Login

बाईपण देगा देवा.. भाग - ४

बाईच मन...

संस्कृती, " तुला माहित आहे का? तुझी आई कश्याने गेली. "

           

                  " हा काय प्रश्न विचारताय तुम्ही मला माहित आहे. माझी आई हार्ट अटॅकमुळे गेली."

                  " संस्कृती, हार्ट अटॅक हे तुम्हाला सांगितलेलं कारण होत. खर कारण काही वेगळंच होत. तुझ्या आईला गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता, त्यामुळे ती गेली. हे कारण तुझ्या आईवडिलांनी तुझ्यापासून लपवून ठेवलं. "

                  " पण माझ्यापासून का लपवलं?"

                  " संस्कृती , तुझ्या आईला लग्नाच्या अगोदर पासून पाळीचा त्रास होता. तिला वेळेवर पाळी येत नव्हती. त्यासाठी तिची औषध सुद्धा चालू होती. पाळी आली की तिला खूप त्रास होयचा. जर असच राहील तर लग्नानंतर बाळ होण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम्स होतील असं सांगितलं होत. तुझ्या वडिलांना ह्या गोष्टीची कल्पना होती आणि त्यांना ह्या गोष्टीपासून काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांचं ठरलं होत जर नाही बाळ झालं तर दत्तक घेऊ. पण एकमेकांची सोबत ह्या कारणासाठी सोडायची नाही. त्यांनी त्यांच्या घरच्यांना सुद्धा समजवल होत आणि कोणाला ह्या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांचं लग्न झालं पण लग्नानंतर तिला जास्त त्रास झाला नाही आणि अचानक एक दिवस तिला गरोदर असल्याचं समजल. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. सगळे खूप छान चालू होत. तुझ्या येण्याने घरात सणासारखं वातावरण होत. सगळ घर अगदी आनंदाने खुलून गेले होते. तुझे आईवडील तर खूप जास्त खुश होते. तुला सांभाळण्यात, तुला वाढवण्यात, तुझ्यासोबत वेळ घालवत असताना त्यांचे दिवस एकदम छान जात होते. कसलीच कमी त्यांच्या आयुष्यात नव्हती. पण अचानक काही वर्षांपूर्वी तुझ्या आईची तब्येत बिघडली. काही चाचण्या केल्या नंतर समजलं की तुझ्या आईला गर्भाशयाचा कॅन्सर आहे, तोही लास्ट स्टेज ला आहे. आता उपाय होण शक्य नाही. तुझे वडील पूर्ण तुटून गेले. त्यातही त्या माऊलीने त्यांना आधार दिला. स्वतः वरच संकट तिने बाजूला ठेवलं आणि तुझ्या वडिलांना शपथ घातली की ह्यातील कोणतीच गोष्ट घरी कळता कामा नये. माझे जेवढे दिवस ह्या जगात आहेत. ते मला माझ्या कुटुंबासोबत आनंदाने घालवायचे आहेत. मला त्यांच्या डोक्यावर माझ्या मृत्यूच दडपण नकोय. संस्कृती सोबत मला माझे उरलेलं आयुष्य आनंदात घालवायचं आहे. तिला जर कळलं की तिची आई काही दिवसांसाठी ह्या जगात आहे तर ती खूप खचून जाईल. मला असे काही होऊ द्यायचं नाहीय. तुझ्या वडिलांनी तुझ्या आईचं ऐकल त्यांना सुद्धा तिचं बोलणं पटलं. त्यांनी तुम्हाला कोणालाच काही कळू दिलं नाही, परंतु त्याला एक गोष्ट खात होती त्याला असे वाटतं होत की पाळीच्या त्रासाकडे दुर्लक्ष केलं म्हणून तिला कॅन्सर झाला , आणि ह्याच कारणामुळे ते दारू पिऊ लागले. त्या नंतर समजल की कॅन्सर च मूळ कारणं चुकीच्या सॅनिटरी पॅडचा वापर होता. बाजारात येणारे सगळेच प्रोडक्ट चांगले नसतात. तसचं तुझ्या आईने बाजारात आलेल्या नवीन कोणत्या तरी कॉटन सॅनिटरी पॅडचा वापर केला. त्यात घरच्या कामामुळे वैगरे तिला जास्त स्वतःकडे लक्ष देता येत नव्हत आणि काही त्रास ही जास्त जाणवला नाही, आपण साधं सर्दीच औषध सुद्धा सारखं गूगल वर सर्च करून घेतो, पण पॅड सारखी एवढी मोठी गोष्ट आपण सहज बाजारातून आणून वापरतो. ह्याचे एवढे घातक परिणाम होतात हे आपल्याला माहीत सुद्धा नसतं. त्या दिवशी तुझ्या वडिलांनी तुला कोणते पॅड वापरते, असा प्रश्न केला तर तू चिडलीस त्यांना उलट उत्तर केलंस की तू आता मोठी झाली आहेस, तुला कळतं सगळे. पण मला एक सांग एवढी मोठी गोष्ट तुझ्या आईच्या सुद्धा लक्षात नाही आली आणि हे तुझ्या सोबत होऊ नये म्हणून तुझ्या वडिलांनी तुला विचारलं. तर त्यात त्यांचं काय चुकलं. बाईपण काय असत हे त्याला नाही कळणार पण त्याने बाईला समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्याचाच त्याला एवढा त्रास होतोय. "

🎭 Series Post

View all