बंध रेशमी नात्याचे..भाग -५२

घरात असलेली स्थिती कानी पडल्यावर ओवी आत जाईल का ?ओवीला त्या मुली विषयी माहिती मिळेल का ?
बंध रेशमी नात्याचे...भाग -५२




ओवी निशब्द झाली होती. ती पटकन खुर्चीत बसली. एवढ्याशा मुलीचा तो निरागस चेहरा तिच्या डोळ्यासमोरून कितीही प्रयत्न केला तरी दूर होत नव्हता.

“काय झाले ओवी ? तुला नसेल जमणार तर मी स्वतः त्या वर्गात जाऊन प्रयत्न करेन. तुझ्यासारखी शिक्षीका आणि महत्त्वाचे म्हणजे तिची आई बनण्याचा.” मिस मेरी.


“तसे नाही मिस मेरी पण काय झाले असेल तिच्या आईला ? म्हणजे तिच्या घरी कोण कोण असते ? की तिला सावत्र आई वगैरे असेल.. आणि तिचा छळ करत असेल तर..! ही सगळी माहिती आपण मिळवायला हवी. तरच आपण तिच्याशी संवाद साधू शकतो.” ओवी म्हणाली.


“ते मलाही माहित नाही. तिचे ड्रायव्हर तिला सोडायला येतात. तेव्हा मी त्यांना तिच्या पेरेंट विषयी विचारले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते नकारार्थी मान डोलावत इथून निघून गेले. मला वाटते तिला आई आणि वडील दोघेही नसावेत बहुतेक.” मिस मेरी.



“असे असेल तर फार अवघड आहे. तरीही मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. डोन्ट वरी मिसमेरी !”ओवी म्हणाली.

“मला माहित होते ओवी , तू मला नाराज नाही करणार आणि माझा पूर्ण विश्वास आहे की तू त्या अबोलीला अगदी बोलकी बाहुली करणार ! शिक्षण म्हणजे तरी दुसरे काय असते ? बालकांचा सर्वांगीण विकास हेच ना. शिक्षक म्हणून आपले तेच तर कर्तव्य असते.”मिस मेरी.


“हो मिसमेरी.” असे म्हणून ओवीने प्युनकडे पैसे देऊन काही साहित्य आणायला सांगितले. जे तिला क्लासमध्ये गेल्यावर त्या चिमुकलीसाठी वापरायचे होते. प्युन आल्यानंतर ओवीने ते साहित्य घेऊन “जाऊ मी. आज पासूनच मी प्रयत्न सुरू करते.” असे म्हणून मिस मेरी ची परमिशन घेतली.


“हो चालेल. जा तू. ऑल दि बेस्ट डॉटर!” मिसमेरी.


ओवीला मिस मेरी कडून डॉटर म्हणून घेताना एक वेगळीच ऊर्जा मिळायची जी तिला सक्सेस मिळवून द्यायची.


ओवी क्लासकडे जायला निघाली. ओवीचा आरवही त्याच क्लासमध्ये होता. ओवी क्लासमध्ये गेल्यावर आरव अगदी आनंदाने उड्या मारत म्हणाला , “मम्मा तू !”

तशी सर्व मुले ओवी आणि आरवकडे पाहू लागली.

ओवी म्हणाली , “आरव डोन्ट से मी मम्मा नाऊ. आय एम अ टीचर अँड वी आर इन द क्लासरूम. अंडरस्टँड!”


“सॉरी मम्मा !नो !नो !मिस.” आरव जीभ चावत म्हणाला.

तशी सर्व मुले हसू लागली पण कोपऱ्यात बसलेली ती मात्र भिंतीकडे एकटक पाहात होती.


ओवीने सर्व मुलांना आपापले नाव सांगण्यासाठी उभे केले. सर्व मुले पटापट नाव सांगून खाली बसत होती. तिचा नंबर आल्यावर ती मात्र मान खाली घालून बसली. ओवीने तिला फोर्स केला नाही. ओवीने पर्समधून वेगवेगळ्या कलरचे बलून काढले. प्रत्येकाला एक- एक बलून देत तो फुगवायला सांगितला. तिने त्या बलून कडे पाहिलेही नाही. मुलांचे कलरफुल बलून सर्व वर्गात अगदी चैतन्य निर्माण करत होते. ओवीने सर्वांना बलून घेऊन उभे केले.

मुले ब्लॅकबोर्ड समोर मागे उभ्या असलेल्या ओवीकडे तोंड करून उभी होती. ओवी तिच्या शेजारी उभी राहून मुलांचे फोटो कॅप्चर करत होती. अचानक एका मुलाकडून बलून फुटला. घाबरून ती ओवीला बिलगली.
ओवीचा आनंद गगनाला भिडला होता. एका भेटीत का असेना तिने ओवीवर विश्वास टाकला होता. ही गोष्ट ओवीसाठी खूप महत्त्वाची होती. ओवीला तिला घट्ट मिठी मारावीशी वाटत होती पण ओवीने स्वतःला आवरले.
सगळा वर्ग तिच्याकडे बघून हसत होता. ओवीने डोळे मोठे करताच सर्वजण शांत झाले. थोड्यावेळाने तिने ओवीला सोडले आणि ती पुन्हा भिंतीकडे पाहत बसली.


ओवीने सगळ्यांना बलून फुगवले म्हणून चॉकलेट दिले. सर्व मुले खुश झाली. ओवीने तिच्यासमोरही एक मोठी कॅडबरी ठेवली. तिने नेहमीप्रमाणे त्या कॅडबरीलाही इग्नोर केले.


ओवीने क्लासमध्ये राईम्स म्हणायला सुरुवात केली. मुले उत्साहाने अगदी उड्या मारत राईम्स म्हणत होती. त्यानंतर ओवीने एक सुंदर गोष्ट सांगितली. टोपीवाला आणि माकडे टोपीवाल्याची झालेली फजिती पाहून मुले जोरजोरात हसायला लागली. तेवढ्यात बेल झाली. लंच ब्रेक झाला होता. ओवीने तिचा डब्बा क्लासमध्येच मागवला.


सर्वजण आपापल्या मित्र-मैत्रिणींच्या हाताला पकडून टिफिन बॅग घेऊन ऐटीत जेवायला निघून गेले. ओवीने तिच्याकडे पाहिले. ती ही हळूच ओवीकडे पाहत होती. ओवीने तिच्या बॅगमधून टिफिन काढला. ओवी तिच्या समोरच्या बेंचवर जाऊन बसली. आणि तिला म्हणाली , “आपण दोघींनी खायचा का टिफिन ?”

तिने टिफिन उघडला. ओवीच्या डोळ्यात पाणी आले. टिफिनमध्ये करपलेली पोळी होती. त्यावर सॉस स्प्रेड केला होता.

ओवी म्हणाली , “कोणी बनवली ही पोळी?”

ती पुन्हा गप्प झाली. ओवीने तिचा टिफिन स्वतःला घेतला आणि स्वतःचा टिफिन तिच्यासमोर पकडला. ओवीच्या इडली सांबारच्या घमघमाटाने कोणाच्याही तोंडाला पाणी आले असते. पण तिच्या मात्र डोळ्यात पाणी होते. तिला खूप काही सांगायचे होते पण कसे आणि कुठून सुरुवात करायची हे त्या चिमुकलीला काहीच कळत नव्हते. तिच्या अंतर्मनात चाललेली घालमेल ओवीने जाणली होती.


तेरे दिल का मेरे दिल से रिश्ता पुराना है
इन आँखों से हर आंसू मुझको चुराना है
मुझको चुराना है, मुझको चुराना है
तेरे दिल का मेरे दिल से रिश्ता पुराना है

तेरी बेचैनी का, तेरी तन्हाई का
एहसास है मुझको सुन
मैं जो साथ तेरे हू फिर तुझे है कैसा गम
दर्द बाट लेंगे हम सुन
इन पलको में खुशियों का सपना सजाना है
तेरे दिल का मेरे दिल से रिश्ता पुराना है





ओवीने तिच्या डोळ्यात पहात स्पोर्कने इडली सांबर मध्ये बुडवून तिच्या ओठांजवळ पकडली. ती नको म्हणत नकारार्थी मान डोलावत होती. ओवीने तिच्या डोक्यावरती हात ठेवला. डोळ्यांतून हलकेच तिला इडली खाण्यासाठी विनंती केली. तिनेही आ करत इडलीचा एक घास घेतला.


तितक्यात आरव क्लासमध्ये आला. आपल्या आईला दुसऱ्या कोणालातरी भरवताना बघितल्यावर आरवला फार वाईट वाटले.

तो जरा चिडून म्हणाला , “हे काय मम्मा मी ही लहानच आहे ना ? पण तू मला भरवतेस का ? मग तिला का भरवतेस ? तू माझी मम्मा आहेस मलाच भरव.”

तशी ती उठून बाहेर पळाली.

‘आता यावेळी आरवलाही रागवण्यामध्ये काहीच अर्थ नव्हता. त्यापेक्षा घरी गेल्यानंतर त्याला समजावून सांगता येईल कारण आरवला त्या मुलीचा प्रॉब्लेम थोडीच माहीती होता. आरवने त्याच्या बालमनाप्रमाणे विचार केलाय.’ हा मनात विचार करून ओवी शांत बसली.

तिने आरवला जवळ घेतले आणि ती म्हणाली , “आरव भुकेल्या व्यक्तीच्या मुखात घास घालताना ती व्यक्ती लहान , मोठी किंवा आपली , परकी ही भावना नसते ठेवायची. बघ ती निघून गेली. तिला भूक होती पण तू तसे बोललास म्हणून तिला वाईट वाटले. बाळा आज तू खूप चुकलास.”


“हो मम्मा. सॉरी! पण ती नेहमी अशीच सगळ्यांपासून लांब राहते.” आरव.


“हो बाळा मला माहितीये. पण ती आपल्यामध्ये मिक्स होत नसेल तर आपण तिला आपल्या मध्ये मिक्स करून घेतले पाहिजे ना ?” ओवी.


तितक्यात मिसमेरी क्लासमध्ये आल्या आणि ओवीला म्हणाल्या , “हे काय ओवी ? आता लंचही क्लासमध्ये बसून करणार आहेस की काय ? अगं मी केव्हापासून तुझी वाट पाहतेय आणि तू इथे बसलीयेस.”


“ती एकटीच होती ना इथे , म्हणून मम्मा येथे थांबली. हो ना मम्मा?” आरव

ओवीने मानेनेच हो म्हटले तसा आरव बाहेर पळाला.


“ती कोण ?” असे मिस मेरी म्हणतात न म्हणतात तोच त्यांना आरव कोणाबद्दल बोलतोय हे समजले.
आणि त्या पुढे म्हणाल्या , “ओवी अगं मग तू तिच्या सोबत जेवत होतीस तेव्हा तिने काही प्रतिसाद दिला का ?”


हताश होऊन ओवीने नकारार्थी मान हलवली.
आणि ती म्हणाली , “मिस मेरी मी तिच्या घरी गेले तर चालेल का ? मला जाणून घ्यायचे आहे की नेमके तिच्या अशा अलिप्त वागण्या मागचे कारण काय आहे ते?”


“ओवी डॉटर ,अग फक्त चालणारच नाही तर धावेल! मला खूप आनंद होतोय की , तू मी सांगितलेस म्हणून तिच्यासाठी इतके काही करायला तयार होत आहेस.” मिस मेरीने ओवीच्या डोक्यावरती हात ठेवला.


मिस मेरी निघून गेल्या तरी ओवीच्या डोक्यात तेच विचार सुरू होते. ‘मिस मेरी म्हणाल्या की , मी सांगितले म्हणून पण कसे सांगू मिस मेरी मलाही तिच्याबद्दल खूपच आपुलकी वाटतेय. का कोण जाणे ? तिचे आणि माझे या जन्मीचे नसले तरी आधीच्या जन्मीचे काहीतरी नाते असावे.’ ओवी मनात विचार करत होती.


स्कूल टाईम संपल्यानंतर आरवला घेऊन ओवी तिच्या बाइकवर घरी चालली होती. आरव म्हणाला , “मम्मा आय एम सो लकी ना !”

“व्हाय ?” ओवी म्हणाली.

“बिकॉज आय बॉर्न ऑन ट्वेंटी फिफ्थ डिसेंबर.” आरव.

“एस!” असे म्हणून ओवीने आरवच्या डोक्यावरती हात ठेवला.

पण ओवीला तरी आरवची खरी बर्थडेट कुठे ठाऊक होती. तिला ज्या दिवशी आरव मिळाला तीच त्याची बर्थडेट समजून ती त्या दिवशीच त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायची. ख्रिसमस डे तिच्यासाठी आरवच्या आगमनामुळे स्पेशल आणि अर्णवच्या विरहाने व्याकूळ असायचा.
ओवीच्या गाडीचा स्पीड वाढला होता. आता आरव मोठा होत होता. त्याला वेगवेगळे प्रश्न पडत होते आणि जेंव्हा त्याला हे समजेल की तो ओवीचा मुलगा नाहीये तेंव्हा तो कसा रिऍक्ट होईल याची ओवीला चिंता वाटत होती.


********************


दुसरा दिवस उजाडला. मिसमेरीने दिलेल्या पत्त्यावर ओवी पोहोचली. आलिशान बंगल्यात कसली तरी धावपळ सुरू होती. नोकरचाकर अगदी वेगाने धावत होते. मोठ्याने काहीतरी तोडफोड झाल्याचा आवाज येत होता आणि हे काय एका मोठ्या गाडीतून डॉक्टर उतरून त्या आलिशान बंगल्याकडे जात होते. ओवीने पुन्हा एकदा ऍड्रेस चेक केला. ऍड्रेस तर तोच होता. ओवी दारात पोहोचली.

तेंव्हा हॉलमध्ये एक व्यक्ती धाय मोकलून रडत होता.


“डॉक्टर कोणत्या कर्माची फळ भोगतोय हो मी ? काय होऊन बसलेय हे सगळे. हा त्रास माझ्याच्याने आता पाहावत नाहीये. त्यापेक्षा डोळे मिटलेले बरे असे वाटते. मी जगतोय फक्त त्या चिमुकलीसाठी.”


डॉक्टर म्हणाले , “हे बघा मिस्टर ,तुम्हीच असा धीर सोडला तर कसे होणार ? थोडा वेळ द्या , होईल सगळे ठीक.”


घरात असलेली स्थिती कानी पडल्यावर ओवी आत जाईल का ?
ओवीला त्या मुली विषयी माहिती मिळेल का ?

पाहूया पुढील भागात क्रमशः

©®सौ.प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)


🎭 Series Post

View all