भाग ५
ठरल्याप्रमाणे सगळ्याजणी ट्रिपची तयारी अगदी जोशात करतात.शेवटी,तो दिवस उजाडतो जेव्हा ह्या चौघीही खूप उत्सुक असलेल्या ट्रीपकरिता आपापल्या घराबाहेर पडतात.
पंखात बळ भरुनी,घेऊ आज उंच भरारी
करूया आज मैत्रिणींसंगे आनंदाची वारी
रोजचे तेच-तेचपण आज बाजूला सारुया
आज मिळूनि साऱ्या मोकळा श्वास घेऊया...
करूया आज मैत्रिणींसंगे आनंदाची वारी
रोजचे तेच-तेचपण आज बाजूला सारुया
आज मिळूनि साऱ्या मोकळा श्वास घेऊया...
हाच विचार मनात घेऊन त्या प्रवासाला कॅबमध्ये बसून सुरुवात करतात.मस्त गप्पा मारत आणि आवडीची गाणी ऐकत त्यांचा प्रवास पार पडतो.रिसॉर्टला पोहोचल्यावर त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात येते.त्यांना त्यांची तुमची चावी देण्यात येते.
पक्षांचा किलबिलाट,सुमधुर सुरू असलेले संगीत,हिरवागार निसर्गरम्य वातावरण त्या सगळ्यांचे लक्ष वेधून आपोआप वेधून घेते.
"कसलं भारी आहे ह्या रिसॉर्टचा ॲबियन्स,रूम्स आणि सर्व्हिस."असे रेखा,रेवा आणि श्रेया रूममध्ये पोहोचल्यावर लक्ष्मी काकूंना म्हणतात.

"छान वाटले की तुम्हाला हे ठिकाण आवडले आहे.चला आता लवकर फ्रेश होऊन काय काय ॲक्टिवीटिज करू शकतो ते पाहूया."काकू म्हणतात.
मस्त गरमागरम नाश्ता करून त्या सगळ्या तिथे असलेल्या इन्फिनिटी स्विमिंग पुलजवळ जातात.तिथे मस्त गाण्यांच्या म्युजिकवर त्या सगळे विसरून मस्त रेन डान्स करतात.नंतर स्विमिंग पुलमध्ये जावूया असे एकमेकींना म्हणतात.त्यातील रेवा आणि श्रेयाला स्विमिंग येत असते त्या काकूंना आणि रेखाला जबरदस्ती पाण्यात उतरवतात.
एकदा पाण्यात गेल्यावर त्या पाण्याचा गारवा,तिथले वातावरण त्यांचा दमलेला जीव जणू शांत करतो.त्या सगळ्यांना स्विमिंगपुलमध्ये खूपच भारी आणि शांत भासते.जणू कित्येक दिवसांचा त्यांचा शीण निघून जातो.

तिथून त्या ॲडव्हेंचर ॲक्टिवीटिज करायला जातात.जणू त्या आपले वय विसरून पुन्हा लहान होतात.लक्ष्मी काकू तर हे सगळे पहिल्यांदा करत असल्याचे आणि करताना खूप मज्जा येत असल्याचे रेखाला आणि श्रेयाला सांगतात.
"चला मुलींनो आता इथे आयुर्वेदिक पद्धतीने फूट मसाज केला जातो तो करून घेऊया म्हणत त्या तिघींना घेऊन जातात."
फूट मसाज चालू असतानाच रेखाच्या डोळ्यात पाणी येते."काय ग काय झाले रडायला?" काकू रेखाच्या डोळ्यातील पाणी पाहून तिला काळजीने विचारतात.
फूट मसाज चालू असतानाच रेखाच्या डोळ्यात पाणी येते."काय ग काय झाले रडायला?" काकू रेखाच्या डोळ्यातील पाणी पाहून तिला काळजीने विचारतात.
"काही नाही ओ काकू,कित्येक वर्षांनंतर कुणी तरी इतका छान फूट मसाज करून दिलाय नाहीतर घरी आपले काही दुखते आहे हे बाजूलाच राहते.बाकी घरच्यांची काळजी घेण्यात आपण व्यस्त होऊन जातो."रेखा काकूंना म्हणते.
सगळ्यांना फूट मसाज केल्याने खूप आराम मिळतो.
दुपारी मस्त आयते आणि छान जेवणावर ताव मारल्यावर त्या आता रूमवर येऊन थोडी विश्रांती घेतात.पुन्हा थोड्या वेळाने फ्रेश होऊन गरमागरम कांदा भजी आणि चहासोबत तिथे सुरू असलेल्या सनई वादनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेतात.त्यानंतर तिथे जवळच असलेल्या छोट्या टेकडीवर जाऊन सनसेट पाहून त्या सांजवेळेचा त्या पुरेपूर आनंद घेतात.

"किती काळानंतर असे मुलांपासून,घरच्यांच्या जबाबदारीतून आज इथे अगदी मोकळे वाटत आहे.नाहीतर आपण बायका फक्त आणि फक्त पळत राहतो आणि हा गरजेचा एकांत मात्र अनुभवायला मुकतो."श्रेया रेवा,काकू आणि रेखा ह्यांना म्हणते.
त्यानंतर उंटावर आणि घोड्यावर एक फेरीची सफर करत त्या आपले बालपण पुन्हा जागून घेतात.तिथे असलेल्या कुंभार कामाच्या चाकावर तिथल्या दादांच्या मदतीने मातीच्या गोळ्यापासून सुंदर छोटे-छोटे मडके बनवतात. ते मडके वाळायला ठेऊन आजूबाजूला फेरफटका मारतात.थोड्या वेळाने, रात्रीच्या जेवणाच्या वेळी,आवडीची सायलेंट साँग्ज ऐकत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.रात्रभर त्या सगळ्या जणींच्या गप्पा मस्त रंगतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा करून त्या सगळ्याजणी पुन्हा एक नवी ऊर्जा घेऊन त्या रिसॉर्टमधून निरोप घेतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा करून त्या सगळ्याजणी पुन्हा एक नवी ऊर्जा घेऊन त्या रिसॉर्टमधून निरोप घेतात.
"काकू,तुमच्यामुळे कालचा एक पूर्ण दिवस उनाड दिवस म्हणुया जो आम्ही मनसोक्त जगलो. बाईपण सोपे नसतेच मुळी पण ते भारी नक्कीच बनवता येते.बाईपण आणि आईपण हे प्रत्येक स्त्रीने जगायला शिकले पाहिजे.रडत,कुडत बसणे सोपे असते पण बदल घडवून स्वतःकरिता जगणे गरजेचे ठरते.स्त्री ही सृजनाची माता आहे आणि तिच्यामुळे हि सृष्टी आहे.हे तिचे महत्त्व तिने जाणून जपले पाहिजे."रेवा मनापासून काकूंना धन्यवाद करत मनात साचलेले बोलून मोकळे होते.
"पटतंय मला तुझे बोलणे,एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचे बाईपण आदराने जपले आणि त्यांनी मिळून प्रगती केली तर त्यांना कुणीही मागे खेचणार नाही.त्यामुळे आता आपण जी कुटुंबासोबत स्वतःकरिता जगायची, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची आणि जीवनात प्रगती करायची हा ध्यास घेतला आहे तो विविध उपक्रम राबवून,आपले छंद जोपासून अविरत सुरू ठेवायचा." काकू त्या तिघींनाही हक्काने सांगतात.
आता त्या पुन्हा घरी येऊन आपल्या सांसारिक,कार्यालयीन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलायला पुन्हा नव्याने सज्ज होतात.आता कुठेतरी बाईपणाचे ओझे कमी करत त्या बाईपणाचे भारीपण जगायला शिकतात.
खरचं बाईपण भारी देवा हे त्यांना नव्याने उमगते.
आई, बहिण, बायको, ताई
सगळी नाती ती मनापासून जपते
जबाबदाऱ्या पार पाडत ती
नकळतपणे स्वतःला विसरूनी जाते
तिचे आरोग्य,तिचा आदर,तिचे मन
आपण प्रत्येकाने जपले पाहिजे
एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचे
बाईपण सन्मानाने राखले पाहिजे
इथे प्रत्येक स्त्री स्वतः आहे भारी खरी
शेवटी पटतयं साऱ्यांना बाईपण आहे भारी..
सगळी नाती ती मनापासून जपते
जबाबदाऱ्या पार पाडत ती
नकळतपणे स्वतःला विसरूनी जाते
तिचे आरोग्य,तिचा आदर,तिचे मन
आपण प्रत्येकाने जपले पाहिजे
एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचे
बाईपण सन्मानाने राखले पाहिजे
इथे प्रत्येक स्त्री स्वतः आहे भारी खरी
शेवटी पटतयं साऱ्यांना बाईपण आहे भारी..
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा