बाईला सोडणं जमतचं नाही....!

बाईपणाचे पैलू...
रूतलेल्या मुळागत बाईच असत जीवन,
सहज सोडणं जमतच नाही तीला ,...
कायमचं असच गुंतागुंतीच मरणं.....
भावनांचा कायमचं असतो मनात सारा पसारा...
सोडणं जमतचं नाही हो....
कारण ...
बाईपणाचं लेबल लाभलयं तीला....

किती तो जीव आटकलेला असतो बाईचा ...
सकाळचा चहा असो कि जेवणाचा घास असो...
सहजच तीचं तीला जगताच येत नाही....
एका कपातला अर्धा चहा वाटल्याशिवाय ती रहातच नाही..
घरात असते तेव्हा भिरभिरणार मन,सतत ,मुल व नवर्यामागे भरकटत असतं...शरीराने ती असते पण मन माञ सैरवैर पळत असतं...

गुंता हा कायमचं असतो तीच्या मनात भावनांचा ...
तीला सहजचं सोडता येणं अशक्यच बरं....
पेपरची रद्दी असो कि असो कोणतीही रिकामी वस्तु छान घडी घालून कामी येईल हं...!
म्हणतं छान साभाळून ठेवण हे तीचं काम...
मग ह्या सांभाळलेल्या गोष्टींचा नंतर ठिग झाला तरी तीच निस्तारायला तयार हं...!

नात्यातही कायमचं गुंतत जाणं,ही तीची जुनी खोड...
दोन घरांमध्ये समन्वय साधण सोंप असतं का?हो...
मुळीच नाही.....
बालपणापासून ज्या संस्कारात वाढलीय ते संस्कार घेऊन नविन उंबर्यावर नव्या संस्कारांची संग करतांना ....नाही सोडवत तीला तो स्वाभाव,तीचा भाव,...पण,इकडेही गुंतावच लागत ना?तीला...
तेव्हा मृगजळासारखं तीचही होत ,न सोडवत पुर्वीचं सार ,
पण भावनांना आवर घालत पुन्हा अडकते नव्या ह्या वळणावर...

खुपदा ,ती ठरवतेही मुक्त व्हावं,सोडावं सार पण पुन्हा वळून मन रमतचं त्याच वाटेवर .....
राग,रूसवा सारंच तीचा हक्काचा असला ना?तरीही नसतो तीतका तीचा हक्क त्यावर ,त्याला मुरडा देत पुन्हा त्याच वाटेवर ,संसाराची चुकलेली गणित मांडत गुंतेच ती पुन्हा ...
आपल्या काळजात बरचं काही थीजवून...

संसाराच्या गणितात तीच्याइतकं पक्क कुणी नसतं हं....!

नात्यातला गुणाकार असो की भागाकार...किंवा असो वजाबाकी...उत्तर बरोबर येण्याची हतोटी ते कसब तो हातोटीने जमवते....

संसारामध्ये कोणतही गणित बिघडणार नाही ह्याची काळजी घ्यावी ती बाईनेच...एक हच्यासारखं जीवन असत बाईपणाचं...दिसण नसल तरी अस्तित्व जाणवणार...

हलक्या कानाची, कधी हलक्या मेंदूची,भंगार कितीतरी उपाधींच्या साच्यात ढाळलेली असली तरी चौफेर बुध्दीमत्ता ही फक्त आणि फक्त बाईलाच बरं का?...

"अगं काय?कशातही जीव गुंतवते...सोड ना?".

म्हणतांना सहजच बोललतो हो...पण कधीतरी हेच जपलेल मन असो किंवा जपलेल बिनकामाच सामान असो ...अशी काही जादू करून जात की त्यावेळी ...मग तीला दाद दिल्याशिवाय रहावत नाही हं...!

"क्या बात हैं,..तु आहेस भारी यार,...."

"हे ना,तुच करू शकत होती हं....!"....

"मला माहित होत गं...!,तुझ्याकडे असेलचं ह्याच सोलूशन...".

बरोबर ना?..
कारण ती जपुन ठेवते ,आठवणी,संसार,माणसे ,वस्तु व तुम्हाला सुध्दा...हळवी असते ती ,घाबरते कायमचं कोणालाही गमवायला ,हवहवस असत तीला तीचं सारं जगं...अटकलेला असतो तीचा काडीकाडीत जीव ,म्हणुन तर खराट्याची काडी जरी निखळली ना पटकन उचलून ती त्या पुंजक्यात ओवते...जाऊ दे सोड म्हणुन सोडून नाही देत..चमचाभर साखर जमिनीवर सांडल्यावर एक एक दाणा उचलून ती पुन्हा भरते...तीळ तीळ करूण संसाराची भली मोठी इमारत उभी करते...हीच तर बाईपणाची ताकद...

बाईने जपलयं म्हणुन तर सारचं कसं जपलं जात,
कचर्यातूनही कुंतल्याच नक्षीदार घर होतं....

नात्यांमधला दुरावा ,हलकेच ती घालवते...
जोडण्याचा ध्यास ती कायमचं सोबत घेऊन वावरते...

तुटलेल असो कि उसवलेल धागा धागा ती जोडते...
परिवाराचे मोती ती एका माळेत ओवून ठेवते.....

माझा संसार हेच कायम तीच्या मनाच ध्येय असतं,
बाईला सोडणं जमतच नाही हो...!,मन सगळ्यात कायमचं गुंतले असतं...


गुंतलेल्या तीच्या मनाला समजून घ्यावं,..कचरा नसतोच कोणताही थोडं वेळेवर जाणुन घ्यावं...,सुई दोर्याची किंमत तीच जाणते ...टाक्यांची लांबी रूंदी तीलाच हो ठाऊक असते....जपा तीला व सोबत तीच्या गुंतलेल्या मनाला...

कारण ,कोणत्याही गोष्टी सोडणं जमतच नाही बाईच्या मनाला....

©®वैशाली देवरे...