Login

बैठक लग्नाची (भाग चार)

बैठक लग्नाची
चॅम्पियन ट्रॉफी -२०२५
©® स्वाती पवार
कथेचे नाव- बैठक लग्नाची - भाग चार


डॉक्टर महाडिक बोलतात.... मग तुम्हाला लग्नावरती एवढा खर्च करायचा नसेल तर आपण लग्नाचा आणि जेवणाचा खर्च आपण अर्धा अर्धा करूया तुम्ही तुमच्या मुलीला आठ ते दहा तोळे सोन घाला.

अनघाचे बाबा बोलतात ....नाही,  तरीही मला एवढा खर्च पे लावणं शक्य नाही. त्यापेक्षा आपण लग्न साध्या पद्धतीनेच केले तर,  तुमच्या पाहुण्यांची सोय आपण इथेच कुठेतरी करूया?

अहो पण, आमचा एकुलता एकच मुलगा आहे आणि त्याचं लग्न थाटामाटातच पार पडल पाहिजे ही आमची खूप वर्षापासून ची इच्छा आहे.... ’डॉक्टर महाडिक.


अहो पण ' आमची मुलगी एकुलती एकच आहे ,पण आता आम्हाला हा लग्नाचा खर्च परवडण्यासारखा नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो‌.लोणावळ्या मध्ये जाऊन लग्न करण्या इतकी आमची परिस्थिती नाही. चार ते पाच लाख रुपये मी लग्नात खर्च करू शकतो..... ’अनघाचे बाबा.


बाबांचे शब्द ऐकून अनघा बोलते चार ते पाच लाख रुपये लग्नासाठी खर्च करण्याची काही गरज नाही. जो मुलगा माझ्याशी कोर्ट मॅरेज करेल त्याच मुलासोबत मी लग्न करणार....

अनघाचे बोलणे ऐकून डॉक्टर महाडिक यांना राग येतो व ते बैठकीमधून उठून सरळ निघून जातात व बोलतात तुम्हाला जर खर्च परवडणारा नव्हता तर ते आधी सांगायचं होतं.

बाबांच्या मागे शुभम देखील घराबाहेर पडतो पण त्यालाही अनघाचे बोलणे पटलेले असते लग्नावरती विनाकारण एवढा पैसा खर्च करण्यापेक्षा कोर्ट मॅरेज करून तो पैसा आपल्या हॉस्पिटल मधील रुग्णांवर ती खर्च केला तर ते जास्त फायद्याचे ठरेल.. असे तो मनाशीच बोलतो.

इकडे महाडिकांच्या घरी सर्वत्र शांतता पसरलेली असते. त्यावेळीच शुभम बोलतो... बाबा तुम्ही सकाळी मुलीच्या घरच्या मंडळींना असे बोलायला नको होते. आपल्याकडे आपली स्वतःची प्रॉपर्टी भरपूर आहे. त्यामुळे आपण लोणावळ्यामध्ये  लग्न सोहळा पार पाडू शकतो. पण तो आपण आपल्या खर्चात करूया , त्यासाठी मुलीच्या वडिलांना कर्जामध्ये ढकलन हे चुकीचं आहे.

शुभम तू जास्त बोलू नको... पूर्वीपासूनच मुलगा आणि मुलगी हे दोन्ही कुटुंब अर्धा अर्धा खर्च करतात लग्नाचा. आणि ती मुलगी आपल्या घरात आली तर तिला कशाचीच कमी पडणार नाही.

शुभम बोलतो बाबा त्यांनी त्यांची मुलगी ही आपल्याला द्यायची आणि आपण त्यांना काय देणार तर कर्जाचा डोंगर.

आपण एवढे शिकलेलो आहोत आपणच असा विचार केला तर कसं होईल बाबा .... मला अनघाचं बोलणं पटलं आहे. लग्नावरती इतका पैसा खर्च करण्यापेक्षा आपण कोर्ट मॅरेज करूया.

पाहिजे तर लग्नाचे रिसेप्शन आपण आपल्या जिल्ह्यामध्येच एक चांगला हॉल बुक  तिथे करूया. म्हणजे कोणाला जास्त खर्च होणार नाही आणि त्या रिसेप्शनला तुम्हाला ज्या काही मंडळींना बोलवायचं असेल त्यांना तुम्ही बोलू शकता...


0

🎭 Series Post

View all