Login

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 जलद कथा-हिशोबाचा ताळमेळ भाग १

A Story Of Employers Who Work In The Company
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२५ जलद कथा

कथा-हिशेबाचा ताळमेळ भाग १


"आई! काय ग, सारखा अभ्यास अभ्यास ...कंटाळा आला बघ. आपण यावर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आजोबांच्या गावी लवकर जाऊया. आजोबा मला त्यांच्या बागेत नेतात. त्यांची बाग उन्हाळ्यातही विहिरीच्या पाण्याने किती हिरवीगार दिसते... फुलझाडे ही बरीच आहेत तेथे"... लहानगा साकेत आईला म्हणाला.

"अरे हो! जायचंच आहे. तिथल्या कुलस्वामिनीला पूजा घालायची असते दरवर्षी. बाबांना सांग. यावर्षी येतात का म्हणावं... केव्हाही नंन्नाचाच पाढा असतो त्यांचा. यावर्षी कंपनीतून चार दिवसांच्या तरी सुट्ट्या काढा म्हणावं" "हो आई आपण दोघेही त्यांना घेऊनच जाऊ".

"काय रे! काय गप्पा सुरू आहेत माय लेकाच्या"?
"अहो बाबा, आपण या
सुट्ट्यांमध्ये आजोबांच्या गावी जाणार आहोत. तिथे पूजा असते ना. मला खूप घाई झाली आहे, तिथे आजोबा सोबत बागेत जायची. काय मस्त वाटते ना त्यांच्या बागेत."

"हो, तेही आहे म्हणा. या वयात त्यांच्या कामाचा उत्साह... खरेच. मानलं पाहिजे तुझ्या बाबांना". जयंताने बायकोकडे कटाक्ष टाकला.

"हो ना! माझे बाबा बघा, किती उत्साही आहेत. उत्साहाने कुलदैवतेची पूजा घालतात दरवर्षी. किती गोतावळा गोळा होतो. गावातल्या सर्वांना अन्नदान होते दरवर्षी. तुम्ही यायचं आहे यावर्षी. तुमच्या बॉसला सुट्ट्या मागा चार दिवसांच्या".
गाडी त्याच्यावर घसरल्या वर जयंता सावध झाला. अरे बापरे! हे धर्म संकट आलंय आता... यातून सुटका करावीच लागेल. तो मनातच पुटपुटला .त्याने बरं, बघू पुढे... म्हणून तात्पुरती वेळ मारून नेली.

"काय जयंतराव! आटोपलं का? या लवकर ऑफिसमध्ये. हिशेबाचा

टाळमेळ जुळवायला तुम्हीच हवेत". फोनवर बाॉसचा निरोप… बापरे!ऑफिसची वेळ झाली. आज नेमका उशीर होणार...
बायकोच्या हातचा कडक चहा घेऊन त्याला तरतरी आली. आरशासमोर दाढी करायला उभा राहिला.
ओठांचा चंबू करून, जीवनी एका बाजूला ओढून, गालाचा फुगा, डोळे मिचकावत, त्याची दाढी करण्याची तऱ्हा पाहून, साकेतला हसू येत असे. त्याच्या हसण्या कडे दुर्लक्ष करीत त्याने तयारी केली.
गरम वरण भात, त्यावर तुपाची धार... मस्त जेवण करून दुचाकीला किक मारली.

"मंजिरी! गेले का ग जावई बापू ऑफिसला"?

हो ग आई! मंजिरीने आईशी बोलायला फोन हातात घेतला.
"अगं आई, यावर्षी मी यांना आणते बरं का पूजेला. हे नेहमीच टाळाटाळ करतात"." हो ग मंजू. सर्वांशी भेटी गाठी होतात त्यानिमित्ताने. सगळे आठवण काढतात त्यांची. त्यांना का आवडत नाही कोण जाणे यायला." इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मंजू कामाला लागली.

आज साकेत आनंदाने उड्या मारत शाळेतून घरी आला. आई, चल कर तयारी. मला गावाला कधी जातोय असं झालंय. अरे हो थांब! तुझ्या बाबांना सांगावं लागेल. दोन-तीन दिवस तयारीला लागतातच. सोबत तुझी मावशी पण येणार आहे.
हो का? साकेतला खूप आनंद झाला.


जयवंतराव त्यांच्या सासरी कुलस्वामिनी च्या पूजेला जातात की नाही पाहूया पुढील भागात भाग २ मध्ये


छाया बर्वे राऊत अमरावती
८३९००८६९१७
0