चॅम्पियन ट्रॉफी -२०२५
©® स्वाती पवार
कथेचे नाव-बैठक लग्नाची - भाग अंतिम
©® स्वाती पवार
कथेचे नाव-बैठक लग्नाची - भाग अंतिम
"हे बघा बाबा, अनघा दिसायला खूप सुंदर आहे आणि त्याच सोबत ती हुशार देखील आहे मी तिचा सर्व रेकॉर्ड चेक केला आहे ते अतिशय हुशार आणि संस्कृत मुलगी आहे अशा मुलीला नकार देण मला शक्य नाही".
डॉक्टर महाडिकांनाही त्यांची चूक समजते , ते शुभमला बोलतात ठीक आहे शुभम. तू बोलत आहेस तर आपण तसेच करूया. आपण तुझे कोर्ट मॅरेज करूया... पण लग्नाचं रिसेप्शन मात्र जोरदार करायचं....
ठीक आहे बाबा ... तसेच होईल.
'शुभम , अनघाला फोन करतो....
हॅलो.... अनघा....सकाळी जे काही घडले त्याबद्दल मी तुझी माफी मागतो . खरंतर बाबांचं काही चुकलं नाही . मी बाबांचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्यांनी लहानपणापासूनच माझ्यासाठी काही ना काही स्वप्न बघितली आहेत. त्यामुळे ते सकाळी लग्नाच्या बैठकीत असे बोलले, पण मी त्यांना समजावले आहे आणि ते आपल्या कोर्ट मॅरेज साठी तयार झाले आहेत..
शुभम चे बोलणे ऐकून अनघाला धीर येतो. ती शुभमला बोलते शुभम पण अजून एक अडचण आहे.
लग्न झाल्यानंतर मी जे काही पैसे कमवेन त्यातले थोडेफार पैसे मी माझ्या बाबांना देणार आहे. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी, त्यांना शक्य नसताना देखील खूप पैसे खर्च केले आहेत. पण त्यांनी माझी एम.बी.बी.एस. होण्याची इच्छा पूर्ण केली. तशीच मी देखील माझ्या बाबांच कर्जाच ओझं कमी करण्यासाठी त्यांना लग्नानंतर थोडीफार मदत करणार आहे....
शुभम ठीक आहे. लग्नानंतर तूच काय मी देखील तुझ्या बाबांना मदत करेल...
नाही तू माझ्या बाबांसाठी मदत करावी ही माझी अपेक्षा नाही जर माझ्या बाबांनी माझ्यासाठी पैसे खर्च केले आहे तर ते पैसे परत करण्याचे काम देखील मीच करेन .फक्त तुझी साथ मला हवी आहे.
मी तुला आयुष्यभर अशीच साथ देईन... ’शुभम
दुसऱ्या दिवशी पुन्हा महाडिक कुटुंब अनघाच्या घरी जातात व अनघाच्या ओटीत नारळ घालतात. "डॉक्टर महाडिक स्वतः अनघाच्या बाबांना बोलतात.... आम्हाला फक्त तुमची मुलगी द्या बाकी काही नको. " कोर्ट मॅरेज झाल्यानंतर आपण रिसेप्शन सोहळा ठेवला आहे. त्यामध्ये सगळ्या पाहुणे मंडळींना बोलवायचं आणि त्याचा खर्च सगळा मीच करणार आहे तुम्ही फक्त आम्हाला तुमची मुलगी द्या अजून काही नको....
डॉक्टर महाडिकांचे बोलणे ऐकल्यानंतर अनघाच्या आई-बाबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात . अनघाचे बाबा बोलतात आज पासून आमची लाडकी लेक आम्ही तुमच्या पदरात घालतो....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा