Bandhan Natyatale Bhag - 3

Sachyat Prmapude kathor Nati dekhil natmask hotat. Svaati bhannat Natyatale Majbut asatech!..
काय सांगितले बरं आईने स्वराला आणि हे ऐकून स्वरानं काय निर्णय घेतला असेल पाहूया या भागात

त्या वहित मलाही माहित नसलेल्या बऱ्याच गोष्टी होत्या. त्या नंतर मला वाचल्यावर समजल्या. त्या बहुतेक सगळ्या गोष्टी मी तुला सांगितल्या असं मला वाटतं.

कर्मधर्म संयोगाने आज शंतनुच्या कुटुंबाशी संबंधित धागेदोरे डायरीतील नोंदीशी मिळतेजुळते झाले.नाहीतर आम्ही ती डायरी एक आठवण म्हणूनच जपूनच ठेवली होती.

"आता तुच ठरव काय करायचं?" आईने स्वरावर सगळे सोपवले.

आता शंतनुच्या प्रेमाचे धागेदोरे जुळवत होती. तिलाही आता आज्जीच्या प्रेमकहाणी सारखी आपली पण प्रेमकथा होईल का याची भीती वाटत होती.

आईने घड्याळ बघितले स्वराचे बाबा यायची वेळ झाली होती. ती उठून कामाला लागली. जाता जाता हाताशी असलेला रेडिओ आॉन केला.दाराची बेल वाजली स्वराचे बाबा आलेच होते.

आईने गॅसवर चहाचे आधण ठेवले. त्यात चहा पावडर, साखर आणि आले किसून टाकले.

उकळत्या पाण्याने चहा पावडरचा रंग आपल्यात मिसळून घेतला होता तर साखर त्या पाण्यात केंव्हाच विरघळून गेली होती.

आल्याचा सुगंधाने गाण्याच्या ओळीवर आपली सत्ता काबीज केली होती. वातावरणातील मळभ देखील गाण्याला साथ देत होते. गाण्याचे स्वर स्वराच्या काळजाचा शोध घेत होते.

"कसे कोठून येतो आपण कसे नकळता जातो गुंतून नसता जातो गुंतून, उगाच हसतो उगाच रूसतो, क्षणात आतुर क्षणात कातर!"
'जरा विसावू या वळणावर!'

स्वरा चहाचा कप घेऊन आतल्या खोलीत गेली जिथे भिंतीवर आज्जी व आजोबांचे फोटो लावले होते.

दोन्हीही फोटो समोर हात जोडून स्वरा उभी राहिली, आजोबा, आज्जी कोण चुक कोण बरोबर हे मला माहित नाही. काळ जसा होता तसे निर्णय घेतले गेले.

प्रेम कोणावर करायचे, प्रेम करणं गुन्हा नाही. मी शंतनुवर जिवापाड प्रेम करते. त्याचेही तितकेच माझ्यावर प्रेम आहे. बाबांनाही भुतकाळ माहित नव्हता तेंव्हा तो खुप आवडला होता.

पण भुतकाळ समजला तर मी पण प्रेमाची आहुती द्यावी असं त्यांना वाटत. म्हणजे परत एक आज्जी तयार होणार. पुढे ती देखील असेच आत्मचरित्र लिहणार. पुढे याच्या हाती त्याचा हाती सुपूर्द!

नाही या नात्याला आता नाव हवं आहे. बदल महत्वाचा. साथ हवी आहे आज्जी आजोबा तुमची! नकळत स्वराच्या डोळ्यात पाणी आले.

दारात बाबा उभे होते. त्यांच्या नजरेतून ते सुटेल कसे. काळजाचा तुकडा तो, अलगद त्यांनी स्वराच्या डोळ्यातील पाणी पुसले. तिला जवळ घेत म्हणाले., "बाळा शेवटी बाप आहे ग मी तुझा!काळजाचा तुकडा योग्य जागीच सुपूर्द करेल."

सारासार विचार करता आता या भुतकाळाशी माझे देणंघेणं नाही. आईनं रोजनिशी लिहिली नसती तर काय समजणार होते आम्हाला तरी!

"जा स्वरा शंतनुला फोन कर बोलावून घे हे ऋणानुबंध आता नात्यात बदल करून घट्ट करून देणार तुझा हा बाबा!"

या क्षणी फोटोतली आज्जी आनंदी वाटली. पण आजोबा मात्र आहे त्या पोझिशन मध्ये निर्णायक वाटले.

समाप्त
©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे

🎭 Series Post

View all