मागील भागात.
परी त्याला सांगत होती आणि तो त्याच्यावर विश्वास ठेवत होता. यावरून तुषारने मनातच सुस्कारा सोडला. आता त्याने आरुषसोबत न बोलता सरळ परीच्या वडिलांसोबत बोलायचे ठरवले. एकतर त्याने त्यांची नवीन गाडी तिच्या वडिलांच्या शोरूममधूनच घेतली होती. त्यामुळे विजयसोबत तुषारची जरा ओळख होतीच.
परीच फोनवरच बोलण झाल्यावर ती तुषारच्या बाईकवर बसली आणि त्याने तिला तिच्या घरी सोडलं. परीने त्यांच्या बिल्डींगच्या खालच्या पार्किंगमध्ये पाहिलं तर तिच्या भावंडांच्या पाचही बाइक्स एका लाईनीत लागलेल्या होत्या. थोडी पुढे तर रावीची देखील बाईक तिथे उभी होती. परी स्कुटीवरून पडली हे समजताच तिची भावंड घराजवळ जमा झाली होती. तरी अजून सायली आणि विजय घरी यायचे बाकी होते.
परी तुषारच्या बाईकवरून उतरली. “थँक्स तिने तुषारकडे बघून म्हटलं.
तस तुषारला परत आश्चर्यच वाटल कारण आज पहिल्यांदाच ती एवढ प्रेमाने त्याच्याशी बोलली होती. “ते ठीक आहे, पण तुला माझ्या अटीं माहित आहे ना?” त्याने त्याच्या भुवया उंचावल्या.
“तुमच्या कुठल्या अटीं?” परी गोंधळून विचारू लागली.
आता पूढे.
“त्याच, ते ती माणस तुझ्या मागे लागली असताना तू माझ्या जवळ आलीस आणि...” तुषार पुढे बोलणार तोच परी बोलू लागली.
“बस बस.” परी तिच्या कपाळावर आठ्या आणत बोलली. “प्लीज पण कोणाला काही सांगू नका.”
“नाही सांगणार पण माझी अट..” तुषार तिथेच अडकून राहीला होता.
“मी तुमच्यासाठी नाचू? म्हणजे तुम्ही समजता काय मला?” परी चिडून बोलली.
“अस माझ्या एकट्यासमोर नाही,” तुषार लागलीच स्वतःला सुधारत बोलला. “आत्ता तुमच्या कॉलेजच फंक्शन आहे ना, त्यात तू तुझा स्पेशल डान्स करायचा.”
“काय डोक्यावर पडला आहात का?” परी “ते मुलांसाठी असत.”
“ते मला माहिती नाही.” तुषार तोऱ्यात बोलला. “मला तुझा डान्स बघायचा आहे आणि तो ही तुमच्या कॉलेजच्या फंक्शनमध्ये. नाहीतर आत्ता घरी येतो तू कशी पडली ते सांगायला.”
तस परीने त्याला मारण्याची अक्शन केली. “एका मुलीला अस ब्लॅकमेल करायला काही वाटत नाही का?” परी वैतागून बोलली.
तिचं अस चिडून बोलण, वैतागलेला चेहरा त्याला खूप आवडायला लागला होता.
तिचं अस चिडून बोलण, वैतागलेला चेहरा त्याला खूप आवडायला लागला होता.
“ठीक आहे येतो मी घरी.” तुषार त्याच्या बाईकवरून उतरत बोलला.
“नाही नको.” परी लगेच घाबरून बोलली. “करते मी प्रयत्न.”
“प्रयत्न नको मला.” तुषार त्याच तोंड वाकड करत बोलला.
“अरे तो काय माझा प्रोग्राम आहे का मी सांगेल आणि कॉलेज मला करू देईल. मला आधी परमिशन घ्यावी लागेल ना.” परी चिडून बोलली.
“ते माझ्यावर सोड.” तुषार परत त्याच्या बाईकवर बसत बोलला. “तू तुझा डान्स तयार ठेव.”
“खडूस.” परीच्या कपाळावरच्या आठ्या कमी व्हायचं नावच घेत नव्हत्या. “चुकी झाली तुमची मदत घेऊन.”
“शेवटी त्याचीच लीला.” तुषार वर आकाशाकडे बघून नाटकी आवाजात बोलला.
तसे परीने त्याला हातच जोडले. “जा आता. पण त्यानंतर दुसरी कुठलीही अट मला नकोय.”
“ते मी ठरवेलं.” तुषार त्याचे डोळे मिचकावत बोलला.
तेवढ्यातच परीला विजयची गाडी येताना दिसली. तशी परी अजूनच घाबरली. प्रोब्लेम तुषारसोबत बोलण्याचा नव्हता. प्रोब्लेम हा होणार होता की ती तिच्या स्कुटीवर आली नव्हती आणि तिच्या हाताला पट्टी देखील बांधली होती.
“जा आता.” परी घाबरून बोलली. “बाबा पण आले.”
“अच्छा मग तर भेटलच पाहिजे त्यांना.” तुषार परत त्याच्या बाईकवर उतरत बोलला.
“बोलली ना तुला की करेल डान्स म्हणून. जा आता.” एवढं बोलून परी पटकन तिथून लिफ्टकडे निघून गेली.
तिने साध मागे वळून देखील पाहिलं नव्हत की तुषार गेला की नाही. पण तो मात्र विजयची वाट बघत तिथेच उभा राहीला.
विजय जसा त्याच्या बिल्डींगच्या भागात शिरला. तस त्याला त्याच्या बिल्डींगजवळ परी कोण्या मुलासोबत उभी असलेली दिसली. सोबतीला तिच्या हाताला असलेली पट्टी देखील त्याला दिसली. तसा तो जरा घाबरून गेला. त्यात परीने त्याच्या गाडीकडे बघून पळून पण गेली होती. मग त्याच्या भीतीत अजून भर पडली.
परी गेलेली असतानाही तो मुलगा आहे तिथेच उभा राहिलेला विजयला दिसला आणि तोही त्याच्याच गाडीकडे बघत होता. जसा काही तो मुलगा त्याचीच वाट बघत असावा. अस विजयला वाटून गेल.
विजयने त्याच्या जवळ गाडी थांबवली. तसा तो मुलगा खाली वाकला. तस विजयने त्याला ओळखल होत. सुजय बऱ्याच वेळा त्याच कौतुक करत होता. त्यात त्याने विजयच्या शोरूममधून गाडी पण घेतली होती.
विजयने त्याच्या जवळ गाडी थांबवली. तसा तो मुलगा खाली वाकला. तस विजयने त्याला ओळखल होत. सुजय बऱ्याच वेळा त्याच कौतुक करत होता. त्यात त्याने विजयच्या शोरूममधून गाडी पण घेतली होती.
“जरा बोलायचं आहे.” तुषार जरा गंभीर होऊन बोलला.
तसा विजय विचारात पडला.
तसा विजय विचारात पडला.
“हो, परीचा विषय आहे.” तुषार विजयचा चेहरा वाचून गेला.
तस विजयने लगेच त्याच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि तुषार त्याच्या गाडीत बसला. मग त्याने एका क्षणाचा देखील विलंब न करता आज परीसोबत जे झाल ते त्याला सांगून दिल. ते ऐकून विजय खूपच घाबरून गेला. सोबत त्याच्या रागाचा पारा देखील चढला. हे सगळ कोणी केल असेल याचा त्याला लगेच अंदाज आला.
“आता तुम्हाला काहीच माहित नाही अस दाखवा,” तुषार विजयचा रागातला चेहरा बघून बोलला. “तिची बंधू मंडळी सगळी घरी आलेली आहेत वाटत.” तुषारने त्यांच्या बाईक्सवर नजर टाकली.” त्यांना समजल तर काय होईल? हे वेगळ सांगायची गरज नाहीये.”
“हम्म बरोबर बोललास तू.” विजय एक दीर्घ श्वास घेत बोलला. “पण खरचं खूप खूप धन्यवाद तुझे. आज तू नसतास तर..” विजय बोलता बोलता थांबला.
“त्यात आभार कसले?” तुषार हलकेच हसत बोलला. “सगळी त्याची कृपा.”
तस त्याला सोनालीच्या वडिलांचे शब्द आठवले होते. जेव्हा त्याने त्या मुलांपासून सोनालीला वाचवल होत. त्यावेळेस त्यानेही तिच्या वडिलांना हेच शब्द वापरले होते.
“चला मी निघतो.” एवढं बोलून तुषार गाडीतून उतरला आणि त्याच्या बाईककडे चालला गेला.
इकडे विजयने पण काही विचार केला आणि त्याची गाडी त्याच्या पार्किंगकडे घेऊन गेला.
इकडे घरी मात्र ते सगळेच परीला घेरून बसले होते. ती आपली गरीब गायीसारखी गपचूप त्यांना बघत बसली होती. तिला फ्रेश व्हायला मदत म्हणून रावी गेली होती. आता पाणी पासून चहा नाश्ता सगळचं तिच्या हातात आणून दिल गेल होत.
“मला फक्त खरचटलं आहे.” परी बारीक आवाजात बोलली. “तुम्ही असे करत आहत की जस काही मोठठा ॲक्सिडेन्ट झाला.”
“लागल आहे ना पण.” माला तिच्या पट्टीकडे बघत बोलली. “बस गप्प आता.”
तशी परी तिचं तोंड वाकड करत राहिली. हे तर कमी होत अजून तर विजय घरी यायचा होता. ‘आत्ता खाली तर दिसले होते. मग एवढा का वेळ लागत आहे त्यांना? त्या दगडाने त्यांना सगळ खरं खरं सांगितल तर नाही?’ हा विचार तिच्या मनात येऊ लागला. तशी ती अजूनच टेन्शनमध्ये आली.
काही वेळाने विजय घरी आला आणि पहिले परी जवळ येऊन बसला. तिच्या जवळ बसल्या बसल्या त्याने तिला त्याच्या कवेत घेतलं.
विजयची ही प्रतिक्रिया बघून परीला आलेली शंका आता खरी वाटू लागली. तशी तिने मनातच प्रार्थना चालू केली.
विजयची ही प्रतिक्रिया बघून परीला आलेली शंका आता खरी वाटू लागली. तशी तिने मनातच प्रार्थना चालू केली.
“कस काय लागल तुला?” विजयने प्रेमाने तिचा हात त्याच्या हातात घेतला आणि तिच्या हातावरची पट्टी बघू लागला.
त्याची ती काळजी बघून परीचे डोळे भरून आले. ही माणस तिला एवढी जीव लावतात आणि तिच्यामुळे त्यांना इतका त्रास सहन करावा लागत आहे. हा विचार करूनच तिला आता रडायला यायला लागल.
तिला रडताना बघून विजयच्या मनात कालवाकालव झाली. तिची बाकीची बंधू मंडळी पण लगेच तिच्या भोवती तिच्याजवळ येऊन बसली.
“शूऽऽऽ,” विजयने तिला घट्ट मिठीत घेत शांत करण्याचा प्रयत्न केला. “एकदम शांत. आम्ही आहोत ना इथे. आता कशाला घाबरायचं कोणाला.” विजय भावनेच्या भरात बोलून गेला आणि ते आरुषच्या कानात जाऊन पोहोचलं.
‘म्हणजे दी नक्कीच फक्त पडली नाहीये.’ आरुषच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
“काय झाल रडायला?” विजयने तिचे डोळे पुसले.
“मी नेहमी त्रास देते ना तुम्हाला.” परी तिचा हुंदका आवरत बोलली.
“अस काही नाहीये बाळा.” विजय तिला समजावत बोलला.
तरीही ती मुसमुसत राहिली. तिला स्वतः काही होणार नाही याची तिला खात्री होती म्हणून तर ती बिनधास्त होती. पण तिच्या मुळे तिच्या कुटुंबाला त्रास झालेला तिच्या मनाला सहनच होत नव्हत. त्यामुळे ती आता मनातून घाबरून गेली.
तर दुसरीकडे तेजश्री तिच्या भावाला म्हणजेच तुषारला खूपच भांडत होती. तो तिच्यासमोर तर गेला होता पण तो तिला घ्यायला परत येईल अस तिला वाटल होत. पण त्यांची प्रॅक्टिस संपून बराच वेळ झाला तरी त्याचा काहीच पत्ता नव्हता. नंतर तर ती ॲकेडमी पण बंद करायला घेतली होती. नाईलाजाने तिने कॅब बुक केली आणि घरी आली होती.
घरी आल्यावर तिला तुषारला भांडायच होत. पण तो अजूनही घरी आलेला नव्हता. मग तिचा राग तिच्या काळजीत बदलला गेला. त्याने घरी तर फोन करून सांगितलं होत की त्याला यायला उशीर होईल. त्याची कल्पना तेजश्रीला नव्हती.
मग तिने घरात तिच्या आईला तिचा दादा आधीच निघाला असल्याचे सांगितले. तेव्हा तिच्या आईने त्याने फोन करून उशिरा येत असल्याचे सगुण दिल्याचे तिला सांगितले.
मग काय? बदलेली काळजी परत रागाने भरली आणि ती तिचे गाल फुगवून तुषारची वाट बघत राहिली.
बऱ्याच वेळाने तुषार घरी परतला. घरी आल्यावर नेहमी तेजश्रीची छेड काढणारा तो आज मात्र गपचूप त्याच्या खोलीकडे निघून गेला. ते बघून तेजश्रीला जरा वेगळच वाटल आणि ती पण त्याच्यामागे त्याच्या खोलीकडे निघाली.
“दाद्या,” तेजश्री त्याच्या खोलीत आल्या आल्या जरा चिडून बोलली.
तरी त्याने साध मागे वळून पाहिलं नाही म्हणून तिची बडबड चालू झाली. ती नेहमीसारखी त्याला भांडायला लागली होती. काही वेळ झाला तरी तुषार काहीच बोलत नाही बघून ती रागारागात त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तिने पाहिलं त्याचे डोळे ओलावलेले तिला दिसले. तशी भांडणारी तेजश्री लगेच काळजीने त्याला विचारू लागली.
तरी त्याने साध मागे वळून पाहिलं नाही म्हणून तिची बडबड चालू झाली. ती नेहमीसारखी त्याला भांडायला लागली होती. काही वेळ झाला तरी तुषार काहीच बोलत नाही बघून ती रागारागात त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तिने पाहिलं त्याचे डोळे ओलावलेले तिला दिसले. तशी भांडणारी तेजश्री लगेच काळजीने त्याला विचारू लागली.
“मी इतकही काही बोलली नाही की तू रडावसं.” तेजश्री तुषारचे हात तिच्या हातात घेत बोलली. “प्लीज दादू, काय झाल? माझ चुकल ना? सॉरी ना दादू.”
तुषारने एक नजर तेजश्रीकडे पाहिलं. “तुझ काही नाही चुकल रे बच्चा, पण मी आज जरा जरी उशिरा पोहोचलो असतो तर खूप काही चुकल गेल असत.”
“उशिरा?” तेजश्री गोंधळून गेली. “पण तू आधीच उशिरा आला आहेस? आणि तुझ काय चुकल असत?”
“आज तुमच्या मॅमला किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला.” तुषारने बोलायला सुरवात केली. “ती तिच्या घरी चालली होती तेव्हा काही माणस तिच्या मागे लागली. तिला तिच्या स्कुटीवरून पाडलं. तरी ती तिथून कशीबशी सुटून माझ्याजवळ आली होती."
हे ऐकून तेजश्रीला ही धक्काच बसला. “काय बोलत आहेस दादा तू? मॅम इतक्या साध्या आहेत. कोणाशी त्यांची भांडण नाहीत. त्यांना कोण किडनॅप करेल?”
“काय महित?” तुषार “पण समजा मी त्यावेळेस तिथे नसतो तर?” तुषार बोलता बोलता थांबला.
“सगळी त्याची खेळी आहे रे दादा.” तेजश्री त्याला समजावत बोलली. ती पुढे काही बोलणार तोच त्याने बोललेल्या एका वाक्याने ती स्तब्धच झाली.
“तेजू,” तुषार तेजश्रीकडे बघत बोलला. “मला आवडतात तुमच्या मॅम.” तिच्या लांब होण्याचा साध्या कल्पनेने पण त्याच मन खूपच घाबरून गेल होत. म्हणून त्याच्या तोंडातून हे वाक्य निघाल. जे त्यालाही समजल नाही.
“दादू काय बोलत आहेस तू?” तेजश्री तिचे डोळे विस्फारत विचारू लागली.
“क.. काय बोललो मी?” तुषार आता त्याच्या तंद्रीतून बाहेर आला.
“हेच की तुला आमच्या मॅम आवडतात?” तेजश्री
तसा तुषारने एक दीर्घ श्वास घेतला. “आधी ती बोलायला लागली की तिचा राग यायचा. कारण ती नुसतीच माझ्याशी भांडायची. पण तिचं भांडताना तिचे ते वर होणारे टपोरे डोळे. तिचा तो गोड आवाज. तिचं तिच्या भावांवर असणार प्रेम आणि सर्वात महत्वाच तिचा तो बेभान असणारा डान्स. सगळ कधी मला भावून गेल ते मलाच समजलं नाही. आज तर ती किडनॅप होणार होती हे बघूनच मला खूप घाबरायला झाल. म्हणून मनाची ती खात्रीच झाली आणि ते बोलून गेल.”
“पण दादा,” तेजश्री गंभीर होऊन बोलली. “ते मॅमचे खरे आई वडील नाहीयेत. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना दत्तक घेतलं होत.”
“मग?” तुषार पण गोंधळून गेला. “त्याला काय होत? मला तिच्यासोबत राहायचं आहे. तिच्या आई वडिलांसोबत नाही आणि ती माणूस म्हणून खूप चांगली आहे.”
“त.. प. ते..” तेजश्री जरा चाचरली. “एखाद वेळेस डॅड तर तयार होईल पण मॉम आणि आज्जी? ते कधीच तयार होणार नाहीत.”
“त्यांच माझ्यावर सोड.” तुषार हलकेच स्मित करत बोलला.
“म्हणजे ह्यावेळेस तू खरचं मनावर घेतलं आहेस?” तेजश्रीला जरा आनंदच झाला.
यावर त्याने मंद स्मित करत होकारात मान हलवली. “पण तुला एक काम करायचं आहे.”
“कोणत?” तेजश्री लगेच उत्साहात आली.
“तुमच्या कॉलेजमध्ये आता जे फंक्शन होणार आहे त्यात तुमच्या मॅमचा पण डान्स ठेवायचा.”
“काय डोक्यावर परिणाम झाला आहे का तुझ्या?” तेजश्रीचा उत्साह लगेच मावळला गेला आणि तिच्या कपाळावर आठ्या चढल्या. “त्यांना फक्त डान्स बसवून देण्यासाठी किती पापड बेलावे लागले ते आम्हालाच माहित आणि त्या स्टेजवर डान्स करायला तयार होतील?”
“त्याची काळजी तू नको करूस.” तुषार तिच्या टपलीत मारत बोलला. “तुमची मम नक्की डान्स करेल.”
आता तर ती तिच्या दादाला ‘हा वेडा झाला का?’ या अविर्भावात बघू लागली.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा