Login

#बंध रेशमी नात्याचे भाग -४५

कशी असेल अंश ,ओवी आणि अर्णवची भेट ?


#बंध रेशमी नात्याचे.. भाग- ४५


रियाचा हा निर्णय ऐकल्यावर आईला तर धक्काच बसला.

“नाही हं रिया , मला हे योग्य वाटत नाहीये. अगं किती दिवस झाले आहे मुलांना तुझ्या सहवासात येऊन. अगं लहान आहेत ती. देवाने त्यांना एकत्र पाठवले तर तू अशी त्यांची ताटातूट नकोस बरं करू. कोणा एकालाही असे तुझ्यापासून दूर करणे तुला किती कठीण जाईल समजतेय का तुला ?” आईचे डोळे डबडबले होते.


हे सर्व बोलने बाबा दरवाजातून आत येताना त्यांच्या कानावर पडले. त्यांनी रियाची बाजू घेत आईच्या या बोलण्याला दुजोरा दिला.

ते म्हणाले , “आय एम प्राऊड ऑफ यु बेटा ! अगं कोणत्याही आईला तिच्या मुलांपासून दूर व्हायला कधीच आवडत नाही पण काही निर्णय परिस्थितीनुसार घ्यावेच लागतात. भगवान श्रीकृष्णांनाही जन्म जरी देवकीने दिला असला तरी त्यांना यशोदेकडे आपले बालपण घालवावे लागले आणि त्यातून समस्त मानव जातीचे हित झाले. कंसाचा वध झाला. एकंदरीत दुष्टांचा संहार करण्यासाठी देवानाही आईला सोडावेच लागले. तसेच हा जो काळ अर्णवच्या आयुष्यात आला आहे तो काळ पुसता येत नसला तरी त्याच्यावर हळुवार फुंकर मारण्याचे काम रिया करतेय तर तू का तिचा निर्णय बदलायला सांगतेस.( बाबा रियाच्या आईला उद्देशून म्हणाले.) आणि रिया ,तुझे बाळ श्रीकृष्णासारखे अर्णवच्या घरी अगदी आनंदाने वाढेल याची मला खात्री आहे.” बाबांचे हे बोलणे ऐकून रियाने बाबांना मिठी मारली.

“बाबा या दोघांपैकी कोणालाही एकाला दूर करणे माझ्यासाठीही सोपी गोष्ट नाहीये पण अर्णव नाराज असलेला मला नाही पाहवत. मी काय तरी करू ?” रिया डोळ्यातून ओघळणारे अश्रू टिपत बोलली.


“तू तेच कर जे तुझे मन तुला करायला सांगतेय. तू घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. या बाळांवर जेवढा अधिकार तुझा आहे तेवढाच अर्णवचाही आहे.तुला खरं सांगू रिया मला तुझा हा निर्णय मनापासून आवडला आहे. म्हणजे जर अर्णव आणि ओवीचा संसार वेल भरला असता तर मी तुला कधीच त्यांच्या संसारात हस्तक्षेप करू दिला नसता. पण आता परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा गो- अहेड.” बाबा म्हणाले.


रियाची आई मात्र एकदम शांत झाली होती. दोन्ही मुलाकडे पहात त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होती.

“तू राकेशला फोन करून लगेच तुझा निर्णय कळव. नाहीतर उशीर व्हायचा.” बाबा पुढे म्हणाले.

रियाने राकेशला कॉल केल्यावर जड अंतःकरणाने तिने घेतलेला निर्णय सांगितला. राकेशचा आनंद ओसांडून वाहत होता. अखेर अर्णवला त्याचा अंश असलेले त्याचे बाळ मिळतेय यापेक्षा दुसरा आनंद कोणताच नव्हता. त्याने रियाचे कौतुक केले.

“खरंच रिया तू खूप चांगली आहेस !” राकेश म्हणाला.

“राकेश हे मी फक्त तुझ्याच तोंडून ऐकते. बाकी मला चांगले म्हणणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे.तूच मला समजून घेऊ शकतोस.” रिया हसून म्हणाली.

राकेश मनात विचार करत होता. ‘रिया काश तुला माझ्या भावनाही समजल्या असत्या तर ? आपल्याला जी व्यक्ती आवडते ना , त्यांच्या चुका आपोआपच लुप्त होत असतील अगं. मला तुझी चूक झाल्यावरही परिस्थितीला दोष द्यावा वाटतो‌ आणि तुझ्यातील फक्त चांगल्याच गोष्टी नजरेस पडतात.’

“राकेश अरे काय म्हणतेय मी ? हॅलो राकेश !”रियाच्या आवाजाने राकेश भानावर आला.


“हॅलो रिया! बोल ना.” राकेश.

“कुठे हरवतोस रे तू सारखा. तू अर्णवशी बोल आणि मला कळव. मी लगेच निघेन. ” रिया.

“हो ,हो. लगेच करतो त्याला फोन.” असे म्हणून राकेशने फोन ठेवला.


राकेश अर्णवला फोन करत होता पण तो फोन रिसीव करत नव्हता तेव्हा राकेशने फोन कट केला आणि तो आपल्या कामांमध्ये बिझी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अर्णवणे राकेश ला कॉल केला तो आणि ओवी अनाथाश्रमामध्ये जाण्यासाठी निघतात असे अर्णव म्हणाला राकेशला मात्र आता काय बोलावे हे सुचत नव्हते तो पटकन म्हणाला अरे सध्या अनाथ आश्रमामध्ये आपल्याला जाता येणार नाही आठ दिवस थांबावं लागेल त्यासाठीच तर काल मी तुला कॉल केलेला पण तू रिसीव केला नाहीस हो अरे मी हॉस्पिटलमध्ये ओवीला घेऊन गेलो होतो ओवीची प्रकृती थोडीशी सुधारत आहे आणि परत माझ्या कामात इतका गुंतलो की तुला कॉल करायचा विसरूनच गेलो पण तू लवकर अनाथ आश्रमामध्ये चौकशी करून बघ त्यानंतर मी एक मोठा निर्णय घेतलाय हे शहर कायमचं सोडून जायचं अर्णव खिन्न होऊन म्हणाला.

काय राकेश आश्चर्याने म्हणाला.

“हो अरे , या शहरात नेहमीच माझ्या आयुष्यात चढउतार आले जे मी सहज पेलू शकलो पण यापुढे नाही सहन होणार. म्हणजे आजूबाजूचे लोकही ओवीला प्रश्न विचारून सतत भेडसावून सोडतायेत. परत दत्तक घेतलेले बाळ आणि त्याबद्दलच्या चौकशा सुरू होतील त्याची उत्तरे देताना ओवील फार त्रास होईल आणि ते मला अजिबात सहन होणार नाही. ओवीची जी परिस्थिती आहे तिला पाहता शहरापासून बाळाला घेऊन लांब जावे असाच माझ्या डोक्यात प्लॅन सुरू आहे.”अर्णव किशोर जवळ आपले मन मोकळे करत म्हणाला.

किशोरला हे ऐकल्यावर थोडेसे वाईट वाटले पण अर्णव जे बोलत होता त्यातही तथ्य होते त्यामुळे त्यानेही अर्णवच्या निर्णयाचे स्वागत केल्याचे कबूल केले.

अर्णवशी बोलणे झाल्यावर राकेशने रियाला फोन केला. रियाला सर्व हकीकत सांगितली. रिया लगेच बॅग भरून स्वतःच्याच प्रायव्हेट फ्लाईटने इंडियात यायला निघाली. सोबत आई-बाबाही होते.


रियाने अजून बाळाचा नामकरण विधीही केला नव्हता. तिला चिमुकल्यांचा बारशाचा सोहळा खूप थाटात करायचा होता पण तिने राकेशला बजावून सांगितले ,

“अर्णवला बाळाचे बारशे करायला सांग आणि त्याचे नाव अंश ठेवायला सांग.”


राकेशला अर्णवला हे कसे सांगायचे ? हाच प्रश्न पडला.


तेव्हा रियाने राकेशला म्हणाली ,“बाळाची आई तुझ्या मित्राची बायको आहे असे सांग आणि ती सध्या बाळाला सांभाळण्यासाठी सक्षम नाहीये. कोणत्यातरी दुर्धर आजाराने पीडित आहे आणि म्हणूनच तुझ्या मित्राने हे बाळ दत्तक द्यायचे ठरवले आहे असे सांग.”


आता राकेशच्याही डोक्यात सगळा प्लॅन रेडी झाला. एवढ्याशा छोट्या जीवाला पाहिल्यावर राकेशचे मनही तुटत होते. बाळाला आता आईच्या मायेची ऊब मिळणार असली तरी अमृतासारखे असलेले तिचे दुध मात्र मिळणार नव्हते.


अर्णवला आणि ओवीला एका आलिशान हॉटेलमध्ये राकेशने बाळाला घ्यायला बोलावले.

“अरे राकेश आपण तर अनाथाश्रमामधून बाळ घ्यायचे ठरवले होते ना ? मग तू आम्हाला हॉटेलमध्ये काय बोलतोस ?” अर्णव घाबरून म्हणाला.


राकेश म्हणाला , “अर्णव तुझा माझ्यावर विश्वास आहे ना रे ?”

“हो. पण असा का बोलतोस तू ?” राकेश.


“अरे माझ्या मित्राला मुलगा झाला आणि त्याची बायको एका आजाराने ग्रासली गेलीय. थोड्याच दिवसांची सोबती आहे. त्यामुळे बाळाचे संगोपन तिला जमणार नाही तेव्हा डॉक्टरांनी तिच्यापासून बाळाला लांब ठेवा. असे सांगितले आहे आणि त्याने जेंव्हा मला फोन केला तेव्हा माझ्यासमोर तुझा चेहरा आला.” राकेश म्हणाला.

राकेश जे बोलत होता ते ऐकून रियाच्या आईचे डोळे डबडबले होते.


“ओवी आणि‌ तूझ्या इतके प्रेम त्या बाळाला दुसरे कोणीच देऊ शकत नाही याची मला खात्री पटली आणि म्हणूनच मी असा निर्णय घेतलाय की ते बाळ तू दत्तक घ्यावेस.” राकेश पुढे म्हणाला.


अर्णवने ओवीला राकेश काय म्हणाला ते सांगितले. तेंव्हा मात्र ओवीला त्या बाळाची खूप दया आली. कारण त्या बाळाचे आईचे सुख आणि ओवीचे मातृत्वाचे सुख देवाने हिरावून घेतले होते असे तिला वाटले.


ओवी अर्णवचा हात हातात घेत डोळ्यातून अश्रू ढाळू लागली.

ओवी म्हणाली , “अर्णव मी त्या बाळाला आईची माया देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन पण त्याला खायला काय द्यायचे , त्याच्या वेळा हे सगळे मला जमेल ना मला ? मी एक चांगली आई बनू शकेल ना?”


“अगं इतके सगळे पेरेंट्स दत्तक मुलं घेतात ना ? मग तेही वाढवतातच की आपल्या मुलांना. आपण बाळाला जन्म दिला नाही म्हणून काय झाले ? आपल्याला सगळे जमेल. शिवाय आपण बाळासाठी एक स्पेशल पीडीअट्रिश्न ठेवूया. तिच्या ऑब्झर्वेशन खाली आपले बाळ मोठे होईल.” अर्णव ओवीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला.


कशी असेल अंश ,ओवी आणि अर्णवची भेट ?

पाहूया पुढील भागात क्रमशः
सौ. प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)