चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 जलद कथा
कथा-हिशेबाचा ताळमेळ भाग ३
"अहो जयंतराव! आहात का घरी"? विनायकराव बेल न वाजविताच आत आले. हातात एक मोठी फाईल आणि पेन घेऊन खुर्चीत बसले. जयंताच्या कपाळावर आठ्या पडल्या. आता हा माणूस आपल्या वेळेचं खोबरं करणार बहुतेक... "अहो जयंतराव, मला हा हिशेबाचा ताळमेळ देता का जमवून? काही केल्या एक रुपयाचा फरक लक्षात येत नाही. तुम्हाला जमा खर्चाची तूट, अगदी बारकाईने लक्षात येते बघा! म्हणूनच तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला किती मान आहे हे पाहिलय मी."
"अहो विनायक राव, माझं जेवण व्हायचंय. त्यात पत्नी घरी नाही".
"वहिनी घरात नाहीत का?
मग छानच की! निवांत द्याना ही तूट काढून... हवं तर मी घरून डबा आणतो तुमच्यासाठी". त्याला भूक लागली होतीच. जेवणाची सोय झाली म्हणून, त्याने काहीही न बोलता फाईल हातात घेतली.
अर्थशास्त्रात तरबेज असलेला 'तो' त्याने तासाभरातच हिशेबाचा ताळमेळ जमविला.

चला ,आता उरलेल्या वेळात आपलं आवडतं पुस्तक वाचायला घेऊया.
"हॅलो, हॅलो! जयंतराव! मी बोलतोय 'बोलके' कार्यालयातून". त्याने फोन घेतला. "नमस्कार बोलके! तुम्ही बोलके च आहात, म्हणून तर आज सुट्टीच्या दिवशी सुद्धा बोलत आहात".
"अहो जयंतराव, एका फाईल मध्ये चांगलाच घोळ झालेला आहे बघा. कामगारांच्या वेतनाच्या खर्चाचा हिशेबच लागत नाही.उद्याच तात्काळ फाईल द्यावी लागते तपासायला.त्यामुळे आज त्यावर काम करणं अत्यंत जरुरी आहे. तुम्हाला त्रास दिला... माफ करा."

जयंताने डोक्यावरच हात मारला. ",आज किती शांततेने पहूडणार होतो मी सोफ्यावर...संध्याकाळी प्रसन्न मनाने नवाबी थाटात बाहेर जेवायला जाणार होतो मित्राला घेऊन".
जयंता कार्यालयात पोहोचला.
"या साहेब! तुमचीच वाट बघत होतो".
त्याने फाईल हातात घेतली. फाईल चाळायला बराच वेळ लागला. तसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर होत गेले. कामगारांच्या वेतनाचा निधी अपुरा पडत होता. काय करावे? यावर एकच पर्याय ...कामगार कपात.
या कल्पनेने त्याच्या संवेदनशील मनाला वेदना जाणवल्यात .प्रत्येक विभागातून साधारण पाच कामगार कमी करावे लागतील. दहा विभागातून पन्नास कामगार बेरोजगार होतील .त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे हाल होणार. या कल्पनेने त्याचा घसा कोरडा पडला. त्यांनी टेबलावरच्या ग्लासातलं पाणी घटाघटा घशात ओतलं. काय करायचे ?बोलके व इतर कर्मचारी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते.

"काय झालं साहेब तुम्हाला? आणखी पाणी आणू का"? "नको .बसा इथे ".तेथे असलेले कर्मचारी त्याच्या समोर बसले.
"असं पहा,? या फाईल मधून असं निदर्शनास येत आहे की, आपल्याला कामगार कपात करावी लागणार...
कदाचित त्यात आपलाही क्रमांक असेल.कंपनी सध्या मंदीत आहे. वरिष्ठांना त्याची कल्पना असेलच. परंतु आतापर्यंत त्यांनी वेळ पुढे ढकलत नेली. "मागणी आणि पुरवठा यात खूप तफावत आहे."

कामगारांच्या वेतनाचा खर्च कंपनीला झेपणार नाही. आपल्याला प्रत्येक विभाग प्रमुखाला त्यांच्या अकुशल, अप्रशिक्षित कामगाराला 'नारळ' द्यायला सांगावं लागेल.
त्याच्या या पर्यायामुळे तिथे असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच डोकं गरगरायला लागलं.

कामगारांच्या भरवशावर असणारं त्यांचं कुटुंब, त्यांच्या लहान पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न, रोजच्या रोजी रोटीचा प्रश्न, त्यांचे शिव्या शाप, त्यांच्या तोंडाचा घास हिरावणं....
काय करावे?! वरिष्ठांशी बोलून हा प्रश्न सोडवावा लागेल.

जयंतराव कामगारांचा प्रश्न सोडवतील का? पाहूया पुढील भाग ४मध्ये
छाया राऊत बर्वे अमरावती
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा