Login

बाबांची दुसरी बाजू (भाग १)

वडिलांची बाजू मुलांना कधीतरी कळेल का?
जलद लेखन स्पर्धा
विषय : दुसरी बाजू


आई मला शंभर रुपये दे, मला कॉलेजला जायला उशीर होतोय.रजतने शंभर रुपये मागितलेले पाहून त्याचे बाबा म्हणतात,शंभर रुपये कशासाठी? तुझं कॉलेज तर जवळच आहे. कॉलेजला जाऊन येण्यासाठी चाळीस रुपये लागतात आणि तुला काही खायचं असेल तर वीस रुपये  त्याला फक्त साठ रुपये दे, वरचे चाळीस रुपये देऊ नकोस.”
“अहो बाबा, आज शेवटचा पेपर आहे. मी मित्रांसोबत जरा पार्टीला जाणार आहे.”
बाबा म्हणतात, “पार्ट्या नंतर करा. आधी जरा अभ्यासाकडे लक्ष द्या. एकदा का तू चांगल्या मार्कांनी पास झालास की लगेच तुला नोकरी शोधावी लागेल. त्यामुळे पार्टी राहू दे, चांगला अभ्यास कर आणि चांगल्या मार्कांनी पास हो. आणि तू त्याला फक्त साठच रुपये दे, वरचे पैसे अजिबात द्यायचे नाहीत.”
बाबांचे शब्द ऐकून सारिका रजतला साठ रुपये देते.त्याचवेळी रजत हळू आवाजात आईला बोलतो, “आई, मला शंभर रुपये हवेत. आम्ही आज कॅन्टीनमध्ये जाणार आहोत.”
आई त्याला हळूच दुसऱ्या हातातून शंभरची नोट काढून देते.आणि रजतला हळू आवाजात बोलते, “हे घे शंभर रुपये, बाबांना सांगू नको. आता पटकन कॉलेजला जा.”

रजत कॉलेजला गेल्यानंतर आई त्याच्या बाबांना बोलते, “काय हो तुम्ही प्रत्येक गोष्टीला त्याला नकार देता. अशाने त्याच्यासमोर तुमची वाईट प्रतिमा तयार होईल आणि तो तुमच्यापासून दूर जाईल.”

त्यावर रजतचे बाबा खूप छान उत्तर देतात, “अगं....सारिका आईचं काम असतं, प्रेम करण्याचं. तसंच बाबांचं काम असतं आपल्या मुलाला आधार देण्याचं. गरज पडेल त्यावेळी मी नक्कीच त्याला आधार देईन, पण नको ते लाड मी कधीच  करणार नाही.”
सारिका म्हणते, हो पण... तुमचं त्याच्यावर खरच प्रेम आहे हे त्याला कळायला नको का?  तुम्ही सतत त्याच्याशी कठोरपणेच वागता.

त्यावर रजतचे बाबा बोलतात 'अगं सारिका प्रेम तर सगळेच करतात गं आपल्या मुलांवर' पण आपल्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये कणखर बनवणं हे आपल्याच हातात असतं. "कधी ना कधी रजतला माझी दुसरी बाजू नक्कीच कळेल" .त्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे वागण्याची काहीच गरज नाही.


इकडे रजत १६० रुपये घेऊन कॉलेजला जातो. तो आज खूप खुश असतो.“मला खरं तर शंभर रुपये हवे होते, पण आईने मला १६० रुपये दिले,” या विचाराने त्याला खूप आनंद झालेला असतो. “खरंच, माझी आई माझा किती लाड करते,” असे तो स्वतःशीच बोलत असतो.
रजत कॉलेजमध्ये गेल्यानंतर सर्व लेक्चर संपल्यानंतर मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये जातो.मित्रांसोबत छान पार्टी एन्जॉय करतो. त्यावेळी तो मित्रांना बोलतो, “खरंच, माझी आई आहे ना, ती मला खूप आवडते. कारण माझी आई माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करते , पण माझे बाबा...”

त्यावर सचिन बोलतो, “बाबांचं काय...?”