चॅम्पियन ट्रॉफी -२०२५
©® स्वाती पवार
कथेचे नाव- बैठक लग्नाची - भाग दोन
©® स्वाती पवार
कथेचे नाव- बैठक लग्नाची - भाग दोन
'अहो ऐकलत का.... आपली अनघा डॉक्टर झाली ही आनंदाची बातमी आहेच , पण त्याच्यासोबत अजून एक आनंदाची बातमी आहे आपल्या अनघासाठी एक स्थळ आलं आहे.
"काय! .... अनघाचे बाबा बोलतात... अगं तू वेडी झाली आहेस की काय. आता कुठे रिझल्ट लागलाय आणि लगेच लग्न ...
"मालती, अहो.... आपल्या अनघासाठी माझ्या बहिणीने जे स्थळ सुचवल आहे ते ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा लग्नाला होकार द्याल". आपल्या जिल्ह्यातील महाडिक डॉक्टर आहेत ना. त्यांच्या मुलाच स्थळ आहे.
"काय सांगतेस" ! एवढे मोठे डॉक्टर आणि ते आपल्या अनघाला होकार देतील का ?
'का नाही होकार देणार ' आपली अनघा देखील एम.बी.बी.एस. झाली आहे. आणि दिसायला सुद्धा अगदी देखणी आहे. विचारून बघायला काय हरकत आहे.
"अगं पण...... 'आपल्याकडे लग्नासाठी आता पैसे देखील नाहीत आणि लग्नाचा विषय काढला तर आता थोडेफार तरी पैसे हवेत ना'.
'अहो , पण पैशांसाठी चांगल स्थळ आल आहे , ते सोडायचं का ? काहीतरी तजबीज होईल आधी विचारून तर बघूया? त्यांना आपली अनघा आवडली तरचं हे लग्न होणार आहे....
'ठीक आहे मग... तू म्हणत आहेस तर विचारून बघ...
अनघा पण यावर तुझं काय मत आहे, तू लग्न करण्यासाठी तयार आहेस का ?
आई...मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचं . मला अगोदर बाबांच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा कमी करायचा आहे. त्याशिवाय मी लग्नाला होकार देणार नाही.
अगं ते लोक शिकलेल आहेत . आणि त्यांनी सांगितलं तर लग्नानंतर तू आम्हाला पैशांची थोडीफार मदत करू शकतेस... आपण अगोदर आपली परिस्थिती त्यांना सांगूया आणि नंतरच काय ते ठरवूया..
ठीक आहे मग तू म्हणत असशील तर विचारून बघ...
मालती लगेचच सुषमाला फोन करते.
हॅलो ....सुषमा . मी घरातल्यांसोबत तू सांगितलेल्या स्थळाविषयी बोलली , अनघा आणि तिचे बाबा हे स्थळ बघण्यासाठी तयार आहेत. मी तुला तुझ्या मोबाईल वरती अनघाचा फोटो व कुंडली पाठवते. पुढचं काय ते तूच बघ...
"सुषमा ठीक आहे ताई .तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे आणि मला वाटत नाही की ते तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवतील म्हणून"... एवढी गडगंज श्रीमंती असलेले लोक कशाला तुमच्याकडून काही घेतील. तू पैशांचा अजिबात विचार करू नकोस .पुढचं काय ते मी बघते
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा