Login

कविता : बालपणीची शाळा माझी

कविता बालपणीची शाळा माझी एक आठवण
बालपणीची शाळा माझी 


बालपणीची शाळा माझी 
होती सुंदर देखणी फार 
पाठीवर किंवा हातात दप्तर 
ओझ्याचा नव्हता कसला भार 

बालपणीची शाळा माझी 
शिक्षक होते रुबाबदार 
घाबरत होतो त्यांना आम्ही 
शिक्षक दिसता सारे व्हायचे फरार 

बालपणीची शाळा माझी 
नव्हता आम्हा पुस्तकांचा भार 
एकच वही त्यात सारे विषय 
मागच्या पुढच्या कागदावर स्वार 

बालपणीची शाळा माझी 
कौलारू कोठे पत्रांचा आधार 
पाऊस होता पत्रांचा आवाज 
कोठे टपटपणाऱ्या पाण्याची धार 

बालपणीची शाळा माझी 
थोर पुरुषांच्या माहितीचे भंडार 
माणुसकी थोर कर्तुत्वांचे धडे 
रुजले आहेत आजही मनात 

बालपणीची शाळा माझी 
मैत्रीचा आम्हा मोठा अभिमान 
मांडी घालून बसणं फारीवर 
नक्षीकाम ही फारीवर होई छान 

बालपणीची शाळा माझी 
नव्हती छत्री रेनकोटचा भार 
मस्त पावसात भिजायचो आम्ही 
आजही ते दिवस आठवतात फार