बचतीचं महत्त्व : भाग २

कमवत नसलेल्या पण पैशाचे महत्व जाणलेल्या आईची गोष्ट!
विषय : ती नाही कमवत... पण..

रोहनचे बोलणे माला ताईंच्या जिव्हारी लागले. त्या फार काही न बोलता पाणी पुसून त्यांच्या रूममध्ये गेल्या.

संध्याकाळी जेवताना रोहन शांत होता आणि अनिता ही. माला ताई ही काहीही न बोलता जेवायला लागल्या. जेवणं उरकले तसे मालाताईंनी बाकीचे आवरले नेहमीप्रमाणे. इतक्यात रोहनला एक फोन आला आणि तो फोन संपला तसे रोहनने रागांंत फोन फेकून दिला.

फोन जमिनीवर पडला तसे त्याचे दोन तुकडे झाले. मालाताईंनी देखील त्या आवाजाने किचनमधून बाहेर येतं दरवाज्यात येऊन उभ्या राहिल्या.

"रोहन आर यू आऊट ऑफ युअर माईंड? कायं झालयं तुला?", अनिता रोहनवर ओरडली.

"येस माझं डोकं ठिकाणावर नाही आहे"

"अरे पण कायं झालं एवढं?", अनिताने विचारले.

"अनिता मागच्या महिन्यात आपण आपल्या जवळ असलेले पैसे शेअर मध्ये गुंतवले होते आणि त्याचं पैशाच्या भरवशावर आपण नवीन कार आणि फर्निचर घेतले होते. "

" हो रोहन मला माहित आहे."

"अनिता आपण ज्या शेअरवर पैसे गुंतवले होते तो शेअर खाली गेला आपले सगळे पैसे बुडाले.", रोहन हताश होऊन बोलला.

" कायं? "

" हो अनिता हे खरं आहे. "

" अरे पण रोहन असं कसं होऊ शकतं? हा शेअर खाली येणार नाही असे सांगितले होते ना", अनिता रोहनला विचारते.

" हो ना अनिता म्हणून तर आपण पैसे गुंतवले यावर पण आज तो शेअर खाली गेला. आपण आपल्या सगळ्या सेव्हिंगचे पैसे गुंतवले ते सगळे बुडाले आता कायं करायचं आपण? ", रोहन डोक्याला हात लावतं सोफ्यावर बसला.

" ओह्ह माय गॉड रोहन आपण मध्ये आपली बँकेत असलेली एफडी सुद्धा मोडली होती आणि आता आपल्या जवळ काहीच सेव्हिंग नाहीत. आपल्या दोघांचा पगार तर या फ्लॅटचे इएमाय आणि मेन्टेनन्स मध्ये अर्धा जातो उरलेले पैसे महिनाअखेरीपर्यंत संपतात. कसं मॅनेज होणार आता?", अनिता त्याच्या शेजारी बसतं बोलली.

" हो मलाही तेचं टेन्शन आहे अनिता अगं पुढच्या महिन्यापासून आपले फर्निचर आणि कारचे हफ्ते सुद्धा सुरू होतील कुठून भरायचे पैसे आपण? आपले अगोदरचं एक लोन आहे तर आपल्याला लोन ही काढता येणार नाही ", रोहनने चिंता व्यक्त केली.

"रोहन तुझं प्रमोशनच कायं झालं?", अनिताने विचारले.

क्रमशः


🎭 Series Post

View all