आज पहिल्यांदाच त्याचा तो रागातला आवाज तिने ऐकला होता.

“मला एकच सांग की तू आत्ता कुठे आहेस?” आरुष कडक आवाजात बोलला.

त्याला इतकी तर खात्री होती की मनालीच्या मनात दुसऱ्या कोणीतरी काहीतरी भरवून दिल होत आणि त्याला रावीवर खूपच शंका येत होती.

“म... मी मॅमच्या घरी आहे.” मनाली घाबरून बोलली.

“कोणती मॅम?” आरुष गोंधळून गेला.

“तुमची दी,” मनाली आता चिडून बोलली. “आमची मॅम आहे ना ती.”

“अच्छा,” आरुष “आणि कोण कोण आहे तिथे?”

“ते का सांगू?” मनाली परत चिडीला आली. “आधी माझ्या प्रश्नाच उत्तर द्या.”

“आम्ही चौघे मालासाठी गिफ्ट घ्यायला आलो होतो,” आरुष “ही गोष्ट तुझ्या मैत्रिणीला चांगलीच माहिती होती. हवं तर तुझ्या मॅमला विचार. तिलाही माहिती होत.”

आता मनाली विचारात पडली. “पण मग तुमच्या मावशी खोट का बोलतील?”

“हे भगवान,” इकडे तुषारने डोक्याला हात लावला. “तू त्यांच्या मागे नको लागुस. ते आता लपून तुला बघत असतील आणि हसत पण असतील.”

तस मनालीने किचनच्या दिशेने पाहिलं. तर तिथे काही सावल्या उभ्या असलेल्या दिसल्या. ज्या तोंडावर हात ठेवलेल्या स्थितीत दिसत होत्या. तशी रावी हळूच उठली आणि त्या बाजूला जाऊ लागली. ती अगदीच मांजरीच्या पावलांनी चालत होती. जेणेकरून त्या तिघींना कोणताही आवाज येऊ नये. पण मग तिच्या बोलण्याचा आवाज ही गेला नाही तर त्या तिघींना शंका येऊ शकते हे काही तिच्या डोक्यात आल नाही.

याचाच परिणाम असा झाला की रावीने मधेच डोक बाहेर काढून पाहिलं तर मनाली तिला हळू हळू चालत येताना दिसली. तस तिचं हसू सुटल आणि ती पोट धरून हसू लागली. तिच्या पाठून परी आणि सायली पण बाहेर येऊन हसू लागल्या. त्या तिघींचे हसणे ऐकून आरुषने डोक्याला हात लावला.

“अगं लाडूली माझी.” रावीने मनालीजवळ जात तिचे फुगलेले गाल ओढले.

“अशी मस्करी कोण करत बरं?” मनाली सायलीकडे तोंड पाडून बघू लागली.

“बघत होती,” सायली तोऱ्यात बोलली. “ज्याच्या आयुष्यात चालली आहेस त्याला तुझ्या तालावर नाचवू शकतेस का?” एवढं बोलून ती अजून हसू लागली.

मनाली पण दोन मिनिट शांत राहिली आणि ती नंतर त्या तिघींना हसण्यात सामील झाली.

“अरे यार,” आरुषने सुस्कारा सोडला. “हिला पण त्यांच्यात सामील करून घेतलं.” आरुषने आता फोन ठेवून दिला होता. यानंतर त्या घरात त्याच्या आजवरचे कौतुकाचे पाढे गिरवले जाणार असल्याचे त्याला समजून गेल होत.

मनाली पहिले तर हसू लागली. पण नंतर लगेच तिने लाजून तिचं तोंड झाकून घेतलं होत. दुपारी घरी पोहोचल्यावर जे काही तिने ऐकल होत ते थोड्यावेळासाठी ती विसरून गेली होती.

“चला,” सायली “तुला आता तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचे गुणगाण सांगते.”

एवढं बोलून बसल्या की त्या चौघी हॉलमधल्या सोफ्यावर. आरुषच्या इतक्या काही गोष्टी ऐकून मनाली कधी लाज तर कधी अभिमान वाटायला लागला होता. रावीला तर तिला आलेली शंका आता बोलून दाखवायला सुरवात केली होती. पणन त्या वेळेस तिने भास किंवा गैरसमज समजून तो विषय सोडून दिला होता.

अश्याच गमती जमतीच्या गप्पा चालू असताना सायलीने आरुषची अट तिला सांगून दाखवली. तेव्हा मनालीच लक्ष परीवर गेल आणि ती परीला बघतच राहिली. मग तिच्या डोक्यात विचार सुरु झाले. तिचं आणि परीच आयुष्य जवळपास सारखच तर आहे. फरक इतकाच आहे की परीला तो दत्तक घेतलं असल्याच माहिती होत. पण मनालीला ते देखील माहिती नव्हत.

मनाली तिच्या त्या विचारात असताना रावीला दुपारची डेट आठवली जेव्हा तिने परी आणि तुषारला एकत्र बघितलं होत. त्यानंतर तुषारने त्याच्या प्रेमाची दिलेली कबुली आठवली. तसे रावीचे डोळे लकाकले. तिच्या डोक्यात आता किडे वळवळू लागले.

“दी,” रावीच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू अवतरल. “दुपारी तासाभरात येते सांगून थेट घरी का आलीस? कुठे गेली होतीस?”

रावीच्या चेहऱ्यावर आलेलं तर हसू परीने लागलीच ओळखल. नक्कीच तिच्या हाती काहीतरी लागल असल्याच परीला जाणवलं.

“कुठे म्हणजे?” परी घाबरून बोलली. “ते मार्केटला समान घ्यायचं होत. ते घेतलं आणि सरळ घरी आली.”

“अच्छा,” रावीने विचार करायचं नाटक केल. “ते तुझी स्कुटी मला..” रावी बोलता बोलता थांबली.

कारण रावीच बोलण ऐकून परीला ठसका आला होता. सायली पण पहिले रवीच्या बोलण्याचा विचार करू लागली होती. पण परीचा ठसका बघून तिचे विचार थांवून त्याजागी लगेच काळजी भरून आली. तर रावी आणि मनाली गालातच हसू लागल्या.

ठसका देता देता त्यांनी मला पाहिलं तर नाही ना? हा प्रश्न परीला पडला. तिची तिरकी नजर रावीवरच होती. ज्यात रावी तिला गालातच हसताना दिसत होती. ‘म्हणजे नक्कीच काहीतरी तिच्या हाती लागल आहे.’ ती मनातच बोलली आणि नंतर तुषारला जे तिने भांडायला घेतलं, पण मनातच बरका. तिकडे तुषारला नक्कीच उचक्या लागल्या असतील.

रावीला नुसतच बसलेल बघून सायली तिच्यावर ओरडली आणि तिला पटकन पाणी घ्यायला लावलं. तोपर्यंत सायली परीच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. रावीने लगेचचं किचनमधून पाणी आणल आणि परीला दिल.

ती पाणी पितच होती की दाराची बेल वाजली. ही वेळ विजयच्या घरी यायची होती. त्यामुळे आता तोच आला असेल आणि आल्या आल्या परीला अस ठसका देताना पाहिलं तर तो सगळ्यांना भांडेल हे सायली आणि रावीला चांगलच माहिती होत.

“दी,” रावी लगेच परीजवळ बसली. “पाठव त्या ठसक्याला बाहेर नाहीतर आता आम्ही घराबाहेर जाऊ.”

“गेला आता.” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. रावी तिकडे काय करत होती? हे तर परी तिला विचारू शकत नव्हती. कारण मग परी तिथे काय करत होती? याच उत्तर तिला द्याव लागल असत. त्यामुळे तिने फक्त तिचं तोंड वाकड केल.

मनालीने जाऊन दार उघडलं. दारात मनालीला बघून विजयला आश्चर्यचं वाटल. तो सुद्धा दोन क्षण मनालीला बघतच राहीला. नंतर त्याने सायलीवर नजर टाकली. तस सायलीने नंतर बोलते असा त्याला इशारा केला. यानंतर त्याची नजर परीवर गेली.

नेहमी हसतमुखाने स्वागत करणारी त्याची मुलगी आज चक्क शांत बसून आहे? याच त्याला परत आश्चर्य वाटल.

“परी तू बरी आहेस ना?” विजय फ्रेश व्हायचं सोडून परीजवळ जाऊन बसला.

“हो,” परीने तिचं नेहमीच हसू बाहेर आणल. “मला काय झाल? ते तर मनाली उठली दार उघडायला म्हणून मी नाही आली.”

“ओह के.” विजयने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि फ्रेश व्हायला निघून गेला.

बाप लेकीच हे प्रेम बघून मनालीला तिचे वडील आठवले. ते पण तर तिला इतकाच तर जीव लावायचे. ती त्यांची मुलगी नाही याच तिला वाईट नव्हत वाटत. कारण त्यांनी तिला कधी तस ते भासू दिल नव्हत. याउलट तिला कुठेही बाहेर जाऊ देत नाही असा विचार करत बसायची. तिला वाईट या गोष्टीच वाटत होत की त्यांनी तिला खरं कधीच सांगितलं नव्हत.

आता सुजय पण घरी येऊन पोहोचला. सुजय पण त्याच्या मोबाईलमध्ये डोक घालून त्याच्या खोलीकडे चालला होता. पण सायलीने त्याला मधेच अडवलं.

‘झाली का खरेदी मालाच्या गिफ्टची?” सायलीने हाताची घडी घालून त्याला विचारलं.

तशी परी तिथून उठली आणि सरळ किचनकडे निघून गेली. कारण ह्या प्रश्नावर सुजय पहिले तिच्याकडे बघणार होता.

सुजयने त्याची मान वर केली तर त्याला धक्काच बसला. कारण त्याला पहिले मनाली दिसली जी रावीच्या बाजूला बसली होती.

“मी इकडे आहे.” सायली कडक आवाजात बोलली.

“अं?” सुजय सायलीकडे बघू लागला. “ह.. हा झाली ना खरेदी. मस्त तिच्या आवडीचा..” तो बोलता बोलता थांबला. कारण सायली त्याला रोखून बघू लागली होती.

“तुम्हाला वायफळ खर्च करायची खूप हौस आहे ना?” सायली चिडून बोलली. “काय गरज होती एवढ्या महागातल ते खेळण घ्यायची?”

“खेळण?” सुजयच्या कपाळवर आठ्या आल्या. तर रावी आणि मनाली हसू लागल्या.

“आमच्या भाषेत ते खेळणंच.” सायली

“गिफ्ट कोणत आणि कितीला आणल त्याला महत्व नसत,” सुजयने सायलीचाच डायलॉग तिला मारायला घेतला. “ते देण महत्वाचं असत.”

“पण आपण काय देत आहे ते पण तितकाच महत्वाच असत.” विजय बाहेर येऊन बोलला. “ज्यासाठी तिला बंदी आहे, जे ती वापरत नाही. ते घेऊन देण चुकीच असत.”

“आता सगळेच विरोधक माझ्या विरुद्ध जमा झाले तर मी तरी काय बोलणार ना?” सुजय नाटकी आवाजात बोलला. “असही तिला जे हवं ते तिला सहज मिळत. नाही तर तिचं ती घ्यायला समर्थ आहे. म्हणून म्हटलं आपण काय देणार तर तेच देऊयात.”

“तुहाला कितीही सांगितलं तरी तुम्हाला हवं तेच तुम्ही करता.”सायली किचनकडे जात बोलली.

“तू कशी इथे?” सुजयने मनालीकडे बघून विचारलं.

“मी घेऊन आली आहे तिला,” रावी तिच्या नेहमीच्या ठसक्यात बोलली. “तुला काही प्रोब्लेम?”

“मला काय प्रोब्लेम असणार?” सुजय त्याचे खांदे उडवत बोलला. “पण लोक ना उगाच संशय घेतात, दुसऱ्यांच ऐकून.” सुजय किचनकडे बघून जोरात बोलला.

तशी मनाली टेन्शनमध्ये आली. तिला आता आरुषच टेन्शन आल होत. ती त्याला विनकारण तर भांडली होती.

तिकडे सायली पण सुजयकडे बारीक डोळे करून बघू लागली. तर परी खुदकन हसली होती.

मनालीला टेन्शनमध्ये पाहून रावीने तिचा हात हलकासा दाबून तिला आश्वस्त केल. तर विजय ह्या सर्वाना बारीक डोळे करून बघू लागला. तिथे काहीतरी झाल होत जे विजयला माहिती नव्हत. याची जराशी जाणीव विजयला होऊ लागली होती. पण त्याला त्याच काहीच टेन्शन नव्हत. कारण नंतर परी त्याला सगळ काही सांगून देणार होती. त्यामुळे सध्यातरी विजय शांतच बसला. तर सुजय फ्रेश व्हायला त्याच्या खोलीकडे निघून गेला.

स्वयंपाक तर आधीच झाला होता. त्यामुळे जसा सुजय फ्रेश झाला तसे ते सगळेच जेवायला बसले.

ते सगळे जेवत जरी असले तरी बंधू मंडळींचा व्हॉट्स ॲपवरचा ग्रुप मात्र खूप काही बोलत होता. विषय तोच होता जो आरुष, रावी आणि मनालीने त्या कॅफेमध्ये पहिला आणि नंतर तुषारने जे त्यांना ऐकवलं होता. तुषारच ते बोलण आरुषने त्यांच्या ह्या ग्रुपला सांगून दिल होत. त्यात रावीने पण तुषारच्या बाबतीच तिला आधीच आलेली शंका बोलून दाखवायला सुरवात केली होती.

जेवण चालू असताना आपल्या मुलांनी मोबाईल हातात घेतलेला कोणत्या आई वडिलांना चालणार असत? नाही का? त्यांना सारख मोबाईलमध्ये बघताना आणि टाईप करताना बघून सायली रावी आणि सुजय त्या दोघांना ओरडली होती. तेवढ्यापुरता त्यांनी लगेच मोबाईल ठेवून दिला. पण त्यांच मन त्यांच्या ग्रुपवरच्या गप्पांमधेच गुंतलेल होत.

मनाली पण रावीला बघून गोंधळून गेली होती. कारण तिने जेवढं रावीला पाहिलं होत त्यात रावी खाताना दुसर काहीही करत नसायची. मोबाईल हातात घेण तर लांबची गोष्ट होती. आता ती काही ह्या बंधू मंडळींच्या ग्रुपमध्ये नव्हती त्यामुळे त्यांची चालू असलेली ती चर्चा तिला काही माहितीच नव्हती.

मनालीला बघून सुजयला खट्याळपणा सुचला. त्याने परत त्याचा मोबाईल हातात घेतला आणि रावीला पर्सनल मेसेज केला आणि तिच्याकडे बघून इशारातच तिला तिचा मोबाईल बघायला लावला.

रावीला वाटल ग्रुपवर काहीतरी महत्वाच आल आहे म्हणून तिनेही तो लागलीच हातात घेतला आणि सुजयचा आलेला मेसेज वाचला. तसा तिने मनातच डोक्याला हात लावला.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all