Login

बैठक लग्नाची (भाग तीन)

बैठक लग्नाची


चॅम्पियन ट्रॉफी -२०२५
©® स्वाती पवार
कथेचे नाव- बैठक लग्नाची  - भाग तीन


सुषमा महाडिक कुटुंबातील ओळखीच्या व्यक्तीला अनघाचा बायोडेटा पाठवते. ती व्यक्ती  अनघाचा फोटो व बायोडाटा महाडिक कुटुंबातील सर्वांना दाखवते. अनघा दिसायला खूप देखणी आणि सुरेख असते त्याचबरोबर हुशार देखील, त्यामुळे महाडिक कुटुंबाकडून अनघाला होकार येतो....

डॉक्टर सतीश महाडिक व त्यांचा मुलगा शुभम महाडिक या दोघांनीही जिल्ह्यामध्ये त्यांच्या त्यांच्या कामाने नावलौकिकता मिळवलेली असते. डॉक्टर सतीश महाडिक यांना शुभम हा  एकुलता एक मुलगा असल्यामुळे शुभमच लग्न हे थाटामाटात करायचे होते. डॉक्टर महाडिक यांची हि इच्छा, ती व्यक्ती सुषमाला सांगते. अनघा पसंत आहे, पण त्यांना लग्न मात्र थाटामाटा करायचा आहे...

सुषमा बोलते ठीक आहे .मी त्यांना कळवते...

सुषमा मालती ला फोन करते

हॅलो.... सुषमा.... आपल्या अनघाला महाडिक कुटुंबाकडून होकार आला आहे. ते उद्याच आपल्या अनघाला बघण्यासाठी येणार आहेत. कदाचित ते उद्या आपल्या अनघाच्या ओटीत नारळ देखील घालतील. त्याच वेळी लग्नामध्ये देण्याघेण्याविषयी बोलणी करणार आहेत.

मालती बोलते अगं पण.... तुला माहिती आहे ना, आमच्याकडे आता देण्याघेण्यासाठी पैसे नाहीत म्हणून.

'अगं हो ताई, तू उद्या आल्यानंतर त्यांना तसं सांग की आमची मुलगी शिकलेली आहे आणि तिच्या शिक्षणावर आम्ही खूप पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे आम्हाला लग्नात पैसे खर्च करता येणार नाहीत'.

'ठीक आहे . आता उद्याच्या तयारीला लागते . चल मग ठेव फोन....

'मालती बोलते..… अहो ऐकलात का? आपल्या अनघाला मुलाकडच्या मंडळींनी होकार दिला आहे आणि ते उद्याच आपल्या अनघाला बघण्यासाठी येणार आहेत लवकर लवकर तयारीला लागा....

मालती दिवसभर  सर्व घराची झाडलोट करून उद्याची तयारी करू ठेवते.

अनघाला बघण्यासाठी महाडिक डॉक्टर , शुभम त्यांची आई सुचित्रा, शुभमचे काका काकू व मावशी एवढे लोक आलेले असतात. अनघा देखील साडी नेसून छान तयार झालेली असते.

घरात सर्वजण येऊन बसतात . कांदे पोह्यांचा कार्यक्रम छान पार पडतो .

डॉक्टर महाडिक, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे तर आता लग्नात देण्याघेण्याविषयी बोलूया आमची तुमच्याकडून काही अपेक्षा नाही.' फक्त जेवणाचा आणि हॉलचा खर्च तुम्ही करा'. मुलीला दागिने काय घालायचे ते तुमच्या इच्छेने घाला.

'अनघाचे बाबा बोलतात... हॉलचा खर्च आणि जेवणाचा खर्च एकट्यानेच करायचा ! ठीक आहे ...आपल्या जिल्ह्यामध्येच चौकामध्ये तो सह्याद्री हॉल आहे तोच ठरवूया...

डॉक्टर महाडिक बोलतात ....आपल्या जिल्ह्यातील हॉल नाही , लोणावळ्यामध्ये  एक मोठा हॉल बुक करायचा. तीन दिवस आधीच आपण हॉल वरती जाऊन राहायचे. सर्व विधी तिथेच करायच्या


'अनघाचे बाबा , लोणावळा! पण लोणावळ्यातील खर्च आम्हाला परवडणार नाही.

'डॉक्टर महाडिक, अहो. आमचे परदेशातून देखील पाहुणे येणार आहेत आणि तालुक्याच्या ठिकाणी त्यांची सोय होणार नाही...


0

🎭 Series Post

View all