# बंध रेशमी नात्याचे.. भाग -४३
राकेशला पाहताच अर्णवचा इतका वेळ रोखून धरलेला हंबरडा बाहेर पडला. तो चक्क रडत होता. अर्णवणे याआधी कधीही ड्रिंक केलेले राकेशने पाहिले नव्हते. त्याला फार वाईट वाटले. अर्णव स्वतःला सावरूही शकत नव्हता. राकेशने अर्णवला शांत केले.
“अर्णव काय झालेय ? तू रडू नकोस. तू बोल माझ्याशी.तू बोललास तर मला कळेल ना.” राकेश म्हणाला.
“राकेश मी खूप वाईट आहे. रियाला , ओवीलाही मी फसवले आणि पाहतोयस ना देवाने मला किती मोठी शिक्षा दिलीय. खूप स्वप्न पाहिली होती रे मी आमच्या सुखी कुटुंबाची पण आता ते काही शक्य नाहीये. ओवीची स्थिती पाहून मला माझाच राग येतोय. काय करू मी ?” अर्णवने रागाने जोरात ग्लास पकडला. त्याच्याकडून तो ग्लास फुटला आणि त्याचा हात रक्तबंबाळ झाला. हे पाहून तिथे लोक जमा झाले. राकेशचे डोळे पाणावले होते.
“अर्णव अरे हे काय केलेस तू ? बघ किती रक्त येतेय. तू असा स्वतःला त्रास करून घेऊन परिस्थिती बदलणार आहे का ? सांग पाहू.” असे म्हणून राकेशने वेटरला बोलावून त्याला फस्टेड बॉक्स आणायला सांगितला.
“ही जखम दिसली म्हणून तू उपचार करशील
पण माझ्या इथे जखम झाली आहे. (असे म्हणून अर्णवणे त्याच्या हृदयाकडे बोट दाखवले.) त्याचे काय ? आहे तुझ्याकडे काही इलाज ? नाही ना. मग नकोय मला तो फस्टेड बॉक्स.” असे म्हणून अर्णवने रागाने जोरात फस्टेड बॉक्स ढकलला. मॅनेजर धावतच हा काय प्रकार सुरू आहे ते पाहायला आला.
पण माझ्या इथे जखम झाली आहे. (असे म्हणून अर्णवणे त्याच्या हृदयाकडे बोट दाखवले.) त्याचे काय ? आहे तुझ्याकडे काही इलाज ? नाही ना. मग नकोय मला तो फस्टेड बॉक्स.” असे म्हणून अर्णवने रागाने जोरात फस्टेड बॉक्स ढकलला. मॅनेजर धावतच हा काय प्रकार सुरू आहे ते पाहायला आला.
राकेशने हात जोडून माफी मागितली. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी काही रक्कम स्वतः हून काऊंटरवर ठेवली. वेटरच्या मदतीने तो अर्णवला घेऊन चालला होता. अर्णवच्या वेदना राकेशला हळवे करत होत्या. आता त्याचे डोळे डबडबले होते.
राकेशने अर्णवला गाडीत बसवले. आता त्याला या अवस्थेत घरी नेले तर काका काकू ही उगाच टेन्शन घेतील हा विचार करून तो अर्णवला त्याच्या घरी घेऊन गेला. घरी गेल्यावरही अर्णव पुन्हा पुन्हा तेच वाक्य रिपीट करत होता. अर्णव नशेत होता. त्यामुळे त्याचा कधी डोळा लागला त्याचे त्यालाच कळले नाही. अर्णव झोपला आहे हे पाहून राकेशने अर्णवच्या हाताला ड्रेसिंग केले.
राकेशला मात्र डोळ्याला डोळा लागला नाही. त्याला सतत चांगल्या व्यक्तींना विनाकारण देव शिक्षा देतोय असे वाटत होते. ‘यावर काही उपाय नसेल असे होऊच शकत नाही. हा मनात विचार आला आणि त्याने खूप विचार केल्यानंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने उद्या अर्णवलाही हा विचार स्पष्ट बोलून दाखवायचा असे ठरवले. भलेही अर्णवला ते पटो अथवा न पटो पण याशिवाय दुसरा पर्याय नाही.’ हा मनात विचार करून तो पहाटे झोपी गेला.
अर्णव आता शुद्धीवर आला होता. त्याला आपण जे वागलो त्याबद्दल गिल्टी वाटत होते. आई बाबांचा विचार मनात येऊन तो राकेशला काही न बोलता त्याच्या घरून कॅब बुक करून हॉटेलमध्ये पोहोचला. गाडीची चावी त्याला राकेशच्या टेबलवर मिळाली होती. ती घेऊन तो हॉटेलमध्ये स्वतःची गाडी घ्यायला पोहोचला. गाडी घेऊन तो थेट घरी आला. त्याचा चेहरा खूपच वेगळा दिसत होता. शिवाय हाताला बांधलेली ती पट्टी आई बाबांच्या काळजाला घाव घालत होती.
त्याला असे पाहून आई-बाबांनाही खूप वाईट वाटले.
आई म्हणाली , “काय रे अर्णव ,हे तुझ्या हाताला काय झाले आहे ?”
“काही नाही आई , हाताला सुरी लागलीय.” अर्णव म्हणाला.
“कुठे होतास तू रात्रभर ? असा वागू नकोस. अरे तिकडे ओवीला सांभाळताना तिच्या आई बाबांची किती कसरत होतेय आणि तू असा रात्र रात्र बाहेर राहिलास हे जर ओवीला समजले तर ओवीच्या मनाला आणखी घोर लागेल आणि मग ती स्वतःला दोष देत बसेल.” आई हळवी होऊन बोलत होती.
आई जे बोलत होती ते वाक्य न् वाक्य अर्णवला अधिकच वेदना देत होते.
“आई सांगितले ना मी , मी किशोरच्या घरी होतो म्हणून. त्याने मला काल जेवायला बोलावले होते. उशीर झाला म्हणून तिथेच झोपलो. तू नको काळजी करूस.” अर्णव म्हणाला.
“जा बरं , आता पटकन फ्रेश होऊन ये. बाबा म्हणाले ,”आणि हो अर्णव लक्षात ठेव ही तुझी शेवटची चूक असेल. असे न सांगता , फोन स्विच ऑफ करून बाहेर थांबलेला मलाही चालणार नाही. आम्ही दोघेही तुझ्या काळजीने रात्रभर जागेच आहोत.” बाबा म्हणाले
“सॉरी आई बाबा ! यापुढे ही चूक कधीच होणार नाही.” अर्णव आपली चूक मान्य करून आई-बाबांची माफी मागून निघून गेला.
*************************
इकडे किशोरला अचानक जाग आली. आजूबाजूला अर्णव नाहीये हे पाहून त्याने टेबलवर ठेवलेली चावी पाहिली आणि त्याच्या लक्षात आले. अर्णव कुठे गेला असेल या काळजीने त्याने अर्णवला कॉल केला पण अर्णवचा कॉल पुन्हा नॉट रीचेबल येत होता.
आता मात्र राकेशच्या मनात विचारांचे काहूर माजले. सतत कॉल करता करता चुकून त्याच्याकडून रियाचा कॉल हिस्ट्री मध्ये असलेला नंबर डायल झाला.
आता मात्र राकेशच्या मनात विचारांचे काहूर माजले. सतत कॉल करता करता चुकून त्याच्याकडून रियाचा कॉल हिस्ट्री मध्ये असलेला नंबर डायल झाला.
रियाने फोन उचलला. तोच राकेश म्हणाला , “अर्णव अरे का असा वागतोयस ? कुठे आहेस तू ? मगाच पासून किती कॉल करतोय मी तुला. प्लीज हे सगळे थांबव. अरे माझ्या डोक्यात एक विचार आला आहे. तो तुला सांगितल्यावर तू जो निर्णय घेशील त्याचे समर्थन मी करेन. कारण माझा विचार सध्याच्या सिच्युएशनवर एक मात्र उपाय आहे असे मला वाटतेय. अरे बोल ना. तू काही बोलत का नाहीयेस ? कुठे आहेस तू ? मी येतोय तुला भेटायला. सांग ना.” अर्णवच्या काळजीने राकेश नॉन स्टॉप इतके काही बोलला की रियाला अर्णवची जास्तच काळजी वाटू लागली होती.
रिया म्हणाली , “हॅलो राकेश , काय झालेय रे ? तू मला कॉल केला आहेस. अर्णव कसा वागतोय ? काय झालेय नेमके ? प्लीज सांगशील का मला ?”
रियाचा आवाज ऐकून राकेशने फोन समोर पकडला. खरोखरच त्याने रियाचाच नंबर डायल केला होता.
“हे काय होतेय रिया ? नियतीने तुम्हा दोघांना ज्यावेळी हवे होते त्यावेळी एकत्र आणले नाही आणि आता नियतीच्या मनात काय आहे काय माहित ? तुला फोन कसा लागला ? हे मलाही न उघडलेले कोडे आहे.” राकेश हताश होऊन म्हणाला.
रिया म्हणाली , “ते जाऊ दे रे. झालेल्या गोष्टी आपल्या हातात नाहीयेत पण आता काय झालेय ? ते सांग.”
“अगं अर्णव सतत बाप होऊ शकणार नाही याचे टेन्शन घेतोय. काल कधीही ड्रिंक न करणारा तो दारू पिऊन हॉटेलमध्ये खूप विचित्र वागलाय. त्याच्या हाताला झालेली ती जखम बापरे असह्य होतेय मला हे सगळे. अर्णवच असा वागला तर ओवीने काय करायचे ? असे म्हणतात , स्त्रियांपेक्षा पुरुष कठोर असतात पण अर्णवमध्ये काल मला खूप हळवा पुरुष दिसला. पण डोन्ट वरी ! मी खूप विचार केला आणि एक निर्णय घ्यायचा ठरवला आहे. तो अर्णवला मान्य करावाच लागेल कारण बघ त्या निर्णयामध्ये त्याचे भलेच आहे. तो त्याचे दुःख नक्की हलके करू शकेल असे मला वाटते.” राकेश म्हणाला.
रिया म्हणाली , “काय आहे तुझा निर्णय ?”
“हे बघ या आता अर्णव आणि ओवी आई बाबा होणार नाहीत हे सत्य त्यांना स्वीकारावेच लागेल. यात बदल होत नाही म्हटल्यावर आपण त्यांना आई-बाबा होण्याची एक संधी तर देऊ शकतो. जेणेकरून एका अनाथ बाळाला आई बाबांचे प्रेम मिळेल.आणि अर्णव ,ओवी त्यांचे पालकत्वाचे सुख भरभरून जगतील.” राकेश म्हणाला.
“काय !” रिया म्हणाली.
“रिया , यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे. अगं सतत निगेटिव्हिटी येत राहिली तर दोघांची मानसिकता किती डिस्टर्ब होईल. त्यापेक्षा लहान मुलाला सांभाळताना ते दोघेही या निगेटिव्हिटीला दूर लोटून देतील असा मला विश्वास वाटतोय पण अर्णव तयार होईल की नाही ? ते पाहावे लागेल.” राकेश म्हणाला.
रियाला ही अतिशय धक्कादायक गोष्ट वाटत होती. ‘स्वतःची मुले असताना अर्णव त्यांना जवळ घेऊ शकत नाही की , मुलांना बाबाचे प्रेम मिळत नाही. माझ्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यात वादळच निर्माण झालेय.’ हा मनात विचार करून रिया तिच्याच विचारात हरवली.
राकेश म्हणाला , “रिया अगं काय झाले ? मी काय बोलतोय ,तुला हा माझा निर्णय योग्य वाटतोय ना ?”
“हो .” रिया जड अंतःकरणाने म्हणाली.
“बरं रिया ठेवू का मी फोन ? मला अर्णवची खूप काळजी वाटतेय. त्याचा फोन लागत नाहीये पण पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहतो.” असे म्हणून राकेशने फोन ठेवला.
पुन्हा तो अर्णवचा फोन ट्राय करत होता. रिंग वाजली. तसा राकेशने पुन्हा फोन आपल्या चेहऱ्यासमोर पकडला. आता अर्णवलाच कॉल लागला होता. अर्णवणे कॉल उचलला.
अर्णव म्हणाला , “ बोल रे राकेश ,आत्ताच चार्जिंगचा फोन काढला. तुझे मिस कॉल पाहून आता मी तुलाच कॉल करणार होतो. काल मी जे वागलो त्याबद्दल सॉरी !”
“ये अर्णव सॉरी वगैरे म्हणू नकोस रे. एक मित्र म्हणून मी तुझ्या भावना समजू शकतो. काल जे घडले ते परत घडू नये किंवा तुझ्या आनंदासाठी म्हण. मला असे वाटते की ,तू अनाथ आश्रमातून मूल दत्तक घ्यावे. म्हणजे बघ ना ,तुम्हा दोघांनाही आई-बाबा होण्याचा आनंद मिळेल शिवाय एका अनाथ मुलाला इतके चांगले आई बाबा मिळतील. मी स्पष्ट बोलतो हे तुला माहित आहे. तुझा निर्णय सांग मला. माझ्या मित्राचे अनाथ आश्रम याच शहरात आहे. आपण त्यांच्याकडे तू म्हणशील तेव्हा जाऊन चौकशी करू शकतो.”
काय असेल अर्णवचा निर्णय ?
पाहूया पुढील भागात क्रमशः
©®सौ.प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)