बंध प्रितीचे...

बंध प्रितीचे जुळले...
बंध जुळती प्रीतीचे
प्रीतीचे सुमधूर गाणे
गाणे मनी उमटले
उमटले प्रेम तराणे....

छेडल्या हृदयी तारा
तारा सात सुरांच्या
सुरांच्या जगात रमले
रमले जगी मनाच्या....

मधुर संगीत कानी
कानी पडले माझ्या
माझ्या अस्तित्वाला शोधते
शोधते संगीतात तुझ्या.....

प्रिय बासरी कान्हाला
कान्हाला प्रिय राधा
राधा प्रेयसी झाली
झाली कृष्णाला बाधा.....

~ सौ.प्रणाली चंदनशिवे.


🎭 Series Post

View all