अवजड अपेक्षांचे ओझे भाग 2
तिने बाजूला सारले
तिने बाजूला सारले
©️®️शिल्पा सुतार
दुपारी आराम न करता ती घर आवरत होती. तिने कटलेट केले. फ्रीज मधे ठेवले. वेळेवर तळणार होती. तिने तयारी केली. लाल रंगाची साडी नेसली. टिकली लावली , सैल वेणी घातली ती खूप छान दिसत होती. तिने फोटो काढून रितेशला पाठवला.
बायका आल्या. थोडी धावपळ झाली. पण खूप छान बेत झाला होता. आशाताईंच्या मैत्रिणी खुश होत्या. सगळया तिची स्तुती करत होत्या.
" तुझी सून खूप चांगली आहे आशा. तिच्या हाताला चव आहे."
" हो सुरवातीला सगळेच करतात. बाकी आमचं आम्हाला माहिती. " आशाताई म्हणाल्या. बाकीच्या हसत होत्या.
श्रुतीचा अपमान झाला होता. ती कपबश्या घेवून आत गेली. तिथे ओट्या जवळ उभी होती. या लोकांच किती ही करा कमी आहे. माहेरी आरामात असणारी मी इथे दिवस रात्र काम करते आहे तरी सासुबाई अस म्हणतात.
नंतरची आवराआवरी खूप करावी लागली. परत लगेच रात्रीचा स्वयंपाक. सगळं आवरून श्रुती रूम मधे आली.
रितेश तिच्याकडे बघत होता. ती खूप दमली होती.
"जा चेंज कर आराम कर." तो म्हणाला.
ती विचार करत होती माझ्या अश्या अति कामामुळे मला रितेशला वेळ देता येत नाही. काय करू सासुबाई राहू दे म्हणत नाही. कोणीही मदत करत नाही. म्हणून वेळ होतो.
"अहो..."
"झोप, काही हरकत नाही. सगळं तूच करत बसलीस तर असच होणार. इथे कोणी मदत करत नाही. तुझ तुला हुशार व्हावं लागेल." रितेश म्हणाला.
सासूबाईंनी माझा अपमान केला. यांना सांगू का? त्यांना माझ्या बद्दल काही वाटत नाही. मीनुशी, यांच्याशी त्या प्रेमाने वागतात. मला पाण्यात बघतात.
"अहो कोणाच किती करायला हवं? " तिने विचारलं.
" आपल्याला झेपेल इतकं आणि समोरच्याला आपण करतो याची जाणीव असेल इतकं करावं. नाहीतर तू करत बसशील त्यांना काही पडली नाहिये." रितेश म्हणाला.
" आज असच झाल. म्हणजे आई त्यांच्या मैत्रिणीं समोर मला बोलल्या. मला ते आवडलं नाही. "
" काय झालं? "
ती सांगत होती.
"तिच्या मैत्रिणी तू करायच नाही ना. "
" पण त्या मला भेटायला आल्या होत्या. अस तुटक वागता येत का? तुम्हाला माहिती नाही मी माझ्या मनाने निर्णय घेवू शकत नाही. " ती म्हणाली.
" हेच तर बदल. अशी घाबरून राहू नकोस. फालतू पणा आहे. आई ही अस का करते? बराच आराम झाला. तू आता जॉब शोध. आपलं आपलं काम कर. "
" हो अहो घरकामातून वेळच मिळत नाही. " श्रुती तीच बिझी शेड्यूल सांगत होती.
" वेळ काढावा लागतो. आत येवून पुस्तक वाचत बस. दिवसभर किचन किचन. " रितेश म्हणाला.
यांना बोलायला सोपं आहे. मला करायला तितकच अवघड. जरा आत आल की आई मागे येतात. फोन वर ही बोलू देत नाही. यांना कस सांगू.
सकाळी परेश ऑफिसला जात होता." हे घे श्रुती पुस्तक. जरा आराम कर. "
रोजचे काम आवरले. ती आत होती सासुबाई मागे होत्या. जरा डाळी उन्हात टाक. तिला काम करावं लागलं.
मीनु कॉलेज मधे होती. ती तिच्या जगात खुश होती. दिवसभर मैत्रिणीं सोबत असायची. सुट्टीच्या दिवशी ही इकडे फिर तिकडे फिर चालायचं. घरात मदत करत नव्हती. आज तिच्या मैत्रिणी अभ्यासाला आल्या होत्या. बरोबरीच्या मुली बघून श्रुती खुश होती ती त्यांना भेटायला गेली. त्या काहीतरी बोलत होत्या गप्प बसल्या.
"काय झालं मीनु?" श्रुती विचारत होती.
" काही नाही वहिनी, आम्ही अभ्यास बद्दल बोलत होतो. तू तुझे काम कर ना. आई......"
"श्रुती अग तु त्यांच्यात बसू नकोस पोरींना
चहा चिवडा दे ." आशाताई म्हणाल्या.
चहा चिवडा दे ." आशाताई म्हणाल्या.
ती किचन मधे आली. मी नोकर आहे की काय? कस वागतात. अगदी कमी वागणूक देतात. ती नाराज होती.
तरी तिने चिप्स तळले. चिवडा दिला. कप प्लेट्स तिथे पडले होते.
" श्रुती अग वेळेवर आवरत जा." आशाताई ओरडत होत्या.
रितेश ऑफिस हून आलेला होता.
" श्रृती तू आत जा मीनु तू आवर. "
" मी का दादा? "
" श्रुतीला किती काम देणार जरा काही वाटू दे."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा