अविचारी निर्णय : भाग २

विचार न करता उगाचचं निर्णय घेऊन विषाची परीक्षा घेऊ नये
विषय : विषाची परीक्षा

      "हे बघा मलाही ते स्थळ आपल्या नेहासाठी अगदी योग्य वाटतयं आणि ते साखरपुड्यासाठी घाई करत आहेत कारण त्या मुलाला अमेरिकेत जायचे आहे सहा महिन्यांसाठी म्हणून त्यांचे एवढेचं म्हणणे आहे की जाण्याअगोदर साखरपुडा व्हावा यात गैर काहीचं नाही.", नेहाच्या बाबांनी त्यांचे मत मांडले.

" हो मलाही यांच म्हणणं पटतयं अगदीच. मुलगा छान आहे शिवाय कुटुंब ही अगदी छान आहे. अगं आपल्या शामलचे किती कौतुक करत होती मुलाची आई. शिवाय मुलाला छान नोकरी आहे आणि नेहाने लग्नानंतर नोकरी करावी असा त्यांचा अट्टाहास नाही. तिने तिला हवे ते करावे इतके स्वातंत्र्य देत आहेत ते मगं अशा चांगल्या स्थळात उगाचंच शंका घेऊन खुसपट काढणं मला योग्य वाटतं नाहीये. ", शामलची सासू शामलकडे पाहून बोलली तसे शामलला त्यांच्या बोलण्याचा रोख चांगलाच लक्षात आला.

" शामल मला वाटतयं तु तुला जे काही वाटतयं ते स्पष्ट करं आणि असं का वाटतयं ते ही सांग ", हेमंतने शामलकडे पाहून तिला बोलायला सांगितले.

" आई बाबा स्थळ छान आहे आणि तुम्ही म्हणताय ते ही पटतयं मला पण त्या लोकांच पहिल्या भेटीत अगदी आपल्यासाठी एवढे महागडे गिफ्ट्स घेऊन येणं, नेहासाठी पहिल्याच भेटीत सोन्याचे इअरिंग घेऊन येणं खरं सांगायचं तर मला थोडं संशयास्पद वाटलं.

हे बघा तुम्ही सगळे माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका
पण माझी एका मावस बहिणीने आत्महत्या केली मागच्या महिन्यात हे तुम्हाला ठाऊक आहे ना? "

" हो ठाऊक आहे की तु जाऊन आली होतीस. ", शामलची सासू उत्तरली.

" हो आई पण घरी आले तर आपल्या नेहाच्या स्थळाचे सुरू होते आणि तुम्ही कोणीही विचारले नाही तिने आत्महत्या का केली म्हणून पण आज सांगते मी कारण मला वाटतयं त्याशिवाय तुम्हाला मला कायं म्हणायचे आहे ते कळणारं नाही. ", असे म्हणून शामलने एक दीर्घ श्वास घेतला.

"माझ्या त्या मावस बहिणीला ही असचं छान स्थळ सांगून आलेलं. तो मुलगा लंडनला जायचा आहे असे सांगून त्याच्या घरच्यांनी साखरपुड्याचा आग्रह धरला. स्थळ योग्य म्हणून माझ्या मावशीने ही मुलीचा साखरपुडा उरकला नंतर मुलाचा तिकडे अपघात झाला आहे असे सांगून त्या लोकांनी पैसे मागितले शेवटी मुलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून तिच्यासाठी सुखासाठी पैसे दिले पण नेमकं इथचं फसले ते.
त्या लोकांनी पैसे घेतले आणि त्यानंतर फोन उचलला नाही. माझी मावस बहिण त्या मुलांत गुंतली तोपर्यंत, लग्न मोडले शिवाय आई बाबांची फसवणूक यातचं तिने आत्महत्या केली. ", एवढे बोलून शामलने एक आवंढा गिळला.

क्रमशः


🎭 Series Post

View all