Bandana Natyatale Bhag - 1

Kadhi Kadhi Atrupt Isha dev dekheel Konachya Na Konachya rupane Purn Karun Gheto Jar Talya Manya aseltar!..
"बंधन नात्यातलं भाग - १

"हे लग्न होणार नाही. बाबांनी निक्षून स्वराला सांगितले."

"पण का बाबा माझे शंतनूवर प्रेम आहे. शंतनूचे वडील आणि तुमचे पहिले काय संबध आहेत त्याचाशी आम्हा दोघांना काही देणे घेणे नाही आणि कारण जाणून घ्यायची आम्हांला पण गरज नाही."

बाबांनी गोडीत समजून सांगायचा प्रयत्न केला. पण स्वरा आपल्या मताशी ठाम होती.प्रशांत म्हणजेच स्वरांचे वडील हताश झाले. शेवटी ते म्हणाले,"हे लग्न होईल पण मी तिथे हजर राहणार नाही."

" हे काय बाबा!"

स्वराला वाटले हो नाही करतील पण बाबा लग्नाला तयार होतील. पण एवढा टोकाचा निर्णय घेतील असे तिला कदापिही वाटले नाही.

इकडे शंतनूच्या आईवडीलांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली होती.
जे काही झाले ते आपलं प्रारब्ध होतं. आपल्या मुळे पुढच्या पिढीला त्यात अडकायचं नाही. त्यांचा काय दोष. शंतनूचे वडील संयमाने शंतनूच्या आईशी बोलले.

आईने पण होत, हो मिसळून तयार झाली. इकडे स्वरा आईला विचारत होती. "आई काय कारण आहे ग एवढे संबंध बिघाडायचे?" आधी तर बाबा म्हणायचं तु शोधून आण मुलगा पण योग्य मी तुझं लग्न लावून देईल. स्वरा तु लव्हमॅरजच कर.मग आता काय झाले?

शंतनुला पहिल्यांदा पाहिल्यावर पण ते किती खुशीतच होते. योग्य निवड स्वरा, जोडीदार योग्य निवडलास असे देखील म्हणाले. मग आता अस काय अचानक झालं?स्वराला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आई कडून हवी होती.

आईनं स्वराला जवळ घेतलं आणि म्हणाली, "हो बाळा शंतनु योग्य वर आहे तुझ्या साठी पण, खरं सांगू शंतनुने दिलेल्या माहितीनुसार त्याचे कुटुंब कोण आहे हे समजले.म्हणजे काय समजले? स्वरानं विचारले.

सांगेल मी सावकाशीनं. नाही आई आत्ताच मला हे समजले पाहिजे. कारण शंतनू आणि मी आमच्या नात्याचा प्रश्न आहे. बाळा तो फार मोठा इतिहास आहे. "अग बोल ना तु नाही बोललीस तर कसं समजणार आम्हाला! काही झाले तरी मला समजले पाहिजे त्यावर मग मी ठरवेन. आम्हाला अंधारात ठेवून तुम्ही दोन जिवाच्या प्रेमाशी खेळतात. कळू दे मला आज आणि आत्ताच स्वरा आईला म्हणाली. ठिक आहे मग ऐक, काय सांगणार आई स्वराला हे पाहू पुढील भागात
क्रमशः
©️®️सौ ऊज्वला रवींद्र राहणे

🎭 Series Post

View all