Login

बाबागणूश

Baba Ganoush is a delicious and creamy eggplant dip that originated in the Levant region , which includes countries like Lebanon, Syria and Israel.

बाबागणूश
साहित्य
  • एक मोठे भरितासाठी वापरतो ते वांगे
  • २-३ टेबलस्पून (तिळाची पेस्ट)
  • २ लसूण पाकळ्या, बारीक चिरलेल्या
  • १ लिंबाचा रस
  • २ टेबलस्पून ऑलिव्ह तेल
  • चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर, लाल मिरची पावडर चिमूटभर
  • ऐच्छिक: जिरे , हिरवी मिरची

कृती:
वांग्याला काटे चमच्याने टोचे टोचून भरितासाठी वांगे भाजतो तसे भाजून घ्या. भाजताना सगळ्या बाजूने चांगले भाजण्यासाठी अधूनमधून फिरवत रहा. १० ते १५ मिनिटांत वांगे छान भाजले जाईल.
वांगे थंड होऊ द्या, नंतर काळपट झालेली साल काढा. आतील भाग एका बाऊलमध्ये काढा
त्यात तिळाची पेस्ट, बारीक चिरलेला लसूण, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेल किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेले तेल वापरा.

हे बॅटर आता चांगले एकजीव होईपर्यंत मिसळा,मिश्रण गुळगुळीत व्हायला हवे.
त्यात चवीनुसार मीठ आणि मिरी घाला. हवे असल्यास, जिरे पावडर घाला.

सर्व्ह करताना वरून थोडे ऑलिव्ह तेल घाला आणि ताज्या कोथिंबिरीने किंवा डाळिंबाच्या दाण्यांनी सजवा. ब्रेड किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.

बाबा गनूश हा एक वांग्याचा स्वादिष्ट क्रिमी डिप आहे जो लेव्हंट प्रदेशातून आल आहे , ज्यामध्ये लेबनॉन, सिरिया आणि इस्रायल सारख्या देशांचा समावेश आहे. "बाबा गनूश" या नावाचा अरबी भाषेत अर्थ "लाडका बाबा" असा होतो.
असा हा बाबागणूश, वांग्याचे भरीत नेहमीच बनवता आता बाबागणूश नक्की बनवून पहा.

फोटोत बाबागणूश दिसत आहे तो आज,आत्ता बनवला आहे . हा पदार्थ माझी मोठी मुलगी शरयूने मला शिकवला आहे.
त्यात घातलेल्या तिळाची पेस्ट, काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस यामुळे पदार्थाला वेगळी चव येते.

आमचा ईरा लेखकांचा रायगड, रत्नागिरी हा ग्रुप आहे, त्यावर मी अधूनमधून बनवलेल्या पदार्थांचे फोटो टाकत असते, तिथे एकदा मी बाबागणूशचा फोटो टाकून पदार्थ ओळखायला सांगितला होता. कोणाला ओळखता न आल्यामुळे मी त्याचे नाव, रेसिपी सांगितली तेव्हा पासून आमच्या ग्रुपवर या पदार्थाची चर्चा होते.
ग्रुपवरची लेखिका मैत्रीण कामिनी खाने मला बोलली, " ताई तुमची एखादी हटके रेसिपी स्पर्धेसाठी लिहा". म्हणून आज हा पदार्थ बनवला आणि रेसिपी ही लिहून झाली.

तर नक्की करून बघा 'बाबागणूश' आणि घरात सर्वांना सांगा मी आज 'बाबागणूश' बनवला आहे.

टीप
ऑलिव्ह ऑईल ऐवजी घरात उपलब्ध असलेले कोणतेही खाद्य तेल वापरू शकता.
हिरवी मिरची ऐवजी चिली फ्लेक्स, लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल.
हळद घालू नका, कारण काही पदार्थांना त्यांचा मूळ रंग चांगला दिसतो.
©® सौ. सुप्रिया जाधव
११/१०/२४