Login

अवजड अपेक्षांचे ओझे भाग 3

अवजड अपेक्षांचे ओझे तिने बाजूला सारले
अवजड अपेक्षांचे ओझे भाग 3
तिने बाजूला सारले

©️®️शिल्पा सुतार

आशाताई, मीनु एकमेकींकडे बघत होत्या.

" आई, दादा बघ कसा करतो."

"मी उद्या त्या श्रुतीकडे बघते. तू काळजी करू नकोस. " आशाताई म्हणाल्या.

रात्री श्रुती लॅपटॉप घेवून बसली होती. तिने एप्लीकेशन केले.

"मी सकाळी तुला मेल केली होती तू बघितली ही नाही?" रितेश म्हणाला.

" अहो मी कामात होती. "

"किती वेळा सांगितल पूर्ण वेळ घरकाम करायच नाही."

" अहो मला थोडा वेळ द्या ना. मी सासुबाईं समोर काही बोलू शकत नाही. " श्रुती म्हणाली.

"अस केल तर कस होईल श्रुती. जॉबच काम महत्वाचं आहे. "

" तुम्ही नाराज होवू नका ना. मला तुम्ही घरी आल्यावर बर वाटत."

त्याने तिला जवळ घेतलं. "बर सॉरी. "

दुसर्‍या दिवशी रितेश ऑफिसला गेला.

मीनु, आशाताई किचन मधे आल्या.

" हे छान करते तू श्रुती? " त्या मोठ्याने म्हणाल्या.

" काय झालं आई?"

" रीतेशला आमच्या बद्दल सांगते. तो आमच्यावर चिडलेला असतो."

" नाही आई मी काही म्हणाली नाही. " श्रुती म्हणाली.

"दादा काल मला कसा बोलला." मीनु म्हणाली.

" त्यांनी तुला कप बश्या उचलायला सांगितल्या ना? त्यात काय." श्रुती हिम्मत करत म्हणाली. या पेक्षा कितीतरी काम मी करते. या सासुबाई मला किती बोलतात. या मीनुला थोडसं काम पडलं तर त्यात काय इतकं?

" तुझ्या घरी फोन लाव." आशाताई रागात म्हणाल्या.

" का?"

"त्यांना ही कळू दे त्यांची लेक किती गुणी आहे. उलट बोलते. नवर्‍याचे कान भरते. त्यांनी असे वळण लावले का?"

" नाही आई प्लीज." माझ्या आईला का मधे घेताय? उगीच तिला टेंशन येईल.

" तुझ्या माहेरी सांगते तू इथे कसे भांडण लावते. " आशा ताई अजून तावातावाने बोलत होत्या.

" मी अस केल नाही आई. हे स्वतः हून बोलतात."

" तो दिवसभर घरी नसतो. तू सांगितल्या शिवाय त्याला कस समजेल. फोन लाव. "

" अस करु नका ना आई. यापुढे अस होणार नाही. " श्रुती म्हणाली.

दिवसभर श्रुती घाबरलेली होती. रात्री रितेश आला. ती रूम मधे होती.

" काय झालं? चेहरा का असा केलास? आज किती एप्लीकेशन केले?" त्याने विचारलं.

ती काही म्हणाली नाही.

" आज एकही एप्लीकेशन केल नाही ना? तुला जॉब हवा की नको ते सांग श्रुती? जावू दे मी उगीच एका बाजूने तुला बोलतोय. लग्ना नंतर तू रीलॅक्स झाली आहेस." रितेश म्हणाला.

श्रुती रडत होती.

" काय झालं श्रुती? " तो घाबरला. तिला जवळ घेतलं. ती अजूनही रडत होती.

"डोळे पूस. सॉरी. अग मला वाटत तुला जॉब मिळाला की तुझी घरकामातून सुटका होईल. जरा मोकळीक मिळेल. ठीक आहे तुला हवं तस कर. आरामात रहा. रडू नकोस. "

" अहो मला अजिबात वेळ मिळत नाही. मला या घरात आवडत नाही. मला सगळे त्रास देतात."

" काय झालं?"

"तुम्ही आई आणि मीनुला काही म्हणू नका ना. मी तुम्हाला काही सांगते का?" ती म्हणाली.

" त्या काही म्हणाल्या का? "

"हो मला खूप रागावलं. आईकडे फोन करणार होत्या. "

" अरे पण त्या कश्या वागतात. "

" जावू द्या ना. "

" हे बघ श्रुती तू स्टँड घ्यायला हवा. असं घाबरू नकोस. " रितेश म्हणाला.

"हो मी विचार करते आहे. आधी वाटायच हे माझे लोक आहेत मला त्यांच करायला हवं. पण आता समजल मी परकी. त्यांना मी घरकामासाठी हवी आहे. "

" मागे आई आजारी होती तू किती केलं. तुझी किती खूप धावपळ झाली. " रितेशला आठवलं.

" हो ना. डॉक्टरकडे नेण्यापासून घरी ही किती केलं होतं. "

" तिने काय केल? कोणी भेटायला आलं की त्यांना तुझ्या बद्दल सांगत होत्या. " रितेशने स्वतः ऐकलं होतं.

" हो वाटलं होतं एक दिवस त्यांना समजेल."

" तो दिवस कधी येणार नाही. तू तुझ बघ ना. तु ही श्रुती कधी हुशार होशील समजत नाही. एवढ साध नसावं. " रितेश आवरत होता.

श्रुती विचार करत होती. तिच्या मनात भीती बसली होती. मी विरोध केला तर सासुबाई बोलतील.


0

🎭 Series Post

View all