Login

बैठक लग्नाची (भाग एक)

बैठक लग्नाची
चॅम्पियन ट्रॉफी -२०२५
©® स्वाती पवार
कथेचे नाव-  बैठक लग्नाची  - भाग एक

'अनघा लॅपटॉप वरती रिझल्ट बघते .... तशी मोठ्याने ओरडते ....आई ....बाबा ....लवकर  इकडे या'. "मी एम.बी.बी.एस. खूप चांगल्या मार्कांनी पास झाले.मी डॉक्टर झाले".   अनघाची आई मालती , लगेचच अनघाला जवळ घेते . तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. माझी लेक डॉक्टर झाली....

'अनघा आई-बाबांच्या पाया पडते . दोघेही तिला भरभरून आशीर्वाद देतात अशीच मोठी हो आणि डॉक्टर म्हणून चांगलं नाव मिळव.... तुझ्या हातून रुग्णांची चांगली सेवा घडो हाच आमचा तुला आशीर्वाद.

'मालती अनघाची आई, लगेच किचनमध्ये जाते व साखर घेऊन येते व अनघाचे तोंड गोड करते... देवापुढे साखर ठेव, देवालाही नमस्कार कर, आशीर्वाद घे.'...

'अनघाच्या बाबांना देखील अनघा डॉक्टर झाली याचा खूप आनंद होतो . ते मालतीला बोलतात... आपली मुलगी डॉक्टर झाली , आता हळूहळू कर्जाचा डोंगर कमी करण्याच्या मागे लागले पाहिजे. आपण अनेक जणांकडून थोडे थोडे पैसे घेऊन अनघाचे एम.बी.बी.एस.चे स्वप्न पूर्ण केलं . पण आता त्यांचे पैसे ठेवून चालणार नाहीत.

'आई- बाबा,  तुम्ही माझ्या शिक्षणासाठी जे काही कर्ज काढले आहे ते मी हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करीन'
तुम्ही काळजी करू नका.

"अनघाची आई, अनघा डॉक्टर झाली हे सांगण्यासाठी सुषमाला म्हणजेच तिच्या बहिणीला फोन करते"...

'हॅलो .....सुषमा ...आपली  अनघा डॉक्टर झाली...

"काय सांगतेस ताई !! अभिनंदन". अनघाला सुद्धा अभिनंदन सांग...

"ताई अनघाचं शिक्षण पूर्ण झालं म्हणजे आता तिला स्थळ बघायला सुरुवात केली पाहिजे. अनघाचं वय देखील झालं आहे लग्नाचं ..... जर तू म्हणत असशील तर, माझ्याकडे एक छान स्थळ आहे....


मालती, नाही गं .....सुषमा .  आम्ही एवढ्या लवकर अनघाचं लग्न करणार नाही. अजून तिची इच्छा नाही इतक्यातच लग्न करण्याची...

अगं पण ताई तू स्थळ ऐकशील तर अनघा सुद्धा या स्थळाला होकार देईल...

"आपल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत ना"? 'डॉक्टर महाडिक....त्यांचा मुलगा शुभम हा देखील एम. डी.  आहे. त्यांच स्वतःच आपल्या जिल्ह्यामध्ये  हॉस्पिटल आहे. आणि आई वडील दोघेही पेशाने डॉक्टरच आहेत. ते त्यांच्या मुलासाठी स्थळ पाहत आहेत. आणि त्यांना देखील डॉक्टरच मुलगी हवी आहे,  आणि आपली अनघा देखील आता डॉक्टर झाली आहे. त्यांच्या  मुलासाठी मी आपल्या अनघाच स्थळ सुचवू शकते".

अगं पण सुषमा शिक्षणासाठी तेवढा खर्च केला आहे. तोच खर्चाचा डोंगर आता फेडायचा कसा याचा मी विचार करतेय . 'त्यात आता लग्न करायचं म्हटलं तर हातात पैसा नको का' ?

हे बघ ताई , तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून एवढं चांगलं स्थळ हातच जाऊन देऊ नको. नीट विचार कर आणि नंतर उत्तर दे.... आणि ते शिकलेले आहेत त्यामुळे त्यांच्या काही अपेक्षा असतील असं मला तरी वाटत नाही..

'ठीक आहे सुषमा.... मी अनघा आणि अनघाच्या बाबांसोबत बोलते आणि तुला कळवते'....


0

🎭 Series Post

View all