बाईपण भारी देवा..
"काय ग तू श्रावणीच्या शेजारी राहते ना? मी पाहिले आहे तुला दोन-तीन वेळा तिच्यासोबत मुलांना सोडवायला जाताना" लक्ष्मी काकूंनी रेखाला गार्डनमध्ये चालताना थांबवत विचारले.
"हो काकू मी रेखा, तिच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहते".रेखाने उत्तर दिले.
त्यावर काकूंनी रेखाला सांगितले "मी इथे समोरच्या बिल्डिंगमध्ये ३०१ मध्ये राहते.मी रोज संध्याकाळी वॉकला येते पण तुला ह्या दोन तीन दिवसांपासूनच पाहते आहे. त्याआधी तू मला खाली गार्डनमध्ये ह्या वेळी दिसली नाही.
पुढे त्या दोघीहि गार्डन मधील बाकड्यावर बसून बोलू लागतात.
"आहो काकू काय सांगू तुम्हाला आता?...हे पाहताय ना तुम्ही माझे वजन वाढले आहे.रोजची पाठदुखी आणि पाय पण खूप दुखतात त्यावर डॉक्टरांनी नियमितपणे चाळीस मिनिटे तरी वॉक करायला सांगितले आहे.त्यामुळे आता मागच्या आठवड्यापासून वॉक सुरू केला आहे".रेखा त्यांना सांगू लागली.
"बरं केलंस प्रत्येकीने स्वतःची काळजी ही घ्यायलाच हवी.घरातील स्त्री सदृढ तर संपूर्ण कुटुंबाची ती व्यवस्थित काळजी घेऊ शकते".काकू आपुलकीने तिला बोलत होत्या.
चालत चालत एकमेकींची विचारपूस करत दोघी चालू लागल्या."माझ्या घरी मी आणि माझे आहो आम्ही दोघेच असतो.दोन मुले आहेत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.छान नोकरी आहे आणि लग्न देखील झाले.मला दोन गोड नातवंडे पण आहेत.एक मुलगा त्याच्या कुटुंबासहित मुंबईला असतो तर लहान मुलगा यू.एसला असतो.आम्ही दोघे आमची रिटायरमेंटचे आयुष्य छान जगतो".काकू रेखाला सांगत होत्या.
"अच्छा, किती छान!आमच्या घरी मी माझे आहो.एक मुलगी आणि मुलगा,सासूबाई आणि सासरे असे सहाजण राहतो"."दिवस माझा पहाटे सगळ्यांच्या आधी सुरू होतो ते कामात मी व्यस्त होते आणि सगळे झोपून जातात तरी माझे आपले काम संपत नाही".कामाने कंटाळलेली रेखा काकूंना सांगत होती.
"एवढ्या सगळ्यांचे सगळे करायचे म्हणजे असे चालायचेच.पण हो स्वतःची तब्येत सांभाळून सगळे करत जा एवढेच मी म्हणेल".काकूंनी तिला समजावले.
तेवढ्यात रेखाची मुलगी प्रिया, आई...आई चल ना घरी जावूया म्हणून तिला आवाज देते.तोच ती चला काकू येते म्हणून काकूंचा निरोप घेते.
आता रोज संध्याकाळी लक्ष्मी काकू आणि रेखा भेटत असतात.त्यांचे एकमेकींशी चांगलेच पटू लागते."काकू तुमच्याकडे पाहून खूप छान वाटते.तुम्ही किती छान एकदम टापटीप राहता आणि कायम हसतमुख असता.प्रत्येक स्त्रीचं आयुष्य असेच समाधानी आणि सुखाचे असावे".रेखा तिच्या मनातील गोष्ट काकूंना बोलून दाखविते.
"नाहीतर मी पाहा चाळीशी गाठली आणि मागे वळून पाहते तर दिसतात त्या मी केलेले बदल,समायोजन.माहेरी लाडात वाढलेली मी लग्नानंतर एकत्र कुटुंबात फक्त सगळ्यांची मने जपत राहिले आणि स्वतःच्या आवडी निवडी विसरूनच गेले.मुले झाली तसे संपूर्ण विश्व माझे त्यांच्याभोवती फिरत असते.घरीच असल्याने बरेचदा गबाळ्या कपड्यात आणि अवतारातच असते.घरच्यांच्या माझ्याकडून अपेक्षा ह्या तर अगदी न संपणाऱ्या आहेत.सगळ्या जबाबदाऱ्या,ताण,व्यायामाचा अभाव त्यात वजन इतके वाढले आहे की स्वतःच्या फिटनेस कडे लक्षच दिले नाही.आता एक एक दुखणे मागे लागले तेव्हा ठरविले सगळ्यांचे करत आहे ठीक आहे पण स्वतः कडेही लक्ष दिलेच पाहिजे".रेखा आज मनातील साचलेले बोलत होती.
"बरे केलेस की आता फिटनेसकडे लक्ष देत आहेस"."मी एक सांगू का?आपण सगळ्या स्त्रिया म्हणजे प्रत्येक स्त्रीचे आयुष्य म्हणजे एक संघर्ष असतोच,सुख आणि दुःख चढउतार असतात. एक स्त्री मुलगी,पत्नी,आई,मामी,मावशी,आत्या,आजी,सासू,सून हे सगळे टप्पे आणि सोबत वाढत जाणाऱ्या जबाबदाऱ्या पेलत आयुष्य जगत असते.सोपे नसते हो हे बाईपण आणि आईपण दोन्हीही.मलाही हे सगळे काही चुकले नाही.पण ह्या सगळ्यातून महत्वाचे हे असते की, आपण कसे घडत जातो कसे सकारात्मक बदल आपल्यामध्ये करत आयुष्याची एक एक पायरी चढत प्रगती करतो".काकू रेखाला समजावत बोलतात.

काकुंचे हे अनुभवाचे बोल रेखाला मनापासून पटतात. तिला मनात प्रश्न पडतो की ह्या काकूंनी असे काय दुःख जीवनात अनुभवले असेल? त्या तर नेहमी खुश समाधानी असतात.त्यांची मुले देखील सेटल आहेत.त्यांना तर गोड नातवंडे देखील आहेत.हे दोघे त्यांना हवे तसे मनाप्रमाणे मस्त आयुष्य जगत आहेत.ना कुणाचे एक ना दोन.
कसे आहे लक्ष्मी काकुंचे आयुष्य?काय असतील त्यांचे अनुभव आणि कसा असेल त्यांचा जीवनप्रवास?
चला तर मग ह्यांचा बाईपणाचा भारी प्रवास पाहूया पुढच्या भागात..

क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा