# बंध रेशमी नात्याचे.. भाग -४६
अर्णव आणि ओवी त्यांच्या गाडीतून उतरत होते. रियाने नुकतेच अंशला फीडिंग करून बेबीसाठी असलेल्या त्या क्यूट अशा सायकलमध्ये झोपवले होते. अर्णवला दुरूनच पाहताना रियाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
‘अर्णव आज पहिल्यांदा त्याच्या गोड बाळाला पाहणारेय. किती बरे झाले असते ना ,तो त्याच्या मुलीलाही पाहू शकला असता तर ? असो अंशला तरी त्याच्या बाबाचे प्रेम मिळतेय याचे समाधान वाटतेय.’हा मनात विचार करून रिया ट्रान्सपरंट ग्लासच्या मागे असलेला कर्टन बाजूला सरकवत ओवी आणि अर्णवला येताना पाहत होती. आई-बाबा घरीच थांबले होते.
अर्णव आणि ओवी अगदी आनंदाने राकेशकडे आले. राकेश त्यांची वाट पाहत बसला होता. अर्णव राकेशजवळ गेला.
टेबलमुळे अर्णवला किशोरच्या बाजूचे काहीच दिसू शकले नाही. तेव्हा त्याच्यासोबत कोणीच नाही म्हटल्यावर त्याचा चेहरा पडला होता.
“कुठे आहे तुझा मित्र ?” अर्णव राकेशला म्हणाला.
“तो नाही आला.” राकेश म्हणाला.
अर्णव म्हणाला , “तुझा मित्र आला नाही ?”
“नाही आला रे ,तुला सांगितलं ना त्याच्या बायकोची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला तिथेच थांबावे लागले. आताही तो तिला हॉस्पिटलमध्येच घेऊन गेलाय.” किशोर.
ओवी आणि अर्णवचा चेहरा अगदीच खिन्न झाला होता.
“मग तू आम्हाला इथे का बोलावलेस?” अर्णव उदास होऊन म्हणाला.
“अरे बेबी घ्यायला. मित्र आला नसला तरी त्याने आपली क्युटशी अमानत माझ्याकडे सोपवली आहे.” असे म्हणून स्मितहास्य करत किशोरने हळूच सायकलकडे बोट दाखवले.
ओवी आणि अर्णव उठून उभे राहिले. बाळाला पाहताच अर्णवच्या मनात एकानामिक ओढ निर्माण झाली. तो लगेचच बाळाजवळ गेला.
ओवीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
“किती गोड बाळ आहे ना!” ओवी हळू आवाजात म्हणाली.
“हो ग ,याच्याकडे पाहिल्यावर असे वाटतेय की याला उचलून घ्यावे.” अर्णव हात पुढे करत म्हणाला.
“नाही अर्णव , आत्ता त्याची झोप सुरू आहे. तू त्याला डिस्टर्ब नको करू.” ओवी अर्णवचा हात मागे घेत म्हणाली.
“हो अर्णव ,आत्ताच अंश झोपलाय. त्याला उठवू नकोस. नाहीतर आपली फजिती व्हायची.” राकेश म्हणाला.
“अंश याचे नाव आहे का ?” ओवी म्हणाली.
“नाही. अजून तरी याचे कोणी नाव नाही ठेवले पण याच्या आईची अशी इच्छा होती की , तिच्या बाळाचे नाव अंश ठेवावे आणि ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. काय करणार ना मग ,थाटात बाळाचे बारसे ?” राकेश हसून म्हणाला.
बाळाकडे पाहत ओवी म्हणाली , “हो करू आम्ही बाळाचा नामकरण सोहळा. तो ही अगदी थाटात. हो ना रे अर्णव.”
अर्णव मात्र कसल्या तरी विचारात हरवला होता.
“अर्णव अरे काय झालेय तुला ? कसला विचार करतोयस?” ओवी म्हणाली.
“मी ? नाही. काही नाही.” अर्णव.
“मग सांग बरं मी आत्ता काय म्हणाले ते.” अर्णव सहजासहजी त्याच्या मनातील विचार बोलून दाखवत नाही हे माहीत असल्याने ओवी पुन्हा म्हणाली.
“सॉरी!” अर्णव ओवीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला.
“फक्त सॉरी! नकोय मला. तू तुझ्या मनात काय सुरू आहे ते बोलून दाखव तरंच माफ करेन मी तुला.” ओवी थोडीशी नाराजीच्या स्वरात म्हणाली.
“काही नाही. पण माझ्या मनात एक विचार आला. असे कसे आपण हे बाळ आपले म्हणू शकतो ना ? लिगली त्यांच्याकडून आपल्याला हा मुलगा मी दत्तक दिला आहे हे लिहून घ्यायला हवे की नको ? उद्या त्या व्यक्तीने आपले मत बदलले आणि हा त्याचाच मुलगा आहे जो त्याला परत हवा आहे असा हट्ट केला तर ? आपले काय होईल ? देव न करो आणि असे काही घडो पण मनात…” अर्णव पुढे बोलणार तोच राकेश म्हणाला , “आजवर तू माझ्यावर विश्वास ठेवलास त्याला कधी तडा गेला आहे का ? मग यावेळीही माझ्यावर विश्वास ठेवून बघ. असे काही होणार नाहीये.”
अर्णवने होकारार्थी मान हलवली. राकेशने आधीच स्नॅक्सची ऑर्डर दिली होती. स्नॅक्स घेऊन येणाऱ्या वेटरला ओवीचा हात लागला. प्लेट्स खाली पडता पडता राहिल्या. पण अर्णवच्या ड्रेसवर सॉस सांडला. ओवीने तो सॉस टिशूने क्लीन केला पण तरीही तो म्हणाला , “मी फ्रेश होऊन आलो.”
अर्णव फ्रेश व्हायला वॉशरूम कडे जात होता. त्याला रियाचा चेहरा ट्रान्सपरंट ग्लासमधून स्पष्ट दिसला. रियाने मात्र तिथून जाण्याचा निर्णय घेतला. चेहऱ्यावरती स्कार्फ बांधून रिया बेबीला घेऊन चालली होती.
तितक्यात मागून येणाऱ्या अर्णवचा रियाला धक्का लागला. रियाच्या हातातील ब्रेसलेट आणि तिचे डोळे अर्णवला ती रियाच आहे याची खात्री पटवत होते.
अर्णवणे “रिया तू ?” असे विचारल्यावर ओवीची नजर रिया आणि अर्णवकडे गेली.
अर्णवणे “रिया तू ?” असे विचारल्यावर ओवीची नजर रिया आणि अर्णवकडे गेली.
रियाने हातात पकडलेली बेबी सायकल आणि राकेश जवळ असलेल्या बाळाची सायकल अगदी सेम होती. शिवाय दोन्ही मुले एकसारखीच दिसत होती.
अर्णव हळूच सायकलकडे पाहत म्हणाला , “हे बाळ घेऊन कुठे निघालीस ? का सतत माझा पाठलाग करतेस ? तुझ्या सुखाच्या मध्ये येणार नाही असे म्हणत होतीस ना ? मग आता हे माझे सुख माझ्यापासून का हिरावून घेतेस ? पाळत ठेवत होतीस का माझ्यावर ?”
तितक्यात ओवी अर्णवचे काय चाललेय ? तो कोणावर ओरडतोय ? हे पाहायला अर्णवजवळ आली.
“ओवी तुझे लक्ष कुठे होते ?बघ रिया आपल्या बाळाला घेऊन चाललीय.” अर्णव वाट्टेल ते बोलत होता.
रियाच्या डोळ्यातून फक्त अश्रू येत होते. ती जायचा प्रयत्न करत होती पण अर्णवणे तिचा हात घट्ट पकडला.
“अर्णव अरे काय बोलतोयस तू हे? सोड तिचा रिया इथे कशी असेल ? आणि का करेल ती असे ?” ओवी रागावून म्हणाली.
“विश्वास नाही ना तुझा माझ्यावर ? हे बघ हे ब्रेसलेट. आठवतेय ना ओवी तुला ? रियाने तिच्या हातात घातल्यावर ते तुलाही खूप आवडले होते. ही रियाच आहे. तिला तोंड दाखवायला सांग.” अर्णव.
रियाचा हात सोडवत ओवी म्हणाली , “ब्रेसलेट सारखे ब्रेसलेट असते अर्णव.”
“पण हे बघ. हे ब्रेसलेट मी दिलेले आहे तिला. रिया लिहिले आहे त्याच्यावर .त्यामुळे ते माझ्या चांगलेच लक्षात आहे.” अर्णव म्हणाला.
त्यावर रागाच्या भरात अर्णव जे बोलला ते ऐकून ओवी मागे सरकली.
रियाच्या हातून बाळाची सायकल पकडून अर्णव म्हणाला , “तू माझ्या आयुष्याला लागलेले ग्रहण आहेस. कितीही दूर जायचा प्रयत्न केला तरी नेहमी माझ्या आयुष्यात अडचणी घेऊन येतेस. आज तुझ्यामुळेच माझ्या हसत्या खेळत्या कुटुंबात अडचणी निर्माण झाल्यात.”
रिया मागे फिरून परत चालली होती.
राकेशने तिचा हात पकडला आणि तो म्हणाला , “अर्णव काय समजतो काय तू स्वतःला ? तू तिला एकटीलाच दोष देऊ नकोस. तू ही खूप चुकलास. तिच्याशी लग्न केलेस ,तिची मदत मिळवलीस वर खोटे आरोप करतोयस.”
राकेशने तिचा हात पकडला आणि तो म्हणाला , “अर्णव काय समजतो काय तू स्वतःला ? तू तिला एकटीलाच दोष देऊ नकोस. तू ही खूप चुकलास. तिच्याशी लग्न केलेस ,तिची मदत मिळवलीस वर खोटे आरोप करतोयस.”
“लग्न केलेस.” हे ऐकताच ओवीला चक्कर आली. ती खाली कोसळणार तितक्यात अर्णवने तिला पकडले. तो तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. राकेशही रियाला आणि तिच्या बाळांना घेऊन अर्णवजवळ हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी काहीही घाबरण्यासारखे नाही असे सांगितले. तेव्हा राकेश आणि रिया घरी गेले. ओवी अगदी थोड्या वेळातच शुद्धीवर आली.
अर्णवला जे झाले त्याचा पश्चाताप होत होता. भूतकाळातील घटना ओवीला सांगण्याशिवाय पर्याय नसल्याने त्याची ओवीच्या डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत होत नव्हती.
“रिया कुठे आहे ?” ओवी म्हणाली.
“ती घरी गेली असेल. जाऊ दे. तू नको टेन्शन घेऊस.” अर्णव म्हणाला.
“असे कसे ? माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात इतके काही घडले आणि मला माहित नाही हे ऐकल्यावर माझ्यासारखी दुर्दैवी स्त्री मीच असेल असे मला वाटू लागलेय.” ओवी डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना वाट मोकळी करत म्हणाली.
“ओवी रियाशी माझा काहीच संबंध नाहीये. जे झाले ते एक वाईट स्वप्न होते. मी विसरलोय तू ही विसर. हा सगळा घोळ त्या सेम सायकलमुळे झाला. मला वाटले रिया आपल्या बाळाला घ्यायला आली की काय !” अर्णव म्हणाला.
“ते काहीही असू दे. मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तू आज रियाला घरी बोलून घे.” ओवी म्हणाली.
अर्णव बाहेर आला. त्याने राकेशला कॉल केला आणि ओवी काय म्हणाली ? ते सांगितले.
राकेश अगदी काही क्षणात हॉस्पिटलमध्ये आला.
राकेशला पाहताच अर्णव म्हणाला , “काय गरज होती राकेश तुला , मागच्या गोष्टी पुढे आणायची ?”
“हाच प्रश्न मी तुलाही विचारू शकतो. मिस्टर अर्णव. मी नेहमी तुला मित्र मानत आलो पण तू मात्र मैत्री करण्याच्या योग्यतेचाच नाहीस असे मला वाटतेय. रिया किंवा ओवी या दोघींच्याही भावनांशी तू खेळला आहेस. ती दोन्ही मुलं तुझी आहेत. तुझी आणि रियाची. माझ्याकडून रियाला ओवी विषयी समजले आणि तुम्हां दोघांना आनंद देण्यासाठी रियाने तिचा मुलगा तुला दत्तक द्यायचा ठरवले होते आणि म्हणून ती त्या हॉटेलमध्ये आली होती.”
अर्णव आणि राकेश चे बोलणे ओवीच्या कानावर पडले होते.
ओवीने रियाला घरी का बोलावले असेल ?
दोन्ही मुले आपली आहेत हे ऐकल्यावर काय असेल अर्णवची प्रतिक्रिया ?
पाहूया पुढील भागात क्रमशः
©®सौ. प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)