बचतीचं महत्त्व : भाग १

कमवत नसलेल्या पण पैशाचे महत्व जाणलेल्या आईची गोष्ट!
विषय : ती नाही कमवत.. पण..

    रोहन घरात आला आणि त्याची ऑफिस बॅग त्याने सोफ्यावर फेकली.

"रोहन हे कायं अरे? बॅग व्यवस्थित ठेवता येत नाही का तुला?", अनिताने बॅग उचलतं विचारले.

"हे बघं मला लेक्चर नकोय आत्ता या वेळी.", रोहन ओरडला.

"हे बघं मलाही तुला बोलायची किंवा लेक्चर द्यायची अजिबात हौस नसते पण तु वागतोस तसे त्याला मी कायं करणार? एवढं नको वाटतं लेक्चर ऐकायला तर मगं आपापल्या वस्तू जागेवर ठेवायच्या.", अनिताने सल्ला दिला.

"हे बघं अनिता डोकं फिरवू नकोस माझं मी ऑलरेडी टेन्शनमध्ये आहे", रोहनने त्याच्या बायकोला शांत रहायचा सांगितले.

" अच्छा मी डोकं फिरवते का? हे बघं मी सुद्धा ऑफिसमध्ये काम करते मलाही खूप टेन्शन असतात पण त्याचा राग मी कधीही तुझ्यावर नाही काढतं लक्षात ठेवं", अनिताने टोमणा मारला.

" बरं बाई माझं चुकलं. आता मला जरावेळ शांत बसू देशील", रोहनने अनितासमोर हात जोडले तशी अनिता फणकारतं बेडरूममध्ये निघून गेली.

त्या दोघांचा आवाज ऐकून माला ताई मगाशीचं बाहेर आल्या होत्या त्यांच्या रूममधून पण दोघांची वैयक्तिक गोष्ट आहे म्हणून त्या मध्ये पडल्या नाहीत. त्यांनी रोहनकडे पाहिले तो डोक्याला हात लावून सोफ्यावर बसला होता.

माला ताईंनी किचनमधून पाण्याचा ग्लास घेतला आणि रोहनच्या पुढ्यात धरला.

"तुला सांगितलं ना मला शांत राहू दे", असे म्हणतं रोहनने पाण्याचा ग्लास जमिनीवर फेकला आणि वर पाहिले तेव्हा समोर आईला पाहून जरा वरमला तो.

"आई सॉरी मला वाटलंss"

"असू दे फार काही नाही. तुला चहा वगैरे आणून देऊ का?", पाण्याचा ग्लास उचलतं माला ताईंनी विचारले.

"नाही नको"

"रोहन सगळे ठीक आहे ना? नाही म्हणजे काही टेन्शन नाही ना?", रोहनच्या डोक्यावरुन हात फिरवतं माला ताईंनी विचारले.

"आई काही नाही हे", रोहनने आईचा हात बाजूला केला.

" रोहन आई आहे मी तुझी मला कळतं रे.", माला ताईं त्याच्याकडे पाहून बोलल्या.

"आई ते सगळे ठीक आहे पण तु जा आतमध्ये. आहे मला थोडे टेन्शन पण तुला नाही कळणार"

"अरे रोहन सांगितल्याशिवाय मला थोडीच कळेल तु सांगून तर बघं ", माला ताईंनी पुन्हा विचारले.

"आई अगं तु आयुष्यभरात कधी घराच्या बाहेर पडली नाहीस तुला कायं कळणारं ऑफिस आणि इतर टेन्शन ", रोहन वैतागून बोलला.


क्रमशः


🎭 Series Post

View all