Bandana Natyatale Bhag - 2

Shevti Kahi Kahi Samaj Kay Manel Ya Bhitine aplya Premchi Ahuti Dyavi Lagate shewti Pram te Premch!
स्वराची आई स्वराला काय सांगते पाहूया या भागात


बाळा ऐक शांतपणे आणि मग तु निर्णय घे स्वराच्या आईने बोलायला सुरूवात केली. हे शंतनूचे कुटुंब, खुप दिवस झाले आपला या कुटुंबाशी संपर्क तुटला होता.

त्याच्या कुटुंबीयांचे धागेदोरे जरा वेगळ्या कारणाने आपल्या कुटुंबाशी जोडले होते.

बाळा खुप वेगळा इतिहास आहे तो. अग बोल ना थांबते कशाला? स्वराच्या आईने अवंढा गिळत बोलायला सुरुवात केली.

स्वरा बाबांची आई म्हणजेच तुझी आज्जी माझ्या सासुबाई व शंतनूचे आजोबा एकेकाळी प्रेमात पडले होते एकमेकांच्या!ज्या काळात प्रेम करणे म्हणजे फार मोठा गुन्हा होता.त्याला कारणही तसेच.

आज्जीच्या माहेरी खुप मोकळे वातावरण होते. सगळे खेळामेळीचं राहत.तेंव्हा त्यांच्या वाड्यात शंतनूच्या आजोबाच्या वडीलांचे बिर्हाड राह्यला आले. शंतनूचे पणजोबा ग्रामसेवक होते. शंतनूची पंजी आणि शंतनूचे आजोबा. व त्यांची बहिण एवढेच कुटुंब.

मग या कुटुंबाची आणि आज्जीच्या कुटुंबाची छान मैत्री झाली. शंतनूच्या आजोबांची बहिण आणि आज्जी तर घट्ट मैत्रीनीच झाल्या.

जेवनखाण, अंगतीपंगती, शाळेत जाणं, येणं सगळे बरोबरीने. दोन्हीही कुंटूबाचे मैत्रीचे धागेदोरे मस्त जुळले होते अगदी घट्ट घरोबा झाला.

शंतनूचे कुटुंब गरीब होते. ग्रामसेवकाचा कितीसा तो पगार! त्यावर मुलांचे शिक्षण आणि गावी आईवडीलांना देखील पैसा पाठवायला लागायचा. मग शंतनूची पंजी विद्यार्थ्यांना डबे द्यायचे काम करायची. तेवढाच संसाराला हातभार.

पण आपलं म्हणजेच आज्जीचं कुटुंब खुप सुखवस्तू होतं दुध दुपतं शेती वाडी सगळ भरपूर. मग तुझी पंजी पणजोबाच्या नकळतपणे शंतनूच्या आईला दुध, धान्य जमेल तेवढी मदत करायची.

शंतनूचे आजोबा व आत्या आज्जी दोघेही आभ्यासात हूशार होते.आपल्या आज्जीला शंतनूचे आजोबा आभ्यासात मदत करायचे. चुणचुणीत हुशार आजोबाच्या प्रेमात आज्जी कधी पडली कळलेच नाही. दोघेही दुरूनच पण एकमेकांकडे आकर्षिले गेले. जात व परिस्थितीत दोन्ही पलिकडे.

एकदिवस आज्जींच्या वडीलांनी त्यांना बोलताना बघीतले. घरी आल्यावर आज्जीच्या आईला व आज्जीला दम दिला. परत त्याच्यांशी बोलताना दिसलीस तर तंगड मोडून हातात देईल आणि पंजीला सांगितले जरा स्वयंपाकघरातलं लक्ष कमी करा लेकीवर नजर ठेवा. पोरगी हातची जायची. मग तुमची खैर नाही.

मग काय आज्जीचे बाहेर जाणेच काय, शाळाही देखील बंद केली. शंतनुच्या कुटुंबाला पण बिर्हाड खाली करायला सांगितले.आज्जीला तर कोणालाच भेटू दिले नाही.

जाताना शंतनूची पंजी आणि आत्येज्जी निरोप घ्यायला आल्या होत्या. कर्म, धर्म संयोगाने आज्जीचे वडील घरी नव्हते. आत्येज्जीच्या गळ्यात पडून आज्जी खुप रडली. ऋणानुबंधाच्या गोष्टी आहेत ग! म्हणून शंतनुच्या पंजीने समजून घातली.

भातुकलीचा डाव विस्कटला. पुन्हा कधीही न भेट होईल इतके ते दुर गेले. कोठे गेले काय झाले. काही कळले नाही. कारण तेंव्हा संपर्काची साधने कमी होती.

मग आज्जीच्या वडीलांनी या आपल्या आजोबांचे स्थळ शोधून आज्जीचे लग्न लावून दिले.

मन मारून आज्जी संसार करू लागली. पण पहिले प्रेम ते मधूनच उन्मळून येत. कोठे असेल कसा असेल या विचारात ती उदास होत.

निसर्गनियमानुसार आज्जीला तुझा बाबा आणि आत्या दोन मुले झाली.

तुझं आजोबा खुप कडक आणि संतापी. सतत आज्जीकडे संशयानं बघत. सासुरवास करत.कुलटा, अवलक्षणी असे अपशब्द वापरत.

आज सांगायला मला लाज वाटते पण, तुझ्या आत्याला तर दुसऱ्याचं पाप माझी फसवणूक करून माझ्या माथी मारले असे म्हणत.आज्जी सहन करायची इलाज नव्हता. .

आजोबा खुप बोलायचं अगदी मी सुन असुनही माझ्या समोर सुध्दा कित्येकदा आज्जीला अपमानित केले आहे. जाऊ दे गेले तेही माणूस गेल्यावर त्यांच्याविषयी वाईट बोलू नये असे म्हणतात.


"अग आई तु तर या घरची सुन मग हा इतिहास तुला कसा माहीत?" स्वराने आईला विचारले. "हो मला वाटलंच तु हा प्रश्न विचारणार."

"त्याचे असं झालं.आज्जी आणि माझे नातं खुप वेगळे होते. सासूसुनेपेक्षा आम्ही दोघी मायलेकी आणि मैत्रीणीच जास्त होतो.

मग कधी कधी आज्जी मनातलं बोलायची. पण कुठेतरी अडघळायची. जाऊ दे सांगेल कधीतरी असे म्हणायची. बोलताना तिची जीभ जड व्हायची. मग मी तिला आईडिया दिली.

आई एक काम करा. तुम्हांला मी एक डायरी देते. त्यात तुम्ही तुमचे आत्मचरित्र लिहून काढा.रोज दैनंदिनी लिहा. म्हणजे तुमचे मन हलके होईल. मनात कसलीच खदखद राहणार नाही.

आज्जीलही कल्पना पटली. तिने आत्मचरित्र लिहिले आणि जाताना माझ्या व बाबांच्या हातात सुपूर्द केले.

काय असेल त्या आत्मचरित्रात पाहूया पुढील भागात!.

क्रमशः
©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे

🎭 Series Post

View all