अविचारी निर्णय : भाग ३ (अंतिम भाग)

विचार न करता उगाचचं निर्णय घेऊन विषाची परीक्षा घेऊ नये
विषय : विषाची परीक्षा

हेमंतने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
"हेमंत नेहा माझी नणंद नाही फक्त मी तिला बहिण मानते रे माझी म्हणून वाटतं की माझ्या मावस बहिणीबरोबर झाले ते नेहासोबत होऊ नये.

हे बघं मुलाला अमेरिकेत जायचे आहे मान्य आहे पण तो आल्यावर ही साखरपुडा आणि लग्न होऊचं शकते की, मग ते लोक दोन दिवसांत साखरपुडा उरकायची एवढी घाई का करतं आहेत?

आपली नेहा सुंदर आहे, हुशार आहे तिच्यासाठी अजून चांगली स्थळे नक्की मिळतील आपल्याला पण त्यांच अति वागणं मला थोडं खटकतं आहे आणि म्हणूनचं वाटतयं की आपण थोडी चौकशी करूया. ", शामलने तिचे म्हणणे अगदी स्पष्टपणे मांडले.

" वहिनी मला आठवलं आम्ही दोनदा भेटलो तेव्हा तो सतत आजूबाजूला बघत होता जणूकाही कोणी त्याला पाहू नये गप्पांच्या नादात मला लक्षात नाही राहिले पण तु आत्ता बोलली आणि एकदम आठवले. मला त्यावेळी त्याचे हे वागणे जरा संशयास्पद वाटलेले.", नेहा बोलली तसे तिचे आईवडील ही जरा सतर्क झाले.

" मला वाटतयं आपण शामलचे म्हणणे ऐकूया शेवटी आपल्या नेहाच्या आयुष्याचा प्रश्न आहे उगाचचं घाई नको. व्यवस्थित चौकशी करूया आणि विचार करून निर्णय घेऊया. ", नेहाचे बाबा निर्णय घेतात तेव्हा सगळ्यांनाच तो पटतो.

दुसर्‍या दिवशी नेहाचे बाबा जाऊन मुलाने ज्या ऑफिसचे नाव सांगितले होते तिथे जाऊन चौकशी करतात तेव्हा त्यांना चांगलाच धक्का बसतो. ते स्थळ आले त्या मॅरेज ब्युरो मध्ये जाऊन अजून खोलवर चौकशी करतात आणि संध्याकाळी घरी येतात.

"अहो दिवसभर कुठे होता? त्या मुलाकडच्या मंडळींचा चार वेळा फोन येऊन गेला. कायं करायचे साखरपुड्याचे?", नेहाच्या आईने विचारले.

"शामल बाहेर ये", नेहाच्या वडिलांनी त्यांच्या सुनेला इतक्या मोठ्याने हाक मारली की नेहा आणि हेमंत सुद्धा बाहेर आले.

"कायं झालं बाबा?", शामलने विचारले.

" तुझे म्हणणे अगदी योग्य होते आणि मला समाधान वाटतयं आज की तुझ्यासारखी स्नेहाचा इतका विचार करणारी वहिनी भेटली आहे तिला. तो मुलगा त्याने सांगितले त्या ऑफिसमध्ये काम करत नाही आणि मॅरेज ब्युरो मध्ये गेल्यावर कळले की तिथे त्यांनी कुठलीही नोंद केली नाही किंवा आपले स्थळ ही त्यांनी कोणाला दाखवले नाही अजून.

शामल आम्ही अविचाराने निर्णय घ्यायला निघालो होतो मात्र तु तुझी विवेक बुद्धी वापरून आम्हाला वेळीच सावध केलेस म्हणून नेहाचे आयुष्य उद्ध्वस्त होता होता राहिले. आमचा अविचारी निर्णय आमच्या मुलीसाठी विषाची परीक्षा ठरली असती.

                            **समाप्त **

कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी योग्य विचार करायला हवा.


🎭 Series Post

View all