Login

डोहाळे पुरवा

डोहाळे पुरवा
आपल्या कुटुंबात नव्या छोटया सद्स्याच आगमन होणार आहे. तर साहजिक आपल्या संस्कृती प्रमाणे आपण डोहाळे जेवण नावाचा विधी करतो. तर अशा वेळीं त्या होणाऱ्या आईचे सगळे लाड पुरवले जातात. तिच्या बाळासाठी मोठ्यांचे आशीर्वाद देतात.. अशा वेळीं होणारा कार्यक्रम सगळ्यांना एन्जॉय करण्यासाठी आपण सगळ्यांच्या एन्जॉय मेंट साठी काहितरी गेम खेळु शकतो. तर अशा कार्यक्रमाची आखणी करताना कोणत्या गोष्टी विचारात घेऊ शकतो. या बद्दल काही आयडिया तुम्हाला सुचवत आहे.

कार्यक्रम घरी किंवा हॉल मध्ये करू शकतो. जेवणाचा मेनू आपल्या आवडी प्रमाणे करतो. तर अशा वेळीं कार्यक्रम सगळ्यांना एन्जॉय करता येईल या साठी काही तरी नवीन आयडिया.

१) आपण एक सेल्फी पॉइंट बनवू शकतो. ज्यात फुलांची सजावट करु शकतो. पाठीमागे कार्टून कॅरॅक्टर चे फोटो ठेवू शकतो. काही सॉफ्ट टॉईज पण ठेवू शकतो.

२) होणाऱ्या आईला आवडणारे पदार्थ एका मोठ्या बास्केट मधे ठेवून सजवू शकतो.

३) मुलांच्या आवडीची खेळणी ठेवू शकता.

४) एक मोठा कोरा पेपर एका भिंतीवर चिटकवा. स्टिक नोट्स ठेवा. पेन स्टॅण्ड ठेवा. त्यात रंगी बेरंगी स्केच पेन ठेवा. मोठ्या पेपरला नाव दया.
' होणाऱ्या बाळासाठी तुम्ही नाव सुचवा.'
कार्यक्रमाला येणारे पाहुणे बाळासाठी नाव सुचवू शकतील. लाडाच नावं पण सुचवू शकतात.
त्या नावाचा अर्थ लिहिण्याची विनंती करू शकता.

५) मुलगा होणार की मुलगी होणार या साठी पारंपरिक पद्धतीने गोड पदार्थ ठेवले जातात. पेढा की बर्फी असे.

यात तुम्ही लहान बाळाचे ब्लु आणि पिंक रंगाचे कपडे ठेवू शकता. खेळणी ठेवू शकता. तुम्ही तुमची इमॅजिनेशन वापरू शकता.

६) लहान मोठयांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्या साठी गेम ठेवू शकता.

जसे की प्रश्र्न उत्तराचा राऊंड घेऊ शकता. ज्यात तुम्ही साधे सोपे प्रश्न विचारू शकता.

( प्रश्न उत्तर तुमच्या सोयी साठी सुचवत आहे.)

१) बाळाला जन्म झाल्यावर कोणती वॅक्सिन देतात. त्यांची नावं सुचवा.

२) बाळाच्या गुटी मध्ये कोणते घटक असतात ?

३) बाळासाठी वापरण्यात येणारे कपडे कोणते ? नावं सांगा.

४) बाळासाठी पारंपरिक दागिने कोणते आहेत ?

५) बाळासाठी अंगाई गीते सांगा.

६) लहान मुलांची बडबड गीते सांगा. मराठी इंग्लिश भाषेतील नावं सांगा.

७) लहान मुलांच्या साठी गोष्टिंची नावं सांगा.

८) लहान मुलांच्या साठी यु टुब चॅनलची नावं सांगा.

९) लहान मुलांच्या साठी असणारे कार्टून कॅरॅक्टर ची नावं सांगा.

१०) बाळासाठी वापरण्यात येणारे बेबी प्रॉडक्ट च्या कंपनीची नावं सांगा. पाच प्रॉडक्ट ची नाव सांगा.

असे प्रश्न विचारले जाऊ शकतात.

७) असे प्रश्र्न तुम्ही येणाऱ्या पाहुण्या साठी पण करू शकतात.

१) ( होणाऱ्या बाबाचे नाव)च्या बायकोच्या आईच्या भावाच्या बायकोचे बाळाशी नाते काय ?
उत्तर - मामी

२) ( होणाऱ्या आईचे नाव)च्या सासू बाईंच्या आईच्या भाचीचे बाळाशी नाते.
उत्तर - मावस आजी

३) ( होणाऱ्या बाबाचे नाव) च्या वडिलांच्या व्याहांचे जावई बाळाचे कोण ?
उत्तर - बाबा / काका

४) बाळाच्या पंजोबांच्या भावाच्या सुनेच्या नातवाच्या बायकोचे बाळाशी नाते ?
उत्तर - बायको किंवा वहिनी

५) (होणाऱ्या आई आणि बाबा चे नाव घेऊन )
त्यांच्या आईचे बाळाशी नाते ?
त्यांच्या वडिलांचे बाळाशी नाते ?
उत्तर - आजी आजोबा

८) या सगळ्या गेम खेळणाऱ्यांसाठी गिफ्ट ठेवु शकता. मग ते एखादं चॉकलेट देखील चालेल.
असे काही तरी डोक्याला ताण देणारे प्रश्न विचारू शकता.

©® वेदा

आवडल्यास नक्की सांगा.

आता यात अजुन काय गेम खेळू शकतो . तुमच्या सजेशनची मी वाट बघत आहे.