Login

अवजड अपेक्षांचे ओझे भाग 4

अवजड अपेक्षांचे ओझे तिने बाजूला सारले
अवजड अपेक्षांचे ओझे भाग 4
तिने बाजूला सारले

©️®️शिल्पा सुतार

सगळ्यांच करता करता श्रुती आजारी पडली. सकाळ पासुन ताप होता कोणी बघायला आलं नाही. दुपारचा स्वयंपाक तिने कसातरी केला होता. चहाची वेळ झाली.

"श्रुती काय करतेस?" आशाताई आवाज देत होत्या.

" आई मला बर नाही."

" अस झोपून रहाशील का? दोन कप चहा कर मग झोप. संध्याकाळी स्वयंपाक काय करणार?" त्यांनी विचारलं.

" माझ्या कडून होणार नाही."

" एवढ्याश्या तापाला असं करते. घरचं कोण करेल. माझा उपास आहे. वरण भात, दोन भाज्या आणि शिरा ही कर. आम्ही नाही अस झोपून राहिलो."

श्रुती किचन मधे आली. तिने कसातरी चहा केला. चक्कर येत होती. ताप चेक केला. शंभर पेक्षा जास्त होता. तिने रितेशला फोन केला.

" डोक्यावर ओला रुमाल ठेव. मी लगेच येतो."

ती थोडा वेळ झोपली.

रितेश आला त्याने बघितलं तिला खूप ताप आहे. लगेच ते डॉक्टर कडे गेले. गोळ्या दिल्या.

"काही खाल्लं का?"

" नाही."

रस्त्यात थांबून तिने इडली खाल्ली. त्याने चहा ही मागवला. गोळी घेतली. ते घरी आले.

" श्रुती अग घरी यायला किती वेळ. आता फक्त पोळी भाजी कर जास्त नको. थोडी चटणी ही कर." आशाताई म्हणाल्या.

" आई आम्ही डॉक्टर कडून येतो आहोत." रितेश म्हणाला.

" दाखवलं ना डॉक्टरला मग आता किती दिवस झोपून रहायला सांगितल? ते काहीही सांगतात एवढ नाजूक बनून चालत का?" आशाताई बडबड करत होत्या.

"श्रुती तू झोप. आई तू आणि मीनू करा. "

"माझी परिक्षा आहे मला तुमच्यात घेवू नका." मीनु म्हणाली.

" ठीक आहे मला भाजी कापायला दे आई. मी मदत करतो." रितेश म्हणाला.

कसातरी एक दोन तासात सात आठ पोळ्या भाजी झाली. रितेशने श्रुतीला उठवलं. तिच्या साठी मुगाची खिचडी केली होती. ती तिथे रूम मधे जेवली. गोळ्या घेवून झोपली. सकाळी तिला बर वाटतं होतं.

किचन मधे बिकट परिस्थिती होती. कालचे भांडे तसेच पडले होते. ओटा, गॅस पुसलेला नाही. सासुबाईंना स्वच्छता आवडते ना? मला नेहमी सांगतात. स्वतः ची वेळ आली तर किती घाण करून ठेवली आहे. लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण.

ती आवरत होती. रितेश आला. तिला आत नेलं.

"अहो चहा करायला ही भांड नाही."

"मी बघतो तू पड बर. बघू ताप चढतो आहे."

"कोणी काही करत नाही." श्रुती म्हणाली.

" तू ही काही काम करायच नाही. " रितेश म्हणाला.

" अहो इथे राहून ते शक्य नाही. "

" आईकडे जाते?"

" हो."

तिने तयारी केली.

"कुठे निघालात?"

"श्रुती आईकडे जाते आहे." रितेश म्हणाला.

" चांगल आहे. आईकडे जाते आहे तर चार गोष्टी शिकून ये. नाजूक आहे पोरगी. जरा म्हणून भराभर आवरत नाही. " आशाताई म्हणाल्या.

आता अजून काय करायला हवं. सकाळी सहा ते रात्री अकरा यांची सेवा सुरू असते. श्रुती नाराज होती.

ती आईकडे आली. आईला भेटून तिला भरून आलं होत. चहा घेवून रितेश परत गेला.

" आई मी त्या लोकांना आपल मानलं ते म्हणतील ते केलं, स्वयंपाक पाणी, त्यांची सेवा पण ते मला आपलं मानत नाही. मी परकी आहे. त्यांना दयामाया नाही. मी फक्त घरकामासाठी आणलेली सून आहे."

"काय झालं बेटा?" त्या विचारत होत्या.

श्रुती सांगत होती.

" जावई कडे आहेत? "

" ते देवमाणूस आहेत. त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. "

" मग बर आहे ना. जावई तुझी काळजी घेतात बाकीचे लोकांकडे लक्ष देवू नकोस. "

" हे घरी नसतात. मला सासुबाईं सोबत रहावं लागत ना आई. "श्रुती म्हणाली.

" असच असत बेटा. ते सासर आहे." आई समजावत होती.

" तुला हे माहिती होत? लोक असे वागतात. "

" हो मी पण यातून गेली आहे. "

" मला का नाही आधी सांगितलं. "

" काय सांगू स्त्री जातीचं दुःख. घरोघरी मातीच्या चुली. त्यातल्या त्यात जेवढं होईल तेवढ कर. "
0

🎭 Series Post

View all