Login

अवजड अपेक्षांचे ओझे भाग 5 अंतिम

अवजड अपेक्षांचे ओझे तिने बाजूला सारले
अवजड अपेक्षांचे ओझे भाग 5 अंतिम
तिने बाजूला सारले

©️®️शिल्पा सुतार

" आई तू मला उगीच चांगलं शिकवू नकोस. आजकाल अस वागून उपयोग नाही. मला त्या लोकांचा खूप राग येतो आहे." श्रुती चिडली होती.

"सासरे काही म्हणत नाही का?"

"त्यांच घरात लक्ष नसतं. तेच सासुबाईंच्या धाकात आहेत."

तिला खूप वीकनेस होता. ते डॉक्टरांकडे जावून आले. टॉनिक दिलं. बाबा फळ घेवून आले. आईच्या हातच खावून तिला बर वाटतं होत. बाबा माया करत होते. तिला माहेरी रहावसं वाटत होतं. उगीच लग्न केलं. आधी सुखी होती. पण रितेश खूप चांगले आहेत. त्यांच्या साठी लग्न केलं ते घरी नसतात.

"रितेश अरे श्रुतीला घेवून ये किती दिवस झाले." आशाताई म्हणाल्या.

"एक आठवडा तर झाला आई. राहू दे."

" अस ती डोक्यावर बसेल जरा नवर्‍याचा धाक नाही." आशाताई म्हणाल्या.

"कश्याला हवा धाक? हे तीच ही घर आहे. बाबांनी ठेवलं का तुला धाकात? तू कायम सेपरेट राहिलीस."

रितेशचा फोन वाजत होता.

" अहो इंटरव्ह्यू साठी कॉल आला. मला घ्यायला या. " श्रुती खुश होती. जॉब मिळाला तर बर होईल.

रितेश श्रुतीला घेवून आला. तो दुसर्‍या दिवशी सकाळी आवरून आला. श्रुती नेहमी प्रमाणे डबा करत होती.

" घर कामाला मदतनीस येते आहे ती राहू दे आई. "

" आता का? श्रुती आहे ना. " आशाताई म्हणाल्या.

" अरे श्रुती आठ दिवस नव्हती तर तु बाई लावली. तुमच्या कडून होत नव्हतं. ती एकटी किती करेल. मदतनीस राहू दे. झाडू फरशी ती करेल. श्रुती इकडे ये. वेळेवर जेवण कर. इंटरव्ह्यू ला जा. मला दुपारी फोन कर. "

" कसला इंटरव्ह्यू? " आशाताई विचारत होत्या.

" श्रुती जॉब करणार आहे."

"नाही जमणार. घरचं कोण बघेल? "

" बाई लावून घ्या. आई, तिला काढलं तर बघ."

तो ऑफिसला गेला. नेहमी प्रमाणे आशाताई तिला धाक दाखवत होत्या. या वेळी श्रुती घाबरली नाही.

"आई जरा हॉल मधे जावुन बसा. सारख माझ्या रूम मधे येवू नका. मला अभ्यास आहे. बाईला काढायच तर काढा. मी आता सगळं काम करणार नाही. मीनुला सांगा." श्रुती म्हणाली.

"आईच्या घरून चांगल शिकून आली." त्या ओरडल्या.

"हे माझ्या आईने नाही. तुमच्या मुलाने शिकवलं. माझी आई सहन करायला सांगते." श्रुती म्हणाली.

ती इंटरव्ह्यूला आली. तिला जॉब मिळाला. घरी येतांना तिने रितेशला फोन केला. तो खूप खुश होता.

आता श्रुती दोन वेळेचा स्वयंपाक करत होती. थोडा आराम ही करत होती.

आशाताई फिरून आल्या. जेवताना त्या सांगत होत्या. " आम्ही पिकनिकला जातो आहोत. आपल्याकडे पुर्‍या करायच्या आहेत. शंभर तरी कराव्या लागतील."

" ठीक आहे. मीनु मदतीला येईल तर करते." श्रुती म्हणाली.

" मी का करायच?" मीनु म्हणाली.

" मग मी पण का करायचं? एवढ करून मला काय मिळणार आहे. दोन प्रेमाचे शब्द ही त्यांच्या तोंडून निघत नाही. " श्रुती म्हणाली.

सकाळी पाच वाजता किचन मध्ये आवाज येत होता. सासुबाई कणीक भिजवत होत्या.

"श्रुती अग उठ. मीनु खाली बसुन पुर्‍या लाटून दे ग." त्या आवाज देत होत्या.

थोड्या वेळाने श्रुती आली. तिने बाकीच्या पुर्‍या केल्या. नेहमीप्रमाणे मीनु आली नाही.

" वहिनी डबा नाही केला का?" मीनु आवाज देत होती.

"दिसत नाही सकाळ पासून इतक्या पुर्‍या करतोय. " आशाताई ओरडल्या.

" आई तू हे अस का ठरवून येतेस?"

"आई या उरलेले पुर्‍या तुम्ही करा. मी पोहे करते. " श्रुती म्हणाली.

पंचवीस तीस पुर्‍या करून आशाताई थकल्या. त्या पिकनिकला जावून आल्या. त्यांना समजल श्रुती आता आपण म्हणू ते ऐकत नाही. हिच्या भरोश्यावर काम अंगावर घ्यायचं नाही.

त्याच दिवशी मीनुच्या मैत्रिणी घरी आल्या. " वहिनी चहा कर." मीनु आवाज देत होती.

तिने लक्ष दिलं नाही. मी आजारी होती तेव्हा हिने माझ काही केल का?

" तू करून घे मीनु. मला ही अर्धा कप दे. यापुढे तुझे काम तू करत जा." श्रुती म्हणाली.

रितेश आला.

"श्रुती आजकाल काही ऐकत नाही." आशाताई सांगत होत्या.

"ती अशी का झाली? पूर्वी ती नीट होती ना. तुम्ही गैरफायदा घेतला. तेव्हा चांगलं वागला असता. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावू नये." रितेश म्हणाला.

श्रुतीने जॉब जॉईन केला. तीच छान रूटीन होत.

सकाळी स्वयंपाक करून जायची. आल्यावर भाजी करायची. पोळ्यांसाठी बाई येत होत्या.

मीनु क्लास हून आली.

" आई, दादा वहिनी कुठे गेले? "

"काय माहिती अजून आलेच नाही. "

" आपला स्वयंपाक? "

"बाईने पोळ्या केल्या आहेत. भाजी कर जरा."

मीनुने फ्लॉवर चिरायला आणून दिला. आशाताई टीव्ही बघत भाजी कापत होत्या.

बाजूच्या मावशी येवून बसल्या.

" अजून स्वयंपाक झाला नाही का? "

आशाताई सुने बद्दल सांगत होत्या." सगळं काम सोडून फिरते. काही करत नाही. आपलं नाणं खोटं निघालं. रितेश तिच्या कलाने घेतो. ती म्हणेल ती पूर्व दिशा. काय करता."

थोड्या वेळाने त्या गेल्या.

बाबा आशाताईंकडे बघत होते.

"आशा अस वागू नकोस. सूनबाई कामावर गेली ना. शिकलेल्या पोरी त्या. चांगल करते आहे. घरकाम करायची. स्वयंपाक जमतो. तरी तू नाव ठेवते. हे कर्म असत. इथेच ते आपल्या कडे परत येत." ते ओरडत होते.

" अहो तुम्ही ही काय मलाच बोलताय. सासुबाई मला त्रास द्यायच्या तेव्हा नाही काही म्हणाले. " आशाताई चिडल्या होत्या. त्या बाबांना बोलल्या.

"मग आईचे शेवटी किती हाल झाले. कोणी विचारत नव्हतं. तुला तस हव असेल तर वाग कशीही. श्रुती अशी आहे का. तिला सांभाळून घे." बाबा खुप बोलले.

आशाताई विचार करत होत्या.

थोड्या वेळाने श्रुती, रितेश आले. तिने कुकर लावला. भाजी केली ताट वाढले. जेवायला बासुंदी होती.

" आई, बाबा माझा पगार झाला."

" छान अशी प्रगती कर. " त्या म्हणाल्या. शांततेत जेवण झालं

" मीनु आवरू लाग. " त्यांनी आवाज दिला.

मीनु, रितेश, श्रृती आवरत होते.

श्रुती रूम मधे आली. "अहो थँक्स. तुम्ही खूप सपोर्ट करतात. मला आता जॉब करून चांगलं वाटत."

रितेश खुश होता.

अवजड अपेक्षांचे ओझे. तिने ते दूर सारले होते. ती आता तिला हवं तस जगणार होती.
0

🎭 Series Post

View all