येतो खाली मेघराजा
भेटायला धरणीला,
वाट त्याची पाहे बळी
टक लावून नभाला.
भेटायला धरणीला,
वाट त्याची पाहे बळी
टक लावून नभाला.
घाम गाळूनी जोमाने
फुलवितो काळी माती,
राब राबूनी कष्टाने
बळी पिकवितो मोती.
फुलवितो काळी माती,
राब राबूनी कष्टाने
बळी पिकवितो मोती.
बहरते शिवारात
पिक ऐटीत तो-याने,
झुंजू मुंजू गाणे गात
डोलू लागते वा-याने.
पिक ऐटीत तो-याने,
झुंजू मुंजू गाणे गात
डोलू लागते वा-याने.
डोलणारे पिक जणू
भासे मोत्यासम त्याला,
डोळे भरुन हर्षाने
अश्रु लागे वाहायला.
भासे मोत्यासम त्याला,
डोळे भरुन हर्षाने
अश्रु लागे वाहायला.
सा-या जगाचा पोशिंदा
नसे चैन क्षणभर,
आस एकच मनात
घास मिळो पोटभर.
------------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®
नसे चैन क्षणभर,
आस एकच मनात
घास मिळो पोटभर.
------------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा