Login

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 जलद कथा-हिशोबाचा ताळमेळ भाग ४

Story Of Employers Who Work In The Company
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025

कथा-हिशेबाचा ताळमेळ भाग ४ अंतिम


जयंताला आपल्या नोकरीवर सुद्धा गदा येणार हे जाणवायला लागलं. त्याने विचार केला, बरं झालं ती फाईल आपल्या हाती पडली. त्याला परिस्थितीचं गांभीर्य जरा जास्तच भयाण वाटू लागलं. आपली जर नोकरी गेली, तर इतर कामगारां सारखे आपलेही हाल होतील. त्याला बायकोच्या माहेरची कुलस्वामिनी आठवली .त्याचं मन सैरभैर झालं. त्याचं मन वेगाने विचार करू लागलं.

आयुष्यभर काम करून केव्हातरी आपल्या सारख्या माणसाला देव आठवतो. आठवतो म्हणजे काय, अगदी त्याची नितांत गरज असल्याप्रमाणे, आपण त्याला हाक मारतो. मी भगवंताची आठवण करीत नाही. किंवा मला त्याची अजिबात गरज नाही. असं म्हणणारी माणसं, स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी समजतात.
म्हणूनच आपण कुलस्वामिनी ची पूजा घालण्यावर पत्नीशी वाद घातला. त्याला आता अपराधी वाटू लागलं.

तरीही त्याला त्याचा बुद्धीप्रामाण्यवाद स्वस्थ बसू देईना. आपल्या अर्थशास्त्राचा काही ना काही उपयोग कंपनीला झाला पाहिजे. या हेतूने त्याने वरिष्ठांशी चर्चा करण्याचं ठरवलं.

"सर, येऊ का आत "?जयंताने हळूच बाॅसच्या केबिनमध्ये प्रवेश केला. "अहो जयंतराव, या की. मी आता आपणाला निरोप पाठविणार च होतो." "सर मी काल आपली सांख्यिकी फाईल चाळली.त्यात जमाखर्चाचा ताळेबंद जुळत नाही. मागणी आणि पुरवठा यात बरीच तफावत आढळली. त्यामुळे अनेक कामगारांचा रोजगार हिरावल्या जाणार की काय याची शंका येते."
"अहो जयंतराव, मला सुद्धा काय करावे सुचेनासे झाले आहे. कंपनी मंदीत जात आहे. त्यामुळे तुमच्या हाताखालचे कर्मचारी त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना कमी करणार. तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना कमी करणार. मग मी तुम्हाला. आणि माझे वरिष्ठ मला .... असे करीत खालून वरपर्यंत नोकर कपात होईल."
"त्यासाठीच तर आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे. सर, आपण यातून नक्कीच मार्ग काढू. होईल काहीतरी".

त्याने मनोमन कुलस्वामिनी ला वंदन केले. कंपनीचा घोळ दोन दिवसात निस्तरायला हवा. त्याला कुटुंबाची प्रखरतेने आठवण आली. कधी एकदा यातून बाहेर पडतो आणि कुटुंबाला भेटतो... असं झालं त्याला.
बायको तेथून परत येण्याआधीच, आपण तिला तेथे जाऊन अनपेक्षित आनंद देऊया.

अहो जयंतराव ,कसल्या विचारात आहात? बॉसने त्याची तंद्री घालवली.
"सर, काहीतरी करावंच लागेल ना. असं करूया, कामगारांचे कामाचे तास वाढवून देऊया. त्यामुळे उत्पादन वाढून कंपनीला फायदा होईल. आणि कामगार कपात पण होणार नाही".
"उत्तम कल्पना! द्या टाळी" .बाॅसचं समाधान झालं.

जयंत आज खुश होता. त्याने त्याच्या सासरी जाण्याची तयारी केली. त्याचे आवडते पुस्तक सुद्धा सोबत घेतले.

अय्या! आलात तुम्ही? बघा, मी कुलस्वामिनी ला तुम्ही येण्यासाठी मनात प्रार्थना करीतच होते. अहो बाबा! बघा कोण आलंय... अरे जयंतराव! बरं झालं आलात. उन्हाचा त्रास वगैरे नाही ना झाला? साकेत सुद्धा बाबांना बिलगला. दोघांनीही कुलस्वामिनी ला वंदन करून सुखी संसारासाठी प्रार्थना केली.



समाप्त
छाया राऊत बर्वे अमरावती
टीम सुप्रिया
0