ईरा चॅम्पियन ट्रॉफी:- २०२५
जलद लेखन स्पर्धा
शीर्षक:- अवंतिका
भाग:-२
"काय लपवत आहात बापलेक?" माधुरी डोळे बारीक करत म्हणाली.
"काहीच नाही, मम्मी?," अवंतिका नजर चोरत म्हणाली.
" काहीच कसं नाही?," असे म्हणत माधुरीने तिने उशीखाली लपवलेले मॅगेझिन बाहेर काढत एक हात कमरेवर ठेवून भुवया उंचावून म्हणाली, " हे काय आहे मग?"
"अगं, ए अवु, कसले गं कपडे घातलेस तू?" त्या फोटोमध्ये अवंतिकाने घातलेला ड्रेस सिल्व्हलेस व थोडा गुडघ्याच्या वरती होता. त्यामुळे ती थोडी चिडत म्हणाली.
अवंतिका केविलवाण्या नजरेने प्रतापकडे पाहिले. मी आहे ना असे नजरेने तिला देत ते माधुरीला समजावत म्हणाले,"अगं मधु, हे नाॅर्मल आहे हे. ती माॅडेल आहे म्हटल्यावर तर तिला असे कपडे घालावे लागतात थीमनुसार. तिच्या कामाचा भाग आहे ते. त्यात बिघडले कुठे? ते सगळे सोड. बघ तरी आपली लेक किती सुंदर दिसते ते."
"ते ठीक आहे, ओ; पण बघणारे कसे बघतात, कसे कळत नाही तुम्हाला? " ती नाराज होतं चिंतेने म्हणाली.
"हे बघ मधु, तो बघणाऱ्यांचा दृष्टीकोन असतो. तू त्या गोष्टीकडे का लक्ष देतेस?" ते तिला पुन्हा समजावून सांगू लागले.
"तुम्हाला नाही कळायचं माझ्या मेलीची काळजी? अजून डोक्यावर घेऊन नाचा तिला. काय तो सावळा गोंधळ घालायचा तो घाला बापलेक मिळून. काही कमी जास्त झालं ना तर तेव्हा कळेल तुम्हाला ?" ती रागाने तणतणत तेथून निघून गेली.
तिच्या बोलण्याने अवंतिका हिरमुसली. प्रतापने तिच्या डोक्यावरून हात फिरवत सगळं ठीक होईल असा विश्वास दिला.
दोन दिवसांनी त्यांच्या गावात एक कार्यक्रम होता. त्यासाठी अवंतिका छान तयार होऊन तिच्या पूर्ण कुटुंबासोबत तिथे गेली. तिला काही गावातील लोक कुतुहलाने तर काही वेगळ्या नजरेने पाहत होते.
त्यातील काहींनी ओळखून तिच्यासोबत फोटो काढले.
माधुरी, प्रताप आणि निलिमा त्यांच्या मित्र मैत्रिणी सोबत बोलण्यात व्यस्त झाले.
अवंतिका लोकांच्या गराड्यातून बाजूला होतं. एकटीच इकडे तिकडे पाहत फिरू लागली.
एके ठिकाणी तिची नजर स्थिरावली. तिने नीट निरखून पाहिले तेव्हा तिला लक्षात आले की तिच्या बालपणीचा मित्र, तिच्या पप्पांचा मित्राचा मुलगा समीर होता.
तो त्याच्या मित्रांसोबत बोलत उभा होता. ती त्याच्या जवळ जात त्याला म्हणाली,"एक्सक्युज मी! तू समीर जोशी आहेस ना, विनितकाकांचा मुलगा? "
"हो, आणि तू टॉपची माॅडेल आणि मॅगेझिनच्या कव्हरवर पेज झळकणारी स्टार मिस अवंतिका आहेस ना." समीर उत्साहाने आनंदाने तिला म्हणाला.
"हो, मीच आहे. पण स्टार वगैरे काही नाही हं, मीही सामान्य मुलगीच आहे. ते सोड. किती दिवसांनी भेटतोय ना आपण. छान वाटले तुला भेटून." तिला कोणताही गर्व नव्हता. ती अगदी सहज त्याला बोलली.
नंतर त्याने त्याच्या मित्रांशी त्याची ओळख करून दिली. ती मोकळ्या स्वभावाची असल्याने त्यांची हसून बोलली.
नंतर ते दोघे बराच वेळ बोलले. निघताना दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले. तिने नाॅर्मली त्याला आलिंगन दिले. ज्याचा त्याच्या त्याने आणि त्याच्या मित्रांनी वेगळा अर्थ काढला.
माधुरीच्या कानावरही अवंतिका बद्दल संमिश्र बोलणे ऐकू आले. समीरला तिने दिलेले आलिंगन तिलाही आवडले नाही. घरी आल्यावर तिने तिला बोलून दाखवले पण नेहमीप्रमाणे प्रतापने तिची समजूत काढली.
दोन दिवसांनी समीरने तिला मेसेज केला. तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तिला मित्राला भेटण्यात काहीच गैर वाटले नाही. आईवडिलांची परवानगी घती त्याला भेटून आली.
या भेटीवरून समीरचे मित्र त्याला विचारू लागले की भेटीचा फायदा घेतलास की नाही.
त्यावर तो हसत डोळा मारत म्हणाला,
"अजून तर नाही. आधी तिचा विश्वास जिंकून घेतो मग मज्जा घेईन."
"अजून तर नाही. आधी तिचा विश्वास जिंकून घेतो मग मज्जा घेईन."
असेच पुन्हा दोन तीन दिवस गेले. पुन्हा ते दोघे भेटले. दोघे साॅफ्ट ड्रिंक घेत गप्पा मारत होते. ते गावाच्या बाहेर एका टेकडीवर बसले होते. आधी थोडा लांब बसलेला समीर हळूहळू तिच्याजवळ सरकून बसला. बोलत बोलत त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला. तिने हसत हात काढला.
पण नंतर त्याने पुन्हा तिच्या खांद्यावर हात ठेवला. यावेळी मात्र तिने त्याचा हात झिडकारून त्याला लांब ढकलले. त्याला राग आला. तो खासकन तिला जवळ ओढून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा तिने सर्व ताकदीनिशी त्याच्यापासून स्वतःला सोडवून घेत त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत सनकन त्याच्या कानाखाली दिली आणि तेथून भरल्या डोळ्यांनी निघून आली.
तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तो मात्र रागाने लालबुंद होतं गाल चोळत मनात म्हणाला,"याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल तुला, अवंतिका. वेट अँड वाॅच !"
झाल्या प्रकाराने अवंतिका खूप दुखावली होती. तिला रडताना पाहून निलिमाने तिला विचारले. तेव्हा तिने तिला घडलेले सगळे सांगितले. प्रतापला याबद्दल सांगू असे म्हटल्यावर तिने नकार देत तिच्यामुळे मित्रांमध्ये दरार निर्माण झालेले नको होते. शिवाय तिच्यामुळे त्यांची इभ्रतीला धक्का लागलेले त्यांना सहन होणार नाही. ते तिला आवडणार नाही असे म्हणून ती गप्प राहिली.
पण इकडे समीरने मात्र मित्रांना त्यांच्या दोघांच्या भेटीबद्दल भलते सलते रंगवून रंगवून सांगत होता. नेमके तेव्हाच कामिनीने ते ऐकले आणि तिने घरी येऊन माधुरीला सांगितले.
वर्तमान:-
माधुरीने चिडून अवंतिकाला फैलावर घेत तिच्या गालावर हाताची नक्षीही काढली. ती जीव तोडून सांगत होती पण तिचा रागाचा पारा चढला होता. ती ऐकून न घेता तिला त्वेषाने म्हणाली,"सांगत होते ना तुला, पण नाही ऐकायचं. आता आमची इज्जत वेशीला टांगलीस, समाधान झाले असेल तुझं? "
ती अजून हात उचलणार तोच प्रताप अवंतिकाला जवळ घेत म्हणाले,"वेड लागलंय का तुला? तरूण पोरीवर हात उचलतेस काय? "
"हो, वेडच लागलंय मला. ही डोक्यावर मिऱ्या वाटतेय. हिच्यामुळे अब्रूचे धिंडवडे निघालेत ते दिसत नाही का तुम्हाला? मी हात उचललेला दिसतोय तुम्हाला?" ती नाकपुड्या फुगवत जोर जोरात श्वास घेत म्हणाली.
"माझा पूर्ण विश्वास आहे, अवुवर आणि मला वाटतं तुही तो विश्वास दाखवावा." ते तिला म्हणाले.
"दाखवला होता, कामिनी जेव्हा बोलली तेव्हा नव्हता मला बसला विश्वास. पण आतापर्यंत दहा बारा लोकांचे फोन येऊन गेले. त्याचं काय? कोणा कोणाला उत्तर देऊ?" माधुरी डोळ्यांत पाणी आणत डोक्याला हात लावून बसत म्हणाली.
"मम्मी, माझी दी तशी नाही. मी तिच्याजवळ चार-पाच दिवस राहून तिथे पाहिले आहे, ती किती मेहनत करते. तेथील लोक तिचा किती आदर करतात. इथे लोकांना कळत नाही, ऐकलेल्या गोष्टीवर का विश्वास ठेवतेस तू?" निलिमा अवंतिकाची बाजू घेत माधुरीला जीव तोडून सांगत होती.
क्रमशः
काय होईल पुढे? अवंतिका स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का?
जयश्री शिंदे
टीम सुप्रिया
टीम सुप्रिया
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यातील पात्र, स्थान व घटना यांचा वास्तवाशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा