स्वातीने ते दृश्य पाहिले आणि तिचे तर हातपाय गळून गेले.ते दृश्यच असे होते.कोमलने स्वतःला जाळून घेतले होते.
त्या अवस्थेत ती स्वातीला किंचाळून मदतीसाठी बोलावत होती.
त्या अवस्थेत ती स्वातीला किंचाळून मदतीसाठी बोलावत होती.
कोमलने आतून कडी लावून घेतली असल्याने स्वाती तिला मदत करू शकत नव्हती. स्वाती असहाय झाली होती. तितक्यात कोमलचा नवरा किशोर आला त्याने पूर्ण जीवानिशी दरवाज्याला लाथा मारून दार उघडले. दार उघडले तसे कोमल बाथरूमच्या दिशेने पाणी अंगावर मारण्यासाठी गेली.
स्वाती आणि किशोर तिच्या पाठी गेले.किशोरने प्रसंगावधान दाखवत जाडजूड गोधडी तिच्या अंगावर टाकली.आग विझली; पण कोमलचं संपूर्ण शरीर संपूर्ण जळालं होतं. तिचा चेहराही ओळखू येत नव्हता.
कोमलला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले.
डॉक्टरांनी तिची अवस्था बघूनच सांगितले " "कोमल खुपच सिरीयस आहे ,तिला वाचवणं कठीण आहे."
डॉक्टरांनी तिची अवस्था बघूनच सांगितले " "कोमल खुपच सिरीयस आहे ,तिला वाचवणं कठीण आहे."
हे ऐकून तर स्वाती आणि किशोर घाबरलेच.
किशोर तर अगदी निशब्द झाला होता.
किशोर तर अगदी निशब्द झाला होता.
तासाभरात कोमलचे आई वडील आणि भाऊ सर्व आले.सगळेच रडत होते.
स्वाती तिच्या आईला सांत्वन देत होती.
कोमलची आई जोरजोरात रडत होती आणि म्हणत होती "काय केलंस कोमल? काय दुःख होतं हे तू तुझ्या आईला का सांगितलं नाही?
कोमलचा भाऊ मंदार किशोरकडे आला आणि म्हणाला "कसं झालं हे सर्व? माझ्या बहिणीने असे का केले? हे नक्की तिनेच केले का ..कोणी?..
कोमलचा भाऊ मंदार किशोरकडे आला आणि म्हणाला "कसं झालं हे सर्व? माझ्या बहिणीने असे का केले? हे नक्की तिनेच केले का ..कोणी?..
पुढे अजून काही तो बोलणार तोच किशोर म्हणाला:" हे कोमलनेच केले,हवं तर तुम्ही स्वातीला विचारा"
स्वाती पुढे होत म्हणाली "कोमलने स्वतः च केले. मी दुपारी रूममध्ये होते आणि अचानक तिचा किंचाळण्याचा आवाज आला. मी धावत गेले पाहते तर कोमल जिवाच्या आकांताने ओरडत होती."
आपली बहीण असे काही करेन असे मंदारला वाटत नव्हते. झुरळाला पाहून देखील ती लांब पळते ती चक्क असे स्वतःला जाळून घेण्याचे धाडस तरी कसं करू शकते?
मंदार त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकत म्हणाला "मला एकही शब्द खरा वाटत नाही."
तेवढ्यात पोलीस आले.
पोलिसांना पाहून मंदार त्यांच्याकडे गेला.
म्हणाला
"साहेब, माझी बहिण जी झुरळाला बघून घाबरते ती स्वतःला जाळून घेण्याचे धाडस कसं करणार?. मला पूर्ण शंका ह्या किशोरवर आहे. ह्यानेच काही तरी केले असणार ."
पोलिसांना पाहून मंदार त्यांच्याकडे गेला.
म्हणाला
"साहेब, माझी बहिण जी झुरळाला बघून घाबरते ती स्वतःला जाळून घेण्याचे धाडस कसं करणार?. मला पूर्ण शंका ह्या किशोरवर आहे. ह्यानेच काही तरी केले असणार ."
किशोर रडक्या स्वरात म्हणाला
"मंदार, माझ्यावर विश्वास ठेव,मी कोमलला मारण्याचा प्रयत्न केला नाही. मी तर कोमलवर खूप प्रेम करतो. मी स्वप्नातही हा विचार करू शकत नाही. विश्वास ठेव माझ्यावर"
"मंदार, माझ्यावर विश्वास ठेव,मी कोमलला मारण्याचा प्रयत्न केला नाही. मी तर कोमलवर खूप प्रेम करतो. मी स्वप्नातही हा विचार करू शकत नाही. विश्वास ठेव माझ्यावर"
कोण खरं बोलतं आहे आणि खोटं हे लवकरच कळेन. पोलीस करड्या अवजातच म्हणाले आणि डॉक्टरांना भेटायला गेले.
इथे कोमलचे आई, वडील, भाऊ,स्वाती, किशोर तिचा जीव वाचावा म्हणून प्रार्थना करत होते.
कोमलची अवस्था खूप नाजूक होती. सर्व अंगाचा दाह होत होता.ती खूप किंचाळत होती.
तिला अजिबात सहन होत नव्हते.
पोलिसही तिची अवस्था पाहू शकत नव्हते.
तिला अजिबात सहन होत नव्हते.
पोलिसही तिची अवस्था पाहू शकत नव्हते.
डॉक्टर पुढे होत म्हणाले :"साहेब ,त्या आता काहीच बोलण्याच्या अवस्थेत नाही आहेत."
डॉक्टर ती कधी स्टेबल होते आहे ह्याची वाट पहात होते. वातावरण गंभीर झाले होते. सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले होते.
सगळेच चिंतीत होते.
सगळेच चिंतीत होते.
का केले कोमलने असे? नक्की कोमलनेच असे केले होते का ? खूप सारे प्रश्न अनुत्तरीत होते.
क्रमशः
जलदकथामालिका
©®अश्विनी ओगले.