बचतीचं महत्त्व : भाग ३ (अंतिम भाग)

कमवत नसलेल्या पण पैशाचे महत्व जाणलेल्या आईची गोष्ट!
विषय : ती नाही कमवत.. पण..

"हे बघं अनिता अजून प्रमोशनचे काही फिक्स नाही.", रोहनने तिला स्पष्टपणे सांगितले.

"रोहन आता रे कायं करायचे? नाही म्हणजे मी ताईकडे मागितले असते पण तीचा परवा हॉस्पिटलवर एवढा खर्च झाला आहे तर तिला कसे मागू? ए रोहन आपण पैसे दिले नाही तर ते लोक येऊन फर्निचर आणि कार घेऊन जातील का? ", अनिताने तिच्या मनातील भिती बोलून दाखवली.

"हो आपण पैसे भरले नाही तर ते लोक घेऊन जातील कार वगैरे किंवा मगं आपल्या दोघांवर कारवाई ही होऊ शकते. ", रोहनने सांगितले.

" नो रोहन असे नाही व्हायला पाहिजे, अरे या सोसायटीत आपण आत्ता तर रहायला आलो आहोत आपली इमेज किती खराब होईल?", अनिता बोलली तसा रोहनने एक जळजळीत कटाक्ष दिला तिच्याकडे पाहून.

" अनिता हा विचार तु फर्निचर आणि कार घ्यायच्या अगोदर करायला हवा होता. तरी तुला म्हणतं होतो मी की आपण फ्लॅटचे ईएमआय संपले की कार, फर्निचर घेऊया पण तुला स्टेटस महत्त्वाचं होतं ना. तुला शेअर मध्ये पैसे गुंतवताना ही मी म्हटलं होतं की नको म्हणून पण तुझा तुझ्या मैत्रीणीवर फार विश्वास बघितले ना तिचे ऐकून आज आपल्यावर ही कायं वेळ आली आहे?

आता तुझी मैत्रीण देणार आहे का पैसे? ", रोहन अनितावर चांगलाच भडकला तशी अनिता रडायला लागली.

माला ताई इतकावेळ गप्प उभ्या होत्या. त्या आता बाहेर हॉलमध्ये आल्या.

" रोहन अनितावर ओरडू नको आणि अनिता तु ही शांत रहा जरा ", त्याने दोघांनाही सल्ला दिला.

" तुम्हाला शांत रहा म्हणायला कायं जातयं? ", अनिता जरा तिरकसपणे बोलली.

"हे बघ अनिता पैशाच टेन्शन नको घेऊ."

"आई तुम्ही कधी घराबाहेर जाऊन पैसे तरी कमावले आहेत का हो? तुम्हाला कायं कळणारं पैशांच महत्त्व? ", अनिताचे बोलणे ऐकून माला ताई त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि त्यांनी काही पासबुकं आणून रोहन समोर ठेवली.

रोहनने ती पासबुकं उघडून पाहिली आणि त्याचे डोळे विस्फारले.
" आई एवढे पैसे तुझ्याकडे कसे? "

" रोहन मी तुमच्या इतकी शिकलेली नाही पण मला तरीही दुनियादारी, जगणे कळते आणि पैसा हातातला मळ असतो तो जपून वापरावा, जेवढे अंथरून तेवढेच पाय पसरावे हे सुद्धा कळतं. आमच्या संसारातून मी जमा केलेली ही बचत आहे.

तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुमचे कार आणि इतर हफ्ते भरा यामधून ", एवढे बोलून मालाताई त्यांच्या रूममध्ये गेल्या.

रोहन आणि अनिता मात्र खजील झाले त्यांना अपराधी वाटू लागले कारण आज न कमवून सुद्धा मालाताई त्यांच्यापेक्षा खूप श्रीमंत त्यांची सेव्हिंग अनिता आणि रोहनपेक्षा जास्त होती. त्यांनी वेळीच बचतीचे आणि पैशाचे महत्त्व ओळखले होते.

                   **समाप्त **


कोणालाही कमी समजू नये कधीचं कारण पैसे कमावण्यापेक्षा पैशांचे महत्त्व ज्याला कळते त्याला जगताना कुठलीही अडचण येत नाही.


🎭 Series Post

View all