चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 जलद कथा
कथा-हिशोबाचा ताळमेळ -भाग२
"अहो ऐकलंत का? साकेत ला जायचंय त्याच्या आजोळी. मी पण तयारी करते. तुम्ही कळवलं का तुमच्या बॉसला"?
"नाही अजून पर्यंत नाही." "का? आठ दिवसांपूर्वीच आपलं बोलणं झालं होतं ना या विषयावर"?
"तुमचं नेहमीच असं असतं. कधी कुठे जाणं नाही की येणं नाही. इतका  एकलकोंडेपणा बरा नाही हो! अशानं आपल्या मुलाच्या लग्नात आपण तिघेच असू,आपल्या बाजूचे... मी आहे म्हणून सांभाळून घेते. दुसरी एखादी दोन दिवसात पळून गेली असती".
"कशाला घालायची पूजा दरवर्षी,कुलस्वामिनीची"? "एवढा खर्च कशाला करायचा? लोकांना काय, फुकटचं जेवायला मिळतं. अशाने कुणाचं भलं झालंय! सगळा खर्च व्यर्थ असतो तो. एखाद्या गरीबाचं भलं करा त्या ऐवजी".
"उगाच काहीतरी बोलू नका. श्रद्धेने करतात माझे आई बाबा. त्यानिमित्ताने सर्वजण एकत्र येतात. तुम्हीही चला... देवीसाठी नाही, तर थोडी हवा पालट म्हणून. तेथील बागेत फिरा साकेतला घेऊन. घ्या की चार दिवस रजा". पत्नी काकुळतेने म्हणाली.
तिने एवढे आर्जव केल्यावरही, जयंता न जाण्यावर ठाम राहिला.
तिने एवढे आर्जव केल्यावरही, जयंता न जाण्यावर ठाम राहिला.
पत्नीने चरफडतच साकेत व बहिणीला घेऊन गाव गाठले. तिच्या मनात नवऱ्याविषयीचा राग खदखदत होताच.  
"आई, बाबा
येणार होते ना आपल्या सोबत"? हो!" येतील ते नंतर. त्यांना रजा मिळाली नसेल ऑफिसमधून". तिने त्याला समजाविले.
"आई, बाबा
येणार होते ना आपल्या सोबत"? हो!" येतील ते नंतर. त्यांना रजा मिळाली नसेल ऑफिसमधून". तिने त्याला समजाविले.
आज रविवार. जयंता घरात एकटाच असल्यामुळे आरामात उठला. उठा लवकर. ऑफिसला जायला उशीर होईल म्हणायला बायकोची बडबड नाही. चला आज सुट्टीचा पूर्ण दिवस आपल्याला एकट्यालाच मिळणार.
काय बरं करावं आज? त्याने चहा बनवला. चहा घेताना पत्नीची आठवण आली. तिने प्रेमाने बनवलेल्या चहाला वेगळीच चव यायची.
त्याने चहा घेताना,दिवसभराचे नियोजन करायला सुरुवात केली. मागच्या आठवड्यात आणलेले नवीन पुस्तक आज निवांत वाचून काढूया. त्याला वाचनाची आवड होतीच. असा एकांत मिळाल्यावर, 'आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन' वा!
चला आधी बायकोला फोन लावू या.
"पोहोचलात का नीट"?

"हो, अगदी व्यवस्थित पोहोचलो."
"साकेत काय करतो"?
"नुसता गोंधळ घालतोय सगळीकडे. त्याची मित्रमंडळी आहेत ना!"
"त्याच्याकडे लक्ष ठेव. कुठे जाईल तो".
"साकेत काय करतो"?
"नुसता गोंधळ घालतोय सगळीकडे. त्याची मित्रमंडळी आहेत ना!"
"त्याच्याकडे लक्ष ठेव. कुठे जाईल तो".
"हो, आहे मी आणि आई-बाबा त्याची काळजी घ्यायला. तुम्हाला नको होती जबाबदारी घ्यायला.   तुम्ही यायला पाहिजे होते .सगळे विचारत आहेत तुम्हाला". बायकोने रागातच फोन ठेवला.
त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले.
चला आज शांतता... आजचा रविवार एकट्याने घालवायचा.;
त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले.
चला आज शांतता... आजचा रविवार एकट्याने घालवायचा.;
जयवंताचा रविवार कसा जातो पाहूया पुढील भागात भाग ३मध्ये
छाया बर्वे राऊत
टीम- सुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा